सहजीवनाची चाळीशी
💐💐🌹💐💐
सहजीवनाची चाळीशी
🌹🌹🌷🌷🌹🌹
*****************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
सुंदर फुलांच्या सानिध्यात मन सुगंधीत होत असत!मोहित होत असत!प्रफुल्लित होत असतं!सुंदरांनंद डोळ्यांत मावत नसतो!सुंदरतेच्या सुंदर विचारांनी जगणं आनंदीत होत असत!सुखमय होत असतं!तृप्तीचा अनुभव होत असतो!आनंद प्रसन्नतेची खान असतें!त्यातून हळूहळू, थोडाथोडा आनंद घेत राहायचा!लागेल तेवढाच वेचून,उपसून घायचा असतो!आनंद उपसता उपसता आनंदखानीचा तळ कधीचं गाठायचा नसतो!तळ गाठायचा नसतो!आनंदासोबत तळातून तुरळक दुःखाचा गाळ आपल्या आनंदात मिसळला जाऊन दुःखच आपल्या सोबतीला येऊ पहात!कटाक्षाने दुःखाच्या डोहात उडी मारणे टाळायचं असतं!मग मात्र जगणं सुगंधित फुलांची माळ होऊन समाधानाचं अत्तर आपली जिंदगी बदलून टाकत असतं!🌷
बाळ जन्मल्यावर घर गल्लीतील सर्वचं आनंदुन जात असतातं!बाळ रडून रडून,भोकाडं पसरून आपला निषेध व्यक्त करीत असतं!दुन्या आनंदाने हासत असते!तेच बाळ मोठं झाल्यावर!लग्नाळू झाल्यावर!विवाह गुलाबी स्वप्नांनी प्रफुल्लित होऊन नाचायला लागतं असतो!लग्नाळू स्वप्नांतील चंद्र आणि चांदण्या पाहण्याचा सुखद क्षण काढून घेत असतो!प्रेमालिंगनातं व्यस्त असतो!स्वप्नांतील राजा आणि परीच मिलन सुखद,मधुमीलन वाटत असतं!स्वप्नाळू पण ओढीने हवेहवेसे मस्त वाटतं असतं! स्त्री-पुरुषाची ओढ आतुर करीत असते!त्यासाठीचं लग्नाची पक्की रेशीम गाठ बांधली जात असते!
लग्न म्हणजे दोन जीवांची भर भक्कम कधीही नं सुटणारी गाठ असतें!पवित्र मंत्रोच्चारांच्या साक्षीने एकत्र येण्याची वेळ असतें!आयुष्यभर दोन जीव एक होऊन जगण्यासाठी घेतलेली मंगलमय शपथ असते!लग्न म्हणजे समाजाने दिलेली मान्यता असते!लग्न म्हणजे अग्नी साक्ष सात फेऱ्यांचं अतूट बंधन असतं!नातं असतं!लग्न करार नसून दोन जीवांनी अंतःकरणातून दिलेली मान्यता असते!साथ असते!होकार असतो!त्या प्रसंगाच्या पवित्र मंगल विधींनी दोन्ही जीव एकजीव होऊन जात असतातं!संसार वेलीची लावणी म्हणजेचं लग्न असतं!कुठल्याही कठीण अन आनंदी प्रसंगाला सोबतीने,संगतीने,एकविचाराने साथ देत जगण्याची अंतःकरणपूर्वक खात्री असते!१००टक्के खात्री असते!त्या खात्रीने,अनामिक ओढीने पती-पत्नीचं नातं जन्माला येत असत!श्रद्धा-विश्वासाने तेच नातं एकजीव-एकांग होऊन जातं असतं!शिवशक्ती होऊन जात असतं!मनोमिलन होऊन जात असतं!🌷
सुखाची सुंदर स्वप्ने पहात पती- पत्नी मन आणि शरीराने एकजीव झालेली असतातं!विश्वास आणि श्रद्धा दोन्हीच्या हृदयात निवासी असतात!उभयता प्रेम घोड्यावर स्वार झालेले असतातं!संसाराची लगाम हाती असतें!मोहाच्या आणि निसरड्या क्षणी लगाम योग्य पद्धतीने ओढीत मन वेळीच आवरून संसार वेल बहरतं रहाते!पुढे तेचं जोडपं इतरांनाही आदर्श होत बनत असत!आपसूक समोर आलेल्या दु:खास दोघांनी धैर्याने तोंड देत जगणे म्हणजेचं एकजीव झालेल्या पती-पत्नीनें दुःखातून नेमके, निवडक सुखाचे क्षण वेचलेले असतातं!ते वाटीत फिरणे म्हणजे विवाह सफल झाल्याची फलनिष्पत्ती असते!दोघांनी एकमेकांच्या डोळ्यातील सुख-दुःखाची आसवं आपल्या ओंजळीत घेत उगवणाऱ्या उद्याच्या सुखसूर्याची वाट पहात स्वप्नात जगणे म्हणजेच संसार असे मी म्हणेन!
संसार रथाची चाकं पळत असतातं!साथ संगतीने पळत असतातं!खाच खळगे टाळत पळत असतातं!अन दबा धरून बसलेलं छद्मी दुःख एकनिष्ठेच्या, एकमेकांच्या विश्वासानें चालणाऱ्या सुखावर जळत असतं!कुढत असतं!त्याला विघ्न आणण्याची संधीच मिळत नसते!संसार सुखाची दोन्ही चाकं आत्मविश्वासाने पळत असतातं!पती-पत्नी चटका घेत!सुख पेहरीत!जागोजागी-घरोघरी सुंदर स्वप्नांची झाडे लावीत असतातं!संसार वेलीवर फुलं,फळं बहरायला लागतात!पक्षांच्या, मुलांच्या किलबिलाटाने, चिवचिवटाने संसारवेल वाढत रहाते!फुलत रहाते!बहरू लागते!कारंज्यांच्या हलक्याशा शिडकाव्यात लग्नाचा पहिला!दुसरा!तिसरा!सलग पंचवीसावा!तीस-पस्तीसावा अन चाळिसावा वाढदिवस कधी येवून ठेपतो ते ही कळतं नसतं!🌷
वर्षे पळत असतातं!संसारी संसारात इतके गुरफटतात की वेळच मिळतं नाही हो मोजायला!!मोजल्यावर लक्षात येत असत,एकेक वर्ष विश्वास!प्रेम!जिव्हाळा!श्रद्धा आणि आपुलंकीचा पूल बांधीत पुढे जात असतातं!खरचं सिरियसली सांगतो काय गंम्मत असतें संसार म्हणजे नाही का!!संसारात पडूनचं गंम्मत पहाण्यातील मज्जा काही औरच असते बघा!अशाच एका सहृदयी जोडप्याने सहजीवनाची चाळीशी गाठली त्याविषयी काही!...👏
🌹🌷🌹🌷🌹🌹🌷
बंधू-भगिनींनो!
आज१२एप्रिल!कडकडीत उन्हाळ्याचा एप्रिल महिना!तरीही ढगांची उपस्थित कुठंतरी खट्याळपणे जाणवते आहे!सडकून येण्याची भीती दाखवितो आहे!आभाळ ऊन झाकून सावली देत आहे!पण भर दुपारी १२ते १२-३०च्या कालावधीत आपली सावलीचं दिसत नाहीये हो!कदाचित सूर्याभोवती पृथ्वी भ्रमनाचा अक्षांश बदलला असेल! ही किमया कोणाची असावी?🌷
बंधूंनो!...असे अनेक उन्हाळे चटका देत निघून गेले असतील!अनेक चटक्यांनां सामोरे जातं विवाह दिनाची चाळीस वर्षे पार केलेल्या पती-पत्नीनां मी आज समक्ष पाहणार आहे!भेटणार आहे!अभिष्टचिंतन करणार आहे!३९ वर्षांची गुपितं त्यांच्याकडून गोडीगुलाबीने काढणार आहे!मी अंतरंगातून त्यांना पहातो आहे!एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे!अतूट प्रेमादर अन समंजसपणे सर्वांना सोबत घेऊन जाणारे!सर्वांना सारखाचं मानपान देऊन,तारेवरची कसरत पार करीत आज विवाह दिनाचा मंगल सोहळा साजरा करीत आहे हे जोडपं!कोण असतील बरं हे भाग्यवान जोडपे??🌷
बंधू-भगिनींनो!
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित!कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी!साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित!महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी!ज्यांच्या पारंपरीक घरात भक्ती संप्रदयांची परंपरा प्रसवत राहिली आहे!असे आदरणीय दादासाहेब "सितारामजी नरके सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.विजयाताई" यांचा लग्नाचा वाढदिवस आज आहे!आज लग्नाचा ४० वा वाढदिवस आहे!दोघांच्याही चेहऱ्यावरील प्रसन्नता आनंदी,सुखी संसाराची ग्वाही देतांना दिसते आहे!ज्यांच्या संसाररूपी घरात समाधान नावाचं बिरुद खुशाल हुंदडत आहे! मनसोक्तपणे इकडे तिकडे हिंडतांना दिसत आहे!चेऱ्यावर आनंद ओसंडून वहात आहे!त्यांच्या हृदयातली श्रध्दा विठ्ठलाच्या चरणी अर्पित आहे!त्यांचं घर देवत्वाचं मंदिर होऊन गेलेलं आहे!गाभारा चंदनी सुहासिक होऊन गेलेला आहे!३९ वर्षांपासून गाभाऱ्यातील देव प्रसन्न आहे!अकल्पित आलेल्या दुःखाची चेहऱ्यावर पुसटशी देखील छटा दिसत नाही!अगदी आनंदी नववधू-वरांसारखे टवटवीत गोबऱ्या गालांनी खुशाल हसताहेत हो!पूर्णतः आत्मीलनातून समाधानी अन तृप्त आहे!सुखांच्या आनंद लहरींतं एकचित्त आहेत!🌷
आदरणीय नरके सर खरोखर सचोटीने माणसं जमविण्याचा व्यवसाय करतात हो!त्यात त्यांची गुंतवणूक फक्त शब्दमाधुर्याची आहे!आत बाहेरून स्वच्छ मनाची आहे!निर्मळ आहे!देण्याची कर्ण वृत्ती आहे!गोड शब्द दानाची उदारता आहे!त्यांच्या माणूसपण जपणाऱ्या वास्तूत कोणीही आला तर सुख समाधानाची अमृतवाटी हमखास पिवून जात असतो!मी नानाभाऊ माळी नामक देहधारी व्यक्ती... त्यांच्या व्यवसायातील पुंजी आहे!त्यांच्या व्यवसायात त्यांनी मलाही खरेदी केलंय!ही त्यांची काळजातून माणूस पेहरणारी प्रवृत्ती आहे!मी त्यांच्या "नरके पॅलेसमध्ये" कित्येकदा जात येत असतो!उभयतां पती-पत्नीचे आशीर्वाद घेत असतो!अस्सल माणूसपणाचां अनुभव घेत असतो!माणसांचं उत्तम पीक काढणाऱ्या व्यक्तिमत्वास प्रणाम करत असतो!त्यांच्या शांत,चंद्रशीतल वृत्तीचा येथेच्छ अनुभव घेत असतो!अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन हिंडत असतो!🌷
दुःखाला कवटाळीतं नं बसता धैर्याने सामोरे जाण्याची शिकवण देणारे किमयागार आदरणीय गुरुवर्य दादासाहेब नरके सर आपुलकीने सर्वांना त्यांच्या "ज्ञानाई फाऊंडेशन"च्या अनेकविध कार्यक्रमात सहभागी करून घेत असतातं!अनेक सामाजिक उपक्रमांनी "ज्ञानाई फाऊंडेशन" अभूतपूर्व श्रद्धेच पवित्र स्थळ बनलेलं आहे!श्रद्धेने माथा टेकण्याचं भावभक्तीचं
मंदिर बनलेलं आहे!🌷
आई-वडिलांवर निस्सीम श्रद्धा असलेले!साहित्यातील महानुभवांचे अग्रणी पूजक अन भक्त असलेले विशाल हृदयी व्यक्तिमत्त्व नरके सर आपण माणूसपण पेरीत निघालेला आहात!फक्त चांगले तेच पेरणारे!आदर्शांच्या वाटेवर धैर्याने, हिंमतीने चालतं राहणारे नरके सर!..आपण उभयता पती-पत्नी लग्नाचा ४० वा वाढदिवस साजरा करीत आहात!३९ वर्षे संसार सुख-दुःखाच्या रथावर बसून आपली झोळीतील सद्गुणांची देणगी देत फिरत आहात!फलस्वरूप सहृदयी माणसांचा विशाल जनसागर आपल्या वाटेवरील वारकरी झालेले आहेत!आपण स्वच्छ सुदृढ मनाची माणसं वेचित फिरत आहात! सर्वांना सुदृढ आरोग्याचा उत्तम संदेश देत आहात!🌷
आपण रचलेल्या भक्ती गीतांनी साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज!जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि अन्य महावंदनीय संतांच्या स्मृती हृदयी जाग्या होऊन अवतरत असतातं!आपण रचलेल्या अनेक देशभक्तीपर गीतं देशप्रेमाची हाक देत असतातं!आपल्या वीर रसयुक्त शाहिरी काव्यांनी छत्रपती शिवाजीराजे रायगडावरील सिंहासनावर विराजमान झालेले दिसतात!आपल्या सामाजिक विषयांवरील कवितांनी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले,क्रांतीज्योती ज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर साक्षात नजरेसमोर दिसत असतात!आपल्या अनेक कवितांनी, कवनांनी महाराष्ट्रात समाजिक क्रांतीची बीजे रोवलेली आहेत!
..अशा थोर व्यक्तींच्या आयुष्यातील आज १२एप्रिल रोजी सौ.विजया ताईसाहेबांसोबत विवाहाला ३९ वर्षे पूर्ण झालेली आहेत!उभयतांचा सहजीवनाचा ४०वा वाढदिवस साजरा होतो आहे!आज भाग्याचा सुदिन आहे!
मंगल दिन आहे!आम्ही सर्वचं भाग्यवान आहोत!आज आपल्या विवाह दिनाच्या निमित्ताने४० वर्षाच्या सहजीवनाचा दुग्ध शर्करा योग सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे आहे!आपल्या सारख्या पूजनियांच्या आशीर्वाद रुपी सानिध्यातं,आमच्या मनाला लागलेला स्वार्थी गंज साफसूफ करून घेणार आहोत!आपल्या चरणस्पर्शामुळे आमच्या मनातील अहंकाराला मूठमाती देण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत!आपल्या अंतर्बाह्य स्मित हास्यास शरण जाणार आहोत!आपल्या विशाल सावलीत आपणास नतमस्तक होणार आहोत!🌷
आपण उभयता पति-पत्नी चाळीस वर्षे पार केल्यावर देखील कमळाच्या फुलासमान टवटवीत दिसत आहात!आपण उभयता प्रेम बंधनांचा रेशीम धागा विणत- विणत हृदयातील रेशिंमगाठी घट्ट बांधीत आहात!जीवन सुंदर करीत आहात!स्वर्गीय सुख मानवी देहात देत-घेत आहात!आनंदयात्री बनून फिरत आहात आपल्या सुखी समाधानी, चिरतारुण्य ४० वर्षाच्या संसाराचं गुपित एकरूप शिवशक्ती रूपात आहे!🌷
आपले हार्दिक अभिनंदन करीत असतांना काही वर्षे आधीच संसाराच्या भावी सुवर्णमहोत्सवी वर्षांसाठी आपणां उभयतांस अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो!अभिष्टचिंतन करतो!दोघांनाही१००पार वर्षे आयुष्य प्राप्त व्हावे याचं मनःपूर्वक शुभेच्छा!
🌹🌷🌹🌷🌹🌷💐
****************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक- १२एप्रिल २०२२
Comments
Post a Comment