माझ्या कवितेची फजिती (भाग-२)
माझ्या कवितेची फजिती
****************
(भाग-२)
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
सुसंस्काराने वाढीस लागलेलं अपत्य श्रावणबाळ होऊन भारतीय संस्कृतीत अजरामर होऊन गेलेलं आहे!भारतीय सभ्यतेच्या अध्यात्मिक अंगाला हळूहळू स्पर्श करीत,मानवी मूल्यांच्या जपवणूकीने जन्मोजन्मीचा आदर्श निर्माण केलेला आहे!आपण मागील पिढीकडून संस्काराची देणगी स्वीकारीत असतो!पुढील पिढीच्या कल्याणासाठी तेच उत्तम संस्कार आपल्या अपत्यांनां स्वाधीन करीत असतो!रसाळ गोमटी फळ मनाची भूक भागवीत असतातं!🌷
कविता संस्कारी पालकांची प्राणप्रिय अपत्य असतं!काळजाचा तुकडा असतें!कवी बबन धुमाळ यांची गझल अंतःकरणाचा तळ गाठत असते!रसिकांच्या काळजाला भिडत असतें!क्षितिजावरील उगवत्या सुर्यास अर्ध्य देत असतें!जगण्याची उमेद निर्माण करीत असतें!कवी बबन धुमाळ यांचा महाराष्ट्रात नावलौकिक होतो!आम्ही त्यांचे गुण गात असतो!
अनंत राऊत आपल्या रचनांनी समाजास नजर देण्याचं महान कार्य करीत आहेत!
पुण्यातलें प्रसिद्ध कवी सितारामजी नरके सरांच्या "ज्ञानाई फौंडेशनमध्ये" त्यांच्या सहजीवनाच्या ४०व्या वर्षा निमित्त काव्यसमेलं आयोजन केले होते!कविता विविध अंगाने,रंगाने, ढंगाने,रसिकांना मंत्रमुग्ध करीत होती!मनाला
चिंब भिजवीत होती!सहजीवनाच्या ४०व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या नरके दाम्पत्याचा गौरव करीत होती!प्रेम रसात डुंबत होती!एक एक कवी कविता सादर करत होते!शुद्ध सोन्याची खान सापडावी सोनेरी अलंकारांनी अंग नं अंग झाकलं जावं,संस्कारीत अन सुंदर चकाकी असलेली कविता सादर होत होत्या!महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवींनी कवितेचा गौरवशाली पाया रचला होता!कळसाकडे वाटचाल सुरू केली होती!🌷
कवींच्या कविता खट्याळ होत्या! कधी हास्याचा फवारा उडवीत होती!पती-पत्नीचा हात हातात घेत होती!मधुचंद्राच्या स्वप्नाळू रात्रीतं विशाल,शीतल चंद्र शोधीत भटकत होती!कविता गुलाबपुष्प बनून प्रेमाराधनेत गुंग होती!रसिकांची मने जिंकतं निघाली होती!कोणी मातृवंदनं करीत होते!कोणी विशाल पितृरूपाचं दर्शन घडवीत होते!प्रेमरसाचा मधू गोडवा ही कवी चाखायला देत होते!रसिकजनांच्या मनावर कविता मोहिणी जादू होती!कविता अधिराज्य गाजवत होती
भक्तीचा अथांग सागर कवितेतून साकार होतांना दिसत होता! नात्यांच्या गोतावळ्यात कविता भटकत होती!लटकत होती!समाजाचं वास्तव प्रतिबिंब कविता दाखवीत होती!एक एक कवी आपली मनपसंत रचना रसिकांना वाढीत होते!सादर करीत होते!रसिक मनसोक्तपणे आनंद लुटीत होते!कवितेचा आस्वाद घेत दाद आणि साद देत होते!नरके सरांच्या ४०व्या विवाह दिनी विविध कवितांनी हजेरी लावली होती!रंजन करीत कविता शिकवणी देखील घेत होती!
...कविता विषयांचा रस असते!कविता सार असतें!अर्क असते!चिपाड काढून सुंदर अर्थ देत असतें!कविता फटकारे असते!कविता दबलेला आवाज असतें!हुंकार आणि चित्कार असतें!कविता हास्याची उकळी फोडत असते!कधी दुःखाचा डोंगर पार पाडायला भाग पाडत असतें!कविता दुःखाची किनार असते!कविता अश्रुत चिंब भिजवत सांत्वन करीत असते!!दुःख हलके करीत असते!🌷
कविता शौर्य गाजवीत असतें! वीर रसातून लढायला शिकवीत असतें!कधी सामाजिक प्रश्नांची उकल करीत अन्यायाला वाचा फोडीत असतें!कविता देशप्रेमाने प्रेरित असते!हाती अभिमानाचा तिरंगा फडकत असतो तर कविता कधी झोपेचं सोंग घेणाऱ्यास शब्द फटकाऱ्यानी बडवून काढीत असते!कविता सागराच्या तळासारखी खोल खोल होत जाते थांग लागत नसतो कधी!कधी वाहणारी उथळ नदी होतें!विविध अंगांनी फुलत जाणाऱ्या कवितांचा आस्वाद घेत रसिक तृप्त होत होते!🌷
त्यात माझ्या सारखा नवशिक्या देखील घुसकोरी करून कविता सादर करणार होता!शिकाऊ उमेदवाराला देखील कविता सादर करण्याची संधी मिळाली होती!दोन तीन दिवसांपूर्वी शब्द जोडून जाडून!शब्द सांधून कविता लिहिली होती!सर्वंच मान्यवर कवींच्या रचना दर्जेदार होत्या!व्यासपीठावर नामवंत कवी बसले होते!व्यासपीठा सामोर रसिकांमध्ये बसलेले कवी देखील महाराष्ट्र कवीचं होते!..मी कविता लिहिली होती!ओढून ताणून लिहिली होती!उडती चाल देखील लावली होती!🌷
प्रतिभाशाली सूत्रसंचालक आणि कवी प्रा.विजय लोंढे सरांनी माझं नाव पुकारलं!...मी जसजसा व्यासपीठाकडे जावू लागलो तसतसा लटलंट करायला लागलो!नामांकित कवींसमोर छातीत धडधड व्हायला लागली होती!कपाळावर घाम फुटला होता!मी मनाचा निश्चय केला होता!कवितेला चाल लावून म्हणणार होतो!गेय स्वरूपात गाणार होतो!दडपणाचे ठोके छातीत धाड धाड वाजत होते!त्या धडकीने मी कवितेची चालचं विसरलो होतो!मग मात्र व्यासपीठासमोरील रसिक जणांच्या जनसागरा समोर लिहिलेली कविताचं विसरायला झाली होती! 🌷
माझी लय बिघडली हाती! " ट ला ट लावून" लिहिलेल्या कवितेची लय बिघडली होती!मी गाय गात होतो ते ही विसरलो होतो!रसिकांच्या टाळ्यांचा अर्थ गवसत नव्हता!मी जरी कवितेचा होतो,कविता तिचा मानायला तयार नव्हती!🌷
(अपूर्ण आहे... पुढील भागात)
🌷🌷🌷🌷🌷🌷
***************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४मे२०२२
Comments
Post a Comment