पत्नी आज्ञेचं पालन करतो आहे. भाग -१
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पत्नी आज्ञेचं पालन करतो आहे
🌹🙏🌹🌷🙏🌹🌷🙏
***********************
...नानाभाऊ माळी
बंधू भगिनींनो!
गेले दोन दिवस मी उन्हातान्हात वरतीचं बसलो आहे!टेरेसवर बसलो आहे!सकाळी सहा वाजता आलो की सुट्टी भेटते फक्त जेवनासाठी!...जेवण करून आलो का पुन्हा टेरेसवर पहारा सुरू होतो आहे!तीन दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे!
दर वर्षीचं नेमलेलं कार्य गेल्या ३३वर्षांपासून इमानेइतबारे करतो आहे!माझं लग्न झाल्यापासून करतो आहे!आनंदाने,हृदयातून सन्माननीय पत्नीच्या आदेशाची अंमलबजावणी करतो आहे!होय मी टेरेसवर उन्हात टाकलेले गहू डोळ्यात तेल घालून सांभाळतो आहे!🙏😌
काठीच्या टोकावर बांधलेले फडके हलवतो आहे!रेल्वे स्टेशनवर सिग्नलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांगत छत्रीचा आधार घेत काठी हलवतो आहे!पारवे, कबुतरांना हुसकावून लावीत आहे!मी उन्हात गहू वाळवतो आहे!मी राखणदार झालो आहे!तीन दिवस सुट्टी घेऊन पत्नीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत आहे!🙏😌
मी कबुतर,परव्याशी युद्ध खेळतो आहे!त्यांच्या नजरेच्या खेळावर मला चकवीत आहेत!मी उन्हात चटका घेत,पत्नी प्रेमासाठी लढतो आहे!मी गव्हाचं रक्षण करतो आहे!टेरेसवर २००किलो गहू वाळवतो आहे!होय मी राखनदार आहे!🌷
लहानपणी गहू डोळ्यांना दिसणे कठीण होता हो!त्यात दुष्काळाचं संकट असायचं!कोणी गहू पेहरला!तयार होऊन घरापर्यंत पोहचला तर भाग्यवान समजत असतं!मी लहान असतांना अमेरिकेचा सडका गहू रेशनमधून मिळायचा!महादुष्काळ होता!🙏
१९७२चा दुष्काळ होता!आई त्या गव्हांपासून पोळ्या बनवायची!गव्हापेक्षा आईच्या हातात सुरेख कला होती हो!पीठ कुठलंही असू द्यात!...आईच्या हातच्या भाकरी, चपात्या,पुरणपोळ्या खातांना पोट भरले तरी मन भरत नसे!खात राहावेसे वाटतं असे!आईच्या हातात जादू होती!मन ओतून सगळं करतं असे!हृदयातून करत असे!तव्यावरील भाजलेल्या भाकरीचा सुगधं पोटाची भूक वाढवायची!तो दरवळ घरभर पसरायचा!आम्ही आधाशागत खात राहायचो!मागे कोण खाणारे आहे याची देखील फिकीर नसे!
परीस्थिती गरिबीची होती पाच-दहा किलो धान्य दुकानातून आणायचे!संपले की पुन्हा दुकान उघडेचं असायचं!पैसे द्या आणि माल घ्या!कामावरची शेत
मजुरी मिळाली की दुकानाचे दरवाजे उघडे असायचे!कमरेच्या पिशवीत पैसे तर हवे नां!दिवसभर रोजंदारीने जायचं !शेतात राबायचं!आठवडयातून पैसा मिळाला की तेल मीठ, मिरचीचा आठवड्याचा प्रश्न सुटायचा!चटके घेत जगणाऱ्यांजवळ वर्षभराचा साठा करायला एवढे पैसे कुठून येणार?खाणारी तोंडं११ होती!कमावणारे दोन तीन होते!आम्ही तर शेवटच्या ओळीत होतो!लहान होतो!स्वतःचे कपडे स्वतः घालण्याचं देखील वय नव्हते!गरीबीचे संपूर्ण चटके बसण्या इतपत वाढलो नव्हतो🙏😌
मामांच्या गावाला वर्षभराचं धान्य साठविण्यासाठी कोठा,कणग्या असायच्या!ज्यूटचे पोते असायचे!गव्हातं पाण्याचा अंश राहिला तर सोनकिडे जन्माला यायची!धनोरं गव्हाला खाऊन पीठ करून ठेवायची!गहू आणि ज्वारीला पोखरून खायची!खूप नुकसान होत असे! 🙏😌
मामा मामी एप्रिल-मे महिन्याच्या कडक उन्हात गहू धाब्यावर दोन-तीन दिवस वाळवायचें!दातानें चावून पाहायचे!दातांनी फुटला नाही असे वाटल्यावर उन्हात वाळलेला गहू दुसऱ्या दिवशी सकाळी गारव्यात गोळा करून,शिग लावून,ढिग करायचेतं!नंतर कडूलिंबाचा पाला गव्हात मिसळून कोठ्यात, कणगीत गहू भरला जायचा!कोठा खूप मोठा असायचा!वर्षभराचा साठा करण्यासाठी ५००ते१००० किलोच्या कोठ्याला खाली झाकण असायचं!त्यातून गहू बुरुबुरु बाहेर यायचा!वर्षभर गहू उत्तम स्थितीत असायचा!🙏😌
गहू आणि ज्वारीचं सोन किड्यांपासून संरक्षण व्हायचं!कडूलिंबाच्या पानात किटनाशकाची शक्ती असते!गहू ज्वारीचे रक्षण होतं!बाजरीचं तंस नसतं!..बाजरीला किड लागत नाही!पण बुरशी सारखी जाळी येते!त्यामुळे बाजरीचं नुकसान होत असत!योग्य वातावरणात बाजरी असली की वर्षभर बाजरी उत्तम राहाते!लहानपणी डोळ्यांनी पाहिलेल्या कृती संस्मरणात आहेत!🌷
बंधू-भगिनींनो!
आम्ही किलो किलोने धान्य आणून खाणारी माणसं होतो!आमचं कुटुंब होतं!गरजा कमी,शोकपाणी नाही!आई-वडिलांच्या अतिशय कष्टाने आम्ही उभी राहिलेंलो माणसं!त्यांच्याचं पुण्याईने नोकरी लागली!नाहीतरी कुठेतरी गावात सालदारीने किंवा मजुरी करत पोट भरत राहिलो असतो!🙏
😌🙏🌷🌹😌🙏
माता पित्यांच्या घामाने
हे पुण्य आम्हा लाभले
चटके त्यांनीचं सोसले
अन आम्हा सुख लाभले!🌷
तेव्हा कष्टात राम होता
आमुचे घामावर पोट होते
दोन घास तुकड्यांसाठी
दरिद्रीत हाल थेट होते...!🌷
गेलेत निघूनी दिवस मागे
पुढे घामास फळ आले
आमुच्या अश्रूंच्या किनारी
तव अमृत सागर झाले. !🌷
आई अमृत पदस्पर्शाने
आज सुखात आम्ही सारे
घामातं पोहतो त्यांच्या
आम्ही घेतोय थंडगार वारे!🌷
बंधू-भगिनींनो!
मजुरीची स्वप्ने पहात जगणारा जेव्हा शहरात नोकरीला लागतो!स्वप्न उलटे होते !जीवनात उजेड येतो!उजेड प्रकाशमान होतो!सुखात स्वप्ने पडतात!स्वप्न लग्नाच्या बेडीत बांधतो!व्यक्ती मंगल वेदीवर चढलेला असतो!विवाह वेदीची पहाट होते!मंगल सोहळ्यातील सप्तपदी दोघांना घट्ट बांधीत असते!कच्चे धागे पक्के होत जातात!घट्ट होत जातात!नातं एकजीव होत जातं!
किलो किलो ने धान्य भरणाऱ्यास आदेश मिळतो!प्रेमाचा आदेशचं तो!लडिवाळ अट्टाहास तो!डोळ्यातील भाव ते!एक जीवाची हाक ती!अहो अज्ञाचं ती! बघा कशी ती,"तुम्ही किलो किलोनें महिन्यासाठी धान्य भरत असाल!पुढचा महिना ऑ वासून उभा राहील!आपण वर्ष भराचचं धान्य भरून घेऊ!"🙏😌🌷
....पत्नीचाच आदेश होता तो!प्रेमळ आज्ञा होती!आज्ञेत ठाम विश्वास होता!संसाराची आस होती!प्रीती होती!ओढ होती!शब्दांवर ठाम होती!मी आज्ञेत होतो!शब्द नाजूक होते!आदेश अढळ होता!मी अवहेरून चालणारं होतं??🙏🌷😌
पत्नीच्या शब्दरुपी वचनात अडकणारें जगात खूप होऊन गेलेत!मागे आदर्श आणि इतिहास ठेवून गेलेत!वचन ठेवून गेलेत!मी बापूडा ....मी ही साडे तेत्तीस वर्षांपासून,लग्न झाल्या पासून अडकलो आहे!दर वर्षी एप्रिल-में महिन्याच्या संगमावर टेरेसवर गहू राखतो आहे!जागल्या होतो आहे!प्रेमासाठी उन्हाचे चटके घेतो आहे!प्रेमाची परीक्षा देतो आहे!गहू वाळवून कडूलिंबाच्या पानात गहू मिसळतो आहे!गव्हात बोरिक पावडरही मिसळतो आहे!
कणगीच्या मुखात स्वतःचे मुख न्याहाळतो आहे!२०० किलो गहू वाळवित चटका घेतो आहे!टायर झिजलेंल्या साठीत!..उतार वयात देखील मी प्रेम सांभाळीत आहे!मी पत्नी आज्ञेचं पालन करीत टेरेसवर चटका घेतो आहे!🙏
मी गहू रखितो आहे!नाठाळ प्रेम कबुतरास काठीने पिटाळीतो आहे!🙏😌
🌹🙏😌🌹😌🙏
*******************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२९एप्रिल२०२२
(थेट live from टेरेस)
Comments
Post a Comment