नाक्खय खोडायपन
नाक्खय खोडायपन
🌷🌷🌹🌹🌹
**************
...नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
खोडायपना धकल्पनफाइन आपले भेटेल फुकटनं दान ऱ्हास!खोडाय ऱ्हावाशिवाय पोर नई!पोऱ्या नई!मानोस नई!कृष्ण भगवाननी धकल्पने कितला खोडायपना करेल से,कोनलें सांगानी गोठ से का?आंगम्हा खोडायपना जोइजे!त्यानंशिवाय जीवन नई!थोडं चांगलं,थोडं वांगलं कालामोडीस्नि जगी लेवो!दुन्याले आनंद देत मव्हरे निंघी जावो!खोडायपना म्हणजे खोड्या करीकुरी घर-दुन्यालें तंगाडत ऱ्हावो!कुंमचाडत ऱ्हावो!बह्यकाडतं ऱ्हावो!जीव्वर येवा पाउत नाचाडतं ऱ्हावो!धाकल्पनें हाऊ खेय आक्सी चालतं ऱ्हास!
गनज पोऱ्या खोडाय ऱ्हातसं!पोऱ्या ऱ्हातंस तें ठिक से पन डोयांलें देखाले भेटस..गनज शानला-सुरता भी उज्जी खोडायपना करत ऱ्हातंस!काम व्हनार व्हयी तठे भी फात्या पाडी टाकतस!दूरथिन गंम्मत दखत ऱ्हातंस!दूरथिन आंग शेकत ऱ्हातंस!फिदी फिदी हासत ऱ्हातंस!🌷
धकल्पनें खोडाय व्हयी ठिकऱ्या खेयी,ईट्टी-दांडू खेयी!झाडवर पकडा पकडी खेयी ज्यांनावर राज ऱ्हाये त्याले उज्जी कुंमचाडी,तोंडलें फेसकूट यी इतला हाफेहाफ करी सोडूतं!राज मातरं कोनले टये नई!इतलं
तंगांडूत इतलं तंगांडूत तें जिव्ववर ईसनी ज्यानावर राज राहें तो गुच्चूप,चोरीदपी उपाडबांडी करी घर पयी जाये!
सायमा,गलीम्हा आंगेपांगे आनी घरमां याले त्याले नाया पाडाम्हा जी मज्या ऱ्हाये ती मव्हरे आते जिंदगीभर भेटावू नई!याले नकट्या म्हन!तिलें खोल डोई म्हन!त्याले दात्तोड म्हन!तिलें बगरबगर बकरी म्हन!कोनं पुस्तक दपाड!कोनी व्हयी दपाडं!कोनी कंपास लपाड!कोनले झिपरी म्हन!सायमां गुरुजी फळागंम तोंड करी लिखी पुसी शिकाडत ऱ्हायेत!मांगे
नेम्मंन आम्ही उचडेलपना करत ऱ्हाउत!तोंडम्हा आंबट चिचा चगयेतं ऱ्हाउत!पोरेंस्ना तोंडलें पानी सुटे!गुरुजी मांगे फिरी आमन्हा मव्हरे दखी शिकाडालें लाग्नात रें लाग्नात का आम्ही शाजूकनां मायेक मन लायी गुरुजींगंम दखी!जीव वती,अभ्यास करी ऱ्हायनुत अशी वाटतं ऱ्हाये!गुरुजी आम्हलें शाबासकी देत ऱ्हायेतं!बाकिना आम्हनांगंम मटरमटर डोया फाडी दखत ऱ्हायेतं!आम्ही खुसुरफुसुर करी हासत ऱ्हाउत!🌷
आमन्हा खोडायपनां पायरें कव्हय मव्हय आम्हनावर एकदम एकमझार पाटा फिरी जाये!गुरुजींस्नि छडी आम्हना हात वाटचं दखत ऱ्हायेतं!गुरुजी छडी मारी मारी थकी जायेत!आम्ही,"नको नां गुरुजी!नको नां गुरुजी!" म्हनत इवळी-आवळी आल्लाउत ऱ्हाउत!चिल्लाउत ऱ्हाउत!जेवना हात,डावा हात छडी खायी खायी काया निय्या व्हयी जायेत!सुजी जायेत!घरमां कोनलें सांगानी बिशात नई व्हती! खरं बोलानी,खरं सांगानी चोरी व्हती!खरं सांगुतं ते घरमां भी कुंमचाडी काढेत!तव्हय मार
खावाम्हा भी मज्या वाटे पन धाक ऱ्हाये!धाकम्हा मया ऱ्हाये!मयाम्हा जीव ऱ्हाये म्हणीसनी माय-बापनां जीव बये!🌷
धकल्पनन्हा खोडायपनाम्हा जे नाक्खय रूप दिखे!ते निर्मय व्हत!गुईंगत गोड-गुईचट व्हत!त्याम्हा आनंद व्हता!मया व्हती!कृष्ण कन्हैयानी खेयेल खयखयत,वयवयत भु भारी धाकल्पन व्हत!🌷
धाकला रूपम्हा creativity नी हिम्मत ऱ्हास!मव्हरे जावानी कयकय ऱ्हास!सप्पन दखानी दबेल शक्ती ऱ्हास!तिचं शक्ती उस्मई वास्मई,डोक वर काढतं ऱ्हास!उज्जी खोडायपनां करतं ऱ्हास!येनारा कायन्ही कांनगी करत ऱ्हास!मनम्हा दबेल
इचारनी वाईवुई आवरी ठेयेल पिसोडीम्हायीन उस्मई उस्मई वात्रायेलंपन डोकं वर काढी काढी बठ्ठास्ले नाचाडतं ऱ्हास ते हिरदथुन गोड वाटत ऱ्हास!🌷
वात्रायेलंपनम्हा खोडायपना लपेल ऱ्हास!तो मनलें सुखून देत ऱ्हास!आनंद देत ऱ्हास!धाकल्ला बठ्ठा पोरे भलता ईत्रायेलं ऱ्हातंस!घरम्हा कोप बशी फोड,भांडा फेक,उंड-सांड कर!दुसरालें नाया पाड!हायी वयन लागानं,शिकानं वय ऱ्हास!पडी-झडी ढोपरा फोडी हुभ ऱ्हावानं वय ऱ्हास!
नाक्खयंपना करा शिवाय...स्थल,कालनी वयख व्हत नई!खोडायपना जित्तापननी निशानी से!आम्ही धाकल्ला व्हतुतं!खोडायपना करी!मार खायी-मार दि आठलोंग उनुत!पोरेस्मझार आनी आते नात्रेस्मझार तोच वात्रायेलंपना
दखी मज्या वावाटत ऱ्हास आपले!आनी सोतालेंचं सोता
चिमटा काढी ल्हेस,"आपला खोडायपना नात्रेस्पाउत भिडी ग्या भो..!"मंग एकलाचं हासी लेवो!
मी तें नात्रेसंगे उज्जी ईत्रायेलंपना
करी माल्हेचं धकल्पनम्हा ढकली देतं ऱ्हास!त्यासना संगे मन मोक्या खेयेत ऱ्हास!नाख्खय खोडायपनं आयुष्यानी दोरी लांब वाढावानं न्यामीन औषद से!नात्रेस्ना वयनां व्हयी,नात्रेस्मा नाची कुदी लेवो! फुकटम्हा हासी-कुदी वय वाढाई लेवो!
किरम्हा किर व्हडत ऱ्हावो!जिंदगीभर मज्या लेवो!🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
....नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२०जून२०२२
Comments
Post a Comment