मोबाईल घरमां घुसना
मोबाईल घरमां घुसना
🌷🌷🌷🌷🌷🌷
*****************
...नानाभाऊ माळी
सुख दुःखम्हा बाधा बनिसनी
हाऊ मोबाईल घरमां घुसना
चालनं बोलनं इसरीसनी
मव्हरे सवसार चालनां उसना🌷
बायको सांगस नवरा रांगस
घरमा न्यामीनं धुत्रूंम घुसनं
तोंडे कुस्टाये नजर चगाडी
पेरेम वाटी ऱ्हायनं उसनं...🌷
सांज सकायलें लिखा मारी
वर झिपाट्या ऱ्हातीस मोक्या
बाट्टोड मोबाईलन्हा पाह्यरे या
मांगे पडी ग्या घरन्हा लाख्या
नजर आनी बोटेस्ना खेयवर
पोस्टन्ह्या लागी ऱ्हायन्यात रांगा
शानला सुरता उचकेलस्ले ह्या
आते कोनीतरी समाजाडी सांगा
मोबाईलम्हा डोया रसीम्हा पुरी
हावू दांगडो कवलोंग चाली
खीर ऱ्हायी गयी ताटलीम्हा
ताट उचलालें कोन से खाली!🌷
मुक्सा बांधी घर भरेल हायी
मोबाईलम्हा दखी हासतस
बोलनं चालनं इकत व्हयी गे
निस्ता येरायेरनां आंगे बसतस
चालनं बोलनं इसरीसनी
मव्हरे सवसार चालनां उसना
सुख दुःखम्हा बाधा बनिसनी
हाऊ मोबाईल घरमां घुसना!धृ!
******************
🙏🌷🙏🌷🙏🌷
...नानाभाऊ माळी
मु.पो.ताशिंदखेडा,जि.धुळे
(ह मु हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२० मे २०२२
Comments
Post a Comment