मित्रा किशोर!सेवानिवृत्तीची शुभेच्छा फुले!
मित्रा किशोर!सेवानिवृत्तीची शुभेच्छा फुले!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*********************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
वर्णन करू शकत नाही पण अनुभूतींचा प्रचंड खजिना आपण सोबत घेऊन हिंडत असतो!आयुष्याची सुरुवातच ज्यांच्या सहवासाने होते ते मित्र बालपणीचे असतातं!🌹
बालपणी फक्त मित्र असतो!सहपाठी असतो!पुस्तकं आदला-बदलीचा वर्गातील सहकारी असतो!पेन,पेन्सिल,खोड रबर देण्या-घेण्याचा!गरजेचा!हक्काचा मित्र असतो!मित्रत्वाचे धागे हळूहळू वाढत्या वर्गांप्रमाणे, वाढत्या वयाप्रमाणे घट्ट होत रहातात!🌹
आपला वर्ग!आपली शाळा!आपले सहपाठी!आपले गुरुजन सर्वंच कसे मनाने!हृदयाने बांधले गेले होतें!शाळेतून घरी आलो तरी शाळेतीलचं विचारचक्र डोक्यात फिरत असें!हक्काचं मन मोकळं करण्याचं ठिकाण म्हणजे शाळेतील वर्ग मित्रच असतं!दर वर्षी एक एक वर्ग उत्तीर्ण होत कधी शाळेतील निरोप समारंभ येऊन ठेपला कळलं देखील नाही! तेंव्हा फक्त डोळ्यातील आसवं सांगत होती "आता ताटातूट होणार!इतकी वर्षें आपण एकत्र राहिलो ते दिवस आणि क्षण सर्वंच स्मृतीत राहातील!"...खरचं पुढें प्रत्येक मित्रांच्या वाटा वेगळ्या झाल्या!रस्ते बदलले!काळ पळत राहिला!जगणं थांबलं नाही!🌹
वर्गात एखादा विध्यार्थी अतिशय हुशार असतो!कोण मध्यम असतो!कोण कमी असतो!कासवाची आणि सशाची स्पर्धा संपलेली असतें!एखाद्याची आर्थिक परिस्थिती उत्तम असते!तर दुसऱ्याची अतिशय गरीबीची असतें!पण मित्रत्वात या गोष्टींचा अडथळा कधींच येत नसतो!मित्रत्वाचं नातं शुद्ध सोन्यासारख असतं!निर्मळ असतं!आपुलकीचं असतं! पुढें असंच वृद्धिंगत होत जातं असतं!कधी कधी सख्ख्या भावापेक्षाही हृदयाचें,जवळचें नाते घट्ट होत जातं असतं!मैत्रीच्या नात्यात भावनिक ओलाव्याचे क्षण आपोआप जन्म घेत रहातातं!🌹
मित्र सखा असतो!मित्र गुरू असतो!मित्र भावाहून जवळचा असतो!अगदीं हृदयाचा होऊन बसतो!सुख दुःखाच्या क्षणी धावून जाणारा तो मित्रच असतो!खरं रक्त नात्यांचा भाऊ होऊन बसतो!वर्ष संपतात!वय वाढत जात!आपण काळासोबत पुढे जात असतो!मित्र संसारात, व्यवसायात,नोकरीत रममाण होऊन जातात!...सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी मात्र मित्र परिवार मानसिक,शारीरिक अन आर्थिक आधार म्हणून उभे रहातातं!हेवा वाटावा असं नातं जन्म घेत रहात!नातं वृद्धिंगत होत रहात!..."हाच मित्र माझ्याच आईच्या पोटी,माझा भाऊ म्हणून का जन्माला आला नाही?" इतकं आतड्याचं नातं होऊन बसतं!
जिवाभावाचे मित्र भेटणे देखील भाग्याचं असतं!कदाचित मागील जन्मी पुण्य केल्याचं फळ असेलही!.. मित्र वयोमानाप्रमाणे आपल्या व्यवसायातून,नोकरीतून हळूहळू सेवानिवृत्त होतातं...५८/६०व्या वर्षी सेवानिवृत्ती नंतर दुसऱ्या इंनिंगची सुरुवात करतात!बालपणीचा मित्र वृद्धापकाळाकडे झुकायला लागतो!केस पांढरे व्हायला लागतात!डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा येतो! मित्रत्वाचे धागे मात्र घट्ट अधिक घट्ट बांधले जात असतातं!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷
बंधू-भगिनींनो!
आज दिनांक ३०जून रोजी आमचा मित्र!शाळेतील बालपणीचा मित्र!खोडकर मित्र!जिवाभावाचा मित्र!सरकारी खात्यातील दिर्घकाळ सेवापूर्ती नंतर सेवानिवृत्त होत आहे!.."किशोर जोशी"!नावाप्रमाणेच किशोर!खोडकर!हसतमुख गुलाबी मुखडा!बालपणीचा कोवळा किशोर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहे!अजूनही किशोर वयीनचं वाटतो!..बालपण!तरुणपण!संसारीपण!मुलं आणि नातवंड या अशा गोड गोकुळ फुलवत फक्त सरकारी नियमानुसार सरकारी सेवेतून निवृत्त होत आहे!निवृत्ती कशी म्हणता येईल?kishor is transferred to pension section!!🌹
मित्रास!किशोरला सेकंड इंनिंगसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!आपण असेंच आरोग्यसंपन्न आयुष्य जगून इतरांनाही प्रेरित करीत रहा!१०० वर्षांहून अधिक आयुष्य आपल्या वाट्यास यावे!आपणास लाभावे!मित्रांच्या माकड चेष्टा देत घेत, आनंद घेत, आयुष्याची सुंदर वाटचाल करीत राहावे!सुख-दुःख देत घेत बालपणापासून एकत्र राहिलोतं!एकत्र खेळलोतं!भेटलोत!मुलांच्या लग्नात आपण आनंद देत घेत सांसारिक सुखाचा आनंद देत राहिलो!जीवनातील निखळ आनंद नेहमीचं वाटतं राहिलात!मित्र देखील मकडांगतं आपल्या समवेत इतरांच्या माकडचेष्टा करीत आयुष्य सुंदर,आनंदी होऊन जगत राहिलो!🌹
...जीवनाचा या जन्मीचा पुरेपूर आनंद घेत,वेळेचा सदोपयोग करीत जगावे हिच हृदयातून,आंतरिक शुभेच्छा प्रदान करतो!लहानपणी आपण बाबांचे बोट धरून शाळेत आलो होतो!आता आपण आजोबा बनून नातवंडांचे बोट पकडून त्यांना शाळेत पोहोचवूयात!पुढे तेच आपल्या म्हाताऱ्या काठीचा आधार होऊन आपणांस पुन्हा गाव-गल्ली फिरवतील!निवृत्ती म्हणजे नवीन जीवनाची नवी संधी आहे!तिचा पुरेपूर फायदा घ्यावा!खोडकरपणा मात्र जीवनाचा भाग बनवा!..श्री किशोरजी जोशी आपणास सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा व्यक्त करतो!🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*********************
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०जून२०२२
Comments
Post a Comment