।।सुंदर जग पाहू।।
।।सुंदर जग पाहू।।
**********
राहुनि गेले मागे काही
आता वळूनि नको पाहू
सूर तुझे माझे जोडोनि
आपुले नवीन गीत गाऊ...!
जुन्या क्षणांची रात्र नकोशी
निघूनि गेली दूर.......
पहाट घेऊनि आली संगती
नव्या दमाचा स्वर............!
झाले गेले विसरुनि आता
नव्या वाटेने जाऊ......
थोडे तुझे थोडे माझे
आपुले नवीन गीत गाऊ.....!
लाल पिवळे तांबूस फुटले
सूर्य उघडतोय दार........
राम घेऊनि सोबतीला
करू नवा सेतू पार...........!
जपून ठेव तू मुखात तुझ्या
अमर प्रीतीची वाणी......
देत राहू वंगण त्यासी
करू या रक्ताचे पाणी.......!
नजरा आपुल्या एक झाल्या
नवं सुंदर जग पाहू.........
राहुनि गेले माघारी
त्यांना सोबत घेऊनि जाऊ...!
########
.........नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१७ ऑगस्ट२०२०
Comments
Post a Comment