पत्नी आज्ञेचं पालन करतो आहे. भाग-२
पत्नी आज्ञेचं पालन करतो आहे. भाग-२
🌹🌹🙏😌🌹🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷
*******************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
आज ३०एप्रिल आहे!काल दुपारचे दोन वाजले असतील!सूर्यदेव डोळे वटारून पहात होता!त्याच्या डोळ्यांत पाहण्याची हिम्मत आहे का कुणाची??कडक उन्हाने वरचा स्लॅब अर्थात टेरेस sun bath घेत होता!सूर्यदेवाची उष्णता शोषून घेत होता!मी टेरेसवर वाळवायला टाकलेल्या गव्हाची राखनदारी करीत होतो!कबुतर डोक्यावरून घिरट्या घालीत माझ्या हातातील काठी पाहून पोबारा करीत होती!शत्रू घिरट्या घालून वरच्या वर उडत होता!त्यांचं लक्ष्य साध्य होत नव्हतं!उन्हापासून रक्षण व्हावं म्हणून मी डोक्यावर छत्री धरून बसलो होतो!🙏🌷
वरचा गरमागरम स्लॅब..लोहाराने लोखंड तापवावे तसा मी ही भाजून निघत होतो!वरून तप्त सूर्य देव!घिरट्या घालणारी कबुतरं!खाली तप्त स्लॅब,अशा वातावरणात मी आमच्या सौभाग्यवतींनी दिलेलं, सोफाविलेलं महत्वपूर्ण कार्य इमाणे इतबारे पार पाडीत होतो!
आणि स्वतः सौभाग्यवती आमच्या शेजारीचं एका आजीबाईंच्या वर्ष श्राद्ध जेवणाला गेली होती!🙏😌🌷
खरं म्हणजे आम्ही उभयतांनी ड्युटी विभागून घेतली होती!सकाळी लवकर सहा वाजेपासून ते दुपारी दिड वाजेपर्यंत माझी ड्युटी!मी सकाळी अंघोळ आटपून टेरेसवर गेलो! शत्रूंच्या आगमनाची वाट पाहणार तेवढ्यात एक नाही,दोन नाही, तीन नाही तर..तब्बल दहा-बारा कबुतरं वरून अचानक घिरट्या घालीत गव्हावर झडप घालणार होती!मी काठीची मशीनगन चालवून नेटाने शत्रूंना पिटाळून लावले होते!मी नेटाने मुकाबला करीत होतो!पण कबुतरं ऐकतील तर नां!निलाजरे,घट्ट बेशरम,पाकिस्तानी सारखे!फिरून फिरून हमल्यासाठी घिरट्या घालीत होती!मी तयारच होतो मुकाबल्यासाठी!..मी डोकं खाजवीत विचार करायला लागलो!..पण..पण मी उन्हाने भाजत असतांना सौभाग्यवती वर्षश्राद्धला पुरणपोळी खात होती!माझी तर प्रेमाने स्वीकारलेली!मला दिलेली ड्युटी संपली होती!एकमेकांशी प्रेमळ सुसंवादी राहावे म्हणून प्रेमाच्या आज्ञेचं पालन करीत होतो!दोन वाजले!सव्वा दोन वाजले!अडीच वाजले!जेवण करून दमदार पावलं टाकीत मॅडम आल्या हळुवारपणे!मी चिडचिड करीत रिलीवरला ड्युटी सोपवली आणि खाली पळत सुटलो!🙏😌🌷
सौभाग्यवतींनी मन ओतून बनविलेल्या भाजी चपातीवर अक्षरशः तुटून पडलो होतो!भूक लागली होती!सकाळी नऊ वाजता नाश्त्याला पोहे फरसाण खाल्लेचं होते!पण भूक ती भूक असते हो!भूक पोटाची आग असते!लागल्यावर कळत असतें! भूक हिंस्र वाघ असते!मग मात्र कोणाचीचं नसते!....तर मी साधारण जेवण करून साडे तीन वाजता गॅलरीत फेऱ्या मारत होतो!तेवढ्यात टेरेसवरून सौभाग्यवतींचा फोनवर आवाज आला!म्हणत होती,"अहो! आभाळ भरून आले आहे!मेघ गर्जत आहेत!"मला आश्चर्य वाटलं !माझी चेष्टा तर करीत नाही नां!.. मी बोललो,"लोहगाव विमानतळावरून विमान निघाले असेल,आपल्या घरावरून बेंगलोरला जात असेल कदाचित त्याचा घोंगावण्याचा आवाज येत असेल!मी खाली आलो तेव्हा कापसाएवढा देखील ढगाचा तुकडा दिसला नव्हता!जाऊदे तुला झोपेची डुलकी तर आली नाही नां!"मी दिलं मनाचं ठोकून!
पुन्हा पाच मिनिटांनी वरून विमान गेल्याचा आवाज आला!भास झाला!गडगडाटाचा भास झाला!जस काही वाघ डरकाळी फोडल्यागत करीत होता!सौभाग्यवतीनें रागातचं वरून आवाज दिला!..,"अहो!तुम्ही वर या आधी!अंधारून आले आहे!काळकुट्ट आभाळ दिसतंय!" आज्ञेचं पालन करीत मी टेरेसवर पळत सुटलो!आज्ञा शिरसावंद्य होती!खरचं आभाळ भरून आलं होतं!हे आश्चर्यकारक होतं!वारा सुटला होता!सूर्य लपून बसला होता!तरीही मला वाटत होतं," वारा सुटलाय पाऊस येणार नाही!" मी पत्नी अवज्ञा करीत,अंग हलवीत खाली आलो!सौभाग्यवतीची स्ट्रिक्ट ड्युटी सुरू होती!तिचा जीव पावसाच्या भीतीमुळे कासावीस झाला होता!तळमळत होती!माझी ड्युटी संपल्याने मी खुशीत होतो!खाली येऊन,खुर्चीवर बसून पाय लांबलचक सोडून बसलो होतो!पुन्हा वरून जोरात आवाज आला!अज्ञाच होती ती..
"...अहो!अहो!लवकर वर या!पावसाची टीप टीप सुरू झालीय!"..आवाजासरशी मी वर पळत सुटलो!दोन दिवसांपासून कडकडीत उन्हातान्हात!तप्त उन्हात भाजतोय आणि उपटसुंभ पाऊस मध्येच कलमडला होता!२००किलो गहू टेरेसवर पसरून ठेवला होता!...आम्ही दोघेही दोन सुपल्यांनी गहू गोळा करून घमेल्यात ओतीत होतो!पाऊस आमची टररर उडवीत होता!गहू भिजत होता!आम्ही धावपळ करीत होतो!गहू भरून खाली आणीत होतो!आमच्या दोन दिवसांच्या मेहनतीवर पावसाने पाणी सोडलं होतं!गहू भिजला होता!🙏😌🌷
भिजलेला गहू पाहून सौभाग्यवतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते!निसर्ग लहरी असतो!कधी कडक ऊन असतं!कधी वारा सुटतो!मध्येचं आभाळाला कळ येते!धो धो पावसाला सुरुवात होतें!शेतकरी बिचारा खरचं निसर्गाचा बळी आहे!राजा असूनही गरीब आहे!आपली भूक भागवणारा असूनही उपाशी पोटी जगतो आहे!लहरी निसर्ग त्याचा सतत सूड घेत आला आहे!हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्यात पटाईत आहे!आमचा गहू भिजल्यावर आम्हीही हळहळलो होतो!त्यात मी जबाबदार होतो!वेळेवर गहू गोळा केला असता तर नुकसान टाळता असतं!पण मी निसर्गाचाच अंश आहे!🌷🙏
सर्व गहू ओसरीत पसरून ठेवला होता!रात्री शेवटच्या बटनावर फॅन पळत होता!गहू निपचित झोपला होता!भिजून झोपला होता!वरून फॅनची हवा खात होता!सौभाग्यवती देखील गहू वाहून थकली होती!३३वर्षांपासून या पहिल्याचं अवकाळी पावसाने गव्हाला अंघोळ घातली होती!
सौभाग्यवती अश्रू नयनांनी झोपेच्या अधीन झाली होती!दुःखी कष्टी होऊन झोपली होती!
आज दिनांक ३०एप्रिल!काल सकाळी ऊन होत!दुपारी तीन वाजेपर्यंत आकाश निरभ्र होतं!अन घोंगावत!डरकाळी फोडीत,घिरट्या घालीत!आम्हाला आणि कबुतरांना पळवीत ढग आलेत!अंग भिजवून गेलेत!मन पेटवून गेलेत!गहू भिजवून गेलेत!सौभाग्यवतीला दुःख देऊन निघूनही गेलेत!निसर्ग आणि मानवी जीवन एक नाण्याच्या दोन बाजू असतातं,असं कळलं!नवीन शिकलो!...निसर्गाशी तादात्म्य होत गेलं तर दुःख वाऱ्यावर सोडून आनंद घेत जगायचं असतं!डोळ्यातील आसवं बंदिस्त करीत जगायचं असतं!काल प्रथमच आम्ही उभयता ३३वर्षानंतर सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होतो!
आज सकाळीच!आताचं
सौभाग्यवती फॅनच्या हवेत निपचित झोपलेल्या गव्हास पाहून आली!पोटच्या गोळ्यास सांभाळावे तसा गव्हावर हात फिरवून आली!गहू आणि सौभाग्यवती दोघेही एकमेकांच्या कुशीत सुखावली आहेत!विसावली आहेत...दुरून मी ही सुखावलो आहे!भिजलेल्या गव्हाकडे पहात आताच्या लेखाचं प्रपंच मांडून डबडबलेल्या डोळ्यांतून धडा नवीन शिकतो आहे!आता ऊन पडलंय!गहू पुन्हा ऊन खाण्यासाठी टेरेसवर टाकायचं ठरवतो आहे!🙏😌
********************
🙏😌🌷😌🙏🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३०एप्रिल२०२२
Comments
Post a Comment