बाप तश्या बेटा,कुंभार तश्या लोटा

बाप तश्या बेटा,कुंभार तश्या लोटा
    🌹🌹🌹🌹🌹🌹
     ******************
...नानाभाऊ माळी
 
राम राम जी!
भाऊ-बहिणीस्वन!
धाकल्पने डखारानां घरम्हा ज्या बहीण-भाऊ वाडे लाग्नात त्यासले घरना मेढ्यानां रीती रिवाजथिन ऱ्हान पडे!घर लाईन दोरीवर चाले!माया ममता बट्ठी जित्ती ऱ्हाये!एक जूगथिन ऱ्हायेत!बठ्ठास्ले आपाआपला कामे वाटी द्येल ऱ्हायेत!एक दुसरालें जीव लायेत!..आते ते बठ्ठ बदली ऱ्हायन!...त्यांगुंता मन्हा मन न्हा बोल मांडी ऱ्हायनू!
***********************
दखा भाऊस्वन!बहिणीस्वन!...
डखारानां घरम्हा बठ्ठी हाळवायवर धल्ला-धल्ली आक्सी सुटत ऱ्हातंस!या वसरीम्हा उनात का हाळवाय मांगलंदारे!या मांगलदारे उनात का त्या मव्हरन्हा दारे!..या भानसींननां आंगे उनात का बठ्ठी हाळवाय काना कोपरे आती तथी बिन सासुले व्हयी जास!हावू खेय आक्सी चालू ऱ्हास!धल्ला-धल्ली पुरा डखारालें नेम्मंन लाईनवर
 ठेवत ऱ्हातंस!तव्हय वावरन्हा माल-हाल दारसे दिखतं ऱ्हास!बठ्ठास्ना गये-नये बल्का उतरतं ऱ्हास!🌹

धल्लासनी मुकला उन पावसाया दखेल ऱ्हातंस!..दांडगा आनभव त्यासनाफान ऱ्हास!मांगला-आनी पूल्ला गनज वरीसनां नफा तोटा संगे लयी फिरत ऱ्हातंस म्हनीसनी त्या काकुयदी करी व्हवू-आंडोरवर उज्जी सुटत ऱ्हातंस!दनकारात ऱ्हातंस!त्यासनी कोल्ल-वल्लं पन रगडी-मुसडी खायेल ऱ्हास!लोसननां पानीम्हा भाकर-देड भाकरी मोडी माडी पोट भरेल ऱ्हास!घाम गायी हुभा ऱ्हायेल ऱ्हातंस!🌹
..चांगलं जबून,गोड धोड कव्हय मव्हय ताटे उन ते तोच दिन सन समजी लेतं ऱ्हायेतं!घाम गायी-गुयी,रंगत बायी-बुयी घरे-दारे,जमीन-जुमला कमायी ठेयेल ऱ्हास!रात-दिन आंगन्हा गयेलं घाम सोताल्हे आनी पोरेस्ले कस्ट करानी शेमटी देखाडत ऱ्हास!राब राब राबी तव्हय 
डोयांलें दिखी हायी सिक्सन त्यासनी लेंयेलं ऱ्हास!तोच मांगला पाढा मव्हरे सरकत ऱ्हास!🌹

..बठ्ठा राबनात ते घर-वावर हारं-बरं दिखातं ऱ्हास!लक्षमी मायनां सोनान्हा पाय सोता व्हयी घरलें चमकाडी जातस!कस्ट करानी द्यानंत जोइजे!हात पाय थकेल धल्ला-धल्ली या वयम्हाभी काठी टेकी पोरेस्ले दनकारी-दुनकारी कामेस्ले जुपत ऱ्हातंस!🌹

घर जित्त ठेवन व्हयी तें राबनं पडी!भुक्या-तिष्या राबेल 
पोरेस्ले राबानं सांगी ऱ्हायनातं!राबी ते दिखी!डोयालें दिखी तें मव्हरे जावानी उमेद ऱ्हायी! बठ्ठा खान्देशम्हा हायीचं चितरं दिखास!धल्लासनां नजरखालें पोरे राबी ऱ्हायनात!येरायेरनां मुल्लानं व्हडी ऱ्हायनात!मव्हरे ढकली ऱ्हायनात!गच्ची पिकी ऱ्हायनं!नात्रे-पंतू धल्लास्ना आंगे खांदे खेयी ऱ्हायनात!आबादी-आबाद दखी दिन आनंनथिन पयी ऱ्हायनात!हेट्याथिन वार्ग सुटेल से!चाव्वय चावडीवर रंगी ऱ्हायनी!धल्ला ठायकेचं समायी-सुमायी भुंड हालायी-हुलाई चावडीन्ही जिमींन गरम करी ऱ्हायनात!मुकला आढावू भेंडे येरायेरगंम दखी फिदी फिदी हासी मव्हरे जायी ऱ्हायनात!हायी मातरं खरं से बाप तसा बेटा निंघस, कुंभार तसा लोटा ऱ्हास!धल्ला पह्येरी जास!पोऱ्या लानी करस!नात्रे दयी दुयी भाकरी खातस!..असं चालत ऱ्हाई!एकनी झाड लावो!तिसरान्ही फय खावो!धल्ला चांगला ते पोऱ्या चांगला!...
नात्रेभी  संस्कारम्हा घडी जास!
🌹🌹🌹🌹🌹🌹
*****************
....नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
ह मु हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०९ऑगस्ट२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)