मैत्री २४ कॅरेट सोनं

मैत्री २४ कॅरेट सोनं
🌹🌹🌹🌹🌹
**************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
जमिनीतून  बीजांकुर वर आल्यावर जन्म घेत असतं!आईच्या गर्भात नऊ महिने राहून बाळ जन्म घेत असतं!शब्द दररोज जन्म घेत असतात!नातें दररोज जन्म घेत असतात!वाढतं असतात!फुलत असतात!काही नाती दुधातील लोणी सारखी असतातं!सर्व गळून गेल्यावर शुद्ध तुपासारखी बनत असतात!असं नातं मित्रात असतं!मैत्री जपण्यात असतं!भेटीतील ओढ आणि आतुरता जणू प्रेमिकेसारखी असतें!विरह असतो!हुरहूर लागून राहिलेली असतें!मैत्रीत देखील भावभक्तीचा गोडवा दडलेला असतो!गोडव्यातील अंतरीची ओढ  श्रद्धेला अर्पण केलेली असते!मैत्रीत जिव्हाळा असतो!अंतरीची ओढ असतें!स्वार्थाचा लवलेश काडीमात्र नसतो!ती मैत्री अमृताहुन संजीवन असतें!इतिहासातं नोंद ठेवून..ठसा ठेवून अमरत्व होतें!..आज मला "त्याचं" मैत्रीची संजीवन भेट झाली!मला माझे बालपणीचे वर्गमित्र भेटले!मला जिवाभावाचा सखा भेटला!मला सत्व भेटले!मला मित्र रुपात संत भेटला!हो मला "संजय सोनार" भेटला!आज ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते "संजयजी शेठ सोनार भेटले!मला सुदाम्याला कृष्ण भेटला!🌷

मित्र कसा असावा?मार्गदर्शक असावा!आपल्या जीवनाचा दिग्दर्शक असावा!सुख-दुःखात सतत हात देणारा असावा!सत्कर्मात पुढे नेणारा असावा!कधी कधी बोट धरणारा देखील असावा!मित्र नजर देणारा असावा!मित्र दृष्टी देणारा असावा!मित्र रक्ताच्या नात्यातून जवळ असावा!निकट असावा!मित्र डोळ्यातील असावं स्वतःच्या ओंजळीत घेणारा असावा!मित्र खांद्यावर भरभक्कम हात ठेवून लढ म्हणणारा असावा!मला माझा मित्र भेटला!मला संजयजी सोनार भेटला!भावाहुन भाव देणारा भेटला!भावापेक्षा भान असणारा भाऊ संजयजी शेठ भेटले!मला माझे मित्र भेटले!🌷

डोळ्यांत पाणी आल्यावर मैत्रीची आठवण होत असते!मुखी हास्य उमलल्यावर हास्यात मित्र दिसावा!हास्यात मैत्री फुलत जावी!स्वप्न पडले तर त्यात मित्र दिसत रहावा!हिरवळीच्या सुंदर वनराईसारखी मैत्री असावी!अनेक फुलं,फळांसारखी विविधता मैत्रीत असावी!मैत्रीचा आविष्कार सुंदरतेच्या परिघापलीकडे जाऊन भिडावा! परीघ वर्तुळाकार रेषेवरून मित्राने हाक द्यावी तशी परीघ सोडून तो धावत यावा आणि मित्रास समर्पित व्हावा असा मित्र असावा!मला माझा बालपणीचा मित्र भेटला!मला माझा कवी मित्र भेटला!मला विचार अमृत पाजणारा शांत,सुस्वभावी मित्र भेटला!..मला शिंदखेड्यातील बालमित्र भेटला!मला संजयजी सोनार शेठ भेटले!💐👏

बंधू-भगिनींनो!
बालपण वाऱ्यावर उडून निघून जात असतं!काळ बदलेला असतो!बालसुलभ मनातील भाव काळाच्या ओघात वाहून गेलेले असतातं!मनातील चंचलता कुठेतरी अदृश्य ठिकाणी जाऊन बसलेली असते!तेथेंच बालपण कपडे काढून ठेऊ पहातं असतं!अंगावरील,मनावरील आणि हृदयातील कोमलता,जवळीकता यांची घडी घालायला सुरुवात होत असते!बालपणीचे खट्याळ मन आणि चंचलता वेचून  हळूहळू आठवणींच्या डब्यात बंदिस्त करायला सुरुवात होत असते!तेथेंच बालपणीची निरागसता निरोपाची वाट पाहायला लागत असते!तरीही मैत्रीचे अतूट नातं पक्क्या धाग्यांनी विणलं जातं असतं!जाळीदार नातं आरपार दिसत असतं!नजरेला नजर भिडवणारे असतं!तेच निखळ नातं मित्राचं असतं!मित्रं सर्वस्व त्यागी असतो!तेथे मतलब जन्म घेत नसतो!स्वार्थ जन्म घेत नसतो!अस्सल आणि शुद्ध नाते जन्म घेत असतं तेथे मैत्री फुलत जाते!मला माझा कविराज मित्र भेटला!मला श्रीकृष्ण सारखा धनवान राजा भेटला!मी सुदामा मला श्रीमंत मित्र भेटला!मला संजयजी सोनार भेटले!नवसारीचे प्रसिद्ध सोने व्यापारी संजयजी सोनार भेटले!

मैत्री सोन्यासारखी असतें!शुद्ध २४ कॅरेट असतें!त्यात अशुद्धता नसते!त्यात शुद्ध भाव भक्तिभावाने अर्पण केलेले असतातं!निरागसता ओथंबून वहात असते!आप मतलबी असें अशुद्ध आणि नकोसे जाळून टाकलेले असतें!सोन्याला कस लावून!तापवून फक्त शुद्धता येत असते!pure असतें!चकचकीत असतें तशी मैत्री असतें! शुद्ध असतें!ओढ फक्त अंतरीची असतें!सोन्याला तापवून तापवून शुद्धता आणणारे माझे  बालपणीचे शुद्ध सोनं भेटले!३६वर्षात कुठलेही अशुद्धता दिसली नाही असं शुद्ध सोन भेटले!शिंदखेडा,जि.धुळेतील पण "नवसारी" गुजरातमध्ये गेल्या ३०वर्षापासून स्थायिक असलेले जिवलग मित्र भेटले🌷

मैत्री पाण्यासारखी पारदर्शी असतें!उत्तम संस्कारांचं पांघरूण असतं!त्यात उबदारपणा असतो!उत्साह असतो!सहज हृदयातलं बोलणं आणि वागणे असतं!मैत्री नजरेतील ओळख असतें!मैत्री जगणं शिकवीत असतें!एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची संधी असतें!भाव भावनांनी सांधलेलं नातं असतं!कवी मनाची आर्जव असतें!..असे मराठीतील उत्तम कवी आणि लेखक संजय सोनार भेटले!अंतरीचे भाव टिपणारा भावकवी संजय सोनार भेटले!अहिराणीला माय समजून त्यात अंतरीचे शुद्ध बी पेरणारे कवी संजय सोनार भेटले!🌷

बंधू-भगिनींनो!
कवी!लेखक!गुजरातेतील सुप्रसिद्ध सोने व्यापारी अत्यंत निर्गवी व्यक्तिमत्त्व संजय शेठ सोनार साहेब काल रात्री १० वाजता आमच्या कुटीत आले!बालपणीच्या अनंत आठवणींना उजाळा देत रात्र कधी उलटून गेली कळलं देखील नाही!आज द सकाळी दिनांक ८ मार्च रोजी लवकर उठून पुन्हा गप्पांच्या मैफिलीत रंगलो!...कार्यबहुले संजयजी सोनार साहेब सकाळीच ८-३० वाजता अनंत आठवणी ताज्या करून!...निरोपाचें अवघड शब्द उरात ठेवून आपल्या पुढील प्रवासाला निघून देखील गेले!🌷

मैत्री निरोपातून डोळे भिजवीत असतें!दूर जाण्यासाठी निरोप असतो!विरह मनाला नकोसा वाटत असतो!मित्र असे असावे! २४ कॅरेट सोने असावे!शुद्ध सोनं शोधणाऱ्या संजयजी सोनारासारखे मित्र असावेतं!जागतिक महिला दिनी मित्र पुण्याचा,हडपसरचा निरोप घेवून नवसारीला दूरदूरच्या प्रवासाला निघून गेलेत!हुरहूर ठेऊन निघून गेलेतं!
   🌷🌷🌷🌷🌷🌷
      ****************
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐👏
   ********************
   ...नानाभाऊ माळी,
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं- ७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०८ मार्च२०२२
(जागतिक महिला दिन)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)