गझलकारा कविताताई काळे

गझलकारा कविताताई काळे
🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
*********************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
आज २७ एप्रिल!प्रतिवर्षी एप्रिलमध्ये ऊन परीक्षा घेत असतं!सर्वांचीच परीक्षा घेत असतं!..सकाळी सुर्यदेवाचं आगमन होत असतं!..सकाळी हसरा असतो!आपल्यालाही त्याचं दर्शन हवंहवंसं वाटतं!आपण उत्साहाने त्याचं स्वागत करतो!नमन करतो!उघड्या डोळ्यांनी त्यास स्पष्टपणे पाहून घेतो!दर्शन घेतो!...जसजसा वर चढत असतो,उघडे डोळे दिपतात!डोळे मिचमीच व्हायला लागतात!डोळ्यांची खालची-वरची पापणी घट्ट मिटायला लागते!सूर्य दर्शन अवघड होतं!चटका मात्र बसतो!एप्रिल महिना आहे ना!सूर्य तसं सर्वांनाचं तापवत असतो!🌹

४१ वर्षापूर्वी असंच कडक ऊन असावं!त्यात वैदर्भीय भूमी तर अति तापत असते!तेथे प्रतिवर्षी उन्हाळ्यात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुर्यदेवानें कडक कर्फ्यु लावलेला असतो!भूमी तापत असते!जीव जिवाणू सावलीच्या आडोशाला भूमिगत असतातं!अशा तप्त भूमीत एका 'भूमीचा' जन्म झाला होता!एका कन्येचा जन्म झाला होता!तिचा विदर्भ कुशीत जन्म झाला होता!मानव समाजास डोळस करणाऱ्या संतांच्या भूमीत जन्म झाला होता!संत गाडगे बाबांच्या पवित्र आणि पावन भूमीत जन्म झाला होता!तापलेल्या अन अंगाची लाहीलाही करणाऱ्या भूमीत जन्म झाला होता!"कवितेचा"जन्म झाला होता!कवियत्री "कविताताईंचा" जन्म झाला होता!आपल्या गझलेतून हृदयाला पाझर फोडणाऱ्या गझलकाराचा जन्म झाला होता!🌹🎂

जन्म आपल्या हाती नसतो!कुणाच्या घरी जन्म झाला ते देखील हाती नसतं!कोणी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असतो तर दुसरा अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या घरी जन्म घेत असतो!बाळ जन्माच्या दुसऱ्या दिवशीचं पोटासाठी घराबाहेर पडणारी आई देखील असते!जन्म आपल्या हाती नाही!जन्मानंतर आई-वडिलांच्या भक्कम संस्काराची शिदोरी मात्र सतत सोबत असते!मिळालेल्या जन्माला सार्थकी लावण्याचं महत्वपूर्ण काम आपलं कर्म करीत असतं!🌹🎂

कविताताई कवियत्री बनून, कवितेच्या माध्यमातून!गझलेतून त्यांचं अंतर्मन प्रस्तुत1 करीत आहेत!गझलेतून जगण्याची रीत सांगून जात आहेत!पुण्यातील काव्यसमेलंनातून आपली विशेष ओळख निर्माण करीत आहेत!जाणिवांच्या कविता सादर करून माणसाला माणसासारखं जगण्याचा संदेश देत आहेत!एक स्त्री!एक महिला!गझलेतून व्यक्त होतांना रसिकांच्या हृदयात जावून बसत आहेत!!🌹🎂

एक स्त्री अपघाताने म्हणा!योगायोगाने म्हणा साहित्यिक होते!साहित्यातून समाज प्रबोधन करते!संत कबीरांच्या,क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या,संत गाडगेबाबांच्या अन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्गुण निराकार
  विचारांच्या मार्गावरील साहित्यिक वारकरी होते! दिंडीतून कविता सादर व्यक्त होत असते!कविता सादर होत असते!हळवेपण मांडून वास्तवाला स्पर्श करीत असतें!दबलेल्या भावनांचा स्फोट आपल्या शब्दातून कवितेत जन्म घेत असतातं!🌹🎂

आपल्या गझलेतून मानवी मूल्यांची उत्तम मांडणी करणाऱ्या कविताताई काळे महाराष्ट्रातील विविध सामाजिक जाणिवांच्या विषयावर लिहिणाऱ्या भावनाप्रधान,संवेदनशील सामाजिक जाणिवांच्या कविता प्रतिबिंबित करणाऱ्या कवयित्री काळे महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या आहेत!🌹🎂

सुख-दुःखाची!सामाजिक स्तरीकरण!.. जाती धर्मातील सुसंवाद साधणाऱ्या आणि संवाद जिवंत ठेवणाऱ्या ज्वलंत विषयांवर लिहिणाऱ्या कविताताई आम्ही भाग्यवान आहोत की आपण मांजरी,हडपसरमध्ये राहायला आहात!आपल्या रचनांचा आस्वाद जवळून घेण्याचा आनंद आम्ही घेत आहोत!🌹🎂

दोन मुली आणि देवमाणूस पती श्री बाळासाहेब काळे सर यांची भरभक्कम साथ लाभल्याने कविताताईंची लेखणी सशक्तपणे अनेकविध विषयांना स्पर्श करीत पुढे चालली आहे!नाव कविता!कवितेवर प्रेम करणाऱ्या कविता ताई...कविता लिहितांना हृदयातून अर्थ ओतीत असतात!कवितेचा अर्थ साच्यात बंदिस्त करीत असतातं!शब्द पेहरीत मनुष्य जाणिवांचें प्रतिबिंब दाखवीत असतात!त्यांची कविता रसिकांची होते!सामान्य जणांची होते!कविता आपली वाटू लागते!गझल आपली होते!🌹🎂

 कविता नाव घेऊन जन्माला आलेल्या कविताताई आपल्या कवितेतून जगण्याची उर्मी निर्माण करीत आहेत!अर्थ देत आहेत!आपल्या स्वतःच्या आवाजात गाऊन कवितेला योग्य न्याय देत आहेत!आपल्या गाजलेल्या अनेक कविता आहेत!गझल आहेत,पुण्यातील साहित्य नगरीत त्यांना न्याय मिळतो आहे!सन्मान मिळतो आहे!आपल्या कवितेतून विशेष वेदनेची किनार जाणवत असते!सहल्याच दुःख अप्रत्यक्षपणे कवितेतून जाणवत असतं!आपण आपल्या काळजातून कवितेला जपत आहात!🌹🎂

पुण्यातील,महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक चळवळीतील आपली विशेष प्रतिमा निर्माण केलेल्या कविताताई अनेक काव्य समेलनांचे सुरेख सूत्रसंचालन करीत कवींच्या भावनेला स्पर्श करीत नवकवींना प्रोत्साहन देत आहेत!🌹🎂

आज २७ एप्रिल!कडक उन्हाळा आहे!आपला जन्म देखील उन्हाळ्यातील!माणूसपण जपणाऱ्या कविताताईं आज आपला वाढ दिवस आहे!त्या निमित्ताने आज विशेष काव्यसमेलंनाचे आयोजन केले आहे!आपल्या प्रतिभेला पंख फुटावेत!आकाशाला गवसणी घालावी!आपल्या रचना आणि गझल माणुसकी शिकवीत रहाव्यात!माणसाला डोळसपणे जगण्याचा मार्ग दाखवीत राहाव्यात!मार्गदर्शन करणाऱ्या असाव्यात!आदर्श मार्गाचा अवलंब करणाऱ्या असाव्यात!आपल्या रचना साहित्य जगताच्या दर्शन असाव्यात याचं हार्दिक शुभेच्छा आपल्या वाढदिवसानिमित्त देत आहे!
🌹🎂🌹🎂🌷🎂🌷
*********************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२७ एप्रिल२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)