निरोप-हळव्या क्षणांनां
🌹🌹🌹🌹🌹
निरोप-हळव्या क्षणांनां
🌷🌷🌷🌷🌷
****************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!..
आमचे एक मित्र खैरनार सर..!छोट्याशा टुमदार गावात म्हसाळे येथे जिल्हापरिषदच्या शाळेत मुख्याध्यापक आहेत!गावात पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे !चौथी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी पुन्हा नवीन शाळा शोधावी लागते!... शाळेत शेवटच्या चौथीच्या वर्गातील मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे निरोप समारंभ आयोजित केला होता!मुलं-मुली छानपैकी कपडे घालून, नटून थाटून आली होती!त्या शाळेत तब्बल चार वर्षे शाळेत शिकली होती!बालसुलभ मनावर शिक्षकांचे सुसंस्कार झाले होते!शाळेतील गुरुजनांनी माती मिसळून मिसळून पाणी ओतून चिखल तुडवीत कच्चे मडकी तयार करून ठेवली होती!अ ब क ड वाचण्या पासून वहीवर ग म भ गिरवीत,धडा वाचता येईल एवढं ज्ञान दिलेलं होते!आकडेमोड गणितं सोडवता येईल एवढं ज्ञान गुरुजींनी निश्चितच दिलं होतं! शेवटच्या वर्षातील चौथीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता!🌷
दहा अकरा वर्ष वयाची कोवळी लहान मुलं ती!छोटीशी गोंडस मुलं ती!गुरुजनांनी पाजलेल्या ज्ञानामृतामुळे अक्षर ओळख होऊन बोलकी झाली होती!अन त्यानांचं निरोप देण्याची वेळ आली होती!शाळेत पुढचा वर्ग नसल्याने,शिक्षणाची सोय नसल्याने!पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यासाठी शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता!एवढया लहान वयात निरोप घेण्याची वेळ आली होती!🌷
गुरुजी विध्यार्थ्यांचें आदर्श असतात!गुरुजींच्या कृतीतून विद्यार्थी घडत असतातं!गुरुजी ज्ञान उजेडाचा,प्रकाशाचा परिचय करून देत असतात!गुरुजी ताज्या बुद्धीवर पैलू पाडीत असतातं!ओरखडे ओढीत तरलता आणीत असतातं!गुरुजी विचार बीज पेहरीत असतातं!अन आज सर्व गुरुजी लहानग्यांचं कौतुक करीत होते!चार वर्षांची प्रगती मांडत होते!भावी शिक्षणासाठी सचेत,सतर्क करीत होते!आदर्श महापुरुष बनण्यासाठी स्वप्न दाखवीत होते!मुलंचं ती!बालसुलभ चंचल मन त्यांचं!कोवळ्या वयातील मुलं दाखविलेल्या स्वप्नांनी भारावली होती!🌷
मुलं गुरुजनांनी दिलेला कानमंत्र मन लावून ऐकत होती!गुरुजी आदर्श व्यक्ती बनण्यासाठी मार्गदर्शन करीत होती!पण आज निरोपाचा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता!हळवेपणातून पाझर फोडणारा होता!गुरू शिष्यास आपल्या कुशीत वसलेले गाव दाखवीत असतो!अन गुरू शिष्याच्या हृदयात विराजमान असतातं!आज इथपर्यंत शिक्षा संपल्याने गुरू आणि शिष्य दुरावणार होती!दुरावण्याचा विरह नकोसा वाटत होता!ताटातुटीचा अन दूरावण्याचा प्रसंग होता! एकमेकांपासून दूर जाण्याची वेळ आली होती!शाळेतून दुरवण्याची वेळ आली होती!काही विध्यार्थ्यांच्या डोळ्यातलें अश्रूथेंब गालांवर ओघळतांना दिसत होते!
आपल्या आदर्श गुरूंविषयी छोटी मुलं देखील भरभरून हृदयातून बोलू लागली होती!एवढया लहान वयात देखील आपल्या गुरूंविषयी शिष्य निष्ठा प्रकट होतांना दिसली होती!गुरुजी देवाचे संदेश वाहक असतातं!शिक्षक ज्ञान वाहक असतातं!..निरोपाचा हा प्रसंग जणू गुरू शिष्यातील भक्तीभाव प्रकट होतांना दिसतं होता!गुरू विध्यार्थ्यांचे डोळे असतात!त्याच नजरेने पहात असतात! 🌷
निरोप समारंभ विध्यार्थ्यांसाठी होता!चार वर्षात गुरू शिष्यातील अंतर नाहीसे झाले होते!दोन्ही एकरूप झाले होते!संपूर्ण वर्ग जणू एक कुटुंब होतं!त्यांचीचं पुढील शिक्षणसाठी पाठवणी होत होती!मुलांच्या मनात श्रद्धाभाव जन्माला येत असतो!गुरुंना ईश्वर स्थान देऊन श्रद्धापूर्वक शिकणारे विध्यार्थी गुरूंशी एकरूप झालेले असतातं!निरोप घेतांना त्याची प्रचिती जाणवतं होती!शेवटी काय तर निरोप घेवून समोर उघडलेल्या नव्या प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा असतो!🌷
एका घरातील मुलगा परदेशात नोकरीला असतो बरेच दिवस होतात!आई-वडील कासावीस होतात!फोन नाही, कुठला संदेश नाही?एवढया दूर देशात गेलेल्या मुलाचा निरोप नाही म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते!आई-वडील वाट पहात होतें!निरोप हुरहूर लावत असतो!आतुरतेने वाट पहायला लावीत असतो!निरोपातून सुख-दुःखाचं संदेश वहन होत असत!मन अधीर होत राहतं!आतुर होत रहात!विरहाने घायाळ होत रहात!एके दिवशी मुलाचा फोन येतो!"मी सुखरूप आहे!" आई-वडील अश्रूंचा बांध फोडून रडू लागतात!मन हलकं होत!मुलगा चांगला असल्याचा समाधानाने निरोप मिळतो! 🌷
बंधू-भगिनींनो!
निरोप कार्याचा गौरव असतो!आरसा असतो!प्रगती असते पुढील वाटचालीची!प्रतिबिंब त्यातून दिसत असतं!आपल्या निरोपातून येणारी पिढी घडतं असते!निरोपाचा सोहळा अखंड चालूच आहे!मुलगी मोठी झाल्यावर तिचा विवाह होतो! विवाह मंडपातून सासरी पाठवणी होते!लग्न आनंद आहे!पाठवणी मनाला हळहळ लावून जाणारी असते!चटका लावून जाणारी असते!हुरहूर लावून जाणारी असते!विशीष्ट पोकळी निर्माण करून जाणारी असतें!निरोपाने माहेरी बांधलेले जन्माचें घट्ट धागे विस्कटल्यागत वाटायला लागतात!सैल व्हायला लागतात!नंतर मुलगी माहेरची पाहुनी होते!मुलगी आई-वडील भावंडांनां सोडून सासरी जातेय हा माहेरच्यांकडुन कठीण प्रसंगी घेतलेला निरोप असतो!माहेर सोडून सासरचे नाते विवाह बंधनाने जोडले जातं असतं!नवीन नाते जन्म घेतांना माहेरचं नातं पाहुनी सारखे बनून जात असतं!लहानपणी भावंडांशी हक्काने भांडायचे दिवस असतातं!पाहिजे ते मिळवायचं ठिकाण असतं!ते माहेर एका अर्थाने नव्या,नवख्या सासरसाठी दुरावण्याचा निरोप असतो!रक्ताचे नाते दूर दूर जाऊ लागतं!सासरची माणसं जवळची होत जातात!काही दिवसांनी मुलगी दिल्या घरची होऊन जाते!त्या परिवारातं एकरूप होऊन जाते! पुढे पुढे मुलगी इतकी एकरूप होऊन जाते की निरोप देखील येत नसतो!🌷
अनेक व्यक्ती आयुष्यभर कष्ट करून ऐश्वर्य निर्माण करीत असतातं!राब राब पैसे कमावतात अन एक दिवस अचानक निर्णय घेऊन बाजूलाही होऊन जातात!आपली विशेष ओळख ठेऊन, चारित्र्य ठेवून पुढे निघून जातात!निरोप घेतात!आगमन कर्तव्याची पहिली पायरी असतें तर निरोप परतीची शेवटची पायरी असते!आपण खरोखरच योग्य वेळी निर्णय घ्यायचा असतो!जास्त लोभ,मोह,मत्सरात न अडकता सहजपणे कठीण निर्णय घेऊन बाजूला व्हायचं असतं! यशोशिखरावर पोहोचून हळूच निरोपानें तेथून बाजूला होणे असतं!सेवा निवृत्तीतून निरोप घायचा असतो!स्वार्थापोटी चिकटून बसायचं नसतं!निरोप घेऊन बाजूला व्हायचं असतं!🌷
निरोप कधी सुखावून जात असतो तर कधी विरह देऊन जात असतो!तरीही निरोप घेऊन नवीन दालनात प्रवेश करायचा असतो!मागचा आदर्श घेऊन पुढें वाटचाल करायची असते!आपलं आयुष्य निरोप घेत घेत निरूपणापर्यंत येऊन पोहोचतं असतं!संदर्भ घेत,वाटचाल करीत निरोपाचा दिवस उजाडत असतो!
जन्म ते शेवटच्या श्वासापर्यंत भिन्न ठिकाणाहून निरोपाचा सोपस्कार पार पाडीत,वाट काढीत आपलं जगणं चालूच असतं!सुख शोधीत शोधीत वाटचाल चालू असते!निरोप समाधानाचं अत्तर असतं!🌷
मानवी जीवनात प्रत्येक कार्याची सुरवात आणि समाप्ती चालूच असतें!सुरुवात आकर्षित करीत असते!मोहमयी असतें!कर्तुत्वाला दिलेली संधी असते!आव्हान असतं!ते स्वीकारीत कार्यमग्न राहायचं असतं!तर कार्यसमाप्ती निरोप घेत असतें!कार्याची इतिश्री होत असतें!कार्य तडीस नेऊन पूर्ण करणे!.."बस्स पुरे झाले आता!''हे सांगण्याची वेळ आलेली असतें तिथे थांबायचं असतं!निरोपाची व्याप्ती वाढत जात असते!निरोपाने सांगता होते
संत परंपरा आणि भक्ती संप्रदायातील संतांनी शांती आणि सुखाचा सर्वश्रेष्ठ मार्ग दाखवीला आहे!कुठे थांबायचं हेही सांगितले आहे!संत महात्मे रंजल्या गांजल्यांचें दुःख कमी करीत राहिले!योग्य वेळ आली तशी त्यांनी कार्य परिपूर्तीतून निरोप घेतला!संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज आदी अनेक महासंतांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली!आजही फडकते आहे!त्यांनी यातना सहवून हळूच निर्वाणातून निरोप घेतला!असे संत भक्तांच्या हृदयात अढळ स्थान होऊन राहिले आहेत!भक्तांच्या डोळ्यात अश्रूंमोती ठेऊन गेलेलें आहेत!हा निरोप होता निर्वानाचा!हळव्या क्षणांचा!निरोपाचा!🌹
निरोप संध्याकाळची चाहूल असतें!कार्यपूर्तीचा गौरव असतो!उद्धिष्ट पूर्तीची शेवटची पायरी असते!सन्मानाने स्थळ आणि सत्ता सोडण्याचा संकेत असतो! निरोप हा अंतिम निर्णय असतो!पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते!आपल्या अंगात शक्ती आणि उर्मी असेपर्यंत राज्य करायचे!
शेवटी वृद्धापकाळामुळे राज्य त्यागून वानप्रस्थाश्रमात निघून जायचेत!त्यांच्या सांगतेने समारोप व्हायचा!त्यांना भावपुर्ण निरोप द्यायचेत!🌷
पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक प्राणीजीव स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्षाची लढाई लढत जगत असतो!लढता लढता शेवटी एकरूप होऊन जात असतो!नाहीसा होऊन जातं असतो!देहास अर्पित करून निरोप घेत असतो!एकजीव होऊन जातं असतो!पृथ्वीच्या कुशीत एकजीव होऊन जात असतो!शेवटी त्याची मातीचं होत असते!त्याचं मातीतून पुन्हा नवनिर्मितीचा खेळ सूर होतो!सुरुवात आणि शेवट हा खेळ सतत चालू रहाणार आहे!
जन्मातून प्रारंभ आणि निरोपातून गुरफटलेपणास मुक्ती मिळत रहाणार आहे!जन्माच्या घट्ट बेड्या काही क्षणात तुटून सातत्य राहणार आहे!प्रारंभ स्वागत करणार आहे!निरोप समारोप करणार आहे!हळवेपण सतत राहणार आहे!अस्तित्व मुक्तीचा निरोप होत राहणार आहे!
🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०५ मे २०२२
Comments
Post a Comment