खान्देश अहिराणी हिरा🌷मोहन पाटील कवळीथकर भाग ४
खान्देश अहिराणी हिरा
🌹🌷🌷🌷🌷🌷
मोहन पाटील कवळीथकर(पांट-४🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
-------------------------------------
...नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
कालदिंन २१मे व्हता!कालदिन फाइन रोहिन्या सुरू व्हयी जायेलं सेतीस!उज्जी गदारा व्हयी ऱ्हायंता!आंगवर घामनी कुडची चिटकी ऱ्हायंती! एक म्हन से,
"रोहिनीमां नदिले पूर आनी वरसारद गया दूर!"पानी पडी इतला गदारा व्हयी ऱ्हायना!...तथा सुरतनां गदाराम्हा हिरा उजायनारा मोहनदादा पाटील सोतां हिरांगत चमकी ऱ्हायनातं!खान्देशनं समाज जीवन लिखी ऱ्हायनातं!आपले आनबक वाटस!आतेपाउत मोहनदादा यासन्या अहिरानींन्या १००० कविता लिखायी जायेलं सेतीस!अहिराणी मायनां आशीर्वाद आनी गोडीमुये लिखा यी ऱ्हायन!...🌷
साहित्यप्रतिभा देव देणगी ऱ्हास!मनम्हा उतरी इचारनी वांधी फाफोटा व्हयी उडत ऱ्हास!लिखेल साहित्य आथ- तथ उडी सुपीक मनम्हा आस्सल कोंब उगत ऱ्हातंस!...एकथिन एक न्यामिन्या रचना लिखनारा मोहन--- मायबाप कडथुन संस्कार प्रतिभा लयी येल सेतंस!माय-बाप त्यास्न दैवत सेतस!देवबानं रुपडं सेतस!मोहन-माय बापनी सेवा करनारा आंडोरं... विठ्ठल भगवाननां पुंडलिक सेतस!मोहन माय बापनां बाराम्हा लिख्तस!आजारी पडेल आनी धयडपन सुख-दुःखनां बाराम्हा कायेज वती लिख्तस!बठ्ठा माय बापस्ना बाराम्हा लिख्तस!...🌷
"मन्हा घरनां विठ्ठल
आज गया रे दुखायी
मन्ही रखुमाई कशी
गयी ती रे सुकायी!🌷
देव करालें लोकेस्ले
चारी धाम तू जावू दे
मन्हा घरमा देवबा
माय बाप त्या राहू दे!"🌹
भक्त पुंडलिकनी सेवा जग दुन्यांलें सांगतस!माय-बापस्न रंगत आपली कुडीमा व्हात ऱ्हास!त्यास्नि आपले वाडे लायेलं ऱ्हास!... कोरधरी नेम्मंन चालाना-वागानां संस्कार माय बापनी देयेलं ऱ्हातंस!आपुन तंस वागत ऱ्हातंस!...🌷
मोहनदादा बोलता बोलता बोली जातस!मन उगायी जातस,
"जर चुकीस्नि आम्हनां दोन्ही भाऊस्ना वाटा पडनां ...ते माले घरदार नको!वावर नको!....मन्हा वाटे फक्त मन्हा माय-बापचं येवो!...ज्यास्नि माले जलम दि घडावं!...आखो मन्हा वाटालें घरम्हानी ती मडका-घल्लास्नि उडतीन येवो!...जी माले धाकल्पनं फाइन भूकनां धीवसा देत उनी!पोटना प्रश्न सोडत उनी!कायम आस लावत उनी!माले समजाडत उनी!बस्स... मन्हा वाटालें इतलचं येवो!हायी मन्हा जिंदगानीनी ठेव से!कायेजनी वयख से....!"🌷
...बोलता बोलता मोहनदादास्ना डोयांस्ना तलाव पापनीनां बांध फोडी व्हावालें लागी जास!
...पन.... पन... सांगानी बात आसी से भाऊ भी तितलाचं जिद्वर पडेलसे!... माय-बाप त्यास्नाचं वाटालें भी येवो!.....यालें म्हंतस बंधू पेरेम!आश्याच हायातिभर जीव भावनां व्हयी राहो!येरायेरले धरी ठेवोत!वाटा पडानी पायी नको येवो!🌷
माय बापनां व्हडा जलमनां सिद्धांत से!...बठ्ठास्ले माय बापनां जोगे ऱ्हावाले आवडस!त्या आपले घडावतस!..मोहनदादा यासनी कवितानां मुखडा देखा कसा से!....🌷
"माय नी मया बाप नी दया
काय काय मी सांगू तुले
मायबाप मन्हा घरमा देवबा
तुफाईन मी काय मांगु.....!"🌷
सात्विक विचारनां व्हडालें.... मोहनदादा यासनी भु भारी मांडेलं से!माय बापनी जे कस्ट भोगेलं से.. त्यास्ना उपकार नी परत फेड जिंदगी भर व्हत नई!...त्यास्ना पायंवर डोकं ठेवालें भेटनं हायी आपलं भाग्य ऱ्हास!🌷
मोहनदादा यास्ले अनुभव आनी संस्कारस्नि उजाये दखाडेलं से!लगीन व्हवावर सुरतलें खोली करी व्हती!तठली नवरा-बायकोनी 'भाडानी खोली' या इशयनी कविता नवा संदेश देवानं काम करस!ते आसी!.🌷
"लगीन करं तव्हय सुरतम्हा
र्हावानी करेल बोली से
काय सांगू भो तुले
सुरतम्हा मन्ही धाकुलसी खोली से.........!"🌹
या रचनामायीन कवीं बठ्ठा लगीन व्हयेलस्ले संदेश देतस!
"पोर दिसुत पन आठे खेडामां खुरपे धरावू नई!सुरतलें (सहेरम्हा)खोली करनी पडी!तठे आंडेरंलें फुलनांगत ठेवनं पडी!या आट वर पोर दिसुत!"....कविता नेम्मंनं डोया हुघाडानं काम करत ऱ्हास!...🌷
मोहनदादा यासनी कविता जगदुन्यांनी रीतनं दर्शन से!...काळ बदली ऱ्हायना!लोके बदली ऱ्हायनात!मांगलं मुकल सोडी नवं धरी चाली ऱ्हायनातं!तो बदल मोहनदादा आपला कविताथुन नेम्मंन हुगड करी दखाडतस!बदल...हाऊ खान्देश संस्कृतीनं मोठपन से!म्हणीसनी आवलोंग टिकेल से!मव्हरे ती मार्गदर्शन करत ऱ्हाई!🌷
सवसारनं सुख-दुःख नवरा बायकोनी वाटी लेवानं ऱ्हास! लगीनां येलें सात फेऱ्या मारानां आर्थ तेचं सांगस!नदारीम्हा आनी सुखम्हाभी दोन्ही वाटेकरू ऱ्हातंस!मोहनदादा यासनी कविता नेम्मंनं तेच सांगस,....कस ते दखा,
"मन्ही मोठी आबादानी
धानींना मोठा कारभार से
खाली डबाना सवसार करस
तिचं खरी नार से!".....🌷
सवसारनां व्हडा जिंदगानीनां से! दुःखनां मोठ्ठल्ला बल्ला सवसारम्हा आडा-हुभा येत ऱ्हातंस!...नवरा-बायको दोन्ही एकजीव व्हयी तोंड देत ऱ्हातंस!..येरायेरनां आंसू पुसी लेवो!मव्हरे चालतं ऱ्हावो!..धयेडपने येरायेरनां आधारनी काठी बनी चालानी उमेद मोहनदादा देत ऱ्हातंस!कविता आधार से!धिवसा से!समाज प्रबोधनसाठे!
कवी नेम्मंनं समाज जागृती करी ऱ्हायनात!🌷
दुन्या बदली ऱ्हायनी!मानोस बदली ऱ्हायना!पन आजून भी गनज दुन्यानां मतलबसाधू सेतस!सोतांनी भाकर रांधी लेवागुंता जात,धरम,नाता-गोतास्ना आधार
लीस्नि फूट पाडानं काम करत ऱ्हातंस!दुन्यालें बयखाडानं काम करत ऱ्हातंस!...मोहनदादास्नि कविता... टिपरं ली झोडानं काम करी ऱ्हायनी!..भंगेलं फूटपाड्यास्ले दनकारानं काम करी ऱ्हायनी!...ती रचना आसी से.......!🌷
"नवी चक्कीम्हा जूनं दयन
कवलगून मी दयसु
तून्हचं तेल तून्हचं कोड्य
मी वात बनीस्नि बयसू.....!"
मानूसपन पहेरी चांगली दुन्यानं सप्पन दखनारा!शांती,आबादानी!
सुखनां झेंडा हातमां लीस्नि मोहनदादा मव्हरे जायी ऱ्हायनात!कविता मानूसपननां संदेश दि ऱ्हायन्यात!सुरतम्हा हिरा घसता-घसता!.. गंज लागेलं लोकेस्ना मनवरनां गंज काढानं काम कविता करी ऱ्हायनांत!उब्या ते बयालें पाहिजे पन फुकनं जरुरी से!मोहनदादा वात बनीस्नि बयी ऱ्हायनात!उब्यालें प्राण वायू दि ऱ्हायनात!त्यास्नि लेखनी अंधार कापी उजाये दखाडी ऱ्हायनी!🌷
दररोज एक तरी अहिरानींम्हा चारोळी लिखालेंचं जोइजे हाऊ आजीवन संकल्प मोहनदादा यास्नि लेयेल से!दररोज अहिराणी मायनी सेवा चालू से!अष्टाक्षरी कविता लिखानी गोडी लागेल से!आशय,विषय आनी आर्थ सांगणारी कविता मनलें सुकून देतं ऱ्हास!....मोहनदादा यासन्या कविता रसिकजन वाची ऱ्हायनांत!पावती दि ऱ्हायनात!अहिराणी भाषा समृद्ध आनी श्रीमंत करी ऱ्हायनातं!सागर ब्राम्हने नावंनां नवा जीवलग मित्र भेटनां!व्हाट्सएप आनी फेसबुक वर कविता येवालें लागन्यात!अहिरानींना जागर खान्देश वलांडी दूर पाउत पव्हचाडी ऱ्हायनात!अहिरानींना गुरू रमेश धनगर सर,लतिकाताई चौधरी मॅडम!विठ्ठलदादा साळुंखे यासनं मार्गदर्शनमुये मोहनदादा यासन्या कविता पखे लायी आल्लग आल्लग ठिकाने उडी ऱ्हायन्यात!🌷
मायनी जनम दिनां!..जनमताचं हिरदनां अहिराणी बोल कानवर पडनांत!..त्याचं बोल बोलाले लागनातं!त्याच भाषाम्हा चांगलं व्यक्त व्हता येस!..हिरदनां सबद मुखे बाहेर येत ऱ्हातंस!..मोहनदादा यासले समृद्ध सबदस्नि प्रतिभा भेटेल से! त्या एक हजार कवितास्ना धनी सेतस!त्यास्न अहिराणी भाषावार जीव से!पेरेम से!उज्जी जीव से!
.......मोहनदादा यासना आदर्श सेतस..... प्रकाश पाटील पिंगळवाडेकर सर!त्यासन्या
.."कस्टकरी बाप"आनी"वेदना गोठल्या"या
कविता मोहनदादा यासन्या आवडत्या कविता सेतीस!...डोयांनं पानी काढनांऱ्या रचना सेतंस,
".…......पखालनां हेला
म्हन कोनी ती बनायी
मन्हा बापनी गनती
सांगा कोठे रे गनायी....!" 🌷
बापनं जीवन जठे-तठे मूगमूग सहन करत ऱ्हास!तो बाप कोन लें दिखात नई!..बोलता येत नई!म्हनता येतं नई!...
"वेदना गोठल्या ज्याच्या
कधी विव्हळल्या नाही
काव्यास कळली आई
बाप का कळला नाही!🌷
आखो मोहनदादा दादा यासनी दुसरी आवडती कविता से.. कैलास नाना भामरे यासनी,
"मन्ह मन्ह करत मन आपलं भरत नई
घरदार वावर शिवाय राख भी उरत नई....!"🌷
लोभ, मोह,मत्सर हायी बठ्ठ जागावरचं ऱ्हायी जायी आसा
सत्शील वागानां न्यामिना संदेश कवी भामरे सर देत ऱ्हातंस!
मोहनदादा यासनी तिसरी आवडती कविता से... प्रा देवदत्त बोरसे सर यास्नि,
"दोन पाठनां भाऊस्ना
पडनां जव्हय वाटा
माय बापना हिरदलें
टोचाई गयानां काटा....!"🌷
आते भाऊ भाऊ वैरी बनी ऱ्हायनात!माणूसपण दूर जायी ऱ्हायन!यानं उत्तम चित्रन बोरसे सर यासनी करेल से!🌷
मोहनदादा दादा या जेठा मोठा कवीस्ना आशीर्वाद लिस्नि मव्हरे लिखी ऱ्हायनात!अहिराणी मायलें समृद्ध खजिना दि ऱ्हायनात! आपली सोतानी रचनाथुन भी न्यामिना संदेश दि ऱ्हायनात,
"बाप ग्या सर्गलें
माय कुकु लावत नई
मायनां मनम्हा कितलं दुःख से
कधी दावत नई!"🌷
मन हेलायी जास!दुःख वल्ल व्हयी मनलें सतावत ऱ्हास!🌷
आखो "नदारी"या कविताथुन काय सांगतस ते दखा,
"अरे नदारी नदारी
तिले कोनी नई ईचारी
करे खुशीम्हा सवसार
काय करी ती बिचारी!
काया आभायनां खाले
जीनं से कायी माटीम्हा
गरीबीनं ते जहर
पेनं से रोज थाठीम्हा!..🌷
मोहनदादा हिरदलें भिडनांऱ्या कविता लिखी ऱ्हायनात!जीवन जगासाठे उमेद दि ऱ्हायनात!दुःख डोकावर धरी आननम्हा ऱ्हावानं सांगी ऱ्हायनात!न्यामिना संदेश देत मोहनदादा लिखी ऱ्हायनात!
वाचन, लेखन आनी गायन करी अहिराणी साहित्यालें अमृत भरी भरी कविता दि ऱ्हायनात!धाकल्ला पोरें आनी धल्ला मानसेस जोडे बठी मझ्यामां कविता लिखी ऱ्हायनात!🌷
मोहनदादा यास्ना खटलानं नाव कविता से!या कवितानी साथ भेटनी!१००कविता लिखायी जायेलं सेतस!आखो साथ भेटी ते मुकल्या कविता लिखाथिन आस त्या म्हंतंस!कवितागुंता कविता जगी ऱ्हायनातं!लिखी ऱ्हायनात!आंडेरं नंदिनी आनी आंडोर प्रीतम दोन्ही घरनां समीक्षक सेतस!..घरम्हाचं कवितानी समीक्षा व्हयी ऱ्हायनी!आस्सल सोना-हिरानां तोल-मोलनं काव्य करी ऱ्हायनात!कोल्ल खायी ऱ्हायनात पन कोना दारे जायेलं नई सेतस!🌷
अहिराणी कवितानं रुपडं बदली ऱ्हायनं!अनुभवनां गिद्दु कविता म्हा उतरी ऱ्हायना!मनम्हा बठेल अक्षर बीज कविता बनी ऱ्हायनी!कविता कायेजनां हुंकार व्हयी ऱ्हायना!बागेबागे अहिराणी कविता मव्हरे सरकी ऱ्हायनी!....मोहनदादा पाटील कायेजथिन लिखी ऱ्हायनात!नवं नवीन आशय- विषय लीस्नि लिखी ऱ्हायनात!सुरतम्हा हिरा घसता घसता.. अहिरानीं हिरा कवितालें तपाडी तपाडी चमकाडी ऱ्हायनांत! कविता सोनांगत आस्सल व्हयी उतरी ऱ्हायनी!मोहनदादा या हिरालें आखो अहिराणी साहित्य लिखागुंता हिरदथुन शुभेच्छा !आरस्तोल करस!आनी या लेख मालानां समारोप करस!आभार मानस!🌷
🌷--------------------🌷
....नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२२ मे२०२१
Comments
Post a Comment