कंठात शब्द थांबला
🌹कंठात शब्द थांबला🌹
*************
.......नानाभाऊ माळी
..................
शब्द सख्या रे जाऊ नको तू
.....सोडूनि माझा कंठ
तुझ्याविना मी बंदी झालो
वरती घायाळ आसमंत.!
संतांच्या या भूवरी रे
ओवी प्रकटली एकांत
अक्षर लेणे बांधुनी कंठी
होऊनि गेले महासंत!
सूर तुझे मज दे रे आता
अक्षर करिती आकांत
न्हाऊ दे मज शब्द सागरा
विना थांबली एकांत!
ताल थांबला तबल्याचा रे
हार्मोनियम जाई ना जनात
सरस्वतीला विनवितो आता
शब्द पडू दे ना कानात!
रुसू नको ग पौर्णिमा तू
अश्रू ढाळीतो चंद्रकांत
तळमळताहेत वाद्य ही सारे
शब्द साखर झोपी शांत!
🌷******🌷
..........नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे
मो. नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
Comments
Post a Comment