आई रडू नको!मिलिटरीतं चाललो

आई रडू नको!मिलिटरीतं चाललो
   🌷🌷🌷🌷🌷🌷
**********************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
बालपण निरागस असतं!पाहिजे तस वागायचं असतं!हवं ते मिळवायचं असतं!जगणं खूप सुंदर असतं!बालपण आनंदी असतं!खूप खूप खोडकर असतं!कधी कधी हट्टी असतं!भोकांड पसरून रडणंही असतं!बालपण सुंदर असतं!🌷

घरात-बाहेर भांडायचं असतं!मनसोक्तपणे हसणं असतं!सर्वंच काही निरागस असतं!आतून बाहेरून निष्पाप असतं!धुतल्या कपड्यागत स्वच्छ असतं!बालपण निस्वार्थी असतं!खळखळतें पाणी असतं!आत बाहेर शुद्ध असतं!१००टक्के अस्सल असतं!बालपण सोनं असतं!देवत्वाचां अंश असतं!उगवत्या सुर्यासम बालपण असतं!बालपण सुंदर असतं🌹

वेलीवरील उमलती कळी असतें!खेळण्या-बागडण्यात आनंद देतें!थोडाफार अभ्यास असतो!गोडीगुलाबीने करायचा असतो!अंगावर दप्तराचं ओझं असतं!अक्षरांशी मैत्री होते!शब्दांची ओळख होतें!चित्रांतून शिकता येते!वाचून,लिहून शिकता येतं!बालपण कच्चे मडके असतं!बालपण सुंदर असतं!🌷

बालपण कधी उनाडकी असतं! भांडण घरी येतं असतं!आई-वडील प्रसाद देतात!फुटक्या खिडक्या काचा भरून देतात!चांगले वाईटाची समज नसते!म्हणून आई मागावर असतें!गल्लीत कधी खेळ असतो!घरात कधी दिसत नसतो!आनंदाशिवाय काहीही नसतं!बालपण हसतं असतं!बालपण सुंदर असतं!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बंधू-भगिनींनो!
बालपण चौथीतून पाचवीत पुढे सरकत असतं!खळखळ नुसतं पाणी वाहातं राहतं!वय वर्ष दहा-अकरा असतं!...🌷🌷
अशा बालपणीची उधळण करणाऱ्या माझ्या बहिणीच्या नातूला हर्षलनें काल दिनांक १०जून रोजी सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील!..सह्याद्री पर्वतराईच्या कुशीतील छोट्याशा रायगावात पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतला! "मिलिटरी स्कुल"मध्ये प्रवेश घेतला!🌷

घरी कुठलेही निर्बंध नसलेल्या!मोबाईलने बुद्धी व्यापलेल्या!आपल्याचं संवंगड्यांच्या संगतीत कृष्णलीला करणाऱ्या!घरात उच्छाद मांडलेल्या पण निरागस असलेल्या हर्षलला मिलिटरी स्कुलमध्ये प्रवेश घेतला!🌷

एकच मुलगा,मोठी बहीण असं कुटुंब!मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी कठीण निर्णय घ्यावा लागला होता!शाळेत प्रवेश घेण्यासाठी हर्षलचे आई-वडील, आजी सर्वंच गेले होते!लहान हर्षलला अजून कळत नव्हते!आनंदी होता!🌷

प्रवेश प्रक्रिया पार पडली!..सर्वच सोपस्कार पार पडले!यादीप्रमाणे  सर्वंच सामानसुमान आणले होतें!ते स्कुलच्या ताब्यात दिलेत!.....आणि... आणि... तो प्रसंग येऊन ठेपलाचं!सामानसुमान सोबत हर्षललां देखील स्कुलच्या स्वाधीन केले गेले!...आजीच्या डोळ्यांतून अचानक अश्रूंचा बांध फुटला होता!...हर्षलच्या आईला देखील मनावर ताबा ठेवता आला नाही!अश्रुपुरात ममता वहात होती!आईचं कोमल हृदय अश्रुत भिजत होतं!नऊ महिने पोटात अन आता दहा वर्षाचा होईस्तोवर,अंगाखांद्यावर खेळलेला हर्षलला ठेवून जातांना काळीज तुटत होतं!...🌷

बाप कितीही कठोर असला तरी तो ही माणूसचं असतो!हर्षलचे वडील मन आवरून,ओठ दाबून डोळ्यातील आसवांना आत  ओढण्यास असफल होतांना दिसले होतें!..हर्षलला घेऊन शिक्षक निघाले होतें!पाठमोरा हर्षल शाळेत जायला निघाला होता!त्यानें एकदाचं मागे वळून पाहिले!..डबडबलेल्या डोळ्यांनी जणू म्हणत होता," आई मी खूप त्रास दिला नां तुला!!आई मी आता मिलिटरीतं चाललो आहे!"...फक्त दहा वर्षांचा हर्षल पाचवीत प्रवेश घेता झाला!..आम्ही डोळ्यात अश्रू साठवून माघारी आलो!🌷
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-११जून २०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)