क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले
🌹👏🌹👏🌹👏
*********************
...नानाभाऊ माळी

बंधू भगिनींनो!
मानवाच्या अस्तित्वापासून इतिहास पुढे सरकतो आहे!फडफड करीत पाने उलटून मागे जात आहेत!इतिहासातील सोनेरी पानांमध्ये अनेक महापुरुषांची नोंद झालेली आहे!आभाळाहुन विशाल कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे!तीव्र संघर्षाशिवाय अढळ पद मिळत नसतं!विचारांच्या विस्फोटातून जळमटलेल्या बंदिस्त अन अभेद्य भिंती पाडण्याची उर्मी महापुरुषांमध्ये होती!🌷 

महापुरुष जन्माला येत असतातं!मानव समाजाला अनमोल ठेवा देवून निघूनही जात असतातं!गौतम बुद्ध,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम महाराज शाहू महाराज,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले,
विश्वरत्न!भारतरत्न डॉक्टर
 बाबासाहेब आंबेडकर!अशी ही नररत्ने भारत देशाची अनंत सूर्य आहेत!दर्शन देऊन संध्या समयी निघून गेलेतं!देशाच्या उज्वल भवितव्यासाठी महामानव आलेत आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा ठेऊन निघून गेलेत!किर्तीरुप होऊन निघून गेलेत!🌷

काळ पळत असतो!भूतकाळ इतिहास लिहीत असतो!वर्तमान काळ बदल स्वीकारत वाटचाल करीत पुढे जात असतो!महापुरुष क्रांतिकारक होते!दूरदर्शी होते!निद्रिस्त समाजाला जागे करून उजेड दाखवत होते!प्रस्थापित प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालणारे  ज्ञानयोगी होते!..कर्मठ आणि डोळ्याला झापड लावलेल्यांना हादरे देणारे बंडखोर प्रबोधनकार होते!बंधू-भगिनींनो!..पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत हे समाजसुधारक जिवंत रहाणार आहेत!हृदयात राहणार आहेत!मनामनात राहणार आहेत!पावलोपावली त्यांच्या विचारांची विशाल शक्ती प्रेरणा देत राहणार आहेत!डोळसपणे जगायला शिकवणारे आहेत!

🌹👏🌹👏🌹👏🌹👏
 आज ११ एप्रिल आहे!एका विशाल हृदयी महापुरुषांची जयंती आहे!जीवन समर्पित महापुरुषांची जयंती आहे!सर्वस्व अर्पण करणाऱ्यां विद्वानांची जयंती आहे!पूजनीय तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांची १९५वी जयंती आहे!..🌷

आणि..आणि..येत्या गुरुवारी १४ एप्रिलला भारतरत्न!विश्वरत्न!...
 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार!दिंनदलितांचे कैवारी!प्रबुद्ध!महानायक!पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे!डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरू मानले अशा महानायकाची जयंती आज ११ तारखेला आहे!महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज आहे!बघा...!!! कसा योगायोग असतो!गुरू-शिष्यांचं आगमन मागे पुढेच झालेलं आहे!एप्रिल महिन्यातील आग ओकणाऱ्या कडक उन्हाळ्यातील दोघांचं आगमन आहे!चटके देणाऱ्या एप्रिल महिन्यातील आहे!अंग आणि मन भाजणाऱ्या उन्हाळ्यातील आहे!...💐

आयुष्यभर दोन्ही महानायक.. पावलोपावली चटके घेत राहिले!दुसऱ्यांनां चटके बसू नये म्हणून जनजागृती करीत राहिले!मानव समाजाला डोळस करीत राहिले!शिक्षणाचं महत्व पटवून देत राहिले!"शिक्षण वाघिणीच दूध आहे!शिक्षण घेतल्याशिवाय समाज डोळस होणार नाही!ज्ञानी होणार नाही"असं ठाम मत मांडणारे दोन्हीही बंडखोर कबिरपंथी महासंत होतें!महायोगी होते!सुधारक होते!
💐👏💐👏💐👏💐

बंधू-भगिनींनो!
 क्रांतिसूर्य!समाजसुधारक!प्रबोधनकार!राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा फुले यांचा जन्म ११एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील कटगुन येथे झाला होता!आताच्या खटाव-मान तालुक्याच्या ठिकाणी झाला होता!वडील गोविंदराव आणि आई चिमनाबाई यांच्या पोटी झाला होता!🌷

महात्मा फुल्यांचं आडनाव गोऱ्हे होते!त्यांच्या वडिलांचा व्यवसाय फुले विक्रीचा होता!फुलें विकता विकता आडनाव "फुले" झाले असावे!कटगूनहुन त्यांचा परिवार पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातीलं "खानवडी" येथे आला!खानवडी नंतर पुण्यात येऊन वडिलांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला होता!
इतरही जोडधंदा सुरू केला होता!महात्मा फुलेंच प्राथमिक शिक्षण पंतोजींच्या शाळेत झालं होत!१८३४-१८३८पर्यंत त्या शाळेत शिकलेतं!जुन्या रूढी परंपरेप्रमाणे लहान वयातच सन १८४०साली ज्योतिरावांचं लग्न सावित्रीबाईंशी झाले!पुढे १८४१ते१८४८पर्यंत पुण्याच्या स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी मिशनरी शाळेत पुढचं शिक्षण पार पडले होते!ज्योतिराव अतिशय कुशाग्र आणि तल्लख बुद्धीचे असल्याने  शिक्षण सहजपणे पूर्ण केले होते!
💐👏💐👏💐👏💐👏

शिक्षणाने माणूस डोळस होत जातो!शिक्षण घेत असतांनाच अनेक सामाजिक बुरसटलेले विचार मानवी मूल्यांचं हनन करीत होते!ज्योतिराव डोळ्याने पहात होते!असामाजिक तत्वांमुळे मनात कुठेतरी बंडखोरीने जन्म घेतला होता!सामाजिक जीवनात उच्चनीचतेचे चटके बसू लागले होते!वडिलांचा  व्यवसाय सांभाळून खऱ्या सामाजिक कार्याची सुरुवात पुण्यात सुरू झाली होती!उच्च वर्णीयांच्या शोषिक वृत्तीचा!ब्राम्हन्यवादाचा फटका बसत होता!मनात या गोष्टींनी घर करायला सुरुवात झाली होती!अन एकेदिवशी खऱ्या सामाजिक कार्याची सुरुवात झाली होती!💐

शूद्रादिशूद्रांवरील गुलामीपन डोळ्यांनी पहात होते!शेवटी माणूस एकच आहे!लाल रक्ताचाच आहे!विषमतावादी !जातीयवादी धर्ममार्तंडांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २३ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुल्यांनी "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली!💐

तथाकथित उच्चवर्णीयाकडून,सवर्णांकडून होणाऱ्या अत्याचारास वाचा फोडण्यासाठी!न्याय मिळवून देण्यासाठी!अतिशूद्रांच्या हितासाठी महात्मा फुल्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केल होतं!अत्याचारित गुलामगिरी विरुद्ध सामाजिक न्यायाची चळवळ उभी करतांना सर्वप्रथम आपल्या पत्नीस शिकविले होते!क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना शिक्षित केले होतें!शिक्षिका बनविले होतेंस्त्री शिक्षणाचा पाया सर्वप्रथम महात्मा फुल्यांनी घातला होता!महात्मा फुले व्यक्ती म्हणून नव्हे तर व्यक्तित्व म्हणून जगाला दिसले होते!महात्म्याचं महात्म्य आभाळहून विशाल भासले होते!म्हणून महात्मा झाले होते!💐

माणूस जगण्यासाठी शिकला पाहिजे!ज्ञानी झाला पाहिजे हा ज्ञानमंत्र आणि कानमंत्र शोषितांच्या कल्याणासाठी खुपचं महत्वाचा होता!तो असा होता
💐👏💐👏💐👏💐
"विद्येविना मती गेली
मतीविना निती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले!"

अज्ञान आणि अंधकारात खितपत पडलेल्या शूद्रातिशूद्रांची मुक्तता होणार नाही हे  महात्मा फुले जाणून होते!म्हणून त्यांनी शाळा सुरू केली!....स्वतंत्रपणे मुलींची शाळा सुरु करणारे!... भविष्याचा विचार करणारे महात्मा फुले तत्वज्ञानी होते!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका झाल्या!नंतर मुख्याध्यापिका झाल्या आणि महान समाजसेविका झाल्या!शाळेत जात असतांना रस्त्यावर कर्मठ धरमार्तंडांनी सावित्रीबाई फुलेंवर शेण आणि चिखल फेक करीत राहिलें!उभयता पतिपत्नी कार्यापासून कधीच डगमगले नाहीत!उलट वर्गातील विद्यार्थी संख्या वाढतच गेली!उभयतांच्या जाजवल्य इच्छाशक्तीपुढे काळ देखील थांबला होता!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं समाज प्रबोधन शेवट पर्यंत थांबलं नाही!अज्ञानिनां!अतिशूद्रांना ज्ञानामृत पाजत राहिले!🌷

महात्मा फुलें हे खरे देशभक्त होते!खरे देशप्रेमी होते!वंचित शोषित आणि शूद्रादिशूद्रांचे महानायक होते!पददलितांसाठी  लखलखणारा सूर्य होते!शिक्षण महर्षी होते!समाजसुधारक होते!शोषितांनां शिक्षनाशिवाय स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजणार नाही असे मानणारे तत्वज्ञानी होते!ज्ञान हे वाघिणीच दूध आहे!मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानरुपी वाघिणीच दूध प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही असे मानत होते!संपूर्ण मानव समाज डोळस झाला पाहिजे!वंचित शूद्रादिशूद्र शिकला पाहिजे!ज्ञानी झाला पाहिजे!असं आयुष्यभर ठामपणे महात्मा फुले सांगत राहिले!🌷

बंधू-भगिनींनो!
आज भारतभर विशेषतः महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रचंड उत्साहात साजरी करीत असतो!त्या काळी महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन!समाधीच्या परिसरातअसलेले काटे कुटे वेचून!जुन्या तुटक्या झाडांच्या फांद्या बाजूला सारून छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ शोधून काढलं.. पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले हे पहिले शिवभक्त होते!छत्रपती शिवाजी राजांवर खरी निष्ठा असणारे देशभक्त होते!राष्ट्रभक्त होते!शिवाजी महाराजांवर महात्मा फुल्यांनी १ जून१८६९ला वीर रसांनीयुक्त पोवाडा रचला होता!🌷

त्यांची ग्रंथ संपदा देखील खूप मोठी आहे!आपल्या लेखणीतून समाज प्रबोधन करीत १८जुलै १८८३साली "शेकऱ्यांचा आसूड"
 हा ग्रंथ प्रकाशित केला! शेकऱ्यांची प्रचंड व्यथा मांडणारा  हा ग्रंथ लिहिला होता!१२एप्रिल १८८९ रोजी "सार्वजनिक सत्यधर्म"हा ग्रंथ लिहिला होता!
गुलामगिरी लिहिला होता!महात्मा फुले हें सामाजिक उत्थापनासाठी सर्वस्व अर्पण करणारे दानशूर व्यक्तिमत्व होतं!ते पुण्यातील बंडगार्डन पूल बांधणारे बिल्डर होते!मोठे व्यावसायिक होते!पाण्यासाठी शूद्रादिशूद्रानां स्वतःची विहीर आणि हौद खुला करणारे दाता होते!ब्राम्हन्यवादावर स्पष्टपणे विचार व्यक्त करणारे सडेतोड वक्ता होते!विचारवंत होते!🌷

१९४८ साली त्यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात त्यांचा प्रचंड अपमान झाला होता!मिरवणुकीतून बाहेर काढलं होत! ती सल लागून राहिली होती!  समाजाला जागृत करण्यासाठी याचा उपयोग झाला होता!महात्मा फुल्यांनी पुण्यातल्या चिपळूणकारांच्या वाड्यात१८५१साली मुलींची पहिली शाळा काढली आणि स्त्री शिक्षणाचा पहिला खरा पाया रचला गेला होता!सनातन्यांनां योग्य उत्तर दिले होते!डोळसपणे समाजास योग्य दिशा दाखवत समाजसुधारना करीत राहिले🌷
💐👏💐👏💐👏💐👏

गुलाम बनवणाऱ्या!तुच्छ चालीरितींना विरोध करणाऱ्या महात्मा फुलेंवर मारेकरी पाठवला होता!समाज प्रबोधनाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता! पण स्वतः मारेकरुनें महात्मा फुलेंच्या पायाशी येऊन क्षमा मागितली होती!पुढे तोच महात्मा फुलेंचा अनुयायी झाला होता!समाजसुधारना करणे म्हणजे आगीशी खेळणे होते!काट्याकुट्यावर चालणे होते!सावर्णांशी वैर पत्करणे होतं!

महात्मा फुले मोठे बिल्डर होते!बांधकाम व्यावसायिक होते अनेक कामे त्यांनी केली होती!पैसे कमवित होते!सुखात राहू शकले असते!काय गरज होती आगीशी खेळायची?सुखाने!आनंदाने आणि समाधानाने आपलं आयुष्य मजेत जगू शकले असते!काट्यांवर चालणाराचं परिवर्तन घडवून आणतं असतो!समतेचे पुजारी असलेलेचं समाजाला दिशा देत असतो!एकाग्रता,चिकाटी,अभ्यासुवृत्ती, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची प्रचंड शक्ती असणारे व्यक्तिमत्त्वचं या विश्वात अमर रहात असतो!महात्मा फुले हे पृथ्वीच्या अस्तित्वापर्यंत त्यांच्या महान योगदानासाठी जिवंत रहाणार आहेत!अमर राहणार आहेतं!🌷

महात्मा फुले एक व्यक्ती नसून ज्ञानसागर आहेत!मंथनकार आहेत!शोषितांचे आत्मा आहेत! महान शक्ती आहेत!ऊर्जा आहेत!...असे महापुरुष कधीतरी जन्माला येत असतातं!सोनेरी उघडून निघून जातं असतातं!इतिहास करून जात असतातं!चंद्र-सूर्य ताऱ्यांसारखे  सतत प्रकाश देत रहातात🌷
💐👏💐👏💐👏

महात्मा फुलें पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून १८७६ते१८८२ कार्यकाळात निवडून गेले होते!त्या काळात नागरिकांच्या हितासाठी, कल्याणासाठी अनेक सार्वजनिक कामे केली होती!जातीभेद विरहित समाज रचनेचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले आयुष्यभर ज्योति रुपात उजेड देत राहिले!प्रकाश होत राहिले!अस्पृश्यता निवारनासाठी  आयुष्य समर्पित करीत राहिले!समाजोन्नतीसाठी आयुष्यभर लढत राहिले!

११मार्च१८८८रोजी महात्मा फुल्यांना सार्वजनिक ठिकाणी सन्मानाने आमंत्रित करून "महात्मा" पदविणे विशाल जनसागरासमोर गौरविण्यात आले होते!..अशा राष्ट्रपुरुषास!राष्ट्रपित्यास भारतरत्न पुरस्कारासाठी आज पर्यंत वाट पाहावी लागते आहे!स्वातंत्र्या नंतरही वाट पहावी लागत आहे!खरचं मनस्वी दुःख होत आहे!खेद वाटतो आहे!ज्यांनी भारतीय स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेड रोवली!ज्यांनी अज्ञानी समाजास ज्ञानाचे डोळे दिलेत! त्यांनाचं सर्वोच्च पुरस्कारा पासून गेली दिडशे वर्षे वंचित ठेवलं जातं आहे!ही कुठली मानसिकता असेल बरं? 

महात्मा फुल्यांवर अनेक पाश्चात्य विद्वानांचा पगडा होता!अमेरिकेतील निग्रोवंरं होणारा अत्याचार आणि हिंदुस्थानातील शूद्रादिशूद्रांवर होणारा अत्याचार समान आहे असे ते मानत होते!म्हणूनच शेवटपर्यंत समानता साठी!..दीनदलितांच्या हक्कासाठी लढत राहिले!नवविचारांचे वारे वहात राहिले!निद्रिस्त समाजाला जागे करीत राहिले!जातीभेदाच्या जोखंडातून बाहेर पडण्यास सांगत राहिले!अज्ञानी माणूस गुलामचं राहील असं त्यांचं ठाम मत होतं!
 असामान्य कार्य करणाऱ्या!समतेचा झेंडा रोवणाऱ्या क्रांती सूर्यास!स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या भारतातील पहिल्या गुरूस!अमर देवदूतास त्यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो!नमन करतो!त्यांच्या पावलांची धूळ माथी लावतो!
🌹🌹👏💐💐👏
शेवटी महात्मा फुले यांना एक कविता समर्पित करतो!
"अंधार कोठडीत बसलो होतो
मला नं कळले कैदी मी
आंधळा होऊनि जगणे माझे
प्रकाश किरणे गिळले मी!💐

दृष्टी माझी अंध झाली
बेधुंद होऊनि जगलो मी
दृष्टी पलीकडेही होते जग
तरीही काळोखात पडलो मी!

कारागृहात मन रमले
बंदिवान त्याचा झालो मी
डांबूनी ठेविले अंधारात
बंधमुक्त कधी होईन मी..!

अविद्येने मज अंध केले
दुःख गिळोनि जगलो मी
दृष्टी सत्य मला नं कळली
अंधार पांघरूनि हिंडलो मी!

दृष्टीस अंधुक प्रकाश दिसला
विद्येच्या द्वारी गेलो मी
तृष्णा मनीची शांत झाली
बंदिवासातून मुक्त झालो मी!
💐👏💐👏💐👏💐
*******************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-११एप्रिल२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol