विश्वरत्न-एक योद्धा
विश्वरत्न-एक योद्धा
🌷🌷🌷🌷🌷🌷
*******************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
विस्फोटातून प्रस्थापित स्थायीपन नष्ट होत असत!उध्वस्त होत असत!विस्फोटातून विद्रूपता जन्म घेत असतें!विस्फोटातून ऱ्हास होत असतो!विस्फोटाची तीव्रता महाभयंकर असते!साऱ्यांचं अस्तित्व संपवून टाकीत असते!सत्ता आणि स्वार्थासाठी प्राचीन काळापासून माणूस मानवाचाचं बळी घेत आला आहे!धर्म नावाची संकल्पना मानवाच्या जीवन संस्कारासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी, हितासाठी बनविलेली आदर्श आचारसंहिता असते!ती चौकट मानवाच्या सर्व समूहाच्या हितासाठी,कल्याणासाठी बनविलेली असते!समान न्यायासाठी बनविलेली असते!जर चुकून विशिष्ठ वर्गाच्या हितासाठीचं काही सत्ताशोषक धर्माचा आधार घेत असतील तेंव्हाच विषमतेची ठिणगी पडतें!ठिणगी आगीच उग्र रूप धारण करत असते!आगीचा आगडोंब संपूर्ण मानव समूहाची हत्या करून,राख करून शांत होतो!शेवटी हाती काय लागतं असतं?
भारतीय प्राचीन इतिहासातील काही कालखंडानंतर विषमतेचा जन्म झाला होता!तो जन्म विस्फोटक होता!मानवा मानवात प्रचंड मोठी दरी निर्माण करणारा होता!जाती तुच्छतेच्या दरीमुळे माणूसच भिन्न माणसात दुभंगला गेला होता!अत्याचारी आणि शोषितांची विभागणी होत गेली!सुडाने विस्फोटापर्यंत वेळ आली होती!
प्राचीन काळापासून भारतात वर्ण व्यवस्थेची स्वार्थी चौकट बनवली गेली होती!शोषण मानवाचचं होत होत राहील!विशिष्ट जातींचंच होत राहिलं!शूद्रादिशूद्रांचे शोषण होत राहीलं!..वेळ अशी आली होती की शोषक आणि शोषित भिन्न काठावर उभी राहिली होती!माणूसच माणसाचा मारेकरी बनला होता!उच्च निचतेच्या विस्फोटातून समाज दुभंगला गेला होता!वर्ण व्यवस्थेने अनंत वर्षांपासून शोषितांचा दबलेला सुरुंग सुप्तपणे दबा धरून बसला होता!वर्ण व्यवस्थेचा अडविलेला लोंढा प्रचंड रौद्ररूप धारण करून धर्म व्यवस्थेला आव्हान देत राहिला!..अन.. अन.. अशाच वेळेस मध्यप्रदेशात महू कॅन्टमध्ये एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला!..त्या तेजपुंज विश्व ताऱ्याचं नाव होतं"भीमराव"💐
१४एप्रिल१८९१साली रामजी सुभेदार(सपकाळ)आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला भीमराव कोणाला माहीत होता?? शिक्षणाच्या सर्वोच्च ३२ पदव्या मिळविल्या!कोणाला माहीत होतं??विश्व मानव म्हणून नाव होईल!..बॅरिस्टर होईल, डॉक्टरेट(पी एच डी) होईल!भारतीय राजघटनेचे शिल्पकार होईल!स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदा मंत्री होईल!भारतरत्न होईल!कोणाला वाटले होते परदेशात शिक्षणासाठी जाईल??पण सूर्य उगवत असतांना त्याचं तेज हळूहळू वाढत जात असतं!सूर्य अंधार कापीतं वाटचाल करीत फक्त आणि फक्त प्रकाश देत असतो!उजेड देत असतो!
जन्म घेणारा सूर्य शोषितांच्या घरी जन्मला होता!जातिव्यवस्थेच्या अतिशुद्र समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आला होता!पशुतुल्य जीवन जगणाऱ्या जातीत जन्माला आला होता!उच्च वर्णीयांच्या पायाशी लोळण घेणाऱ्या तुच्छ जातीत जन्माला आला होता!हीन जातीत जन्माला आला होता!माणूस असूनही माणसास नाकारलेल्या जातीत जन्म झाला होता!मग विश्वमानव होण्यासाठी कुठली जमेची बाजू होती??डोळ्याला सर्व विपरीत दिसत होतं!आभासी स्वप्न होत!सर्वदूर अंधार होता!
स्वतः चटके घेत घेत!अत्याचार राने जखमी होत होत!धर्माच्या-जातीच्या प्रचंड भिंतीनां हादरे देत महामानव जन्म घेत असतात!यातनानां कधी कुरवाळत,भळभळत्या जखमेला हत्यार बनवून लढत असतातं!वेदनांनी विव्हळत,चटके घेत!तडफडत!..त्याचं वेदनांचा इतिहास बनत असतो!महामानव अत्याचाराचा सामना करीत असतो!सत्य विचार पटवून देत असतो!शोषितांचा महानायक होत असतो!नवीन प्रवाहाला जन्म देत असतो!सदविचारांची मांडणी करीत असतो!परिवर्तन घडवून आणीत असतो!अन्यायाला वाचा फोडीत असतो!आपल्याचं शोषित बांधवांना योग्य दिशा देत असतो!डोळसपणे मार्ग दाखवीत असतो!मार्गदर्शन करीत असतो!अनुयायांच्या प्रचंड लाटेसमोर प्रस्थापितांची पोकळ व्यवस्था नेस्थनाभूत होत राहाते!खिळखिळी होत रहाते!तेव्हाच खऱ्या महानायकाचा जन्म होत असतो!तेव्हाच विश्वमानव मुकुट आपल्या शिरावर परिधान करीत असतो!...या सर्वांवर आपल्या विचारांनी विजय मिळवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वमानव झालेत!💐
जेथे जेथे माणूस निर्मित अनियंत्रित सत्तेचा सुळसुळाट होतो!मानवी मूल्यांची पायमल्ली होत असते!सत्ताधीश हिंस्र होत जातात!जात नाही ती 'जातीचा' सौदा करतात!व्यवहार करीत असतातं!जातीपातीच्या खेळ होत रहातो!पोटावर जगणाऱ्या जातींनां वेठीस धरले जात असतं!सत्ता लोलुप स्वार्थासाठी मदांध होतो!..तेव्हा अन्याग्रस्त,अत्याचारग्रस्त,जातीव्यवस्थेचा बळी ...चटका घेत घेत नवविचारांची मांडणी करीत रहातो! शिकून संघर्ष करायला सांगत असतो!तेथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म घेत असतात!🌷
जेव्हा जेव्हा वाट्याला पशुतुल्य जगणं येतं असतं!तेव्हाच खरी क्रांतीची,उद्रेकाची,बंडखोरीची अन विरोधाची सुरवात ठिणगी पडत असतें!क्रांतीची सुरुवात असते !तिचं रूपांतर अक्राळविक्राळ महाभयंकर लाटेत होत असतं!सत्तांध यंत्रणा अत्याचारी होते!सहन करणारा गुलाम होतो!गुलामगिरीची भक्कम भिंत तोडून अत्याचारी मग निलाम होवू लागतो!जेव्हा जेव्हा माणूसच माणसाचा रक्तशोषक बनतो तेव्हा तेव्हा शोषितांची!पीडितांची अफाट शक्ती विरोधातून जन्माला आलेली असते तेथे महानायक जन्म घेत असतो!तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानायक होत असतातं!माणसाला माणसासारखं वागवून माणुसकीचा सुगंध चौफेर दरवळत रहातो!"ते"शोषितांचें डोळे होत रहातातं!
भेदाभेद!जातीभेदाच्या भिंतीला हादरे देणारे मूकनायक, समता,जनता,प्रबुद्ध भारत सारख्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून शोषितांच्या आवाजाला वाचा फोडणारे!शोषितांचा आवाज बुलंद करणारे!पुरुषांप्रमाणे महिलांना देखील समान हक्काचं संरक्षण देणारे कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांचें हृदय होतात!भगवान होतात!पूज्य होतात!भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होतात!"प्रॉब्लेम ऑफ रुपीज" ग्रंथाच्या प्रेरणेने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना होत असतें तेथे थोर अर्थशास्त्री आंबेडकरांचा जन्म होत असतो!🌷
माणसाला माणूस असूनही माणसासारखे जगता येत नसेल!पशुहून हीन जगणं वाट्याला येत असेल!जेथे गुरेढोरे देखील पाणी पित असतील अन माणसालाच पाणी प्यायला मिळत नसेल या १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने नजर येत रहाते!मन परिवर्तनाची दिशा मिळतं रहाते!नव्या वाटेने जाण्यास भाग पाडले जाते!दीन दुबळ्यांचे कैवारी दुःखी होत रहातात!कष्टी होत रहातात!मोठा निर्णय घेत रहातात!ननव्या वाटेच्या प्रवेशद्वाराकडे वाटचाल करीत राहतात!तेंव्हा वेळ निघून गेलेली असते!ते प्रबुद्ध आंबेडकर असतातं!💐
विषमतावादी इतिहास गाडून नव्या इतिहासाची निर्मिती होत रहाते!जगातील अनेक देशांमध्ये राजकीय,सामाजिक,आर्थिक परिवर्तन होत असतानां रक्तपात होऊन बदल झालेला असतो!पण शोषितांच्या जातीयवादी धोरणास विरोध करून सामाजिक, राजनैतिक आणि धार्मिक क्रांती घडवून आणतं,हक्क मिळवून एकही रक्ताचा थेंब न सांडता निशस्त्र क्रांती घडवून किमया करणारे किमयागार तें डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतातं!जगातील एकमेव किमयागार होतात!अहिंसक क्रांतीचे जनक होतात!🌷
"शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा!"असा मूलमंत्र देवून!संदेश देऊन शोषितांनां उभे राहण्याची शक्ती दिली जात असतें! "आपल्याला राहायला घर नसले तरी चालेल पण ग्रंथ वाचून डोळस व्हा!शिका!हक्क मिळवा!आर्थिक प्रवाहाच्या जवळ जा!"अशी जाणीव करून देणारा सुधारक विचारवंताने केवळ ग्रंथ ठेवण्यासाठीचं घर बांधले होते!
अशा महान तर्कशास्त्री आणि अर्थशास्त्रीचें तैलचित्र इंग्लंड मधल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी च्या प्रवेशद्वारासमोर लावलेलं दिसतं!समता,बंधूंतेचा संदेश देत असतातं!विश्वाला मार्गदर्शन करीत असतातं ते विश्वरत्न महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर असतातं!🌷
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला३००वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने ३००वर्षातील विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले जात असतं!त्यात पहिल्या सहा मधील पहिल्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात!तेव्हा भारतीयांच्या हृदयात अभिमान जन्म घेत असतो!भारताचा गौरव होत राहतो!
अतिशय तल्लख बुद्धी आणि उत्तमरीत्या विषय समजून सांगण्याची पद्धतीमुळेचं सामाजिक,आर्थिक,राजनैतिक, समान न्याय,अभिव्यक्ती,विश्वास, श्रद्धा, उपासना व बंधुता यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी भारतीय संविधान हे भारताचा आत्मा आहे!विश्वमानवाने त्यात जान टाकलेली असते!सर्वांचे हक्क अबाधीत ठेवलेले असतातं तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे दिसतात!
तेथे महामानव दिसतात!तेथे विश्व मानव दिसतात!तेथे भारतरत्न दिसतात!तेथे महानायक दिसतात!तेथे महाआत्मा दिसतात!तेथेच प्रबुद्ध भारत दिसतो!तेथेच मग बुद्ध हसताना दिसतो!
अशा महामानवाच्या१३१व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!अभिवादन!जयभीम!जय शिवराय!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
********************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१४एप्रिल२०२२
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
Comments
Post a Comment