उदय

🌹🌹!!!उदय!!!🌹🌹
        🌞----🌻----🌞
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!नमस्कार!
.............रात्र अंधारी असते!तास,मिनिटे आणि सेकंद असा सर्व फौज फाट्यानिशी!..गडद छायेसह पुढें सरकत असते!अनंत घोड्यांच्या रथावर स्वार होऊन सूर्यदेव...निशेचां पाठलाग करीत असतो!रात्र थकतें!तरीही जिद्दी असतें!पळत असतें!सूर्याच्या अनंत घोड्यांच्या टापांनी उधळलेली धूळ सर्वत्र पसरतं असतें!निशाची उषा होते!उषा पहाटे पिवळ्या हळदीने माखलेलीं असतें!पूर्व सर्वत्र पिवळे-तांबूस फुटलेलं असतं!सुर्यदेवांच्या घोड्यांच्या टापांनी पूर्व दिशा उजळून निघत असते!निशा पळ काढतअसतें!उषा नाहीशी होते!हळूहळू अश्वारूढ घोड्यांवरून वास्तवतेचं आगमन होतं!सत्याचं दर्शन होतं!तेजाचं दर्शन होतं!सूर्याच्या कमल रूपाचं दर्शन होतं!किरणांच्या पाकळ्या उघडीत तांबूस-लालसर गोळ्याचं आगमन होतं!सूर्योदय होतो!🌹

"अंधाराला उसवीत प्रकाश
उजेड घेऊनि आला आहे
मागे राहिलेल्या विश्वासाला
उदय देऊनी गेला आहे......!

चंद्र, सूर्य आणि पृथ्वीवर
बोलबाला राहुनी गेला आहे
निर्मिकाच्या चमत्कारास या
अंकुर पहावूनी झाला आहे..!"

बाळ आईच्या गर्भात असतं!अंधारात असतं!सुरक्षित असतं!नऊ महिन्यांनी आईची एकरूपता सोडून!नाळ सोडून स्वतंत्र श्वास घेतं असतं!बाळ टाहो फोडत जन्माला येत असतं!घरात पुढील पिढीचा वारस उदयाला येतं असतो!जन्माला येत असतं!उदय हा अनंत काळापासून आपलं अस्तित्व घेऊन!...आपल्या विशालतेची ओळख देत या धरेवर आला!इतिहासातील पानांवर ठसा उमटवतं शाश्वत सत्याचा आविष्कार बनून राहिला आहे!🌹

पृथा!...ही धरती!..ही पृथ्वी अनंत काळापासून उदयोन्मुख जीव जिवाणूंची जन्मदात्री आहे!तिच्यावर अनंत जीव जिवाणू जन्माला आलेतं!कालानुरूप अनंतात विलीनही झालेतं!एकरूप झालेत!पृथ्वी सत्य आणि वास्तव स्वतःजवळ ठेवीत, अनादिकालापासून सूर्याला हात जोडून फेऱ्या मारते आहे!प्रदक्षिणा घालते आहे!सूर्य सत्य आहे!नित्य आहे!अनंत आहे!अनादिकालापासून अस्तित्वात आहे!वास्तवात आहे!पृथ्वी देखील सत्य आहे!नित्य आहे!उदयाची जननी आहे!🌹

"विश्वसखा तू थांब जरा
काळीज त्याचे पाहुनी जा
गूढ दुनियेच्या नजरेला
सोबत सखा तू घेऊनि जा..!

चमत्कारारी कोड्याला या
उजेड थोडा देऊनी जा
टाहो फोडीत उदय झाला
अमृताने आता न्हाऊनी जा..!"

उदय... प्राचीन काळापासून नवचैतन्याची सुंदर ओढ आहे!आस आहे!हाक आहे!उदयात ममता आहे!प्रेम आहे! मानवी अस्तित्वाची ओळख आहे!माती उस्कटून वर येणारा कोंब उदय आहे!सजीव सृष्टीची उत्पत्ती पृथानें दिलेले दान आहे!गर्भातून झालेला उदय आहे!उदय आनंद आहे!प्रसन्नता आहे!🌷

उदय चैतन्य आहे!चेतना आहे!उत्पत्तीचा पाया आहे!पृथ्वीची काया आहे!जन्मोजन्मांतराची छाया आहे!उदय तेजाची किमया आहे!चमचमणारा तेजस्वी तारा आहे!...उदय स्फूर्ती-उत्साहाचं शिखर आहे!ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे!शक्तीचा अलोट आहे!अस्तित्वाचा शोध आहे!उदय हुरूप आहे!हुरहुर देखील आहे!उदय विरह सुद्धा आहे!उदयची  कल्पकतेचा..कल्पनेचा आविष्कार आहे!🌷

"युगानुयुगे समाधी लागली
वाटेवर नवं प्रकाश भेटला
स्वर्ग सुखाच्या झुल्यावरती
जन्मांतराने प्रकाश वाटला..!

अरुण ज्याला म्हणती येथे
किलबिलाटानें उदय वाटला
सुर्यालाही संगत सोबत.…...
उधळूनि मोती संसार थाटला..!"

.....जीवसृष्टीच्या निर्मितीसोबतचं मानवाचाही उदय झाला असला पाहिजे!.... येथूनचं बुद्धिवादी मानवाचं कर्तृत्व उदयाला आलं असेल!नेतृत्वाची प्रचंड स्पर्धा होऊ लागली असेल!मानवाने आपापल्या युगातील अस्तित्वाचा ठसा उठवला असेल!उदय सार्थक म्हणून उदयास आला असेल!🌷

उदय अनेक संस्कृतींना!पिढ्यानां!युगांना.. आपल्या कुशीत घेऊन हिंडतो आहे!मानवी मनाला भुरळ पाडतो आहे!प्राचीन आणि नव्यांना जोडतो आहे!उदय जन्मजन्मांतराचा ऐतिहासिक वारसा बनून जीवनकुपितलं अमृत पाजतो आहे!अमृत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला प्रदान करीत आहे!उदय हसतमुख स्वागत करतो आहे!अनंत पिढ्या मागे गेल्या असतील!संस्कृतीचा आरसा आणि वारसा म्हणून उदय ठामपणे उभा आहे!🌷

"अजुनी कळले नाही कुणाला
रहस्याचा दरवाजा उघडला
पिढ्यांनपिढ्याचां खेळ चालू
उंचीवर कधी अरुण चढला....!

अंतरंगातली घुसमट उफाळली
भव्यदिव्याचा आघात घडला
भंगली समाधी श्रद्धेची येथे
समृद्धीचा नवप्रकाश पडला..!"

उदय...उगवता सूर्य सोबतीला घेऊन मानवी मनाला चमत्कृतीपूर्ण दिलासा देत आहे! उदय....मोहिनीरूपी लोभसवाणी ओढ घेऊन मनामनात  प्रेमरंग भरीत आहे!पिढयांपिढ्यांना विश्वास आणि दिलासा देत आहे!उदय उद्याची गुलाबी स्वप्ने घेऊन जन्माला आला आहे!प्रसन्न सकाळ सोबतीला घेऊन उदय मानवी जीवनात आनंद भरतो आहे!🌹

आशेच्या झोपाळ्यावर बसून!.. वेदनेच्या किनाऱ्यावर भटकंती करणारा उदय फक्त .....!समृद्धी!आनंद!प्रेम!मोह!ममता!माया आणि सुख वाटीत निघाला आहे!मानवी मनातं हिरवीईचा सडा टाकीत निघाला आहे!हवाहवासा वाटणारा निसर्गातील जीव जिवाणूंचा उत्पत्तीचा किमयागार आहे...उदय आहे!🌹

अनेक संस्कृतीचा उदय झाला!काळ मागे गेला!अनेक महामानव जन्माला आलेतं!ते इतिहास झाले!लोभसवाणे रूप घेऊन उदय मोहवीत आहे!साऱ्या दुनियेसाठी चैतन्याचा झरा होऊन वेड लावीत उदय हसत आहे!फुलं होऊन मनाला फुलवीतं आहे!आनंद देत आहे!सर्वांचं जगणं सुंदर करीत आहे!सर्वांग सुंदर करीत आहे!परिवर्तन घडवीत आहे!उदय नवचैतन्याचं विशाल रूप आहे!🌹

"माणसाच्या स्वप्नातली
 बुद्धी सारी झोपलेली
उदयाच्या गर्भातलें
निशा ही लोपलेली....!

घेऊनि उदरात आता
दिव्य सारे जन्मातलें
सार्थ अर्थ निवाऱ्याचें
 उदयी शोध मनातले...!"

उदय सौंदर्याची उधळण करीत!शांतीचा संदेश घेऊन!संस्कृतीचा वारसा जपतं!वर्तमान साक्षीला ठेऊन उज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहे!संवेदनांचां धागा विनीत!.. वेदनांशी संघर्ष करीत!प्रेमाची सुंदर फुले उधळीत दररोज उदय होत आहे!ईश्वराशी एकरूप होत!हृदय हृदयाला आलिंगन देत आहे! मनामनातं आशावादाचें सुंदर कोंब उगवणारा उदय दररोज उगवत आहे!अनंत पिढयां!अनेक संस्कृती!इतिहास प्रसिद्ध महामानवांचा उदय झाला!कालानुरूप अस्त देखील झाला आहे!मागे ठेवलेल्या अनेक पडक्या वास्तू त्यांची ग्वाही देत उद्याच्या उदयाची वाट पहात आहेत!🌹
   🌞-------🌻--------🌞
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०९जून२०२१
(मृग नक्षत्र)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)