आखाजी

अहिरानींनं धन--भाग-०६वा
        *।।आखाजी।।--(०१)* 
 *.....नानाभाऊ माळी* 

भाऊ-बहिणीस्वन!
 *'आखाजी सारखा सन* 
 *सन तुले टिपरा रवाले!* 
 *आखाजी सारखा सन* 
 *सन तुले झोका खेवाले!* 
 *आखाजी सारखा सन* 
 *उनात तुले संकर लेवाले!'* 

आखाजीनां!गवराई मायनां!पारबती देवीनां गाना आयीकीस्नि!आपला मनलें! ध्यानलें!चित्तलें.....मव्हरे व्हडत-व्हडत वैशाखम्हा लयी पयेस!...मननां मंग जुना!.. पिव्या-कोल्ला पाचोया गयी जास!नवा... पिव्या-हिरव्या!.. कव्याजरत पाने मननां मुकल्या फांटीस्ले फुटाले लागी जातसं!.....झाडेसन्या       फांटीस्नागत मननां वैशाख फुलतं ऱ्हास!निसर्गानं आसचं से!..जथा-तथा चटकेल उनमा भी गुलमोहरनां मायेक धरनी माय हारकी जास!..नयेतरन्या         पोरीस्नामायेक!मंग...त्या नयेतरन्या पोरी-बेटी आंबानां मोहरनां मायेक खुलतीस!फुलतीस!माय माहेरनं उमाया जठे-तठे नजरे पडत ऱ्हास!....पोरी!..चार-आठ दिन मव्हरे आखाजी येवानी कानगी देत ऱ्हातीस!

भाऊ-बहिणीस्वन!
 *वैशाखनं नव-नयेतरपन मनलें हुबारी* *देत ऱ्हास!डोयालें*       *भुलाळत ऱ्हास!...सृष्टी मंग जुनं लुगडं* *सोडी नवं लुगडं नेसत ऱ्हास!तिनं रुपडं दखी रचिता ब्रह्मदेव भी* *बुचकयामा पडी* *जास!...* 
.... गावंम्हानां बठ्ठा झाडेस्ना शेंडा बाम्हणनी शेंडीनगत वर वर आभरायकडे सरकत ऱ्हातस!आथ्या ---झाडेसन्या फांट्या-फांट्यास्वर!घरनां सऱ्यास्ले!नयेतरन्या आंडेर-बेटी!.. बाप-भाऊलें मोठंल्ला दोरनां झोका बांधानं सांगतीस!बठ्या पोरीस्ले फांट्या जगावरचं खेवाळतीस!नाचाळतीस!झोकावर बठी आभरायवर मांगे-मव्हरे उडत ऱ्हातीस......

हिरदयलें भिडतीन आश्या आखाजीनां गाना कानवर पडत ऱ्हातसं!....

 *...'आथानी कैरी तथानी कयरी,*    *कयरी झोका खाय व!* 
 *कयरी तुटनी खडक फुटना,* 
 *झूयी झुयी पानी व्हाय व!'..* 

...आशा एक वर एक गवराईनां गानां म्हनी!म्हणी...गल्ली!..गावंलें झोकावर बसाडतीस!हासाडतीस!   सवसारनं दुःख भुलाडतीस!माय-बाप!भाऊ!धल्ला-पल्ला!...या बठ्ठा!..बठ्ठाजन पोरीस्ना मुखे गाना आयकी वैशाखनां तप्ता उनमा भी मनथिन गरायी जातस!कायेजलें  थंडक पडी जास!टरबूजनां थंडा पानिंगत..गारे-गार व्हयी जातस!आंडरीस्न मधाय!मवाळ बोलनं!..माय-बापनां कायजलें थंडक पोचाडस!    पोरीस्ले सासरनी उबग इसरालें लावस....

 *..'आथानां आंबा तथानां आंबा, कयरी* *झोका खाय व!* 
 *कयरी तुटनी खडक फुटना,* 
 *झुई झुई पानी व्हाय व!* 
 *झुई झुई पानी व्हाय तठे* 
 *....लटकननां बजार व !'..* 

...आस्या गवराई मायनां गणज गाना पोरीसना तोंडे बठेल ऱ्हातसं!पिढीजात..तोंडी गाना पोरीस्ना मुखे बठेल ऱ्हातस!आंडेर सोतां गवराईनं रुप से!माय पारबतींनं रूप से!आखाजीगुंता भाऊ मुऱ्हायी व्हयी बहिनलें माहेर लयी येस!माय बाप... आंडेरनं मुख दखागुंता तरसी जायेल ऱ्हातसं!तिले लेवागुंता.. मव्हरे गावंनी येशी पाउत कायेजनां  गोया गुंता चालत-पयेत येतस!माय-बापनं मन!...व्हडी लयी येस!

भाऊ-बहिणीस्वन!
 *वावरमा!..जंगलम्हा!..दुपारनां भर* *उंडायानां किरकोडास्ना* *किर्रर्र...आसा आवाज कानवर पडत* *ऱ्हासं!उंडायमा खेतीनां हंगाम* *खल्ली थंडा व्हयी जायेल*  *ऱ्हास!आंडरी सासरनं कष्ट इसरी माय* *बापना थंडावाले येयेल* *ऱ्हातीस!* 

दारनां बाहेर वैशाखनां चटका वणवा व्हयी!भट्टी व्हयी!
चांगलाच चटकाडी ऱ्हास!लामेंनथीनं दूर नजर टाकी देखो ते!.डोयालें मृगजयना  समुद्र दिखत ऱ्हास!उमयता लाटा डोयांमव्हरे दिखत ऱ्हातीस!डोकावरनां यांय उब्या व्हयी!आग वकत ऱ्हास!आथ-तथ छावगुंता नजर फिरायी देखो... ते!बठ्ठा झाडेस्ना जुना पाने गयेल दिखतस!नवा कव्याजरत इलुसा-इलुसा नवतरनां पाने झाडेसन्या फांटीस्वर तनगत  दिखत ऱ्हातसं!..फुलत ऱ्हातसं!पखे काढी उमलत ऱ्हातसं!नव जलमले येल धाकल्स पोर्यांगत मोक्या-चोक्या हासत ऱ्हातस!धरनी मायनं!...सृष्टीनं रुपडं धपेल-तपेल!चटकी जायेल उनम्हा दिखत ऱ्हास!सृष्टी जुना साज शृंगार टाकी नवा दागिना घालेलं दिखत ऱ्हास!घामनां उंडाया आभरायनी कपाशीनी.. छाव लयी वारगाना मव्हरे पयेत ऱ्हास!

भाऊ-बहिनीस्वन!
 *वाडगाम्हा!सपर्यास्मा!कामे-धामे* *उरकी!...खुटालें बांधेल* *बैलं थकान काढि वागुल* *करत ऱ्हातसं!वागुलनं फेसकूट तठेच*      *गव्हानम्हा पडत ऱ्हास!* 

 *पूर्वापार पासीन चालत येयेल!वडलोपार्जित!... सासुरवाशीनलें* *हक्काना माहेरलें जावानं दोन सन ऱ्हातस!...त्या दोन सन* *म्हणजे...दिवायी आनी आखाजी!!* 

भाऊ-बहिणीस्वन!
हिवायाम्हा धिरे-धिरे थंडी वाढत ऱ्हास!दिवायीलें 'भाऊबीज'नां दिन बहीण माहेरलें येस!मव्हरे...मव्हरे आखो!..सव महिनाम्हा आखाजीलें!..आंडेर माहेरलें येवावर माहेरन हिरदय हारकी जास!..पोर येस तव्हय बठ्ठा दुन्यानं सुख!..आनंद लयी येस!सासुरवाशीन पोरले!..आंडेरलें सासरनं सुख-दुःख ईचारगुंता माय!धाकली बहिन!भाऊ!ऱ्हाई-सुई बाप भी!..उतावळा व्हई जायेल ऱ्हासं!पानीमा पडी जायेल ऱ्हासं!

आखाजीलें कोनी 'आखीती' म्हंतस!कोनी अक्षय तृतीया म्हंतस!जिन्ह काहीच कमी-ज्यास्ती व्हत नई तिले अक्षय तृतीया म्हंतस!सोतां अविनाशी भगवान शंकरनं वरदान से!पारबती माय सोतां गवराई व्हयेल से!....तर... भाऊस्वन!खेतीनां बठ्ठा हंगाम सरी जायेल ऱ्हास !खेतीम्हा जथी-तथी नांगरटी व्हयी जायेल ऱ्हास!धसेसना खुटा वक्खरवरी ईचरी-वाचरी लिखास्ना मायेक वावरनां वर येयेल दिखत ऱ्हातंस!वावरेस्मा जथा-तथा ढेकाये दिखत ऱ्हातसं!नांगरेलं ढेकाये!... उंडायानां चटका आंगवर लेत ऱ्हास!भुंजायी ऱ्हास!सोनांगत उजयी ऱ्हास!तपी ऱ्हास!धपी ऱ्हास!

भाऊ-बहिणीस्वन!
 *आखाजी!...आखाजी!!..बठ्ठास्ना मनमा बठेल सन ऱ्हास!बठ्ठा गावेस्ना* *वसरीना बाहेर!... उननिं वनवन चटकाडत ऱ्हास* *!वंड्या,साना,भीता लिपा-लापान चालू* *ऱ्हास!हाऊ नव नवतीनां खे मनलें ....जुनं जायी!.. नवं ताज करत* *ऱ्हास!सृष्टी हारकी जायेल ऱ्हास!आंडरीसले लाडका भाऊ नई ते* *मंग बाप मुऱ्हाई व्हई लेवालें जास!आखाजी..आंडरीस्न...सासरनं* *बठ्ठ कस्ट!दुःख..इसरी जावागुंता आनंदनां सन ऱ्हास!* 

 *भर उंडायना दिन ऱ्हातसं!उनन्या झया कानफट्या बठाळत ऱ्हास* *!आखाजीगुंता गावे-गावं धाम-धूम चालू* *ऱ्हास!* 

दुपारन्हाभर झाडेस्वर व्हल्ग, केघाया,हाड्या-चिडया,मिटठू गुपचीप बठेल दिखतस!झाडनी छावम्हा आंगे-पांगेनां गणज मोक्या सुटेल ढोरे बठेल दिखतस!... सायले सुट्टी ऱ्हास!पोरे-सोरे ठिकऱ्या,इट्टी-दांडू खेत दिखतस!उननां चटका बठत ऱ्हास!तय पायलें फफोटानी कायजी नही ऱ्हास!हाय हेर वर आखाजीगुंता गावण्या माय-बहिनीस्नि...धोय-चोयनी गर्दी चालुच ऱ्हास!

 *तोंडवर...आखाजी उनी!.. तरी धोय-चोय चालूच ऱ्हास!गावे-गावं* *सासुरवाशीन आंडरीस्ले लेवालें कोठे बाप!कोठे आंडोर जात ऱ्हातसं!पोरी* *भी माहेरनां    मुऱ्हाईकडे आस लायी बठेल* *ऱ्हातीस!...* 
 
भाऊ-बहिणीस्वन!
आखाजी उनी का...मंग
.....एक एक सासुरवाशीन 'आंडरी' माहेरलें दिखालें लागतीस!माहेरनी शिव नजरे पडताचं....पोरीसन्या डोयालें ठायकाच गह्यर दाटी येस!जठे कयी फुलनी!वाडे लाग्नी!जलमनी!ती माटी आंडेरलें आक्सी बलावत ऱ्हास!मातरं तिले लगीन व्हवावर सोतांलें परकं-परकं वाटत ऱ्हास!मनलें ती तसी बजायी ऱ्हास!तिले धाकल्पननं बठ्ठ आठत ऱ्हास!मंग एक-एक 'त्या धाकल्पननां दिननं चितर' डोयांमव्हरे सरकत ऱ्हास!.

....तर मंग!..
 *...बठ्ठ गावं तगतराव सजाडो तसी सजेल दिखस!बठ्या आंडेर-बेटीस्नि* *माहेरमा पाय ठेल ऱ्हास!घरे-घर कावड,सऱ्या* *भीतडास्वर रंग रंगोटी!वाला-वाला चित्रास्नि नक्षी दिखालें लागी जास* *!घरलें धवी माटीघायी पोतार-पातार सुरू व्हई जायेलं ऱ्हास* *!माहेरनां घरलें घरपन येत ऱ्हास!...* 

भाऊ-बहिणी स्वन
....आखाजी!कोनी से मंग??
....आंडेर-बेटीनी आखाजी ऱ्हास!गवराई मायनी आखाजी ऱ्हास!गावंन्या बठ्या आंडरीस्नि आखाजी ऱ्हास!आखाजी खान्देशनं नवं साल ऱ्हास!आखाजी साडे तीन मुहूर्ता मायीन एक पवतीर मुहूर्त ऱ्हास!आखाजी साल बदली करान... कारण ऱ्हास!

 *आखाजी--खानदेशनां नवं      सालनां पहिला दिन ऱ्हास! आखाजी* *नव-नयेतर ऱ्हास!नवा मालकना आठे!!नवीन साले लागागुंता* *आखाजी ऱ्हास!भगवान शंकरलें पूजानं!गवराई मायलें पुजानी* *आखाजी ऱ्हास!धन-धान्य आबादीगुंता आखाजी* *ऱ्हास!खापरन्या पुऱ्यास्न गोड-धोड पाच-पक्वानन्या   जेवणनी आखाजी* *ऱ्हास!मरेल-धरेलनं डेरग भरागुंता आखाजी* *ऱ्हास!सर्गे जायेल वाड-वडीलस्ले वरीसनी आगारी* *टाकानी!निव्वद दखाडानी आखाजी ऱ्हास!कुंभार दादा कडतीन नवं घल्ल* *लयीस्नि.. त्यांवर डांगर ठेयी!पूजा करांनी आखाजी* *ऱ्हास!आखाजी नयतरन्या पोरीस्नि ऱ्हास!लोके* *आखाजीनं पुण्य कमावतसं!नवीन मुहूर्तनी सुरुवात करतस* *!बीज-बीजवायीन्या भुईमुंग शेंगा फोडी* *आखाजीना नवीन सन साजरा करत ऱ्हातसं!वावरे गहाण* *ठेवानं!नफावर देवानं मुहूर्त आखाजीना दिन करतस!...आखाजी* *खुशी आनी पुन्यानी खान से!शंकर पार्वतीलें* *पुजानां दिन आखाजी से!आखाजी गोड से!सासुरवाशीन पोरीस्ले* *आठ-दहा दिन थकान काढानं ठिकाण आखाजी ऱ्हास!माहेर* *आखाजी ऱ्हास!पारबती ऱ्हास!गवराई ऱ्हास!शंकर जवायी* *ऱ्हास!....* 

  आखाजीना चार-पाच दिन मव्हरे आंडेर-बेटी दररोज नदीवर नई ते मंग हेरवर टिपरा खेवाले जातीस!गवराईना गाना म्हणतीस!गवराईनां आंग धवालें तांब्याना गडूम्हा पानी लयतीसं!
रोज टिपरा खेत आखाजी पाउत पोरी हासी-खुशी गवराईनी पूजा करतीस!माय-माहेरनी खुशी आंडरी वाटतं ऱ्हातीस! सासुरवासनां घरघर घटया!..काही दिन इसरी जातीस!...आंडेर!...खयखयेता झिरा ऱ्हास!माहेरनं आस्सल पानी ऱ्हास!सोतांनं दुख दपाडी    माहेरलें सुख वाटतं जास!आंडेर बापनं कायेज ऱ्हास!पोटम्हा कायम बठेल ऱ्हास!पोर आखाजीलें  ...         खयखयेता वहाता झिरा लयी येस!माय-बाप-भाऊनं आंग धोई!हिरदयनां हासू मांगे ठी!हाई चिडी.. मव्हरे सासरलें निंघी जास!...

 *'गवराई माय नं माहेर* 
 *अमृत नदीन तें गावं!* 

 *झाड मया हिरवयगार* 
 *माय बाप भाऊ राव!* 

 *चटके वैशाख वनवा* 
 *ऱ्हाये माहेर नं नावं!* 

 *कयेरी नाचस डग वर* 
 *खडक फुटी भाऊ धाव!* 

 *माहेर वलावानी लांगी* 
 *झुईंझुईं व्हावाडे देव!* 

 *पाच पक्वाननी थाटी* 
 *निव्वद ठेवा मनोभाव!* 

 *माहेर आखाजीनं गावं* 
 *'ती'ठीयी जास मांगे नाव!'* 

आखाजी नवं सालनं निवतं देस!पारबती!गवराईलें बलावस!नयतरन्या पोरीस्ले!माहेरलें येयेल आंडरीस्ले गवराईसंगे एकजीव व्हयेल दखस!संवसारनां उंडाया भुली आंडरी मंग माहेरनी छावलें बठतीस!यांय वरलांगे सरकत ऱ्हास!छाव मव्हरे-मव्हरे सरकत ऱ्हास!गोड धोड खायी!आखाजी व्हवावर!... माहेरलें येयेल  आंडरी आखो... लेव्हाले येयेल शंकरसंगे!तिन्हा नवरा संगे सासरलें निंघी जातीस!

भाऊ-बहिनीस्वन!
 *नवा सालन्या पुऱ्या खायी!नवा इचार* *डोकामा ठेयी!शुभ मुहूर्त नी* *घडी मव्हरे सरकी ऱ्हायंनी!आखो* *भेटसुत...'आखाजी'नाचं* *आपुरा-सपोरा इशय लिसनी!तवलोंग* *राम राम मंडयी!राम* *राम!.....🌷🌷🌷🌷🙏* 
 *.......नानाभाऊ माळी, हडपसर,* *पुणे-४११०२८ ,मो. न.७५८८२२९५४६/९९२३०७६५००*  *दि-२३एप्रिल२०२०* 
 *.....लॉक डाऊनम्हा--घरच थांबा* 
 *कायजी ल्या......जीवलें जपा*

(मांग ला वरीसलें लिखेल लेख-भाग-१ से)
......नानाभाऊ माळी
--१२मे२०२१
[13/05/2021, 06:59] Nanabhau Mali: *।।आखाजी।।..भाग* ०२रा)
 🌹----------------🌹
*.....नानाभाऊ माळी* 

भाऊ-बहिनीस्वन!
 *आखाजीन्या!...नवा सालन्या!.. बठ्ठा* *खान्देशी भाऊ-बहिनलें!मामा-काका,चुलता* *!* *आजला-आजलीस्ले!..मन्ह्या* *हिरदयथिन हार्दिक शुभेच्छा!आवंनं* *साल बठ्ठास्ले आबादानीनं* *जावो हाईचं गवराई मायनां पायवर डोक ठेयी प्रार्थना* *करस!* 

भाऊ-बहिणीस्वन!
खान्देशना सननी वयख आखाजी से!तीअक्षयतृतीया से!त्रेतायुगनी सुरुवातच आखाजी से!खान्देशनं नवं साल आखाजीचं से!गवराई म्हणजे पारबती माय से!संकर भगवान तिन्हघरनां मानोस से!घर-घरमा नवरा-बायकोना जोडा...संकर पारबतीनं रूप से!गवराई माहेरलें येस!आनंदम्हा माय-बापनाकडे!माहेरलें!..आंडेर येस!आखो थकवा काढी  सासरले चालनी जास!

 *आंडेर हायी गवराई से!म्हणीसनी आखाजी* 
 *खान्देशनी वयख से!खान्देशनं नवं* *साल से!लागता वैशाखलें* *आखाजी यी जास!ती गवराई मायनी* *वयख से!आंडेर-बेटीनी* *आखाजी से!शंकर भगवाननी* *पारबतीलें माहेरलें धाड व्हत!तव्हय* *फाईन आंडरी माहेरलें येयी* *ऱ्हायण्यात!..तव्हयस्नि हायी* *रीत पडी जायेल से!आखाजी* *लागी जास!नवं साल लागी जास!घर- घर हारकी जास* *!खेती करालें शेतकरी मोक्या व्हई जास!* 

भाऊ-बहिणीस्वन!
आखाजीलें खान्देशनं नवं साल लागी जास!वरीसना साडे तीन मुहूर्त!...साडे तीन मुहूर्तम्हायीन आखाजीलें आर्ध मुहूर्त म्हंतस!हाऊ उत्सव आखाजी से!... प्रेम!गोडवानां सन से!वाड-वडीलस्न डेरग भरान!त्यासले जेवाडान!नीव्वद दखाडानं!आगारीनां सन से!पित्रेस्ना सन आखाजी से!गव्हारक्या!बकरक्यास्ना   सालभरनां वायदा पक्का करानां आखाजी सन से!सालदारनं 
साल ठरावतसं तो दिन   आखाजीनां ऱ्हास!

 *खेतीनां हंगाम सरी जास!हेरी तयलें लागी जातीस!उपसा-उपसा उपसी* *मोटरी पाणीन्या 'उलट्या' करत ऱ्हातीस!..मोटरी थायनाम्हा* *पानी फेकत ऱ्हातीस!..जमीन!.…जुवरीना पापडेस्नागत व्हयी जास!हुंनं* *वारग बठ्ठा पाला पाचोया उडाई लयी पयी जास!धरनीमायनं रूप* *निखरी जास!चैत मव्हरे वैशाख ऱ्हास!* 

भाऊ-बहिणीस्वन!
.. मंग वैशाखनां उंडाया  चटकाडस!आथ माहेरलें  चटकाडस तथ सासर लें चटकाडस!यायी-यायीस्ले चटकाडस!दोन्ही ठिकानें       धापाडस!दोन्ही ठिकाने हुपारा व्हस!आंडेर बेटीलें ...या हुपाराम्हा मंग माहेरनी याद येवाले लागी जास!याद ह्या हिरदायना बोल ऱ्हातसं!याद आकसी आनंदम्हा येस!कुडापाम्हा भी येस!आंडेर माहेरना निरोपगुंता डोया लायी बठस!म्हणीस्नि आंडेर म्हणस ....

 *माय बाप काय सांगू,* 
 *सेतस त्या कोसो दूर!* 
 *मन्हा दाटी येस उर,* 
 *तून्ह उघडं माय घर!* 

 *सवसारनां आठे,* 
 *माय हूबा से पसारा!* 
 *बिन जीवनां तयमये,* 
 *मन्हा चिडीनां पिसारा!* 

 *मन्हा माहेरनां समुंदर* 
 *बठ्ठा दुनियाथिन न्यारा!* 
 *नाव चालाये बाप...* 
 *सुटे थंडयगार वारा!* 

 *माय माहेरंनं आमरूद* 
 *सारं बालावस सुख!* 
 *हिरदायात दाटीयेल* 
 *नको लावू नां तू नख!* 
 
 *गवराई माय हुबी* 
 *गावनां दूर शिवलें!* 
 *माय बाप धाये पये* 
 *लेव्हालें शिवले!* 

 *चितांग तोडाम्हा हुबी* 
 *माय व गवराई.....!* 
 *पायघड्या टाकी* 
 *हूबा भाऊ मुऱ्हाई!* 

 *धव्या घोडानां रथ हूबा* 
 *त्याम्हां बसनी गवराई!* 
 *बंगयी झोका खेयी* 
 *गये दुःख भराई...!* 

भाऊ-बहिणीस्वन!
...माहेरनी याद मव्हरे सन-पावन नां येयलेंचं फिरीफिरी येत ऱ्हास!उंडायामा आखाजी तोंड मव्हरे यी जास!मुऱ्हाई आंडरीस्ले लयी येल ऱ्हातस!माहेर भरी जायेल ऱ्हास!हारकी जायेल ऱ्हास!आंडेरनं प्रेम!आंडेरनी माया साखरनां झिरांगत ऱ्हास...
..माहेर येयेल आंडरी म्हंतीस कशा .....दखा..!

 *...,'काय सांगू माय,* 
 *आखाजीनां झोका!* 
  *आभायालें भेटनां,* 
 *वर जावानां व्हका!* 

  *फांटी नाचाडस वर* 
 *मनिं हिरकणी पोर...!* 
 *मन्हा माहेरनं सुख* 
 *बठ्ठ हारकन घर!* 

 *गवराईमाय आखाजी* 
 *पुरन लागे गुईचट* 
 *निव्वद गवराईलें ठेवा* 
 *तिले मांडेलं से पाट..!'* 

आखाजीनां मव्हरे घरमा दोन-तीन दिन पायीन सांजऱ्या करानी गडबड चालू व्हई जास!सांजानां घम-घमाट सुवास दारे-दार येत ऱ्हास!गवराई मायना निव्वदगुंता दुसऱ्या धाकल्या  संजोऱ्या तयेल ऱ्हातीस!

भाऊ-बहिणीस्वन!
. *...आखाजीना एक दिन मव्हरे बठ्या आंडेर-बेटी!पोरी....कुंभार दादानां घर* *टिपऱ्या खेयेत जातीस!कुंभार दादांनी भगवान शंकर तयार* *करी ठेल ऱ्हास!आथा सुतार दादा लाकूडनी गवराई बनाडी* *देस!घडायी देस!माटीनां बनायेल भगवान शंकरलें पिव्या* *कपडाम्हा गुंढाई!सजाडी-सुजाडी!कपडा नेसाडी!मंग बठ्या पोरी* *टिपऱ्या खेयेत शंकरलें घर लयी येतीस!* 

 बठ्ठया आंडरी टिपऱ्या खेयेत!फुगड्या खेयेत घरे-घर गवराईमाय संगे शंकरलें जोडीमा पाठलावर बसाडतीस!दोन्हीसन्या गयाम्हा!टरबूज,डांगरन्या बियास्नि माय!बोरे,भुईमूगन्या शेंगा!धाकल्ल्या सांजऱ्यासन्या.... माया बनायी गवराई-संकरलें घालेलं ऱ्हातीस!दिनमावतलें  शिया-सांजऱ्यास्ना निव्वद दखाडी आंडेर-बेटी मन लायी पूजा करतीस!...

 *..रातभर संकर-गवराई मायना गयाम्हा त्या बठ्या  माया मोतीस्ना* *हारनीमायेक चमकी- खुली दिखी ऱ्हातस!...कैलास परबत बठ्या* *आंडरीस्ना माहेरलें उतरेल ऱ्हास!गवराई मायनं रूप आखो उजई* *जायेल ऱ्हास!माय लाकूडनी बंगयी वर बठेल ऱ्हास!गवराई मायनं रूप* *दखी..!पोरी हिरदायथिन दवडत जातीस ! आपलं डोक गवराई* मायनां पाय *वर ठेवतीस!* 

भाऊ-बहिणी स्वन !
आंडेर-बेटी!... मायना गाना म्हनत ऱ्हातीस!नवा कपडा घाली!सजी-सुजी!या देवघरन्या पऱ्या टिपऱ्या!फुगड्या खेयेत चेष्टा मस्करी करत रहातीस

 *...आखाजीनं दिन बठ्ठा गावंमा पुरन* *टाकेल ऱ्हास!खापरवर पुऱ्या शेकात ऱ्हातीस* 
 *कुल्लाया!भज्या!रसी-भात!आंबानां रस..अश्या पाच पक्वाननां सयपाक* *बनायेल ऱ्हास!* 

.....आखाजीनं भलत मोठं मुहूर्त ऱ्हास!बठ्ठ पाच-पक्वान.... माजघरमा नवी माटीनं घल्लावर!केळी-करावर ठेवतसं!त्यांवर धाकलस मडक! त्यांवर डांगर आनी डांगरवर खापरन्या पुऱ्या!कुल्लाया पापड ठेवतस!त्या मोठा घल्लावर पोरीस्नि धवी माटीवारी रांगोईनं नक्सी काम करेल ऱ्हास!त्यांनी पूजा-अर्चा व्हत ऱ्हास!काही घरेसमा आवन्न सालंलें कोणीतरी जात ऱ्हायंना ....ते त्यासन डेरग भरनं ऱ्हास!चुल्हामा बठ्ठा पित्रेसलें आगारी टाकी!मनोभावे निव्वद दखाडी घरमानां बठ्ठाजन जेवालें बठतस!आगारी टाकी जेवने व्हत ऱ्हातस!..

...जेवने व्हयी... गणज गावेस्मा  आखाजीनां दिन पत्ता खेवानी चाल से!रीत-भात से!गावं गल्लीना गणज आट्टल!.. तीसमारखा पत्ता खेवाले बठतस! डाव वरथीन कव्हय उठो यानं भान ऱ्हात नई!खेनारसना दांगडो चालूच ऱ्हास!बठ्ठा पत्तास्ना अट्टल जुगारी एक दुसरालें भेटी गोया व्हयेल ऱ्हातसं!बठ्ठास्नि पत्तास्ना खेयम्हा येरायरलें गुताडी ठेयेलं ऱ्हास!हाई भी आखाजीनी वयेख सांगतस!

 *भाऊ-बहिणीस्वन!* 
 *दुपारथिन....बठ्या* *आंडेरी-बेटी...नटतीस- थठतीस!नवीन कपडा* *!चितांग,तोडा,कड,कल्ला,गोट* *पाटल्या,बांगडया घालतीस!टिकली-पावडर लायी 'ऐण्या'* *घालतीस!गहू-मक्की कव्या धान्यांस्नि माय व्हईस्नि गावण्या बठ्ठया* *आंडेर-बेटीसनी डोकाले लायेल ऱ्हास!धान्यां माय पारबती नी* *!गवराई मायनी याद से!वयेख से!* 

बापनी!नई ते मंग भाऊनी! पोरीसगुंता आंबा!चीच!मोठ्ठला वड-पिप्पयनां झाडेस्ले झोका भांदी देल ऱ्हास!आंबान्या कैऱ्या तनगी झोका खेयेत ऱ्हातीस! झोकावर माय-बापनी यादम्हा गणज गाना म्हनतीस!बठ्ठ गावं एक व्हयी जास!आंडरीस्न मुख देखी माय-बाप हारकी जातस! घरलें घरंपन यी जास!गवराई!पारबतीनं रूप या माहेरवाशीन पोरी ऱ्हातीस!त्यास्ना मुखे जथा-तथा झोका खेयेता-खेयेता गवराईनां गाना ऐकू येतस!आखाजी व्हवावर संकर गणगोत संगे लेवाले यी जास!आखाजी संकर पारबतीनां सन से!बठ्ठा खान्देशम्हा गवराई मायनां मान ऱ्हास!पोरी पखे लायी येल ऱ्हातीस!बठ्ठया नटेल-थटेल गवराया सेतीस!....

 *...आंडेर-बेटी!..टिपऱ्या खेयेत-खेयेत गावंनां शिववर जायी धडकतीस* *!न्यारा-न्यारा गावंन्या पोरी शिववर भेटतीस!टिपऱ्या* *खेयेत!..खेसर मस्करी चालू व्हतीस!मनम्हा वरीसभरन्या संगयेल गाया* *!मनम्हाथुन सासर बद्दलनी उबग ठायकेच निंघत ऱ्हास* *!मंग संकरनं गणगोत समजी येरायेरलें दगडे मारत ऱ्हातीसं!हायी* *खेसर-मस्करीनी चाल पूर्वापार चालत यी ऱ्हायनी!*       
  *गवराईनां माहेरन्या पोरी      संकरना गंनगोतले गाया-सिया दि दगडे मारत* *ऱ्हातीस....* 
   
भाऊ-बहिणीस्वन!
 *'गणगोत संकरनं* 
  *दगडे खातस भारी!* 
     *माहेर गवराईनं घर* 
    *खेसर कर्तीस पोरी!* 

 *टिपऱ्या-टुपाऱ्यास्ना ठेका* 
 *खेयनिं रंगत भारी* 
 *गोडी गुलाबिनां रंग* 
 *पोरी खेयेत चोरी चोरी* 

 *शिव शिवनी वलांडी* 
 *खेसर भलती से न्यारी* 
 *पयीं पयीं जातस दूर....* 
 *मांगे दखतीस फिरी* 

 *पायलें भिंगऱ्या बांधी* 
 *खेयेत जातीस दुरी* 
 *गणगोत संकरनं.....* 
 *पयेत जास माघारी* 

 *माहेरन्या आंडरी* 
 *दिखतीस सुंदरी!* 
 *मुखडा उजयेल* 
 *मांगे फिरतीस डोया भरी!'* 

 *आखाजीना सन* 
 *हायी माहेरंन धन!* 
 *वाटी वाटी गवराई* 
 *जिकी जास ती मन!* 

 *यांय मावयना आज* 
 *डोया टिपतस जुनं* 
 *संकर उना लेवाले* 
 *थांबे माहेरनं गाणं* 

 *टिपरी खेयेत!थट्टा मस्करी करत!यांयबुडान ये लें दोनी परका गावण्या* *पोरी येरायेरनां गया भेटीतीस!आंसूमा बिलगी-बिलगी!* 
 *येरायेरलें भेटतीस!सासरनां उंडायाना चटका झेलालें निंघी जातीस!* 

भाऊ-बहिणीस्वन!
,'पुल्ला वरीस्ले आखो भेटसुत!'
  येरायेर आसी सांगी!डोयाले मोके सोडी देतीस!यादलें डोयाम्हा ठेयी मांगे फिरी दखत!मव्हरे रस्ता व्हडतीस!यांय वरलांगे मोठल्या बल्ल्यास्ना मांगे धिरेधिरे लपी जास!

..वरीसभर आखाजीनी याद मनमा बठी!..जास!मांगल मांगे चालणं जास!पुल्ल वाट दखागुंता मव्हरे निंघी जास!नवं-नवंतिना हाऊ खे!पिढ्यान पिढया चालूच से!माहेरपननां हाऊ उमाया     पोरनां हिरदयमा उक्कय फोडत ऱ्हास!चालूच ऱ्हायी!...

सूर्यदेव गव्हारक्या व्हई!सकायले सोतां उगी!माणोसनां गव्हारालें चरालें लयी जायी ऱ्हायनां!सोतां बुडावर ह्या गव्हारालें ....रातलें वाडगाम्हा सोडी जायी ऱ्हायनां!वाडगानां शिवाडालें कुस्टाये लायी जायी ऱ्हायनां!

 *चैत-वैशाखनं उन* 
 *_तोडी पयेस दावन_* 

 *झेली दुःख गवराई* 
 *फिरी येयेस गव्हान* 

 *फोडे व्हयेल पायलें* 
 *माय तडपस मन* 

 *चटका फफोटानां* 
 *नही ऱ्हायन भान* 
 
भाऊ-बहिणीस्वन!
हायी आंनबक कोडं आजून भी उमग्न नई!कवलोंग मन नां अंधारानां खेय चालू ऱ्हायी??खरंच मानोस जलंमनां ढोर से का?उबगी जावापाउत हापक्या मारत मव्हरे जात ऱ्हास!

 *आखाजी!.. हासी-खुशी निंघी जास!प्रेम-आनंद वाटत जास!शंकरना संगे* *गवराई भी चालनी जास!आंडेर सासुरवाडीलें चालनी* *जास!उंडायांनं उन चटकत ऱ्हास!आखाजीनां आनंद हाऊ चार दिन* *लिं!---वसरीम्हाईन सरकत मांगला दारे चालना जास!      पोर सासरलें* *चालनी जास!..* 

...आते गावे पहिला सारखा नई ऱ्हायंनात!घरे बदली ऱ्हायंनात!माणसे बदली ऱ्हायंनात!आते गावंमा भकास वाटस!आखाजी आखाजीचं ऱ्हावालें जोइजे!गवराई बसाडी आखाजी पुजाले जोइजे!नवं साल दर वरीसले साजर व्हावाले जोइजे!खान्देशनं धन मनमा रुजाडा लें जोइजे!हायीचं आखाजीनी याद आंडरी स्ना मनम्हा ऱ्हायी!!

भाऊ-बहिणीस्वन!
 *आखाजीलें निरोप देता देता!मव्हरे चालत ऱ्हानं पडी!आपुन बठ्ठा चालत* *ऱ्हाहुत!...आखो भेटसुत अहिरानींना नवा धन संगे* *!तवलोंग राम राम मंडयी!राम राम!🌷🌷🌷🌷🌷🙏* 
  *...नानाभाऊ माळी,  हडपसर,  पुणे-४११०२८,मो.न* . *७५८८२२९५४६/९९२३०७६५००,      दि-२५एप्रिल(वैशाख)आखा* *जी-२०२०*
(मांगला वरीसना हाऊ लेख आखाजी भाग-२आज आखो टाकी ऱ्हायनू🙏🌷🌷)  -नानाभाऊ माळी

दिनांक-१३मे२०२१
[14/05/2021, 06:52] Nanabhau Mali: 🌹आखाजी🌹
         ------------------
            (भाग-३रा)
     ....नानाभाऊ माळी

भाऊ-बहिनीस्वन!"आपले आज आखाजीन्या हार्दिक शुभेच्छा!"
🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏😌
वसरीनां मव्हरे..!दारनां तोंडे..!   नेम्मंनं मावठीनां खालें हुभा व्हतु!मव्हरे पाय टाकानां जीव नयी व्हयी ऱ्हायंता!वरथिन आग     वतीवती तावावर भुईमुंगन्या शेंगा भुंजो तशी सूर्यदेव आंगनं-गल्लीनी माटी भुंजी ऱ्हायंता!....मांगलां दारे पत्रा ठोकी ढोरेस्ले वाडगं बनायेलं व्हत!उनन्हा भरे कानवर किरकोडास्ना किर्रर्र आवाज   चालूचं व्हता!भुईमुंगनां पाला-गहूनं कुटार एकमझार करी गव्हानम्हा टाकेल व्हत!ढोरे     गहूनं कुटार आनी भुईमुंगनां पाला खायी वागूल करी ऱ्हायंतात!खुरप्या-काज्या बैलनां गयाम्हा भांदेलं घंट्या भु भारी संगीत दि ऱ्हायंत्यातं!🌷

हुनं वार्ग कानलें झामलांयी ऱ्हायन्त!कानफट्या शेकी ऱ्हायन्त!उन उतरावर ढोरेस्ले पानी दखाडनं व्हत!... दारेस्ना मव्हरे गलीमां नीमंन्हा गनज झोपाया झाडे व्हतातं!...फांटीलें झोका भांदेलं व्हतातं!...धाकल्या आंडेरं-बेटी झोकावर बठी झोका खेयी ऱ्हायंतात!गांना म्हनी ऱ्हायंतात!आखाजीनी याद दि ऱ्हायंत्यात!गवराई मायनां गांना कानवर पडी ऱ्हायंतात!सासरले जायेलं बहिनी आखाजीलें येल सेतीस!माहेरनी याद सताडी ऱ्हायंती!गवराई माय सपने यी बलायी ऱ्हायंती!फिरिफिरी डोयांना आंसू काढी ऱ्हायंती!धाकल्ला भाऊ-बहिनी सासरले जायेलं मोठी बहिनलें आनागुंता माय-बापलें तगादा लायी माहेर लें अनेलं से!🌷

"भाउराया गयेथा
 बहीणलें लेवाले
आखाजिना गोड
गोड निरोप देवाले........!

बहीन गाये आंसू
भावू रायालें देखी
माहेरनां मयानी
माटी देखी देखी..........!

 मुख हारकी बठे
गाड पये माहेरलें
मुऱ्हाई भाउ बोले
लेक आवरे गह्येरलें.......!"

......हुना वर्गानां फफोटा उडी ऱ्हायंता!वरवर उडी आंडेरंनां सासरले निरोप धाडतं ऱ्हाये!निंमनां फांटीलें बांधेलं झोका आथा-तथा येरं-झाऱ्या करी ऱ्हाये!तथी आंडेर मुऱ्हाईनी वाट दखतं ऱ्हाये!सासरलें यीस्नि दिवाई ते आखाजी सव महिना व्हयी व्हयी जायेलं ऱ्हातंस!माहेरनां निरोपनां गुंता पोरंनां जीव तरसी जात ऱ्हास!चुलांजोडे भाकरी ठोकी !माहेरनी याद सताडतं ऱ्हास!डोयांनां आंसू लपाडतं ऱ्हास!हिरदमां जपाडतं ऱ्हास!🌷

 संकर धव्व्या घोडे बठी कालदिस्ना लेवालें येल सेत!सांजऱ्या शिय्या दूध टाकी कालदिंनं गवराईनी व्हाड व्हत!आज आखाजी!...पुरनंपोई-आंबा रसनं जेवण करेल से!....आगारी टाकायी बठ्ठा-बठ्ठा वान ताठ मांडे लं सेतस!आज आणण म्हायी नई ऱ्हायना!......🌹

हेट्या सक्कायंपाह्यरामां लालचिटिंग कव्व्या गोया जिमीन उकरी वर यी ऱ्हायंता!माहेरवाशीण आंगे धोयीस्नि तुईसीलें फेऱ्या मारी ऱ्हायंत्यात!चिडया-हाड्या येरायरलें व्हाकारा भरी ऱ्हायंतात!सक्काय बठ्ठा आयसिस्ले उठाडी ऱ्हायंती!दूर थिन कानवर घंटीनां गोड आवाज यी ऱ्हायंता!मंदीरम्हा आरती चालू व्हती!व्हवू बेटी पानीनां तांब्या भरी...सूर्यदेवलें अर्ध्य दि ऱ्हायंती!सक्काय ताजी-ताजी व्हती!गोड व्हती!हासरी व्हती!देवध्यानीमां बुडेल व्हती!आज आखाजी से!🌷

चैत-वैशाखनां दिन सक्कायम्हा थंड वाटतंस!... जश्या यांय वर चढतं जास!हुपारा व्हस!नको नको वाटतं ऱ्हास!खेतीनां ऱ्हायेलं-सूयेल गोमडां आखाजिंमव्हरे आवरायी जास!वावरे नांगरी-वखरी पडेलं ऱ्हातंस!सार-सामान अवरायी जायेलं ऱ्हास!चटकाड्या यांय निस्ता गोयंम करी घरमा बठालें लावस!घरमा पह्येरनिनी...बी-बिवारानी तयारी चालू व्हयी जायेलं ऱ्हास!🌷

.......जसजशी आखाजी जोडे येतं ऱ्हास!तशा व्हवूलें माहेरनां व्हडा लागत ऱ्हास!कान आनी डोयां माहेनां रस्ते लागी जायेलं ऱ्हातंस! सवसारनं औत व्हडी व्हडी सासूर वाशीन पुरी लांबी पडी जायेलं ऱ्हास!माहेरनी याद सताडंत ऱ्हास!आखाजीलें बाप नयी ते मंग भाऊ लेवालें यी जास!...च्यारं दिन माहेरलें आराम करालें भेटी जास!माय बापनां कायेजम्हा घुशी सुख-दुःखनं चितर बोलता येतं ऱ्हास!च्यारं गोष्टी निचितवार बोलता येस!....माहेरलें च्यारं दिन थकवा काढी!आमायी-कोमायी आखो सासरनी दुसेरं खान्दवर ली जग दुण्यानी बांधेलं रीत निभाडी  चालतं ऱ्हानं पडस!मव्हरे चालतं ऱ्हानं पडस!आज आखाजी से!🌷
भाऊ बहिनीस्वन!
आखाजी!..…गौराईनां सण!माहेर बेटीनां सण!खान्देशनं नवं साल!सासूर वाशीनलें चार दिन माहेरलें माय बापनां मांडीवर डोक ठी मन हालक करानां सण!आगारीना सण!...साडेतीन मुहूर्ताम्हानं एक से!..पानी पडानां मव्हरे खेतीनां वायदा बोली-बंधन पक्का कराना सण से!कोना डेर्ग भराना दिन से!आंबानां रस पुरनं पोयिंसंगे खावाना पहिला दिन से!...बठ्या आंडेर-बेटीस्ले धाकल्पनंनी याद ठी टिपऱ्या खेवाना दिन से!झोका खेवाना दिन से!आज आखाजी से!🌷

आंडेरंनी जिंदगी वडनां-निंमनां झाडेस्ले बांधेल झोकांगतं ऱ्हास!..तीस चाळीस टक्का जिंदगी माहेरलें जास!जनमफाइन  नाता गोतास्ना पसाराम्हा आडकी जायेलं ऱ्हास!...लगीन व्हवावर ऱ्हायेलं जिंदगी सासरलें निंघी जास!झोका मांगे-मव्हरे व्हत ऱ्हास!फांटी नाचत ऱ्हास!पोरंनी माय व्हस!माय आंडेरंलें मांगल्या टिपऱ्या दि जास!आंडेरं माय माहेरनी संस्कृती मव्हरे व्हडतं ऱ्हास!चालत ऱ्हास!भाऊस्वन आज आखाजी से!🌷

"माहेरनी याद माय
उज्जी सतावस माले
जनमन्ही गोड माटी
 जीव व्हस वर-खालें....!

रीत लायीग्यात जुनी
माहेर म्हनतस रानी
सासरमां नवा जलम 
सुरू व्हयी जास कहानी....!

याद सबदम्हा वल्ली
इसरी गवू ती गल्ली
झोका खेयेतं ऱ्हायनू
व्हयी चालनू मी धल्ली.....!

येस आखाजी-दिवाई 
 मन व्हडस माहेरलें 
भाउ बहीण माय बाप
मी पंघरी लेस झावरलें...!

याद भिंजातं ऱ्हास....
झावरं व्हयी जास वल्ली
स्त्री जलमनां खेयमां
 लेक व्हयी जास धल्ली....!"

भाऊ-बहिनीस्वन!
आखाजी येत ऱ्हास!...घरभार हारकी जात जास!नवं साल बठ्ठास्ले वानोया दि जास!उनन्हा चटकाम्हा आनंद धुंडी मव्हरे जावानां न्यामिना संदेश आखाजी दि जातं ऱ्हास!संकर येवानां दिन शिय्या सांजऱ्यास्न जेवन दि जास!पार्वतीलें शंकर भगवान लेवालें येत ऱ्हास!पार्वती  गवराई से!...आपली आंडेरं से!   सासरनं कस्ट इसरी चार सुख-दुःखन्या गोष्टी बोलाले येत ऱ्हास!मन हालक करालें येतं ऱ्हास!माय माहेरनां उबनी झावरं पंघरालें येलं ऱ्हास!उम्रट वलांडी येत ऱ्हास!आपलाचं उम्रटम्हा मांगे फिरी जात ऱ्हास!आस सोडी जात ऱ्हास!नातं जोडी जात ऱ्हास!...वल्ल कायेजम्हा आपलं मन भिंजीजाडालें येल ऱ्हास!माहेरनी ममता लेवालें येल ऱ्हास!तपेल उनमां नारयनं पानी पेवाले
आंडेरं येलं ऱ्हास!आखो नवा उन-पावसाया खावालें आंडेर दूर सासरलें नींघी जात ऱ्हास!🌷झोकानां गांना आंडेरनं सुख-दुःख मांडत ऱ्हास!मानोस जलमन्हा खान्देशी नाता-गोता येरायेरमां गुरफटी मव्हरे पयी ऱ्हायना!कव्हय आंसू ली!कव्हय हासू ली खान्देश लेकी आखाजी दिवाई माहेरलें येत ऱ्हाथिन!आपलं सुख-दुःख वाटत ऱ्हातीन!भाउ-बहिनीस्वन आज    आखाजी से!.....आज बठ्या माहेर वाशीन झोकावर बठी गांना म्हनी ऱ्हायन्यात!............🌹

"मी गवराई व्हयी वुनू वं माय
पुरणपोईनां व्हाडा ताट
धव्व्या घोडावर संकर हुभावं माय
 त्यास्ले जेवालें मांडा पाट.....!

झोपाया आंबानां रस गोड वं माय
 लागे अमरुदनी त्याले गोडी
धरा पुरणपोईनां रुमाल वंमाय
शेकी खापरवर मोके सोडी...!

 फुटरी रसीनी चव न्यारी वं माय
वरपी खायीस्नि मन भरी
कुल्लाया पापडे व्हाडे ताटे वं माय
चाले गवराई तूपवाढी धरी....!

ग्यात उडी च्यार दिन वं माय
खोपानां सुना डोयां व्हाये
शंकरनां घोडे बठी ग्यात वं माय
गवराई आंसू गायेतं जाये....!"

आज आखाजी से!....घरभार जेवणे करी ऱ्हायनातं!...आंडरी खुश शेतीस!.....कालदिंन संकर संगे चालन्या जाथीन!🌹🌷🙏
      🌸----------------🌸
टिपऱ्या खेळा!झोका खेळा!पत्ता खेळा!लॉकडवूननं कडक पालन करा!कायजी ल्या!करोनालें दूर तंगाडा!🙏😌

....नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१४मे२०२१(आखाजी)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol