कयनानी भाकर
कयनानी भाकर🌹
--------------------
...नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
कालदिंन सुट्टी व्हती!..घरमा खाले फरशीवर दोन गोंटा टाकीस्नि,वरथीन गदलं आथरेलं व्हत!गदलावर आडाधट पडेल व्हतु!सक्कायम्हा उठी हेट्या सूर्यदेव डोया फाडीफाडी दखी ऱ्हायंता!कंबरम्हा हानुहानु करी ऱ्हायंता!मी नजर फिरायी तथाना कानी वयनू व्हतू!वरथीन सिलिंग फॅन निस्ता गरगर फिरी ऱ्हायंता!फिरता फिरता उज्जी कान ठनकाडी ऱ्हायंता!गदारा व्हयी ऱ्हायंता तरीभी आंगवरथिन झावर पंघरेंलं व्हती!जप ते लागे नयी!काय करू बवा.....!🌹
"काय से का तुम्हलें?नयतरनां मायेक खुशाल पडेल सेतस!सुट्टी से म्हनीस्नि पडी राहो का!घरमा आंडोरं-व्हवू से!..नातरें सेतस!काय शिक लीथिन तुम्हनाफाइन त्या!उठा?"...बाईनी आंगवरनी झावर जोरमा व्हडी काढी आनी फेकी दिनी!आखो आवर सावरलें चालनी गयी!मी भेमकायीस्नि उठी बठ्नू!सुट्टीनदिन भी तरास देवानं काय सोडत नयी हायी बाई!!..आते वयन्ही साठी लागी ऱ्हायनी तरी भी घोडांमायेकचं जोइजे यास्ले!!तंदुरुस्त पाहिजे यास्ले!आते मातरं हेट्याथिन सूर्यदेव डोया मिचकायी-मिचकायी हासी ऱ्हायंता!मन्ह बासी तोंड दखी दात दखाडी ऱ्हायंता!बाईंनं बोलणं ऐकाडी ऱ्हायंता!वरवर सरकी ऱ्हायंता!🌹
डोया चोई चायी उठनू!...नातरे भी उठी बठनातं!बठ्ठा गोयंम करी बठनुत नी..!पोरे मन्ह आंग खुंदालें लागी ग्यात!आंग खुंदी लेवाथिन चपाटा करी उठनू आनी मोरीम्हा पयनु!सूर्यदेवनी दात घसानं सांगेल व्हत!आंग धवानं सांगेलं व्हत!......🌹
वसरीम्हा खुर्ची टाकी बठेल व्हतु!पेपर वाची ऱ्हायंतू!पोटले उज्जी भूक लागेल व्हती!..पेपर वाचता- वाचता सैपाक घरम्हा चोरी-चोरी नजर फिरायी ऱ्हायंतू!धिरेस्करी तोंडन्हा मव्हरे मगमगातं वास उना!..."ल्याsss "बाई थाटी तोंडनां मव्हरे लयी उभी ऱ्हायनी!....दखीस्नि जीभ चटबट करालें लाग्नी!.... आम्हनां लगीनलें तेहतीसावं वरीस लागी जायेलं से !...बाईंजातं मानोसनं मन आनी नस बरोबर वयखत ऱ्हास!कोनता टाइमलें मानोसलें काय लागस!काय नयी!.. हायी बठ्ठ मनना दल्लाम्हा नेम्मंनं जपी ठेवतं ऱ्हास!कोरी ठेवतं ऱ्हास!!...म्हनीस्नि मानोसनां नाकन्ही शेल बाईंनां ताबाम्हा ऱ्हास बरं का!आथा का तथा मानोस जावावू नई!ढूकी दखावू नयी!गाडी नेम्मंनं पट्टावर पयेतं ऱ्हास!........बरं जाऊ द्या ते!! सांगं तिथलं कमीचं से!साठ ग्यात आनी आठ ऱ्हायीग्यात आते!काय करनं से!!......पन ताटम्हानी कयनानी भाकर देखी मन्ही भूक आखो बावचायी गयी!...सक्कायम्हा न्ह्यारीलें मनपसंत मेनू भेटनां व्हता! "कयनानी भाकर"...!🌹
कयनानी भाकरम्हा...गहू, बाजरी, जुवारी,उडीदनी दाय,तांदूयीनी चुरी,मीठ,हायी बठ्ठ वलीस्नि,थोडीशी कोथमेरं भुर भुराई!तेल लायी लाटीस्नि तावाम्हा तेल भुरभुरायेलं व्हत!लाटेलं भाकरी तावावर भुंजी-भांजी ताटम्हा लोचांनी चिरी,लोस्सनं तिख,कांदा,पापड वरथिन तेल भुरभुरायेलं व्हत!..तोंडलें उज्जी पानी सुटन व्हत!….भाकर पोटम्हा गयी!ढेकर दिन्हा!मन गरायी गये!पोट भरी गये!भाकर मनलें तृप्ती दि गयी !चटोरी जीभलें शांती दि गयी!🌹
🌷🌷🌷🌷🌷
कयनानी भाकरम्हा आल्लग-आल्लग जिन्नस टाकेल व्हतातं!...भाकर आमन्ह पोट भरी चालनी गयी!जीव निव्वायी पोटम्हा निंघी गयी!......भाऊस्वन !🌷......भाऊस्वन!...."अहिराणी भाषा कयनानी भाकरनां मायेक से!"कयनांनी भाकर" से!चवदार से!चटकदार से!गोड से!आंबट से!खट्टी से!....आज जागेजाग!गावेगाव तिन्हा जागर व्हयी ऱ्हायना!ज्यास्ले अहिराणी भाषा गाव्हडंळ वाटे त्याचं पऱ्हा जायेलं भाउ आते अहिराणी भाषानां प्रसार-प्रचारसाठे पत्रके वाटी ऱ्हायनात!जनम देती मायनां बोट धरी गावे गावं फिरी ऱ्हायनातं!भाऊस्वन...भाषा कधीच मरत नई!मारत नयी!आपलीच वाट धरी मव्हरे सरकत ऱ्हास!...भाषानां कोल्ल्या व्हयेल बिया वार्गाम्हा आथ्या-तथ्या उडत ऱ्हातीस!त्याचं बिय्या लोकेस्ना मनन्ही जिमीनम्हा निय्या व्हयी नवा संस्कार करत ऱ्हातीस!जूनं सोनं गरम व्हयी पिव्वे व्हत ऱ्हास!भाषा सोनानी खान ऱ्हास!...🌷
भाऊ-बहिनीस्वन!
अहिराणी भाषा दोन कोटी लोकेस्नि सावली व्हयेल से!छत्री व्हयेल से!सोशल मेडिया.... व्हाट्सएप-फेसबुक,गुगल ऍप सारखा माध्यम सेतस त्याम्हा लिखायी ऱ्हायनी!बोलायी रहायनी!...म्हनी,आना,लगीनन्हा गांना,आखाजिना गांना,भगत- भक्तीन,डांख्या,इर-वट डखीन,नावे लेवानी रीत,मयतनं रडबोंबल या काय सेतस मंग?....अहिराणी मायनं तेल तिख मीठ सेतस!लोस्सनं तिख सेतस!लोचांनी चिरी सेतस!ती...ती.."कयनानी भाकर"से!
भाषिक सौंदर्यानी नटेल-थठेल भाषाम्हा जवाई सारखा मानपान न्हा पाने सेतस!रगडी-मुसडी खावानां चवदार इतिहास से!अहिराणी भाषा कविता,लेख आनी कादंबरीम्हा आल्लग-आल्लग आनी भारी चव देत फिरी ऱ्हायनी!अहिरानींनां नाटके आनी सिनेमा लोकेस्ना गये उतरी ऱ्हायनात!नवीन पिढी अहिरानींना जागरगुंता जोर लायी ऱ्हायनी!हाऊ बठ्ठा परकार एकमझार गोयंम व्हयी मनलें उजाये दखाडी ऱ्हायनात!🌷
कविता,लेख,अहिराणी बातनी,सिनेमा,तमासा, आखाजीनां गांना,आना,म्हणी,लगीननां गांना मीस्नि सुंदर रुपडानी "अहिराणी भाषा"उठी दिखी ऱ्हायनी!वसरी सोडी आंगनम्हा यी ऱ्हायनी !कयनानी भाकर व्हयी ऱ्हायनी!हिरदम्हा बठी ऱ्हायनी!मनलें चव दि ऱ्हायनी!लोकेस्ना हिरदनी भूक भागाडी ऱ्हायनी!संगीतम्हा नाची ऱ्हायनी!महाराष्ट्र वलांडी दूर जायी ऱ्हायनी!देश वलांडी मुकली मव्हरे जायी ऱ्हायनी!भाऊस्वन चवदार कयनानी भाकर व्हयी ऱ्हायनी!🌹
भाऊ-बहिनीस्वन!
अहिराणी भाषा या"कयनानी भाकर"लें नेम्मंन चव येवागुंता धुये,जयगाव,नंदुरबार आनी नासिकन्हा कसमादे पट्टा मीस्नि---- कोणी संगीत दि ऱ्हायन!कोनी गीत वली ऱ्हायन!कोनी विचारन्ह तिख-मीठ काली ऱ्हायनात!भाषालें सौंदर्यानां साज चढायी ऱ्हायनात!हुना तपेल तावावर कसोटीवर उतारी ऱ्हायनात!परीक्षकस्ना हुना डाव लीस्नि कयनानी भाकर भुंजायी ऱ्हायनी!लोस्सनी चव जीभलें चटोरे बनायी देस देस वलांडी ऱ्हायनी!अहिराणी भाषा हलकी-फुलकी व्हयी ऱ्हायनी!आते बठ्ठ अहिरानींनं गणगोत भाषालें जीव लायी ऱ्हायनात!हिरदथिन लिखी-वाची ऱ्हायनात!बायतींनं बाईलें नवा जलम भेटस!तस अहिरानीं मायनां जलम व्हयी ऱ्हायना!पुनर्जन्म व्हयी ऱ्हायना!🌹
आपली भाषा जितली लिखायी! वाचायी!बोलायी...तितली कयनानी भाकर व्हयी!चव दि!ती टिकी ऱ्हावागुंता समीक्षा व्हत ऱ्हास!व्याकरणनं कार्ल कडु ऱ्हास!पन दांडगायी दावू देत नई!नेम्मंन समीक्षा व्हत ऱ्हास!भुक्या-तिष्या सबदस्ले टकोरा बठी भाषानां सिंनगार बनी जातस!आथा-तथा गरबडेल सबद मंग अहिरानींना रस्ते चालतं ऱ्हातंस!वायीवायी गव्हार करत ऱ्हातंस!🌹
भाऊ-बहिनीस्वन!
अहिराणी भाषाम्हा गनज धनोर पडेल व्हयी!भाकर बिगडी जायेल व्हयी!पहिलेंग ते धनोर काढि फेकनं पडस!चवलें आनी कानलें गोड भाषानं तंतर वतनं पडस!लोक मुखेनी भाषालें... वाचिक-लिखित स्वरूपम्हा पवचाडांनं काम अहिरानींना बठ्ठा जेठा मोठा महान साहित्यिक कारागीर करी ऱ्हायनात!हिरा-मोती-लाल करी ऱ्हायनात!भाषानं सौंदर्य वाढायी ऱ्हायनात!त्या मायलें खान्दवर बठाडी मिरायी ऱ्हायनात!
बठ्ठ चांगलं ते...ते...भाषानां पीठम्हा वली-वाली!मयी-मुयी कयनानी भाकरनी चव वाढावालें जोइजे!कावड आगय करी बठामां मज्या नई भाऊस्वन!दुसरा भाषालें मावशी म्हनसुत पन ती दांडगायी दावत व्हयी ते त्याले कारण आपुनचं ऱ्हातंस!आपुन आपली (संस्कृती)चांगली भुंजेल कयनांनी भाकर वसारी दुसरीनां फंदे पडी जातस!ना तिखट-मीठनी चव!!नां वल्ला तिखानी चव!आपुन आलनंपटक खायीस्नि तीन्हीचं झिल तोडी फिरतस!डोका-खांद्यावर लयी फिरतस!ती आपले तोडी-तोडी का फेकेनां!...खरं म्हणजे आपुन वायबारपना करतस!तिलेचं चिटकतं ऱ्हातंस!आम्हलें नातं नई लाये तरी चाली!पन सर्व गुणसंपन्न आम्हनी कयनानी भाकरनी चव दुसरा बठ्ठास्ना जिभवर ठेवानं काम आते अहिरानींना भाऊभन करी ऱ्हायनात!करालें जोइजेचं!🌹
भाऊ-बहिनीस्वन!
मद्रासी उत्तप्पालें मान्न पडी!अथा तथा बठ्ठा ठिकाने खाथिन!उठथिन!बठ्थिन!...पन त्या लोके उत्तप्पा सोडी जातस का?उत्तप्पालें इसरतंस का?...फिरीफारी उत्तप्पालेचं जीव लावंथिन!उत्तप्पा जीव भावना से त्यास्ना!....आपुन करतस तंस??आपुन उत्तप्पा खावालें लागनूत ते कयनांनी भाकर इसरी जातस!आस नई व्हवालें जोइजे भाऊस्वन!🌷
कयनानी भाकर आपली से! खानदानी से!कान्हदेशनी से!खान्देशनी से!अहिर लोकेस्नि से! सोतां कान्हानी बनायी खावाडेलं से!...पाच हजार वरीसफाइन आपलें हायी धन देयेलं से!तिन्ही वयख मुकला... मुकला युगे जुनी से!भाषा पुल्ली पिढीले व्हकारा भरत ऱ्हास!..मांगलास्नि शिकाडेलं या भाकरम्हा आखो नेम्मंनं मीठ-मसाला टाकी पुल्ली पिढीनां हाते देनं पडस!आपलीचं भाषा आपला खान्दवर लेंनी पडस!आपली कयनानी भाकरलें कधीच अंतर देवू नका!आपली जलमदेती मायन्ही तिले आपला मुखे बठाडेलं से!🌷
🌹---------------------🌹
....नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे(ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०५ मे २०२१
Comments
Post a Comment