खान्देश अहिराणी हिरा🌷मोहन पाटील कवळीथकर भाग ३
खान्देश अहिराणी हिरा
🌹🌷🌷🌷🌷🌷
मोहन पाटील कवळीथकर(पांट-३)
🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
-----------------------------------
...नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
कवी व्हडीतानी लिखत नई!कविता त्यानी निर्मिती ऱ्हास!कायेज वती लिखत ऱ्हास!आपला पील्लालें वाढावतं ऱ्हास!वाडे लावत ऱ्हास!सोनानां मोलना सबद टाकतं ऱ्हास!उज्जी जीव लावतं ऱ्हास!कविता सोतांनं पिल्लू ऱ्हास!कवीलें प्यारं ऱ्हास!सोतांनां जार ऱ्हास!तेच पिल्लू रसिकनां मव्हरे जास तव्हय आमायी-कोमायी कवी त्याले मव्हरे धाडतं ऱ्हास!रसिकजनं मन जिकागुंता बठ्ठास्ना मव्हरे मांडतं ऱ्हास!कवी हारकी जास!हुलकी जास!.....आसाचं...आसाचं जमीनवर हुभा पन जीवन रस निचोडी आपला मव्हरे कविता मांडणारा अहिराणी "कवी मोहन पाटील" यासनी कविता आनी त्यास्न जगनं!....दखा बठ्ठा जेठा- मोठा भाऊ-बहिनीस्वन!🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹
.......छातीवर!मनवर!... मोठ्ठ व्हझ ठीस्नि पोट भरागुंता आपलं जलमगाव!माय ममतानं गाव!माडीनं गावं... शहादा तालुकानं गाव.... कवळीथ सोडीस्नि मोहन २००२सालें सुरतलें यी भिडनां!सुरत मानसेस्न जंगल व्हत!तठे कानाबानानं मायेक व्हयी ग्या...गाव-खेती सोडी सुरतनी माया नगरीम्हा एक धाकुलसा मोहन नावंनां जीव सुरतम्हा एकजीव व्हयी ऱ्हायंता!पहिलं काम भेटन ते साडी बनावानी मिलमां!हेल्परनं काम व्हत!...बारा कल्लाकनी ड्युटी व्हती!कवळीथनी पेरेममायीन नींघी फफोटामां पडी गये था!..काम करी करी लांबा पडी ऱ्हायेतां!मन गावलें... कवळीथलें पउ पउ करे!पीक पानीनं जंगल सोडी गुदमरेलं मानसेस्ना जंगलम्हा यी पडनां व्हता!सुरतम्हा मन आनी जीव दोन्ही गुदमरी ऱ्हायेतांत!आथा आड तथी हेर व्हयी गयी थी!🌷
...पोट...घरदार सोडाले लावस! जोगेनां मानंसे सोडालें लावस!... पाखरू व्हयी!पक्षी व्हयी!पखे लायी सोतां उडत ऱ्हानं पडस!...मांगलं मांगे मनम्हा ठीस्नि व्हाती नदीमां उडी मारनी पडस!...जगागुंता हात पाय हालावनां पडतस!मोहन मांगे कोल्लान देखी....मव्हरे मृगजयनां मांगे पयालें लाग्ना व्हता!सुरतमां राहूशी वाटे नई!पन आते मांगे जावानं नई,आस ठरायीस्नि सुरतनां संमुदरंमां झेपानी आदतं लायी लिधी!भाडानी खोली....!लांब पाय करा ते हुभ भीतडं आडं ये!दिनलें खायेल--रातले मच्छर बठ्ठ रंगत पी जायेत!धिरेधिरे सुरतनं मयकं पानी गोड करी लिध!जेवालें खानावळ!राव्हालें भाडानी खोली!कामलें बारा कल्लाक!....मन आनी शरीर मशीन बनी गयेथ!कारखानामां मस्निस्ना आवाज!खट-खट!खट- खट! दिन-रात चालूचं राहें!मशीन....मालकलें गब्बर सिरिमंत करी ऱ्हायंती!मजूर घानामां पियायी ऱ्हायंता!सुरतन्या कपडा मिल रंगत पियी ऱ्हायंत्यांत!मानोस नावनां जीव मशीन बनी राबी ऱ्हायंता!काम करी घाम गायी राहेंता!मिल जोर्बन रातदिन माल काढी राहेंती!कमाई करी राहेंथी🌷
मोहन साडी कारखानामा काम करी राहेंता!तीन वरीस तठेचं काम करत राहेंनां!पन जठलां तठेचं व्हता!आनी एक दिन एक झटकाम्हा..... काम सोडी दिन्ह!हिरा घसानी ट्रेनिंग लीस्नि हिरा घसानां कारखानामां कामलें लाग्ना!🌷
या तीन वरीसम्हा व्हयीनां पाने भरत राहेंनातं!गावंनं गावपन आनी सुरतनं माणूसपन!कागद वर उतरत राहेंनं!या आल्लग- आल्लग खिचडीनां पांटा भरत राहेंनातं!मन भुके राहें!बठ्ठ बठ्ठ व्हडी व्हडी लिखु वाटे!मन दांडगायी करे!पत्तानाम आयके नई!जीव कोंडाई जाये!मन कोंडायी जाये!जीव आनी मन येरायेरलें समजाडतं राहेंतं!तरीभी हाशी खुशी दखाडी मोहन मव्हरे लिखतं राहयना!पांटा-पांटावर सबद पहेरतं राहेंनां!समुंदरंनां खारा पानीमां खान्देशी गोड-मधाय तापीमाय एकजीव व्हत राहेंनी!मने मन व्हात राहेंनी!अहिराणी सबद गुजरातमां व्हायी जीरावत राहेंनी🌷
हिरालें घसी-घुसी नेम्ननं पैलू पाडतस!नजरनां खेय ऱ्हास!हातनी कलाकारी ऱ्हास!हिरा चमकालें लागी जास!हिरा परदेस म्हा जास!हजार रुप्यानां हिरा घसी-घुसी लाख मोलनां व्हयी जास!अनमोल व्हयी जास!परदेस्मा लाख-करोडमां इकायी जास!...ती त्यांनी बाजारू किंमत ऱ्हास!हिरानी नेम्मंनं किंमत रत्न पारखीलेंचं मालूमात ऱ्हास!🌷
भर उंडायांमा वावर तयार करानं काम चालू व्हत!रोहिणीस्ले काही दिन बाकी व्हतातं!दोन जोड्यास्ना नांगर वावरम्हा फिरी राहेंता!वावरम्हा हुभ्या... बोरी,दवंडी,समडी बठ्ठ मुयीसकट उस्कटी नांगर फिरी राहेंता! भुस्कट-भुस्कट पडी ऱ्हायन्त!नांगरनां कुस्सा जिमीन फाडी ऱ्हायंता!...नांगर फिरता फिरता ....एकदम एक आर्धा-मर्धा चमक्या,गोलगिटिंग दगड...नांगरनी आडीमायीन जिमीन उस्कटी वर उना!औत हाकलनारा!नांगर धरणारा!आखो एक दोन जन.... बठ्ठा गनंज उन पावसाया खायेलं कुनबी व्हतातं!
!अनुभनां ग्यानी व्हतातं!त्यास्नि पारखी नजर व्हती!त्या आर्धा चमक्या दगडलें दखी चमकायी ग्यात!...🌷
औत उभं कर!बठ्ठा त्या चमक्या दगडलें दखतं ऱ्हायनात!बठ्ठास्नि हातभार लाया!..कोनी पानी टाकी धोये!कोनी दगडवर घसडा!कोनी त्याले पुसी पासी लिध!...पहिले आर्धा चमक्या तो दगड आते उज्जी चमकाले लागी ग्या!... बठास्ले उज्जी आनन व्हयनां!...तो अनमोल हिरा व्हता...."मोहन पाटील!"आनी सापडेलं हिरालें चमकाडंनारा त्या बठ्ठा रत्नपारखी कुनबी व्हतात....बापूसाहेब हाटकर, भाऊसाहेब प्रकाश पाटील पिंगळवाडेकर,बापूसाहेब एम के भामरे, सुरेशनाना पाटील, ज्ञानेश्वर आबा भामरे,कैलासनाना भामरे,प्रा देवदत्त दादा बोरसे,विठ्ठलदादा साळुंखे!डॉ सदाशिव सूर्यवंशी..दगड सारखा दिसणारा आर्धा चमक्या हिरालें नेम्मंनं घसी घुसी भु भारी चमकाडीस्नि!...आस्सल हिरानी साहित्य बजारम्हा अनमोल ख्याती व्हयी गयी!हिरा चमकी ऱ्हायनां!मोहन चमकी ऱ्हायना!आस्सल वास्तव लीखी ऱ्हायना!खान्देशलें उजाये दखाडी ऱ्हायना!🌷
आथी-तथी नजर टाकावर दिखी ऱ्हायनं!...जठे वल्ला नाता जोडेलं व्हतातं!त्याम्हानं जीव लायेल पानी आटी ऱ्हायनं!नाता कोल्ला व्हयी ऱ्हायनातं!नाता बीन जीवनां लाकडे व्हयी दूर जायी ऱ्हायनात!पऱ्हा जायी ऱ्हायनातं!मानोसपनं सुकायी ऱ्हायनं!मानोस बझारनां मोती व्हयी बाजारू व्हयी राहेंनां!....नेम्मंनं मोहनन्या कविता या बाजारूपन वर बोट ठी राहेंन्यात!मोहननी कविता जागल्या बनी चोट्टा नाट्टास्ले दणकारी राहेंन्यात!पोलीसनी काठी बनी नेम्मंनं वयनं लावानं काम करी राहेंन्यात!मोहन पंधाधरी लिखी ऱ्हायना!उजाये हातमां धरी मव्हरे चाली ऱ्हायना!मोहन भाव भावनांन्या कविता लिखी ऱ्हायना!कंदीलनी वात बनी उजाये दखाडी ऱ्हायना!🌷
🌷-------------🌷-------------🌷
(मोहन जिमीनम्हा सापडेल हिरा से!आर्धा चमक्या व्हता!जेठा मोठास्न मार्गदर्शनमुये पुरा चमका लें लाग्ना!मोहनदादा पाटील खान्देश लोककवी सेतस!सबदेस्ना सुई -दोराघायी मोठ्ठल्ला ठिगये शी ऱ्हायनांत!पुरा खान्देश बिवती राहेंनातं!कविता चमकी राहेंन्यात!हास्यरस, करूनरस आनी शृंगाररसनं रसायन बनायी खान्देश रसिक मनन्ह रंजन करी राहेंनातं!खान्देशी-अहिराणी मायनी कायेजथिन सेवा करी राहेंनातं!मोहनदादा हिरा व्हयी चमकी राहेंनातं!
आपुन त्यास्नागमथुन शिकी लिवुत!......त्यास्ले आखो भेटुत पुल्ला पांटावर!पांट-४वर!भाग-४वर त्यास्ना मो.नं ८८४९८५४६७० से) .....🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹
----नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह मु हडपसर, पुणे-४११०२८)
मो नं७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२१मे२०२१
Comments
Post a Comment