आज साठ वर्षाचा झालो
आज साठ वर्षाचा झालो
******************
नानाभाऊ माळी
झालो झालो झालो रें मी
आज साठ वर्षाचा झालो
मी खरचं रिटायर झालो
दुसऱ्या वर्गात प्रमोट झालो
पहिला अध्याय उर्मीचा
पूर्ण गुर्मीत निघून गेला
आठवणींचा खजिना
सारा साठीत खुला केला
साठ पावसाळे सोबतीची
दूर पळत निघून गेली
उन्हातील चटके देखील
संगती हसत घेऊन गेली
गुलाबी हिवाळी थंडीतं
अति थंड पाण्यात न्हालो
साठीचा अनुभव माझा
का वयाने वृद्ध झालो?
साठीतं प्रवेशतांनाही मी
व्यवहारी वजाचं राहिलो
सुख दुःखाच्या सोबतीनें
मागे बरेचं सोडोनि आलो
शिळीपाकळी शिदोरी माझी
अनुभव समृद्ध झालो
हसू सोबत आसवातं
मी चिंब भिजून गेलो
*****************
नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-२८
मो नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२२जुलै२०२२
Comments
Post a Comment