मननी खुसुरफुसुर (भाग-०१)

मननी खुसुरफुसुर
         (भाग-०१)
🌷🌷🌷🌷🌷🌷
******************
...नानाभाऊ माळी

भाऊ-बहिणीस्वन!
 नवकरीना रिटायरमेंटनां दिन जस जश्या मंनगंम वसरी ऱ्हायनात!..आंगे आंगे यी ऱ्हायनात!कमी कमी व्हयी ऱ्हायनात तसतशी बुद्धीलें,मनलें आनी आंगलें सुस्ती चढी ऱ्हायनी!काय करो?काय बोलो?काय लिखो?काय दखो!...बठ्ठ नेम्मनं बधीर व्हयेलनांगत व्हयी जायेलं से!🌷

...आते डोकाम्हा इचार घुसतंस नई!डोकाम्हा इचार करान रसायन सरी जायेलं से काय कोन जाने?आते तें उगनारा दिन,मावयनारा दिन बठ्ठा माले
सुस्तायेलंनांगत वाटी ऱ्हायनातं !
काब्र आस वाटी ऱ्हायनी व्हयी?पयी पयी थकनू ते नई?साडे पस्तीस साल नोकरी व्हयनी!..त्यानं पहिले खाजगी कारखानामां चार साल काढात!

पहिले बिन लगामनं घोड व्हयी पयेत ऱ्हायनू!मव्हरे लगीननी लगाम मनलें-मुसडालें 
 व्हडत ऱ्हायनी!पयनं मातरं थांबन नई!पयन चालूज ऱ्हायन!सप्पननां व्हडा!सवसारनां व्हडा!पोरेस्ना व्हडा!मव्हरे त्यासना लगीनन्हा व्हडा!आते नातरेस्ना व्हडा!लोभी,मतलबी मन पायले व्हडत ऱ्हास!पायले नाल तरी कितल्या ठोकान्या हो?पयी पयी थकेल घोड जिमीनलें पाय घसी पयाले लाग्न!🌷

नालन्हा खिय्या उस्मयी निंघी ऱ्हायनात!जवानीन्हा तयपायनां भरपुटे खुर्गटायेल पायलें आतें या वयम्हा टोचायी ऱ्हायनात!घोड थकावर आंग टाकी जिमींनवर बसाले लागी जास!रंगत व्हडी व्हडी जवानीनां चोथा व्हयी जायेलं ऱ्हास!कमायी करी करी घरना चार खांबस्वर सऱ्या टाकी घर हुभ ऱ्हास!🌷

मानोसनं वय व्हवावर दारसे वसरीम्हा पडेल ऱ्हास! खाटलावर दिन मोजी पडेल ऱ्हास!दारना मव्हरे हाड्या,चिडया आथा
 तथा उडतांना दिखत ऱ्हातंस!पोरे-सोरे पयत दिखतस!धल्ला हातम्हा काठी लीसनी हाळवयलें दनकारत ऱ्हास!रिटायरमेंटनां मव्हरे डोयांलें हायी बठ्ठ
 जगनं नजरे दिखी ऱ्हायन!🌷

जिंदगी कसी ऱ्हास दखानां तुम्ही!जलमलें येव्हाफाईन हातपाय झटकानं चालू व्हयी जास!हातपाय मारी ऱ्हावान!हायउपस करत ऱ्हावानं!जिवाडलें शांती अशी भेटत नई!समाजम्हा नाव व्हवागुंता!मतलबी व्हयी,झटा खायी सवसारनं आपलंच घोड दामटाळतं ऱ्हावानं!तंगाडतं ऱ्हावान!नावनं लेबल कपायलें चिटकायी!फुशारकी मारी नाव गाजाडत ऱ्हावानं!जपेलथुन रात-पाह्येटे उठी दाखावरं वाटस," काय से हायी बट्ठी हायउपस?"

एकलाचं आरसांगम दखी हासी रडी लेवो!दिन उगावर आखो वाघनं चामडं घाली मिरत ऱ्हावानं!हाऊ हायउपसनां खे दखी वाटस,"यालेचं सवसार म्हंतंस??" रात-पाह्येटे उठी, आरसांगम दखी,सोतानां येडाचायालें हासी लेवो!आपुन कोन सेतस ते आरसालेचं ईचारी लेवो!🌷

सकायेलें दिन उगावर,बांगा व्हयी आखो सवसारनी दुसेरं मानगुटीवर ठी लेवो!बैल बनी सोतालें जुपी लेवो!तंनगी-तुंनगी व्हडत ऱ्हावो!व्हडातं ऱ्हावो!मी कोन से तें नेम्मंनं संमजी वून नई आपलें!खे मांडनारा!खे करनारा!आपले खेवाडनारा कोन से तेच आजून संमजी वून नई!आपुन मातरं नाची ऱ्हायनुत!🌷
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
********************
....नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
(ह मु हडपसर, पुणे-२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१५जून२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)