संतोष तात्या अजून थांबले असते
संतोष तात्या अजून थांबले असते
💐💐💐💐💐💐💐💐
*********************
....नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
"नियतीचा खेळ कुणाला
कळला नाही
आपुले म्हणुनी माघारी
तो वळला नाही🌷
लगाम आपुल्या हाती
घोडे उधळीतो राहतो
सूटली कधी साथ साथीची
अनामिक चालत राहतो🌷
फासे टाकीत नियती ही
खुशाल हसत राहते
जळुनी देह खाक तरीही
पहात राहते🌷
मनामनावर राज करीत
माणूस घडत राहिला
संकटांवर मात करीत
रोजचं लढत राहिला🌷
नियतीचा खेळ हा कुणाला
कळला नाही
दुःख दारी असतांना माणूस
वळला नाही🌷
हासुनी अश्रुत चिंब भिजला
डोळ्यांत शिल्लक पाणी
रडला लढला भांडला एकटा
सांगतो कहाणी🌷
बंधू-भगिनींनो!
कष्टाची भाकरी अवीट गोड असते!झिजल्याशिवाय गोडवा कधीच कळत नसतो!जीभ चवीसाठी आसुसलेली, चटचट करतें!घामासाठी हातास चटके देत असतें!घाम गाळण्या शरीर देखील आसुसलेलं!घाम देतो पैसा मन आसुसलेलं!🌷.....
...मिळणाऱ्या पैशातून कष्टाची भाकरी खाण्यासाठी तोंड आसुसलेलं असतं त्या कष्टाच्या भाकरीचा गोडवा अवीट असतो!चविष्ट असतो!सुमधुर असतो!🌷
कष्टाच्या घामाचं मोल अनमोल असतं!आनंददायी असतं!सुखकारक असतं!रात्रीस लागलेली झोप ही समाधानाची असतें!पूर्णत्वाची असतें!घामाला न्याय दिल्याची असतें!परिस्थितीवर केलेली मात ही मनसोक्तपणे लागलेली झोप असतें!कष्ट सतत जमिनीवर
राहायला शिकवीत असतें!माणसात राहायला शिकवीत असतें!माणसांशी माणूस जोडायला शिकवीत असतें!उपकार आणि ऋणाची जाणीव करून देत असतें!मदतीचा हात पुढे करायला सांगत असतें!परिस्थितीवर मात करायला शिकवीत असतें!उतुंग स्वप्न दाखवीत असतें!जमीनीवर पाय टेकवायला शिकवीत असतें!दुसऱ्यांचे अश्रू पुसायला शिकवीत असतें!जगणं शिकवीत असतं!
कधी कधी आपले अश्रू देखील दुसऱ्यांकडून पुसून घ्यायला शिकवीत असतं!🌷
बंधू भगिनींनो!
असेंच दुसऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या!नेहमीचं धावपळ करणाऱ्या!आपल्या कडून होईल ती हृदयातून मदत करणाऱ्या व्यक्तिमत्वाची वास्तवता मांडतो आहे!.....🌷
श्री प्रदिप संतोष देवरे!पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी एम पी एल मध्ये सर्व्हिसला!.. मागील दोन वर्षात आहाकार माजवणाऱ्या करोना काळात त्यांची बदली कोविड सेंटरमध्ये झाली होती!अनेक रुग्णांना सेवा देणें!त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे!समर्पित भावनेने, अंतःकरणातून रुग्णांची सेवा करीत आपली ड्युटी बजावीत रहाणे!अशीचं सेवावृत्ती बाळगलेली व्यक्ती... रुग्णांना मानसिक आधार देत होती!रोजचं स्वतः मृत्यूशी खेळत होते!सेवाभाव कसा असतो श्री प्रदिप देवरे यांच्याकडून शिकावा!दुसऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या व्यक्तीच्याचं डोळ्यातील अश्रू पुसण्याची वेळ आली तर??नियती खूप कठोर असतें!जाड कातड्याची असतें!बहिरी असतें!निर्दयी असतें!डोळ्यास झापड लावलेली असतें असं म्हणेन मी!
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील 'लोंढरे' नावाचं सातपुडा पर्वताच्या वनराईत वसलेलं सुंदर अन छोटस गावं आहे!लोकं आनंदी,गाव आनंदी आहे!अशा या गावात संतोष भिवसन देवरे हे अतिशय कष्टाने, मेहनतीने,दारिद्र्यातून मेहनत करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते!संसार सुखाचा करीत होते!मूळ गाव कळंबू पण आजोबा लोंढऱ्याला आल्याने कष्टाने,मेहनतीने घरदार बनवलं!वडील देखील कष्टाने जगत राहिले!पुढे वयोममप्रमाणे एक एक करीत स्वर्ग लोकी जात राहिले!संतोष देवरे अन त्यांचे भाऊ जेष्ठांच्या आशीर्वादास मुकले होते!संतोष देवरेंनी आपल्या मुलांना शिकवून मोठं केलं!मुलीचं लग्न केलं!मुलांचं लग्न केलं!घरात आनंद मावत नव्हता!सर्व कसं सुख उगवत होतं!🌷
कष्टाला गोड फळे आली की माणूस आनंदून जात असतो!असल्या-नसलेल्या परंपिता ईश्वराचें अंतःकरणातून आभार व्यक्त करीत सतत ऋणात राहून सेवाभाव जपणाऱ्या संतोष
तात्यांचं जीवन समाधानाने फुलून गेलं होतं!मोठा मुलगा पुण्याला महानगरपालिकेत,लहान मुलगा देखील I T इंजिनिअर। पुण्यातच!मुलगी सासरी आनंदात!स्वतः शेतीशी एकजीव झालेले!वय वर्ष फक्त५३वर्ष !खेडेगावात त्या काळी कानबाई मातेद्वारी लहानपणीचं लग्न होत असत!संतोष तात्याचं ही लहानपणीच झालेलं!लहान वयातचं आपलं जीवन अगदी कृतकृत्य झालेलं होतं!सुखाचा घास आनंदाने खात होते!🌷
तात्या इतरांना सतत मानसिक आधार देणारें होते!गरिबीत देखील स्वाभिमान जगणारे होतें!घामातं अंघोळ करीत करीत तेच जमिनीवर उभे होते!कटु गोड अनुभवांची शिदोरी घेऊन पुढे पुढे चालले होतें!भूतकाळाचा इतिहास,सोबतीला माणूसपण
आले होतें!संघर्षातून फळं मिळवितं जगणं सुंदर झाले होतें!खुपचं त्यांच्या वाहनां झिजल्या,फोड तळपायास झाली होती!वेदनेला घेऊनि उराशी ती माणसं मोठी झाली होती!तात्या मोठे झाले होते!सुखाचे दोन घास वाटूंनी स्वतः अलिप्त राहिले होते!संघर्षाशी रोज खेळणे,जिंकूनि आनंदी अश्रू गाळलें होतें!🌷
अडीच इंची पोटासाठी माणूस रोज लढत असतो!संघर्षांशी रोज लढून अंधारातून वाट काढीत असतो!सकाळ होता सूर्य तळपतो! संध्या समयी माणूस मळतो!तसेंच राबलें शेतात तात्या!नियतीचा खेळ कुणाला
कळला नाही
आपुले म्हणुनी माघारी
तो वळला नाही🌷
लगाम आपुल्या हाती
घोडे उधळीतो राहतो
सूटतेय कधी साथ साथीची
अनामिक चालत राहतो🌷
फासे टाकीत नियती ही
खुशाल हसत रहाते
जळुनी देह खाक तरीही
पहात रहाते🌷
मनामनावर राज करोनि
माणूस घडतो आहे
संकटांवर मात करुनि
रोज लढतो आहे🌷
नियतीचा खेळ हा कुणाला
कळला नाही
दुःख दारी असतांना माणूस
वळला नाही🌷
हासुनी अश्रुत चिंब भिजतो
डोळ्यांत पाणी
रडतो लढतो भांडतो एकटा
सांगतो कहाणी🌷
बंधू-भगिनींनो!
कष्टाची भाकरी अवीट गोड असते!झिजल्याशिवाय गोडवा कळत नसतो!जीभ चवीसाठी आसुसलेली, असंतें!घामासाठी हातास चटके देत असतें!घाम गाळण्या शरीर आसुसलेलं असतं!घाम पैसा देत असतो!मिळणाऱ्या पैशातून कष्टाच्या भाकरीसाठी तोंड आसुसलेलं असतं!कष्टाच्या भाकरीचा गोडवा अवीट असतो!चविष्ट असतो!सुमधुर असतो!🌷
कष्टाच्या घामाचं मोल अनमोल असतं!आनंददायी असतं!सुखकारक असतं!रात्रीस लागलेली झोप समाधानाची असतें!पूर्णत्वाची असतें!घामाला न्याय दिल्याची असतें!परिस्थितीवर केलेली मात ही मनसोक्तपणे लागलेली झोप असतें!कष्ट सतत जमिनीवर
राहायला शिकवीत असतें!माणसात राहायला शिकवीत असतें!माणसांशी माणूस जोडायला शिकवीत असतें!उपकार आणि ऋणाची जाणीव करून देत असतें!मदतीचा हात पुढे करायला सांगत असतें!परिस्थितीवर मात करायला शिकवीत असतें!उतुंग स्वप्न दाखवीत असतें!जमीनीवर पाय टेकवायला शिकवीत असतें!दुसऱ्यांचे अश्रू पुसायला शिकवीत असतें!जगणं शिकवीत असतें!
आपले अश्रू देखील दुसऱ्यांकडून पुसून घ्यायला शिकवीत असतें!
बंधू भगिनींनो!........
असेंच दुसऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या!दुसऱ्यांसाठी धावपळ करणाऱ्या!स्वतःहून हृदयातून मदत करणाऱ्या व्यक्तिमत्वाची वास्तवता मांडतो आहे!त्यांचं अंतःकरण मांडतो आहे!.....🌷
श्री प्रदिप संतोष देवरे त्यांचं नावं!साध सरळ बोलणं!राहणं!पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पी एम पी एल मध्ये सर्व्हिसला!.. मागील दोन वर्षात आहाकार माजवणाऱ्या करोना काळात त्यांची बदली कोविड सेंटरमध्ये झाली होती!अनेक रुग्णांना सेवा देणें!त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे!समर्पित भावनेने, अंतःकरणातून रुग्णांची सेवा करणे!मनापासून ड्युटी बजावीत रहाणे!अशीचं सेवावृत्ती बाळगलेली व्यक्ती म्हणजे प्रदीपजी देवरे!रुग्णांना मानसिक आधार देत रोज स्वतः सुद्धा करोनाशी,मृत्यूशी खेळत होते!सेवाभाव कसा असतो तें श्री.प्रदिप देवरें कडून शिकावा!
दुसऱ्यांचे अश्रू पुसणाऱ्या व्यक्तीच्याचं डोळ्यातील अश्रू पुसण्याची वेळ आली तर??नियती खूप कठोर असतें!जाड कातड्याची असतें!बहिरी असतें!निर्दयी असतें!डोळ्यास झापड लावलेली असतें!💐
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील 'लोंढरे' नावाचं सातपुडा पर्वताच्या वनराईत वसलेलं सुंदर अन छोटस गावं आहे!लोकं आनंदी आहेत!गाव आनंदी आहे!गावात संतोष भिवसन देवरे हे अतिशय कष्टाने, मेहनतीने,दारिद्र्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते!मूळ गाव कळंबू होते!पण आजोबा लोंढऱ्याला आले होते!मेहनतीने घरदार बनवलं!वडिल देखील अतिशय कष्टाने जगत राहिले!पुढे एक एक करीत स्वर्ग लोकी जात राहिले!संतोष देवरे अन त्यांचे भाऊ जेष्ठांच्या आशीर्वादास मुकले!संतोष देवरेंनी आपल्या मुलांना शिकवून मोठं केलं!मुलीचं लग्न केलं!मुलांचं लग्न केलं!घर आनंदाने भरून गेलं होतं!🌷
कष्टाला गोड फळे आली की माणूस आनंदून जात असतो!असल्या-नसलेल्या परंपिता ईश्वराचें अंतःकरणातून आभार व्यक्त करीत सतत ऋणात राहून सेवाभाव जपणाऱ्या संतोष
तात्यांचं जीवन समाधानाने फुलून गेलं होतं!मोठा मुलगा पुण्याला महानगरपालिकेत तर लहान मुलगा देखील I T इंजिनिअर!मुलगी सासरी आनंदात होती!स्वतः शेतीशी एकरूप झालेले!वय वर्ष फक्त ५३वर्ष होतं!🌷
त्या काळी कानबाई माते जवळ लहानपणीचं लग्न झालेलं!लहान वयातचं अगदी ५३व्या वर्षी आपलं जीवन अगदी कृतकृत्य झालेलं होतं!तात्या इतरांना
सतत मानसिक आधार देणारें होते!गरिबीत देखील स्वाभिमान जगणारे होतें!घामातं अंघोळ करीत करीत स्वतः जमिनीवर उभे होते!कटु गोड अनुभवांची शिदोरी घेऊन पुढे पुढे चालले होतें!भूतकाळाचा इतिहास, सोबतीला माणूसपण आले होतें!
संघर्षातून फळं मिळवितं जगणं सुंदर झाले होतें!वाहनां झिजल्या होत्या!फोड तळपायास आली होती!वेदनेला घेऊनि उराशी ती माणसं मोठी झाली होती!तात्या मोठे झाले होते!सुखाचे दोन घास वाटूंनी स्वतः अलिप्त राहिले होते!संघर्षाशी रोज खेळणे,जिंकूनि आनंदी अश्रू गाळलें होतें!🌷
अडीच इंची पोटासाठी माणूस रोज लढत असतो!संघर्षांशी रोज लढून अंधारातून वाट काढीत असतो!सकाळ होता सूर्य तळपतो! संध्या समयी माणूस मळतो!असेंच राबलें शेतात तात्या!🌷
सूर्य तळपतो शौर्यासाठी!संध्यासमय मावळतीची असतें! दिवस-रात्रीची झुंज चालू असतें!पोट अर्धे भुकेले असते!आपुले म्हणत म्हणत निकटचे,सोडोनि दूर गेले भासते!ज्यांच्या जगण्यातुनी फुलें हासती!ज्यांच्या कष्टातूनी उभे राहतो,एकटेचं अश्रू गाळीत बसतो!ज्यांनी दिला अर्थ जगण्याला पाऊले त्यांची शोधीत असतो!बाप असतो आधार घराचा!बाप असतो पाया घराचा!बाप असतो खांब घराचा!बाप असतो ओळख घराची!बाप असतो गर्व घराचा!बाप असतो शान घराची!बाप असतो दरवाजा घराचा!त्यांच्या रक्ताची आम्हीच पोरं !बाप जेव्हा दूर जातो शोधीत असतात भिरभिर नजरा!कोपऱ्यात बसुनी आम्ही बसतो,आई शोधीत असते पाऊले!कुंकू असतें ओळख त्याची दूर निघूनी जातो तेव्हा आधारहीन सर्व होऊनि जाती!बाप असतो जरब घराची निघूनी जातो दूरदूर तो ....🌷
बंधू-भगिनींनो!
हैवानी ताकदीचा करोना देशात आला अन माणूसपण ओरबाडून निघून गेला आहे!तो शहर,गाव खेडी,कासब्यात घुसून माणसांचा घास घेत राहिला!..असेंच एके दिवशी संतोष तात्यांना ताप आला!एक एक दिवसांनी ताप वाढत राहिला!ताप,थंडीनें आपला मुक्काम वाढवला होता!खेडेगावात आरोग्य सुविधा कमीचं होती!आजार बळावल्यानें मोठा मुलाने अर्थात प्रदिप देवरेंनी तात्यांना पुण्यात हलविले!औषधोपचार चालूच होतें!प्रदीप तर कोविड सेंटरलाच असल्याने थोडा फायदा झाला होता!पण वडिलांच्या सेवेत कसूर झाली होती!🌷
औषधोपचार सुरूचं होता! कुठल्याही औषधांना प्रतिसाद मिळत नव्हता!अन दुःखद घटना शेवटी वेदना देऊन गेली!दिनांक १५ मार्च पौर्णिमेच्या गुरुवारी सकाळी नियतीने डाव साधला आणि तात्यांनी शेवटचा श्वास घेतला!संतोष तात्या देवरे यांची प्राणज्योत मालवली!वयाच्या फक्त ५३व्या वर्षी तात्यांनी भूतलावरून कायमचा निरोप घेतला होता!अश्रूंचा पूर मागे ठेऊन स्वर्गलोकी प्रयाण केले होते!🌷
कोणाच्या ध्यानीमनी नसतांना!मागे मोठा गोतावळा सोडून जीवनाची इतिश्री झाली होती!कै संतोष तात्यांच्या जाण्याने संपूर्ण देवरे कुटुंब मनाने कोसळले होते!स्वतः मुलगा प्रदीप कोविड सेंटरला असतांना अनेकांच्या मदतीला धावून गेलेले असतांना हतबल होऊन तात्यांना साश्रु नयनांनी निरोप द्यावा लागत होता!घराची,शेताची,मुलांची जबाबदारी विसरून तात्या दूर निघून गेले होते ते कायमचेच!अशा वेळेस परमेश्वर कुठे झोपला असेल बरं?तात्या निघून गेलेत! मुलांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त अश्रू ठेऊन गेलेत!🌷
प्रदीप देवरे घरातील मोठा मुलगा!डोळ्यातल्या आसवांना बांध घालीत लहानांची समजूत काढीत उभा होता!आईला आधार देत उभा होता!तिचं दुःख सर्वात अतीव होत!आयुष्यभर ज्यांच्यासोबत सुख दुःख पाहिलीत,झेललीत!आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिले होते तेच निघून गेले होते!आईला सांभाळून प्रदीप इतर भावंडांनां आधार देत होता!आलेल्या दुखास सामोरे जात अश्रूनां वाट करून देत होता!🌷
मानवी जीवन खरचं बेभरवशाचं असतं हो!जे जे रक्ताचे असतातं,जवळचे असतातं, हृदयाचे असतात!आपल्या पासून दूर निघून जात असतात!आपल्या वाट्याला वेदना आणि दुःख फक्त येत असतात!पराधीन हा जन्म मानवाचा सुख-दुःखाची खान आहे!🌷
****🌸🌸
"सूर्य तळपतो शौर्यासाठी संध्यासमय मावळतीची असतें! दिवस-रात्रीची झुंज थांबते
पोट अर्धे भुकेले असते!💐
नियतीच्या फेऱ्यात अडकून आपुली व्यक्ती गेलेली असते
जगण्यातली फुलें हसली होती
त्यां कष्टालाच जाणीव नसते!
एकटाच माणूस अश्रू गाळीत
अर्थ स्वतः शोधीत असतो!
आपुले आपुले म्हणतो
त्यांस पारखा झालेला असतो!
बाप असतो आधार घराचा!
बाप असते ओळख घराची
बाप असतो खांब घराचा!
बाप असते शान घराची 🌷
बाप घट्ट सुरक्षित भिंत ती
चालता बोलता गर्व घराचा!
एकाच रक्ताची पोरं सारी !
बाप असतो दरवाजा घराचा!🌷
बाप जेव्हा दूर जातो
शोधीत असतातं भिरभिर नजरा!
प्रेमातून जरब ओळख त्याची
शोधीत धुरकटलेला सदरा
कधी कोलमडतो आधारवड तो
सुरक्षा घराची निघूनी जाते
तप्त उन्हात शोधीत त्यास
पायपीट ही चालू रहाते!💐
१५ एप्रिल २०२२रोजी कै.संतोष तात्या भिवसन देवरे यांचा पहिला स्मृती दिन आहे या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो!त्यांच्या आत्म्यास स्वर्ग सुख लाभो हिच भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो!अभिवादन करतो!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
...नानाभाऊ माळी,
हडपसर,पुणे ४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
Comments
Post a Comment