गिरणामाईच्या तिरी पुण्यस्मरण

गिरणामाईच्या तिरी पुण्यस्मरण
    *******************
🌹🌹🌹🌹🌹🌹
******************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
आई आणि वडील आपल्याला जन्मासोबतचं प्राप्त झालेल्या दोन पुण्यदान पेट्या असतातं!कोणी त्यास धनाची पेटी म्हणतील!कोणी संस्काराची पेटी म्हणतात!त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या काळजाची पेटी उघडीच ठेवीत असतातं!कधी काळीज देखील देत असतातं!आयुष्यभर फक्त देत राहणे!देता देता दान पेट्या उघड्याचं राहणे!उगवत्या सुर्यापासून मावळे पर्यंत मुलांसाठी शोषिक होऊन जगणारे माता-पिता त्या घरासाठी, नातलंगांसाठी,समस्त मानव समाजाचे आदर्श असतातं!वंदनीय असतात!दैवत असतातं!गाभाऱ्यातील पवित्र चंदन असतातं!🌷

दान पेटीतून एखादा मुलगा हिवाळयातील ऊब मागत असेल तर त्यास आईवडील स्वतःच्या अंगावरील पांघरून काढून अंगावर टाकत असंतात!कोणी चटका देणाऱ्या उन्हात सावलीचा आग्रह धरला तर स्वतः विशाल सावली होणारे झाड होतात!अंगावर चटके घेत मुलांवर अंगावरील नेसते कपडे सावली देत असतातं!पावसाळ्यात छत्री होवून मुलांना पडत्या पाण्यात भिजन्यातून संरक्षण देत असतातं!प्रसंगी सर्व काही विकून झाल्यावर स्वतःला ही गहाण ठेवण्याची क्षमता ठेवत असतातं!बाप आणि आई स्वतः गुलाम होवून मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडणारें शेवटी रितें होतात!दानातील महादान स्वतःचा देह दान करायलाही मागे पुढे पहात नाहीत!मुलांच्या कल्याणासाठी गुलामीचे जीवन जगण्याची हिम्मत ठेवणारा बाप फक्त दान देत असतो!🌷
 
बंधू-भगिनींनो!
मुलं पेटीतून हक्काने पाहिजे ते धन काढून घेत असतातं!काळजातून दिलेले दानाचं तें धन कधी संपतच नाही हो!असें दानी माता-पिता मिळणं महाभाग्य घेऊन आल्याचं असतं!दान देणारे महादानी असतातं!त्यांस श्रावण बाळासारखेचं पुत्र लाभतात!रामासारखे एकवचनी पुत्र लाभतात!त्यांच्याचं आदर्शांवरं चालणारे पुत्र निस्वार्थ सेवाकरीत परमभाग्याचा,सौभाग्याचा विश्वास प्राप्त करीत असतात!आई-वडिलांची सेवा करण्यासाठी आपल्याला विधात्याने दिलेली अमृतमयी संधी असतें!त्याचा लाभ उठवणारे महाभागी जन्माचं सार्थक करून घेत असतातं!मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या रुपात दैवतांची सेवा केली तर जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात वृद्धांची होणारी दयनीय परिस्थिती होणार नाही!हाल होणार नाहीत!शहरांसारखे वृद्धाश्रम होणार नाहीत!ज्यांनी जन्म दिला!ज्यांनी आपल्या जन्मापासून देत राहिले अशा आकाशाहुन विशाल असलेल्या खजिन्याच्या अंतःकरणात प्रवेश करून पाहूयात!त्यांच्या वेदना वाटून घेऊयात!भक्त पुंडलिक होण्याची संधी घेऊयात!🌷

बंधू-भगिनींनो!
आज यासाठी मांडतोय,की गेल्या वर्षी करोना काळात एका ९५ वर्षाच्या महातपस्वीचं!तत्वाने जगणाऱ्या महान योग्याचं निधन झाले होते!ज्यांनी आयुष्यभर माणसं कमविली!माणसं जमविली!स्वतः काटेकोरपणे जगून इतरांना आदर्श निर्माण केला!...नेमका करोना काळात त्यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त करण्यासाठी देखील बऱ्याच आप्त स्वकीयांना जाता आले नव्हते!

अशा या महान तपस्वीचं नाव आहे "कै. रामराव ओंकार महाजन"!६ फूट ४ इंच उंची!गोरापान वर्ण!वजन१२०किलो!भारदस्त हसर व्यक्तिमत्त्व!प्रत्येकाची चेष्टा मष्करी करीत जीवन जगणारे निरोगी व्यक्तिमत होते!खान्देशात जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्याच्या "पिचरडे" गाव!छोटंसं.. टुमदार गावं!लोकसंख्या३०००असलेल्या गावात वयाच्या२५व्या वर्षी हॉटेल व्यवसायात पदार्पण करून!आपल्या शब्द माधुर्याने माणसाला जिंकणाऱ्या,राम मार्गावर चालणाऱ्या नानासाहेब रामराव महाजन यांच्या निधनाने गेल्या वर्षी गावावर शोककळा पसरली होती!थोडे थोडके नाही तर९५ वर्षाचं निरोगी आयुष्य जगणाऱ्या या दैवताची पूजा अपूर्ण राहिली होती!🌷

गिरणा नदीने नंदनवन केलेल्या! हिरवळीच्या सानिध्यात! कुठेतरी नावालाचं काळी जमीन नजरेस पडते!सर्वदूर मका,केळी,कापूस चिक्कू आणि लिंबूच्या बागा पसरलेल्या गिरणा माईच्या भूमीत जगलेल्या या विशाल हृदयी व्यक्तिमत्वाची काल दिनांक १५ मार्च २०२२ रोजी प्रथम पुण्यस्मरण आणि वर्षश्राद्धाच्या पुण्यविधीसाठी मी देखील पिचरड्याला गेलो होतो!तेथील ग्रामदैवत जगत जननी मातेच्या मंदिरानें पावन असलेल्या भूमीत कै.नानांच्या पवित्र स्मृतींना उजाळा मिळाला!नानांची चारही मुलं पिताश्रींच्या पावलांवरं पाऊल ठेवून चालणारी!त्यातीलचचं एक कनिष्ठ चिरंजीव पुण्यात वडिलांचे स्वप्न साकार करणारे श्री नकुल महाजन आहेत ! वाडा आणि आधुनिकतेचा प्रवेश केलेल्या या गिरणातिरी माझे मन ही पावित्र्याच्या जवळी ओढले गेले!
तेथील पोलीस पाटील साहेब आणि शिक्षण संस्थापकांनां भेटण्याचा योग आला!माझ्या सारखा अशुद्ध देखील शुद्धतेच्या पवित्र डोहात उडी मारून चिंब भिजलो!🌷

बंधू-भगिनींनो!
काल कै नानासाहेब रामराव ओंकार महाजन यांचं प्रथम पुण्यस्मरण होतं!त्यांचा पवित्र देह अनंतात विलीन होवून बघता बघता एक वर्ष पूर्ण झालं!कै नानांच्या अनंत आठवणी सोबत घेवून जगणाऱ्यांनां दररोज त्यांच्या दानाची आठवण होत असणारं!त्यांच्या संस्काराचे मोती डोळ्यासमोर येत असतील! आठवणीतून क्षणोक्षणी डोळे भिजत असतील!अनावर झाल्यावर हळूचकण पापणीत लपवलेले आसवं मोती बनून गालावर घरंगळत असतील!तेव्हा अश्रू मोतीतून बाप म्हणून नानांचा तोच हसतमुख चेहरा तरळत असेल!🌷

माणसाला जेव्हा गहिवरून येत असत तेव्हा तेव्हा बापास डोळ्यात भिजवून घ्यायचं असतं!त्याचं अस्तित्व किती महत्वपूर्ण असतं तो दाटलेला उर सांगत असतो!कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावणारा बाप नेहमीचं अंधारात स्वतःचं अस्तित्व शोधीत असतो!एकांतात उर बडवून रडून घेत असतो!कुटुंबातील सर्व सदस्यांना हट्टी,ताठ,हेकट तापट वाटणारा बाप खरचं तसा असतो का हो?त्यालाही मन असेलचं नां?त्याला ही काळीज असतंच नां?त्याला ही भावभावनांचा तळ असणारचं ना? पण तसं राहिलं नाहीनां कदाचित कुटुंबाचा तोल सांभाळनें कठीण होवून जात असत!म्हणून धाकात ठेवणारा बाप असतो! बाप कोपऱ्यातल्या जागी बसून रोज एकांतात कुटुंबाची क्षमा मागत असेलही!स्वतःची भूमिका चोख पार पाडीतं कुटुंबाला वळण लावणारा बाप फक्त बापचं रहातो त्याच्या आंतरीक वेदना कोणी जवळून समजून घेत नाही!जाणून घेत नसतो!🌷

मुलं समाजात ताठ मानेने जगत असतातं!वागत असतातं!मिरवत असतातं!स्वप्न पहात असतात!तशी ईच्छा व्यक्त करीत असतात!मागचा पुढचा विचार न करता धाडकन निर्णय घेत असतातं!...का बरं एवढा आत्मविश्वास असेल त्यांना?.."बाप हैं नां!.डरने का नही!" एवढं शंभर नंबरी सोनं पाठीमागे असल्यावर मुलांना कसली चिंता हो!असा हा बाप मात्र पैशांसाठी वणवण हिंडून पै पै जमा करीत संसार सुखाचा करीत जगत असतो!वव्यवहाराचा ताळमेळ बसवीत कुटुंबाला पुढे नेत असतो!त्यासाठी इतरांचे बोलणे देखील खात असतो!"भोक पडत नाही ना बोलण्याने!" मन आणि अंगावरील चामडी जाड करून घेत जगत असतो!स्वतःच तोंड देत कुटुंबाला सुखी ठेवत राहणारा बाप खरचं मागेचं राहिला हो!उजेडात कधी 
आलाचं नाही!स्वतःच्या महत्वाकांक्षा आणि स्वप्न कोणाला कधी सांगता आलेच नाहीत!बाप एकटाच डोळे भिजवत एकांतात स्वतःला समजून घेत आपली संसार रुपी नाव वल्हवित पैल तिर गाठण्यासाठी जगत असतो!मुलांच्या सुखी संसाराची स्वप्न बघत!म्हतारपनाच्या काठीकडे आस लावून बसलेला बाप खरचं सांगतो गिरणामाई लोकांना कळला का?का फक्त तुझ्यात डुबकी मारून रोज उगवत्या आणि मावळत्या सुर्य देवाकडे संध्याकाळ होण्याची वाट बघतो आहे!🌷

काल कै नानांच्या पुण्यस्मरण निमित्ताने माझ्या मनातील आवेग आवरता आला नाही म्हणून माझ्या हृदयीचे हे बोल आपणा सर्वांना अर्पण करतो!💐💐
🌷🌷🌷🌷🌷
******************
....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे४११०२८
मो.नं ७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१६मार्च२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)