वळीव

वळीव
🌹🌧️🌧️🌹
*************
...नानाभाऊ माळी

दणकट टपोऱ्या थेंबांची
पखाल घेवून येतो
सरसर झोडपून वळीव
प्रेम अर्पूनी जातो

खट्याळ वळीव जीवांशी
नाते जोडुनी जातो
घालीत अंघोळ प्रीतीची
मातीस फुलवून जातो

हिरव्या कोमल अंकुरांतं
जीव ओतूनि जातो
धडश्या मारीत मातीचा
पदर हलवीत गातो

वळीव सडा टाकित
पुढे निघूनी जातो
स्पर्शूनी वारा डोक्यावरील
 पदर उडवून जातो

मातीस अंगाला सुगंध
दरवळुनी येतो
मोर नाचतो झाडावर
कुंहुं कोकीळ गीत गातो

प्रीत फुलवत प्रेमाची
कोमल अंकुर येतो
हिरवा शालू नेसवून
वळीव निघूनी जातो
***************
🌹🌧️🌧️🌹
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-०४जून२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)