लवनं
*अहिरानींन धन--(भाग-१२ वा)*
*।।..लवनं..।।*
*........नानभाऊ माळी*
*भाऊ-बहिनीस्वन!*
*"उंडायांनां चटका भारी*
*तू कोल्लां व्हई जास........!*
*खडक काया तपे वर*
*लवंनं भुक्या तिष्या ऱ्हास..!*
*वरसारदनी झडीलें आक्सी*
*जागे व्हई जास.............!*
*हासी खुसी जग दुन्यान्हा*
*लवंनं हिरदम्हा ऱ्हास.......!"*
वरसारदनां दिनम्हा बल्ला!बल्ल्या!पडीत!ताकडा!जंगल... यासना डोकावर चौम्हेर कोठेभी पानी पडत ऱ्हास!आर्ध-मर्द पानी जिमींनम्हा जिरतं ऱ्हास!मुरत ऱ्हास!ऱ्हायेल-सुहेल हेट्या उतारकडे सापडांमायेक येडावाकडा रस्ता काढी मव्हरे-मव्हरे सरकत ऱ्हास!मझारमा कोनी भी आड-हूब येवो!त्यांलें संगे-संगे लयी पयी जावानी पक्की द्यानतं ऱ्हास!बल्ल्यास्ना उतारवर ज्या गनज दगडे-दुगडे आडा-हूबा जोर लाई हूबा ऱ्हातसं!हूबा दिखतसं!पानीनां मव्हरे आनी ते भी उतारनां पानीनां मव्हरे कोन्हचं काही चालत नई!दगडे!माटी!हूबा झाडे!गवत...बठ्ठ बठ्ठ!जे आडं-हूब यी ते पानीनां लोंढाम्हा एक व्हई जास!व्हाई लयी जास!नई ते मंग पूर्त आड पाडी जास! त्या व्हाता पानील्हे भुत्या बाबांनी ताकद ई जास!संगे लयी पयी जावानं हायीचं ध्यान ऱ्हास!बल्ली-उतारनं पानी बठ्ठ कोरी-कारी खाले व्हावाडी लयी पयेत ऱ्हास!दगडे-दुगडे!घसरी- घुसरी भिण्णाट गोटा व्हयी पयेत ऱ्हातसं!हेट्या उतारकडे पयेत ऱ्हातसं!बल्ल्यास्वरन्या धाकल्ल्या कोरायेल शेऱ्या-चाऱ्यास्ना पानीन्हा लोंढा उतारकडे ढागेंढागं पयेत ऱ्हास!
*माटडं!खडगनं!दगडे बठ्ठ खाले उतारनां तयलें पानी संगे व्हाई येतं ऱ्हास!आशा गनज शेऱ्या-चाऱ्यास्न एकमझार गोह्यम्ह व्हई जास!डभुई* *पानीनां लोंढा उतारकडे व्हात ऱ्हास!उतारकडे पानी पयेत ऱ्हास!बल्ला,बल्ल्यास्वरन्या त्या बठ्ठया शेऱ्या-चाऱ्या-लांग्या एकमझार व्हयेल-घुसयेल पनीनां मोठा लोंढा* *मव्हरे व्हडीव्हडी!दवडी दवडी!व्हात ऱ्हास!भाऊस्वन त्यालें आपुन 'लवन' म्हंतस!नाला म्हंतस!नागझीरी म्हंतंस!*
लवंनं मव्हरे व्हाई-व्हाई!पानीन्हा लोंढाम्हा कोरायी-कारायी चवडां व्हयी!माटीनं!मट्यारानं डभुई पानी!च्याहगंत पानी... लवनंम्हा वरवर व्हात ऱ्हास!खडगंनं मट्यारं तयलें आटकी बठस!मट्यारं आनी खडगंनंनी वाउं पानीनांखाले संगयेत ऱ्हास!लवंन खय-खय व्हातं ऱ्हास!वरसारदम्हा मुकला पोटझोडया पानी पडतं ऱ्हास!कव्हय लवनलें कंबर छातीपाउत पानी भिडतं ऱ्हास!लवनं कव्हय मनोसले तथानां काटलें सोडत ऱ्हास!व्हाता पानीम्हा झेपी झेपी मानोस पुरा लांबा पडी जास!कव्हय शेलना हिसका मारी मानोस बैलगाड जुपी लवनंनां पूरम्हा जित्रबसहित सोताले ढकली देतं ऱ्हास!मानवर दुसेर!गयालें जोतेस्ना फास लागेलं!शेलनां हिस्काम्हा बैलं च्यारीपाय अवकाया करी-करी, झेपी झेपी!नाक तोंडम्हा पानी चालनं जातं ऱ्हास!पूर गाडालें हेट्या-हेट्या व्हडात ऱ्हास!जीव लवंनंन्हा पूरम्हा टाकीस्नि!धोका आंगवर लीस्नि!गाडा संगे बैलं झेपी झेपी तथानां काटलें भिडी जात ऱ्हातसं!वरसारदम्हा हाऊ जीवनां खेय रोजचं चालू ऱ्हास!लवन हेट्या व्हडत ऱ्हास!पानीनां लोंढा व्हडत ऱ्हास!मानोस आडा व्हडत ऱ्हास!लवंनं मानोसलें घडत ऱ्हास!
*भाऊ-बहिनीस्वन!*
*कुनबीनी खेती तथाना काटे ऱ्हास !ऱ्हाव्हालें मातरं आथानां काठले ऱ्हास!बठ्ठ आवर-सावर तथानां* *काटलेचं ऱ्हास!लवनं दोन्ही काटे भरी व्हात ऱ्हास!कुणबी हापक्या मारत ऱ्हास!हूब पीक पानी दखत ऱ्हास!डोकावर गोंटांनी नई ते मंग* *पलास्टिकनी घोंगडी पानीनां शितडा वाचाडत ऱ्हास!कुणबी आर्धा-मर्दा वल्ला व्हत ऱ्हास!हाई बठ्ठी गंम्मत पानीम्हा* *गरायेलं व्हाता लवनं दखत ऱ्हास!लवनंनां पुर वसरी जावावर पानी खल्ली गुढघानंखाले चालनं जास!तेचं पानी हेटली धारकडे व्हडत ऱ्हास!मन्हा धाकल्पने हाई बठ्ठ* *दखेलं!आयकेल!करेल से भाऊस्वन!*
*"कव्हय दवंडी लहू*
*पोटे तुन्हा उगत ऱ्हास....!*
*चारा चुरा झाडें झुडे*
*_तू जग दुन्याले देस.......!"_*
....भाऊस्वन! वरसारदम्हा तव्हय नेम्मंन सरावन महिना ऱ्हाये!आमावसनां दिन पोया ऱ्हाये!गावंनां बठ्ठा बैलं लवनंल्हे येत ऱ्हायेत!कुणबी सोताना बैलं शिंगंडास्फईन खालनी खुरं पाउत धोयी काढेत!हाऊ आनंद दखी, लवनं सोतां खुशीम्हा पागल व्हयी जाये!पानीनां लोंढा हेट्या पाय व्हढत ऱ्हाये!आखो दल्ला-खल्ला बल्लास्मानं जिरेलं-मुरेलं पानी लवनं व्हडी व्हडी सोतांन्हा पोटे व्हावाडतं ऱ्हाये!घरे घरनां बैलं आंग धोयी नाचत कुदत दारनां मव्हरे हूबा ऱ्हायेतं!आंगवर झुल!शिंगडास्ले रंग लायी सजी सुजी पुरनं पोयी खावागुंता हूबा ऱ्हायेतं!वरीस्मा पोयांदिन बैलंल्हे आराम ऱ्हाये!पोयांदिन गावंनां बठ्ठा बैलं लवनंवर आंग धोयी लवनंल्हे बैलंनां पाय लागतं ऱ्हाये!लवनंल्हे खुशी व्हत ऱ्हाये!
लवनंनां दोन्ही तिरल्हे डोकापार मातेलं गवत दिखत ऱ्हाये!आल्लग-आल्लग झाडे दिखत ऱ्हायेतं!त्यासन्या फांट्यास्ले वार्ग नाचाडतं ऱ्हाये!
*....लव्हाई ते लवनंनी शान ऱ्हास!लवनंम्हा लहूनां गनज बेट दिखतं ऱ्हातंस!दुन्यांना कितलाभी पानी पडो!ढग फुटी व्होवो!लवनंलें पुरन्ह पानी डोकापार भिडी जात ऱ्हास!लव्हाई* *पानीम्हा पुरी आडी पडी जात ऱ्हास!पानी वसराव्हर मातरं आखो जसीनं तशी*
*ताठ हुबी ऱ्हास!धाकल्पने घरंनास्न काम नई आयकावर लहूवरी आम्हले चांगलचं शेपाली काढेत!आंगवर* *लहूनां हिरवा-निय्या लालसर वय उमटी पडेतं!लहूनं नाव काढताचं ल्हाये ल्हाये कामले* *लागालेचं जोइजे आशी त्या लवनंनां लहूनी ख्याती व्हती!लवनं आसी काही भायी* *उगाडत ऱ्हाये!नेम्मंन आम्हले चमकाडत ऱ्हाये!दवंडी ते लवंनंम्हा कथीभी युगेलं दिखतं ऱ्हाये!घरम्हा* *भालदेव बसाडाना येलें लवंनम्हाईन लहू उपाडी लयीयुत!आनी भालदेवलें हूबा करी देऊत!*
*"काटे काटे हेरी भारी*
*आक्सी पांझरी ऱ्हातीस..!*
*कुढी पिढी गयी मांगे*
*तुले दखी जातीस..........!"*
भाऊस्वन!कव्हय-मव्हय लवंननां व्हाता पानीनी धार खल्ली काटनां पोटम्हा घुशी जाये!पानींनी व्हाती झिरी काट कोरीकोरी मव्हरे निंघी जाये!पानी जिमीनम्हा जिरी-मुरी हेरी वल्ल्या जरत ऱ्हायेतं!वावरे हिरवा दिखेतं!लवननां पोटल्हेचं धाकला-धाकला बुडस्ना बेट तयार व्हयी जायेत!आथ-तथ पाणी व्हात ऱ्हाये!मधम्हाचं टेकडं दिखे!मातेल गवतनं बेट मझारम्हाचं वाढत ऱ्हायेत! हिरवगार शेवाय पानीनां डाब्रास्मा दिखतं ऱ्हाये!धोनं धोणाऱ्या माय माऊलीस्ना पाय खडकवर संगयेल-चिटकेलं शेवायमुये आक्सी निसटत ऱ्हाये!दगडेस्वर निस्टी हात पाय सुजाडत ऱ्हायेत..धाकला मोठल्ला झाडे भी लवनम्हा मुई गाडी वाढत ऱ्हायेत!हूबा ऱ्हायेतं!लवंनंल्हे धिवसा देत ऱ्हायेत!!
भाऊ-बहिनीस्वन!
*तव्हय माले भलत आनबक वाटे!धाकल्ला-मोठल्ला बल्लास्ना पोटे* *जलमलें येलं लवनं......* *गुढीपाडा-आखाजी पाउत झुईं झुईं व्हाता ऱ्हाये!लवनंन्हा झिर जित्ता* *ऱ्हायेतं!बल्लानां पोटमान्ह संगयेलं पानी!झिरा व्हयी लवनंनां सिद्रास्माहीन उस्मई वर येत ऱ्हायेतं!वांउम्हा झिरा कोरी-कोरी... हातवरी* *उपसी उपसी!काचनां मायेक आस्सल पानी झिराम्हा येत ऱ्हाये!छाती-पोटवर* *वाकीस्नि..... झिराम्हा तोंड बुडाईस्नि पानी घटघट पेत ऱ्हाउत!पोट गार व्हत ऱ्हाये!मन गार व्हत ऱ्हाये!सोतां लवनं पानी पाजी-पाजी गय्यरा आनंद देत ऱ्हाये!लवंनं गरायेत ऱ्हाये!*
गावन्या बठ्ठया माया-बहिनी लवंनंल्हे धोनं धवालें येत ऱ्हायेत! खडकेस्वर धोनं आपटी-उपटी धोत ऱ्हायेत!लवंनंवर उडी वर धुडी पडे!धोनं धवानां आवाज तठला दल्ला खाल्लास्पाउत भिडत ऱ्हाये!त्यांनां प्रतिध्वनी कानवर येत ऱ्हाये!कानलें आल्लग-आल्लग धोनं आपटान्ह संगीत भारी न्यामिंनं वाटे!धोनं धवानां आवाजम्हा!त्या ध्वनीम्हा कव्हय दुःख दपेल ऱ्हाये!कव्हय संताप ऱ्हाये!कव्हय आनंद ऱ्हाये!कव्हय सुख भी ऱ्हाये!माय-माऊलीस्ले लवनं म्हणजे मन मोके करानी हक्कानी जागा व्हती!सुख-दुःख देवा-लेवान्ही जागा व्हती!हुंब्री हुंब्री रडानं!गुमसुम कानगी करानं ठिकानं व्हतं!
*"काटे तुन्हा धोनं धोये*
*डोयानां लवंनंल्हे ये पूर.....!*
*सुख दुःखनं काला मोडी*
*व्हवू काटलें येस दूर........!"*
*लवनं मनम्हानां दबेल हुंडुक मोक्या* *करानां धोबीघाट व्हता!माय-माऊली घरंनं धोनं धोता-धोता तोंडव्हरी गावंन्ह धोनं धोत ऱ्हायेत!सवसारनं गुमसुम गाणं म्हनत ऱ्हायेत!कव्हय आथा-तथानी आक्काडी भी* *पेटाडत ऱ्हायेत!घासलेट वततं ऱ्हायेतं!म्हलावतं ऱ्हायेत!कव्हय मनन्हा गह्येरा!हुंडुक दाटायी येत ऱ्हाये!घडीघडी डोयास्ना लवंनंल्हे पानी व्हात ऱ्हाये!लवंनं आंसू पेत* *ऱ्हाये!डोयांनां पूर वसरता वसरे नई!आंसूम्हा धोनं वल्ल व्हत ऱ्हाये!धोयी धोयी दुःख हालकं व्हत ऱ्हाये!सुख* *दुःखनां!सवसारनां जोजार व्हवू बेटीन्हा मुखे बाहेर पडत ऱ्हाये!दुःख नं पोतडं भरत ऱ्हाये!मन* *हालकं करी!लवनंवर धोनं धोयी-धायी!व्हवू बेटी घरलें मांगे येत ऱ्हायेतं!लवंनं हिरदनं ठिकान व्हत! गोयंमानी जागा व्हती* *!पियापियन्या रावन्या करानी जागा व्हती!लवनं बठ्ठास्न दुःख!आनंद सोतांफान ठी ल्हे!ते बठ्ठ बठ्ठ मव्हरे* *व्हावाडी लयी जाये!लवनंनां तोच जोजार मव्हरे मोठी नदीलें भिडत ऱ्हाये!*
*"खयखय व्हाता लवनें*
*गावंनं काढतसं नाव......!*
*वरसारदनी झडीम्हा*
*बठ्ठ हारकी जास गावं.....!"*
लवनं झुईं झुईं व्हात ऱ्हाये!आंगे पांगे व्हातं पानी काट-काटलें हिरवयनां थंडावा देत ऱ्हाये!उच्चातडांग झाडेस्ना आग्रीवर भारी ईनेल सुगरीननां खोपा दिखत ऱ्हायेत!सुगरीन पोटगुंता!पिल्लासनांगुंता उडत ऱ्हाये!पखे मारत ऱ्हाये!भूक दखत फिरे!लवंनं खालथिन दखत ऱ्हाये!झुईं झुईं पानी व्हात ऱ्हाये!गावड्या,म्हसडा आनी बकऱ्या लवनंनां दोन्ही काठलें चरत ऱ्हायेत!आखो घर बांधेल ढोरेसगुंता लवनंम्हा कापी-कुपी चारानं व्हझा डोकावर बांधी ठी लयी जात ऱ्हायेतं!मव्हरे हिवायाम्हा थंडी वाढतं ऱ्हाये!लवनंनां आंगे पांगे मयानां हेरीस्ले लवनंनं पानी जीरत ऱ्हाये!हारबरा,गहू,कांदा आनी वांगा गुलाबी थंडीम्हा नाचत ऱ्हायेत!
*भाऊ-बहिनीस्वन!*
*उंडायांम्हा व्हाता लवनं आटी जाये!कोल्ला खटक व्हयी जाये!झुईं झुईं पानी ठायकचं थंमी जाये!लवंनम्हा* *जथा-तथा* *धाकला-मोठल्ला पानीन्हा डाब्रा नजरे पडेत!म्हसडा त्या डाब्रास्मा बठी शिंगडा हालायी पानी उडावत ऱ्हायेतं!गावड्या,बकऱ्या दिनभर चरी-चुरी* *दिनमावतलें लवनंन्हा त्याचं डाब्रास्मा तोंड घाली मन गरायेस्तोवर पोटलें पानी व्हडत* *ऱ्हायेत!*
*"जित्ता कोल्ला लवनें*
*ऱ्हातसं गावेगावं..............!*
*खयखय पानीवर*
*दुन्यांनी चाली ऱ्हायंनी नाव..!"*
उंडायांम्हा लवंनं खल्ली आटी जाये!कोल्लाखटक लवंनंनां खडक आणि वांउ पाय चटकाडत ऱ्हाये!हुनं वार्ग व्हात ऱ्हाये!उघडा नागडा कायामटक खडक पानीन्ही शाल सोडी सूर्यदेवनं तपेल उनं पंघरी ल्हेतं!
निसर्गानां हाऊ खेय चालूचं ऱ्हास!चालू से!मव्हरे चालूचं ऱ्हायी!काळ..काय मव्हरे सरकत ऱ्हास!उंडायां,वरसारद आनी हिवायालें मव्हरे सरकायी ऱ्हास!दिन पयेत ऱ्हातसं!लवनं पानकायाम्हा पोटभरी व्हात ऱ्हास!हिवायाम्हा झुईं झुईं व्हात ऱ्हास!
भाऊ-बहिनीस्वन!
*जिरी मुरी पानी तुंन्ह*
*पहिलेंग गरायनी व्हई भुई..!*
*जवय तू जलंमनां व्हई*
*तू तू पानी देता भोई.........!"*
*लवनं गावनां आंगे ऱ्हास!लवनंवर माय बहिनी एकमझार उनंधोनं धोत ऱ्हातीस!उंडायांम्हा लवंनं बठ्ठास्ले पऱ्हा करी जास!दूर करी जास* *!लामेनम्हा टाकी जास!मव्हरे लवनं नदिल्हे भेटस!गनज लवनें नदिल्हे भेटत ऱ्हातसं!मव्हरे नदी समुंदरलें जाई भिडसं!लवनेंस्ले* *पोटम्हा घाली नदी समुंदरंम्हा एकजीव व्हयी जास!हाऊ परिवर्तननां खेय युगेयुग चालूचं से!भूमितीनां गोल गोल वर्तुळनां मायेक* *!जठेंग चालू पडो तठेचं यी भिडो!*
भाऊ-बहिनीस्वन!
लवंनं काय नी निसर्ग काय!मानोस काय नी पशु काय! जलमलें येवाफाईन माटी व्हवालगुन!राख व्हवापाउत या खेयमा आडकी जात ऱ्हास!निसर्गानी साखय उज्जी व्हडी बांधेल ऱ्हास!आते ते झाडे तुटी ऱ्हायंनातं!जोइजे तश्या पानी पडत नई!लवनें-खवनें कोल्ला खटक व्हयी जायी ऱ्हानातं!लंवनं,नदील्हे वांउ ऱ्हायनी नई!आते जठेबन तठे लवंनंम्हा येड्या बाभुई आंगल्हे झुली ऱ्हायंनातं!येड्या बाभूईस्नि बठ्ठा लवंनें झाकी मारेल सेतस!
*उंडायांम्हा लवनंनां खडक चटका देत ऱ्हातस!झाडे तुटी ऱ्हायंनातं!पानीगुंता वावरे तंयमयी ऱ्हायंनातं!सोनानां जुना* *दिन याद करी-करी पोट भरी लेवो!मननी !तननी भूक यादम्हा भागाडी लेवो!..खयखय* *!झुईं-झुईं व्हाता लवंनं सप्पनम्हा देखत ऱ्हावो!..हायीचं देखानं बाकी ऱ्हायेलं* *व्हत!आखो काय??....*
भाऊ-बहिनीस्वन!
आखो नवीन धन संगे!नवा इशय संगे मव्हरे भेटसुत!तवलोंग राम राम मंडई!राम राम!🌷🙏😌
--------------
*.......नानाभाऊ माळी*
*शिंदखेडा, जि.धुळे*
*(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)*
*मो. नं. ७५८८२२९५४६*
*९९२३०७६५००*
*दिनांक-२७जून २०२०*
Comments
Post a Comment