आत्मिक सुखाची गुढी उभारू
आत्मिक सुखाची गुढी उभारू
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
*********************
....नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
जेथे स्वाभिमान असतो तेथे विचारांचा आणि आचारांचा विजय होत असतो!शस्रांनी सकारात्मक विचारांचा अंत होत नसतो!पुनर्जन्म होत असतो!सकारात्मकता उर्मी आणि ऊर्जा असते जगण्याची!...अनितीची मूळ खोदून,जाळून अन गाडून जन्म घेणारा नवा इतिहास उत्कट असतो!आदर्श असतो!स्वच्छ, पारदर्शक असतो!सुख आणि आनंदाचा असतो!समाधानाचा असतो!जाज्वल्य असतो!...आज गुढीपाडवा आहे!🌷🌹
स्वाभिमांनातून स्वभूमी रक्षणासाठी लढणारे वीर सतत सुर्या सारखे तेजाळत असतातं!शौर्याची पताका दिगंत फडकवत असतातं!उंच उंच शिखरावर विजयी ध्वजारोहण करीत असतात!विश्वाला शांतीचा संदेश देत असतातं!आज गुढीपाडवा आहे!दिगविजयी श्री.प्रभूराम चंद्राच्या आगमनाचा,स्वागताचा मंगलदिन आहे!🌷
अनितीवर सज्जनांनी मिळविलेला विजय आनंद देत असतो!समाधान देत असतो!सदाचाराचा संदेश देत असतो!
प्रकाश दाखवीत असतो!समृद्धीचा मार्ग दाखवीत असतो!सन्मार्ग दाखवीत असतो!डोळस करीत असतो!विजय सतप्रवृत्तीचा आरसा असतो! गुढी उभारून!नमन करून विजय साजरा करायचा असतो!बंधूंनो.. आज गुढीपाडवा आहे!🌷
आज दोन एप्रिल आहे!महिन्याचा दुसरा दिवस आहे!सकाळ गोड सुरांनी कुजबुजते आहे!पक्ष्यांच्या गोड आवाजांनी कान तृप्त होत आहेत!आजचा नवीन सूर्य उगवतो आहे!हळूहळू वर येणारी सूर्यकिरणे विजयी पताका घेऊन पुढे निघाली आहेत!अंधार दूर पिटाळीत आहेत!घराघरात प्रवेश करीत आहेत!ज्ञान उजेड देत आहेत!मनामनाला प्रकाशित करीत आहेत!प्रफ्फुलीत करीत1 आहेत!मानवाच्या उन्नतीचा मार्ग दाखवीत आहेत!घराघरात प्रवेश करीत आहेत!नवकिरणांच्या आगमनाने प्रवेशद्वार देखील हरखून गेलं आहे!आज गुढीपाडवा आहे!आज आनंदाचा दिवस आहे!सन्मानाचा दिवस!
दारासमोरील रांगोळीनें रंगसंगती साधली आहे!उंच बांबूच्या टोकावर गुढी उभारली आहे!लिंबाची डहाळी,साखरेच्या गाठी नवीन तलम भगवे कापड आणि तांब्या संपूर्ण गल्लीत घराच्या छतावर डौलाने नजरेत भरतो आहे!विविध रंगछटांनी मन मोहीत होत आहे!प्रसन्नतेचा हा अनमोल क्षण निसटून जावू नये म्हणून धावपळ,लगबग सुरू आहे!कारण आज चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे!आज गुढीपाडवा आहे!आजच भारतीय विक्रम संवत आहे!आज हिंदू नववर्षं सण आहे! आज स्वाभिमानाचा,स्वधर्म पताका उंचावण्याचा दिवस आहे!🌷
विधिवत पूजा करून बांबूवर उंच ठिकाणी गुढी उभारली आहे!उंचावर फडकणारा ध्वज सन्मानाचं प्रतीक आहे!कर्तृत्वाचं प्रतीक आहे!त्यागाचं प्रतीक आहे!जनजागृतीचा संदेश आहे!कर्तव्यनिष्ठेसाठी आदेश आहे!अभिमान आणि स्वाभिमान मनोमनी रुजविण्याचा आत्मिक संदेश आहे!संस्कृतीचं प्रतिबिंब गुढीत दिसत आहे!पिढीजात परंपराचा चालत आलेला वारसा आहे!श्रद्धापूर्वक मनोमनी नमन करण्याचा क्षण आहे!अस्तित्वाची ओळख आहे!आज गुढीपाडवा आहे!🌷
लांबवरून!दूरवरून कोकिळेचा गोड आवाज कानी पडतो आहे!सूर्यदेव दमदारपणे एक एक पायऱ्या चढून वर निघाला आहे!मनोहारी, डोळ्यास दिपविणाऱ्या सोनेरीकडा सूर्य देवाचं रूप आहे!अंग आणि देह भाजून निघतं आहे!घाम गाळून कष्टाला सामोरे जाण्याचा दिवस आहे!...आज गुढीपाडवा आहे!गुढीवरील पताका फडकते आहे!राष्ट्र अभिमान जागत आहे!🌷
निसर्ग फुलला आहे!खुलला आहे!कडक उन्हात देखील चैतन्याचा अनुभव घेत आहोत!निसर्ग आपलं रूप बदलून घेण्याचा प्रयत्न करीत असतं!फुलं,पाने,वेली आणि त्यात कडक उन्हाळा असा सुंदर संगमात आनंद एकवटलेला असतो!आज गुढीपाडवा आहे!घरात पंचपक्वांन्न पुरणपोळी गोडव्याचा सुहासिक गोडवा नाकास आमंत्रित करीत आहे!अतुलनीय आहे!हृदय मोहित आहे!🌷
प्रभू रामचंद्रांनी अन्यायी,
अत्याचारी राजा रावणाचा वध केला होता!१४वर्षाचा वनवास संपवला होता!प्रजा आनंदाने नाचू लागली होती!गुलामीतून मुक्त झाली होती!राक्षसी वृत्तीवर सत्याचा विजय झाला होता!गावोगावी स्वागत कमानी उभारल्या होत्या!आनंद द्विगुण झाला होता!प्रभू श्रीरामांचं स्वागत गावोगावी सुरू होत!प्रजा त्यांच्या आगमनाने आनंदी होऊन आपल्या घरासमोर उंचावर पताका लावून त्यांचं स्वागत करीत होती!विजयी प्रभु रामचंद्रांच्या आगमनाने प्रजा आत्यंतिक प्रसन्न होती!त्या पताका म्हणजेच विजयी पर्वाची सुरवात होती!प्रजा सुरक्षित आणि सुखी झाली होती!राक्षसी वृत्तीचा अंत झाला होता!गुढी उभारून आनंदीपर्व साजरा करीत होतें!आजही गुढीपाडवा आहे!🌷
आजच्या नववर्षाच्या मंगलदिनी घरात गोडधोड जेवण आहे!आनंदाच्या,मांगल्याच्या या शुभप्रसंगी प्रत्येक घरावर पताका फडकत आहे!गुढी उभारून गुढीपाडवा साजरा होत आहे!विजयी संयमी वृत्तीचा परिचय होत आहे!माणसाच्या हृदयात देशाभिमान जगविण्याचा दिवस आहे!भारतवर्षाचा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी पहिल मुहूर्त आहे!आज गुढीपाडवा आहे!🌷
गोरगरिबांवर प्रेम करून गुढीपाडवा साजरा करूयात!जाज्वल्य देशभक्ती अंतःकरणात जागवून गुढीपाडवा साजरा करूयात!हिंदूंचा हा महापर्व म्हणजेच गुढीपाडवा साजरा करूयात!सुख,आनंद आणि समृद्धीसाठी गुढीपाडवा साजरा करूयात!मानवतेच्या कल्याणासाठी गुढीपाडवा साजरा करूयात!धर्माधर्मात बंधूंतेच्या सलोख्यासाठी गुढीपाडवा साजरा करूयात!येणाऱ्या पिढीला एकात्मिक संदेश देण्यासाठी गुढीपाडवा साजरा करूयात!मनामनातील राग,लोभ,मोह आणि मत्सराच्या अंतासाठी गुढीपाडवा साजरा करूयात!🌷
आनंदाची,मांगल्याची गुढी उभारून आपल्यावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आंतरीक जिव्हाळ्याची गुढी उभारू या!जगण्यास हात देणाऱ्यांसाठी आंतरीक प्रेमाची गुढी उभारू या!जातपात कवटाळून बसलेल्या वृत्तीला शह देण्यासाठी भारतवर्षाची गुढी उभारू या!राष्ट्रासाठी समर्पणाची वृत्ती बानावी म्हणून आम्ही गुढीपाडवा साजरा करीत आहोत!जगास शांतीचा संदेश देत आहोत!आपल्या भावी अस्तित्वाच्या द्वाहीसाठी गुढीपाडवा साजरा करीत आहोत!🌷
भारत देशातील तमाम बंधू-भगिनींना!कष्टकरीनां!शेतकरी बांधवांनां!देशाच्या सीमा रक्षणासाठी लढणाऱ्या शूर वीरांना!उद्याचं मंगल भवितव्य दाखविणाऱ्या राजकारणी, समाजसेवकांना गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा!🌷
🌹🌷🌹🌷🌹🌹🌷
*********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११९२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-०२एप्रिल२०२२
(गुढीपाडवा)
Comments
Post a Comment