बाप
****बाप***
🌷🌷🌷🌷
....नानाभाऊ माळी
***************
बाप आभाय आभाय
बाप सवसार व्हडस
घेराये वडनं रें झाडं
आंगनी साल काढस!🌷
बाप घरनां आधार
बाप खाटलान्या दोऱ्या
लाथा कोनी रें हानु द्या
खांब धरी ठेवस सऱ्या!🌷
आख्खी हयाती राबस
डोये दिखे नईनां पानी
रोज दपाडस आंसू
बाप दुन्यानां रें दानी!🌷
बाप कोपरें लपेलं
कशी कोपरी मयेलं
सुई दोरान्ह ठिगय
बाप जागेजाग वयेलं!🌷
बाप कोनल्हे कयेनां
सार सवसार मयेलं
दयी दुयी बाजरीम्हा
बाप चिखोल व्हयेलं!🌷
माने दुसेरं बांधेलं
सोता औतलें नाडेलं
हुभा सवसारलें व्हडी
बाप कोपरे मढेलं!🌷
मनम्हा ठेवस रें राज
पोरें करी ऱ्हातसं नाज
बाप डोयांनी पापनी
आंसूलें नई से लाज!🌷
चटका भोगीसनी सोता
बाप व्हयी जास डागी
जग घोमाली घोमाली
पोटे भूक जास लागी!🌷
***************
🌸🌸🌸🌸🌸
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा, जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो नं-७५८८२२९५४६
९९२३९७६५००
दिनांक-१५ मार्च२०२२
Comments
Post a Comment