खान्देश माळी मित्र मंडळ आयोजित २३ वा कौटुंबिक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ " एक अमृतानुभव"
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
खान्देश माळी मित्र मंडळ आयोजित २३ वा कौटुंबिक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ " एक अमृतानुभव"
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
**********************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
काल दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी खान्देशातून येऊन पिंपरी-चिंचवड अन पुण्यात रहात असलेल्या माळी समाजातील लहान-थोर बंधु-भगिनी अविस्मरणीय अशा क्षणात न्हाऊन निघाले होते!दोन वर्षात एक दुसऱ्यापासून दुरावलो होतो!करोनामुळे प्रत्यक्षात भेटता आलं नव्हतं!🌷
तहानलेला व्यक्ती घटाघटा पाणी पितो तसा प्रत्यक्षात भेटीला दुरावलेली माय माऊली,बहिणी-मैत्रीण एकमेकींना भेटून काय बोलू आणि काय नाही इतक्या बोलण्यात तल्लीन झाल्या होत्या!निमित्त होत खान्देश माळी मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड,पुणेच्या "सांगवी"विभागाने आयोजित केलेल्या या भेट पर्वाचं,या आनंदानुभवाचं दृष्ट लागावी असं आयोजन झालं होतं!🌹
आलेल्या क्षणांच्या आनंदासाठी मेहनत आणि कष्ट उपसलेले असतातं!सुखाच्या प्राप्तीसाठी त्याग करावा लागत असतो!प्रचंड ऊर्जा खर्च झालेली असतें!डोक्यावर बर्फाची लादी ठेवलेली असते!रुसव्या फुगव्यांना जागा नसते तेव्हा जवा एवढे सुख आपल्या पदरी पडत असतं! खान्देश माळी मंडळाच्या सांगवी विभागातील बांधवांनी या सुखद क्षणांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून अतोनात कष्ट उपसले होतें!या दिव्य क्षणांसाठी आपला वेळ,शारिरीक कष्ट अन आर्थिक योगदान दिले होते! तेव्हा कुठे खान्देशी माळी समाजाच्या बंधू-भगिनींना या अविस्मरणीय अमृतानुभवाचा आनंद उपभोगायला मिळाला होता!🌷
काल जुन्या सांगवीतील ढोरे लॉन्स नववधू सारखी नटलं-थटल होत!अमृतानुभवाचे वऱ्हाडी या सुंदर क्षणांच्या आनंदात डुंबला होता!वऱ्हाडी वेगवेगळ्या विभागातून आले होते!एकमेकांशी तदात्म झाले होते!सांगवीतील यजमान लहान-थोर होते!तळागाळातील होते!हाडाचे कार्यकर्ते होते!झाडून एक झाले होते!तळमळीने यजमानपद निभवीत होते!आलेल्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तसूभरही कमी होऊ नये म्हणून झटत होते!आनंद द्विगुणित होण्यासाठी हृदयातून काळजी घेत होते!🌷
"अमृतक्षण" क्षणाक्षणांनी मागे निघून जात असतातं!प्रत्येकजन आनंदासाठी झटत असतो!काही क्षण आठवणीविना निघून जात असतातं!कधी निघून गेले कळतंही नसतात!तर काही क्षण आपल्या हाती आठवणींचा, कुबेराचा घडा देऊन जात असतातं!आपलं जीवन चंद्राच्या केले प्रमाणे आहे!घनघोर अंधारातून उजेडाचा शीतल प्रवास सुरू होतो!पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत असतो!....नंतर... नंतर बंधूंनो!...चंद्र कलेकलेने पुन्हा अंधार पांघरण्यासाठी निघालेला असतो!....🌷
बंधू-भगिनींनो!
सर्व कुटुंब एकत्रित करून विशाल कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या सांगवीतील बांधवांच्या मेहनतीला त्रिवार वंदन करतो! मनाला तृप्तीचा साक्षात्कार देऊन जाणाऱ्या क्षणांसाठी आपण दिवस-रात्र एक केलेत!दिलेल्या वचनाप्रमाणे,शब्दांप्रमाणे दोन महिने आनंदाची झाडं-वेली लावत राहिलात!काल त्याचं वेलींनी चौफेर फुलं उधळली होती! सुगंधाने आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं!सुगंधित फुलांनी वातावरण गंध-धुंद झालं होतं!हा आनंदी क्षण संपूच नये असं वाटत होतं!कार्यक्रमास आलेले बंधू-भगिनी सुगंधी आनंद घेऊन बाहेर पडतं होते!सांगवीकारांच्या कष्टाला
गोड फळं आली होती!यजमान फळ वाटण्यात गुंतून गेली होती!आलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यातं समरस झाली होती!प्रत्येकजन तृप्तीचा ढेकर देत बाहेर पडत होता!
सांगवीकरांना अंतकरणातून आशीर्वाद देत होता!सांगवी विभागाने माणसं कमावली होती!माणूसपण जपलं होतं!कालचा२८ऑगस्टचा अमृतानुभव आयुष्याच्या पानावर ठळक शिक्का मारावा तसा उमटला होता!मनाच्या खोल कप्प्यात सुरक्षित ठेवला होता अन तिचं संचित शिदोरी पुढील वाटचालीत सोबत रहाणार आहे!
उजेडाची ज्योत घेऊन निघालेल्या सांगवीतील भावंडांनां कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो!ज्योत प्रकाशमान होत होत प्रकाश पर्वाकडे वाटचाल करणार आहे!खान्देश माळी मित्र मंडळाची प्रकाश वाट होणार आहे!वाट प्रकाशमान होत रहाणार आहे!दिव्य ज्योत खान्देशातून येऊन भावी स्वप्न पाहणाऱ्या भावंडांची उजेड होणार आहे!
आपण कौटुंबिक मेळाव्यासारखा क्षण!गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आपल्या स्मृतिपटलाच्या खोल कप्प्यात सुरक्षित जपून ठेऊ!निरोपाचा क्षण देखील भावपूर्ण होता!..हा क्षण कधी संपूच नये असं वाटतं होतं!...वेळ थांबत नसते!..मागे पळत असते!..आपण फक्त आशेने त्या क्षणांच्या मागे धावत असतो!सांगवीकर बांधवांना धन्यवाद देत त्यांच्या ऋणात राहू!..येणाऱ्या पुढील मेळाव्याची आशेने वाट पहात अमृतानुभव इतरांना वाटीत राहू!
🌹🌹🌹🌹🌹🌹
**********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२९ऑगस्ट२०२२
Comments
Post a Comment