खान्देश अहीर देवभूमी
खान्देश अहीर देवभूमी
*****************
🌹🌹🌹🌹🌹🌹
....नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
खान्देशभूमी देव भूमी आहे!कान्हदेश भूमी आहे!राम भूमी आहे!त्या अमृत पावित्र्याच्या खाणाखुणा खान्देश प्राचीन काळापासून बाळगून आहे!तापी- ब्राम्हपुत्रेच्या अमृतकुंभाने पावन झालेला खान्देश!गिरणा-पांझरेचा खान्देश!पूर्वी सुजलाम सुफलाम खान्देश हिरवाईने नटलेला होता!दोन राज्यांच्या सीमेलगतचा खान्देश गुजरात-मध्यप्रदेशाला जोडलेला खान्देशाचा भाषिक संयोगाने समृद्ध अहिराणी भाषेचा जन्म झालेला असावा!🌷
खान्देशात धुळे,जळगाव, नंदुरबार,नाशिक(काही तालुके) अशा चार जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे!मध्यप्रदेश आणि गुजरातच्या काही भागात खान्देशी माणूस आपली भाषा आणि परंपरा टिकवून आहेत! त्यांचं खान्देशाशी घट्ट नाते आहे जोडलेलं आहे!🌹
खान्देशातून ३००ते ४०० किलिमिटर दुरवरून बरेच खान्देशी बांधव पुणे,मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात नोकरी आणि व्यापरानिमित्त स्थायिक झालेलें आहेत!काहीजण खान्देशातील मित्र,नाते, यांच्या ओळखीने आले असतील!..काही स्वतःच रिस्क घेत शहरात आले असतील!..🌹
अनेक खान्देशी बांधव भारताच्या विविध राज्यात कार्यरत आहेत! आपली रूढी,परंपरा टिकवून आहेत!काही बांधव विदेशात देखील गेले आहेत!आपली जन्मभूमी,आपला जन्म जिथं झाला ती अहिराणी भाषा कधीच विसरले नाहीत!तामिळ,केरळी,उत्तर प्रदेश, बिहार मधील कुटुंबे कुठेही गेलेत तरी आपली संस्कृती सोबत घेऊन जात असतातं!ती रूढी परंपरा, चालीरीती जगण्याची उमेद आणि ऊर्जा देत असतात!आज मितीस खान्देशी बांधव देखील जेथे गेलेत तेथे आपलं ठळक वेगळेपण घेऊन रहात आहेत!खान्देशी रूढी,परंपरांचा मोह इतरांना देखील आवरत नाहीये!आपण पोटापाण्यासाठी कुठेही गेलो तरी जन्माने नैसर्गिक प्राप्त झालेली आपली भाषा चंदनी सुगंध देत असतें!🌷
अहिराणी भाषा खान्देशी माणसाचा प्राण आहे!अहिराणी भाषेतील गोडवा इतर स्थानिकांना देखील घ्यावासा वाटतो आहे!स्थानिक अन्य भाषिक देखील अहिराणी भाषा शिकत आहेत!अहिराणीचा गोडवा अनुभवत आहेत!शेजाऱ्याकडून चविष्ट पाटोळ्यांची भाजी घेत आहेत!भाषा संपर्काचं उत्तम माध्यम असतं!भाषा अस्तित्वाची जाणीव प्रबळ करीत असते!भाषा आत्मसन्मानाची जननी असते!अहिराणी भाषेतील समृद्ध शब्दसंख्या काही कोटींवर असेल!अहिराणी भाषा अस्सल सोनेरी शब्दांची जननी आहे!ग्रामीण भागात गेलात तर समृद्ध शब्दांची रेलचेल प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून ओसंडून वहात असते!अहिराणी भाषा हृदयाची, काळजाची भाषा आहे!अनेक हृदयांना पोहचते आहे!अहिराणी काळजाची भाषा आहे!खान्देशातील हृदय बोली आहे!खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी आणि अनेक नामांकित खान्देशी ज्ञानियांची माधुर्यानें नटलेली हृदय बोली आहे!अलंकारांनी सजलेली अहिराणी भाषा शब्दांनी श्रीमंत आहे!🌷
अहिराणी भाषा बोलणाऱ्यांची संख्या दोन कोटीहुन जास्त आहे!म्हणूनच शासन दरबारी भाषेचा दर्जा प्राप्त करून घेणे आद्य कर्तव्य झाले आहे!भाषा खोल हृदयातून बाहेर पडते तेव्हा ती सोनेरी रंगाने चमकायला लागते!माय अहिराणी अनेक शब्दांच्या शृंगाराने नटून थटून वैभवाकडे वाटचाल करीत आहे!पूर्वीच वैभव पुन्हा प्राप्त करून खान्देशी व्यक्ती भारताच्या,जगाच्या कानाकोपऱ्यात जेथे जाईल तेथे तिची आराधना करीत गुणगान करीत आहेत!अहिराणी भाषा प्रेमी अहिराणीला स्वत:चा श्वास समजतात!अभिमानाने अहिराणीचा गौरव आणि जागर करीत आहेत!जशी प्रत्येकाला देशाबद्दल जाज्वल्य देशभक्ती असते!प्रेम असतं!अभिमान असतो!तशीच निष्ठा भाषेवर असते!अहिर बांधव आपल्या अहिराणी मायसाठी पुढे येऊन लढा देत आहेत!शेताच्या बांधावरून!घराच्या ओसरीतून!खळ्या-मळ्यातून अस्सल अहिराणी शब्द कानावर पडल्यावर तृप्तीचा आनंद मिळतं असतो🌷
भाषा व्यक्तीला नजर देत असते!डोळस करीत असते!वळण लावीत असते!भाषा जन्मदेती आई असतें!बेंबीच्या देठातून सांगणारा सांगत असतो!ऐकणारा अमृतात अंघोळ करीत असतो! आई मुलाला छान समजून सांगत असते!ज्यांचा जन्म खान्देशात झाला आहे आईचा पहिला शब्द कानी पडला असेल तोही माय अहिराणीतूनचं!शाळेत प्रमाण भाषा सोडली तर ९९% अहिराणी बोलणाऱ्या व्यक्ती आपलं मत काळजातून मांडतं असतात!खान्देशातील बांधवांनी भाषेची लाज बाळगण्यापेक्षा जाज्वल्य भाषाभिमान बाळगला तर तिचा गोडवा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे!पोहचतो आहे!प्रचंड शब्द भांडार घेऊन हिंडणारी अहिराणी भाषा मुखोद्गत होण्यास सुरुवात झाली आहे!आई-आजींच्या मुखी चालता,बोलता अहिराणी ओव्या येत असतातं!अहिराणी जात्यावरची गाणी खान्देशाचं जीवन दर्शन आहेतं!🌷
खान्देशी माणसं!येथील वेगळेपण!येथील पद्धती सर्वंच आपलेपणा आहे!असतं!🌹
आपण एखाद्या कंपनीत कामाला लागलो!कुठेतरी कामधाम पाहिलं!..पैशाचा थोडाफार प्रश्न सुटतो!आर्थिक चणचण दूर होते!पण मनाची भूक भागत नसते!आपल्या भागातला!आपल्या भाषेचा!आपल्या संस्कृतीचा!ओलाव्याची पदोपदी जाणीव होऊ लागते!शेवटी आपल्या भागातला!आपल्या मातीचा, आपल्या भाषेचा व्यक्ती जवळ पाहिजे असतो!काळजाची अहिराणी भाषा बोलणारा आपलाचं पाहिजे असतो अशी जाणीव होऊ लागते!🌹
प्रत्येक भागातले काही महत्वपूर्ण सण असतातं!खान्देशचे देखील काही सण असे आहेत की त्यांचं वेगळेपण ठळकपणे दिसून येतं असतं!सण साजरा करण्याची प्रथा,परंपरा,रूढी,चालीरीती,कानबाईनां रोठ,आखाजी हे सण म्हणजे खान्देशच वैभव आहे! खान्देशातील सण प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत महत्वपूर्ण भाग आहेत!मुलगी दिपावली अन अक्षतृतीयेला माहेरी जात असते!सासरी राब राब राबून अतिशय थकलेली असते!तिला शारीरिक आरामाची गरज असते!हे सण माहेरपणाची आठवण करून देत असतातं!मुलीला काही दिवस विश्रांतीसाठी माहेरी घेऊन यायची प्राचीन परंपरा आहे!खान्देशशी घट्ट नाते जोडत माहेरपणाला चार-आठ दिवस मुलगी येत असते!वीर-डखीन,मरी मायची जत्रा असे संस्कृतीशी निगडित अनेक सण आपण साजरा करीत असतो!🌹
खान्देशातून व्यापार किंवा नोकरी निमित्ताने अनेक व्यक्ती,कुटुंब स्थलांतरीत होतात तेव्हा व्यक्तीच्या नसानसात बसलेल्या या धार्मिक परंपरा,रूढी आपल्या सोबत घेऊन आलेले असतात! स्थानिक लोकांना आपल्या या खान्देशी विशेष रूढी,परंपरांची ओळख होते!खान्देशी हृदय प्रेम वाटीत असतं!जीवन जगण्याची उमेद निर्माण करीत असते!मुळातचं खान्देशी माणूस मवाळ, मधाळ,गोड आणि सज्जन असतो!स्वतः कष्ट सहन करीत आनंद वाटीत असतो!जेथे जाईल तेथील लोकसमूहात एकजीव होऊन जात असतो!एकरूप होऊन जातं असतो!🌷
खान्देशी माणसात आपलेपणा पूर्वापार पासून पिढीजात भरलेला असतो! पाहुनचारासाठी नेहमीचं उत्साही असतो!घरात असेल नसेल तरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी आपलं काळीज ओतणारा असतो!इतरांना जीवन जगण्याची उत्तम कला खान्देशी माणूस शिकवीत असतो!मुळातचं सहनशील वृत्ती असल्याने!कौटुंबिक परंपरा लाभली असल्याने इतरांची मन जिंकत इतरांच्या हृदयात विशेष जागा निर्माण करणारा खान्देशी माणूस कुठेही गेला तर माणूसपण पेहरीत,आनंद देत घेत आपल्या रूढी परंपरांच्या आदर्शांनें जगत असतो!इतरांना देखील खऱ्या माणूसपणाची शिकवण देत असतो!🌹
पूज्य साने गुरुजी मुळात कोकणातले पण खान्देश मातीत त्यांचा "शाम"हृदयाहृदयात जाऊन बसला!फुलला!मुलांवर उत्तम संस्काराची देणगी सानेगुरुजी देऊन गेलेत!त्यांच्यातील हळवेपण त्यांची मातृभक्ती!ममता,कोमलता! हृदयाला पाझर फोडणारी त्यांची वाणी खान्देशी मनाला भावली म्हणून खान्देशी माणूस हळव्या वृत्तीचा आहे!अहिराणी भाषेतून!बोलण्यातून!वागण्यातून!खान्देशी माणूस आपला भाषिक समृद्ध वारसा जपत पुढे चालला आहे!माय अहिराणीवर जन्मदेत्या आई एवढेच प्रेम करतो आहे!आपल्या रूढी,परंपरा,चालीरीती घेऊन पुढे चालला आहे!अहिराणी भाषेचा शब्दकोश निर्मितीसाठी स्वतःहून पुढे येत आहे!...अस्सल सोनेरी शब्दांची मांदियाळी सोबत घेऊन निघाला आहे!🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१२ऑगस्ट२०२२
Comments
Post a Comment