खान्देश माळी मित्र मंडळ वारसा २३ वर्षांचामेळावा २३वा
खान्देश माळी मित्र मंडळ
वारसा २३ वर्षांचा
मेळावा २३वा, सांगवी
🌹🌷🌹🌷🌹🌷
******************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
प्रत्येक वास्तू,वस्तू आणि तथास्तु या शब्दांना आपल्या जीवनात अतिशय महत्व असतं!वारसा हक्काने मिळत नाहीत ते पण वारसदारांना त्यांचा अभिमान वाटत असतो!कारण कष्टाने उभं केलेलं नेहमीचं वैभवशाली असतं!🌷
"खान्देश माळी मित्र मंडळ" पिंपरी-चिंचवड,पुणे परिसर... ही समाज कल्याणकारी संस्था गेल्या२३वर्षांपासून एक दिलाने कार्यरत आहे!..ती वास्तू, वस्तू नाहीये परंतु जेष्ठांच्या तथास्तु आशीर्वादाने भक्कमपणे उभी असणारी नावलौकिक संस्था आहे!🌷
संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री.एस के माळी साहेब आणि मोठ्या हिमतीने संस्थेला नावारूपाला आणणारे दुसरे अध्यक्ष आदरणीय श्री.पी.के महाजन साहेब आणि तत्कालीन कार्यकारी मंडळाचे सर्वंच सदस्य बंधूंचे आकाशाहुन विशाल योगदान आम्हा सर्व बांधवांना स्फूर्तीदायी आहे!🌷
हृदया हृदयाला मायेने आशीर्वाद देणारी ही संस्था२३वर्षांपासून भरभक्कमपणे उभी आहे मनामनात निवास करणारी,विशेष स्थान असणारी संस्था आहे!पुणे-पिंपरी-चिंचवड परिसरात खान्देशातून आलेल्या माळी समाजातील बांधवांच्या एकोप्यासाठी,धागे विणणारें "खान्देश माळी मित्र मंडळ" असून धुळे,जळगाव,नंदुरबार आणि नाशिकच्या कसमादे पट्ट्याचा काही भागाचा समावेश आहे!🌷
गेल्या२३ वर्षांपासून आपल्या समाज बांधवांचें आशीर्वाद आणि शुभेच्छा ऊर्जा म्हणून काम करीत आहेत!ज्या परिस्थितीतून मंडळ स्थापन झाले त्यावेळेस आपला उद्देश म्हणजे संतशिरोमणी सावता महाराज,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दाखवून दिलेल्या आदर्श मार्गावरील आपण वारकरी म्हणून कर्म करणार होतो!अंशतः त्यांच्या मार्गावर आपण चालतं आहोत याचा अभिमान आहे!त्यांच्या डोळस कर्म सिद्धांताचे आपण अनुयायी आहोत!🌷
नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुणे,पिंपरी-चिंचवड,चाकण, भागात राहणाऱ्या अतिशय कष्टाळू,मेहनती आणि उत्साही कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनामुळे आज पर्यंत २२कौटुंबिक-विद्यार्थी गुणगौरव मेळावे व वधू-वर मेळावे अतिशय उत्साहात संपन्न झालेले आहेत!पार पडलेले आहेत!"एकता यशोबीजम" च्या संकल्पनेतून समाजातील सर्व बांधवांच्या ताकदीमुळेचं हे शिवधनुष्य उचलणे शक्य झाले आहे!तळागाळातील समाजबांधव या कार्यासाठी स्वतःला झोकून देत आहे!🌷
भोसरी,चिंचवड,हडपसर,चिखली,सांगवी,काळेवाडी,वारजे- माळवाडी आदी ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव आणि कौटुंबिक मेळावे उत्स्फूर्तपणे पार पडलेले आहेत!हे यश स्थानिक कार्यकर्ते आणि समाजबांधवांच्या योगदानामुळेचं शक्य झाले आहेत!या यशात आपल्या सर्व विभागातील बांधवांचा भरघोस प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असतो!खान्देश माळी मित्र मंडळ आपल्याच ऊर्जेचा श्रोत आहे!मागील दोन वर्षांत केवळ करोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्षात मेळावा जरी झाला नव्हता तरी करोनाच्या नियमांचे पालन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपल्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात जाऊन!घरोघरी जाऊन केला आहे!आपलं कार्य त्याही काळात जोमाने सुरूच होतं!त्यासाठी खान्देश माळी मित्र मंडळाच्या सर्वंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हृदयातून अभारही व्यक्त करतो!आपली वज्रमुठ एकतेची शक्ती साथीला आहे हिच आपल्या मंडळाची ओळख आहे!🌷
समाजातील सर्वंच बंधू-भगिनींनो!दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील विध्यार्थी गुणगौरव आणि कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे!दिनांक २८ ऑगस्ट२०२२ ला पुण्याच्या सांगवीतील ढोरे लवान्स येथे हा भव्य मेळावा आयोजित केला आहे!खान्देश माळी मित्र मंडळाच्या सांगवी-पिंपळे गुरव- निलख-सौदागर या विभागाच्या वतीने हे शिवधनुष्य उचलले आहे!काही दिवसांपासून या विभागातील पदाधिकारी,उत्साही कार्यकर्ते मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटत आहेत! मेहनत घेत आहेत!मंडळाचे उपाध्यक्ष ऍड.गोविंद माळी आणि सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एस डी माळी साहेब यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक पातळीवर सर्वंच कार्यकर्ते हिरीरीने काम करीत आहेत!स्थानिक पातळीवरील सर्वंच बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो की आपण सांगवीतील मेळावा आयोजनासाठी तन,मन धन लावून धावपळ करीत आहात!आपला भक्कम पाया मंडळास शिखरावर नेत आहे!आपण आहात म्हणून खान्देश माळी मित्र मंडळाची ओळख सर्वदूर पोहचलेली आहे!इतर सर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी दिनांक२८ऑगस्ट रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी हातभार लावावा!या वेळेस पत्रिका अतिशय सुरेख आणि सुबक छापलेली आहे!सांगवीला लग्न आहे अशी सुंदर आमंत्रण पत्रिका आहे!आपण सर्वांनी आपापल्या विभागात पत्रिका वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांची गुणपत्रक वेळेवर सांगितलेल्या पदाधिकाऱ्यांकडे पोहोचतें करावे!गुणवंतांचा सत्कार आपलाच सन्मान आहे!आपलेच पाल्य असल्याने सर्वांनी आवर्जून मेळाव्यास उपस्थित राहावे अशी विनंती करतो!सांगवी-पिंपळेगुरवतील सर्वंच कार्यकर्त्यांचे हृदयातून अभिनंदन करतो!ऋण व्यक्त करतो!..कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा!...खान्देश माळी मंडळाच्या सर्वंच बांधवांनी मेळाव्यास आपली उपस्थिती लावावी हिच आग्रहाची विनंती करतो!🌷🙏
********************
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी,
अध्यक्ष,खान्देश माळी मित्र मंडळ
पिंपरी-चिंचवड पुणे परिसर, सर्वंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने!!!
दिनांक-१८ऑगस्ट२०२२
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
Comments
Post a Comment