माझ्या कवितेची फजिती (भाग-१)
माझ्या कवितेची फजिती
***************
(भाग-१)
🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
कविता कवीची आराधना असतें!कविता तपस्या असतें!कविता खोल अंतःकरणाची उत्पत्ती असतें!कविता कवीची कल्पना असतें!कविता कवीची नजर असते!कविता काळजातून प्रसवत असते!कविता विशाल वृक्षाच बीज असतें!कविता विचारांचं खोल खोल तळ असतें! कविता जन्मून कविचा बोट धरून दुदुदुडू चालतं असते!कविता जन्म देणाऱ्याचा उद्धार करीत असतें!कविता पोटाचा गोळा असते!अपत्य असते!कवीचं काळीज असते!सर्वात प्रिय असतें!म्हणून प्राणांहून प्रिय असते!कविता चार चौघात कवीचं नाव काढीत असतें!ती कविता कवीचं नाव होते!🌷
कविता बंडा जोशींची होते!तिचं कविता मिलिंद जोशींची होते!तिचं कविता आदरणीय गुरुवर्य सूर्यकांत वैद्य यांची होतें!तीच कविता भारत सातपुते यांच्या नावे होते!तिचं कविता अरुण कटारे यांचं नावं जगा समोर आणीत असतें!..तिचं कविता सितारामजी नरके यांच्या नावाने ओळखली जाते!त्याचं कवितेला कधी अरूण कांबळे जन्म देत असतातं!🌷
कविता जन्मदात्याची ओळख असतें म्हणून तिचं कविता बा. ह मगदूम यांची होतें!कधी ती सूर्यकांत नामुगडे यांच्या हृदयी प्रसवत असते!कविता किशोरजी टिळेकरांच्या घरी जन्म घेत बापाचा उद्धार करीत पुढे जात असतें!कधी ती विनोद अष्टुळ यांच्या मनीची कन्या होतें!कविता बाळासाहेब गिरीची हृदयी स्फुरते तेव्हा ती त्यांची रहात नाही तर अखंड मानव सामाजाची होते!प्रतिबिंब होते समाजाचं!कविता कॉम्रेड लालझेंड्याची होते तेव्हा ती महेंद्रकुमार गायकवाड यांची सुपुत्री होतें!कधी लडिवाळ लाडकी बेटी चंद्रकांत जोगदंड यांचा बोट धरून चालत असते
..कविता विलास काका कुंभार यांच्या सात्विक विचारातून जन्म घेत रहाते!कविता विजय लोंढे सरांची लाडकी लेक होते!तर कधी ती विजय सातपुतेंची मराठीची पैजा जिंकणारी मुलगी होते!कवीचा आदर,सन्मान करीत कविता वाटचाल करीत असते!तिचं कविता अशोकजी शिंदेंच्या कुशीत वसलेले गाव होते!कविता प्रत्येक कवीची मानस कन्या असतें!पोटच्या गोळ्याहून प्रिय असतें!म्हणून त्याच्या नावाने ओळखली जाते!🌷
कविता कवीची ब्रँड ऍम्बेसाडर असतें!ती कोणाचीही ऐर्या गैर्याची होत नसते!कारण कविता उरातून!काळजातून!हृदयातून!बेंबीच्या देठातून जेव्हा ती स्फुरते तेव्हाच ती जन्मदात्याची अस्सल, खानदानी अपत्य असते!..ती कोणा उपटसुंभ नानाभाऊ माळी ची कशी होईल?जन्मदाता कुंभारागतं असतो!..मातीतून चिखल तुडवीत अतिशय तप्त भट्टीत भाजून टंनटणीत मडके बनवत असतो!अन मार्केटमध्ये ठेवतो!...१००% खात्री आहे ना एक नंबर माल आहे म्हणून!२४कॅरेट सोने आहे म्हणून!.तसच कवीचं असतं!🌷
..काळजाच्या आत आर्त भाव जन्म घेत नाहीत!उर्मी नाही!उमाळा नाही!तगमग नाही!मनाचा भडका नाही!पोटतिडकी नाही!भडका नाही!डोळे हसत नाहीत!बेचव असणार ते डोळे अश्रू गाळत नाहीत.. अशा ठिकाणी जन्म घेणार कार्टचं असेल!कार्टीचं ते द्वाड असणार!नाही तर मरतुकड अशक्तचं असणार ना!!ट ला ट जोडलं की जन्मली कार्टी!...ती काय नाव काढणार बापाचं??काय इज्जत ठेवणार जन्म दात्याची!ट ला ट लावून जन्म घेणारी रचना वाहत्या पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून जाते!क्षणार्धात लुप्त होते! थांगपत्ता ही लागत नाही तिचा!बिना बापाची आधारहीन,निरस कविता गुणवत्ता हिनतेमुळे विस्मरणात जाते!शेवटी कवितेचा बाप२४ कॅरेट सोनं असावा लागतो!तसा असेल तर ती चमकून वीज होते अन गडगडाट करीत धोधो वर्षाव करीत रहाते!कविता ही चंमचमणारी, तडकणारी वीज देखील असते!
बंधू-भगिनींनो!
त्याचं झालं असं की......
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित पोलीस अधिकारी आणि प्रसिद्ध कवी आदरणीय सितारामजी नरके सर आणि सौ विजयाताई यांचा सहजीवनाचा अर्थात विवाह दिन सोहळा होता!उभयतांच्या विवाहाला १२एप्रिल रोजी ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते!त्यात महाराष्ट्रातील अनेक नामांकित कवींना आमंत्रित करण्यात आले होते!
विवाह सोहळ्याचे औचित्य साधून कवी संमेलन म्हणजे दुग्ध शर्करा योग होता!मानवहितासाठीचं जन्म घेणाऱ्या कवितांनी समाज प्रबोधन केलेले आहे!ननवीन क्रांती घडविली आहे!भविष्याची बीजे रोवली आहेत!रंजन आणि प्रबोधन केलेलं आहे!१२एप्रिलची संध्याकाळ ४०वर्षं एकमेकांच्या सहवासात एकजीव झालेल्या जोडप्यासाठी आनंद वाटणारी होती!.....🌷🌷
(क्रमशः पुढील भागात ...)
*****************
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१३एप्रिल२०२२
Comments
Post a Comment