टपरी बयानी कथा

टपरी बयानी कथा
🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
***************

भाऊ-बहिणीस्वन!
ग्रामपंचायतना मव्हरे मोठा चौक से!आंगे-पांगे निमनां झाडे सेतस!तठेचं नेम्मंनं ग्रामपंचायतनी सव-सात लोखंडी बाकडा दोन्ही आंगे ठेयेल सेतस!त्यासनावर निमनी सावली पडस!निमनां गनज झाडे सेतस! उनन्हाभरे आथी तथी थंडीगार सावली पडस!चटकाड्या उनम्हा सावलीनां धिवसा से!नेम्मंन एस टीनां बस स्टॉप भी त्या झाडनांखालेचं से!एसटी उनी का गावलें जानारा बठ्ठा बाकडावरतीनं उठी पयेत सुटतंस!🌷

आंगे-पांगे पान टपऱ्या सेतीस!पान टपरीवर पान,घुटका, पुड्या-पाड्या लिसनी खायीखुयी काही टूक्कार जवान पोरेस्नि तठेचं पिचकारी मारी,थुकी-थाकी बाकडास्ना मांगे गंधाफटक चित्रा काढी ठेयेल सेतस!दुपारनी सावलीमां तठेचं कोकली कोकली आराया मारी बाकडावरचं आडा पडी ऱ्हातसं!🌹

दुपारनांभर आश्याच येडाचाया करनारा काही बाट्टतोड पोरें तोंडम्हा ढोरेस्निमायेक वागूल करी टपरीवर किद्रायी काढेल से!!तीन-चार झन सेतस पन त्यासमा वरली गल्लीनां झिपरु टोंग्यानां पोऱ्या.."बाप्या" आनी तानका शंकरनी काढेलं अवलादी जनव्हाळम्हानं एक से.. "भुऱ्या"!या दोन्ही भी उज्जी बेक्कारगान्ना सेतस!दखा कश्या डोक लायी ऱ्हायनांत त्या टपरीवालासंगे!
पान टपरीवाला "सुर्या"भी त्यांन्हा सग्गी मायनं दूध पेयेल से!त्यासले पुरे पाडी ऱ्हायना!🌷

भुऱ्या बोलना-- 
"सुर्या!..बयजु तू आशा कश्या उफट्टी मत्थीनां पयदा व्हयेल से रें!साल आक्सी उधार देस आम्हलें!आते तूनमाय कोठे जनायी गयी नई देवालें?"
मायन्ह नाव काढताचं 
सुर्यानंडोकाम्हा उब्या भडकालें लाग्ना!आगीन चालालें लाग्नी!कितल्या गाया टिकाडो नी कितल्या नई आस व्हयी गये!उग्रा व्हयी भुऱ्यावर तोंडलें मोकिचोकी सोडी दिन्ह--
 ,"ओ रान्ना,तोंड आवर!मुसडामां दिसू ठी!बयझु जसी काय बापनी चौतस से,रोज रोज उधार देवालें!"🌷

तिथलामां बाप्या मधम्हाचं ढमकन बोली उठना--
," सुर्या!सल्ल्यांगत तट व्हवू नको रें!बुडाई दिसुत का तुन्हा पैसा? आम्ही सेतस म्हणीसनी तून्ही टपरी चाली ऱ्हायनी!कोन जीववर माती ऱ्हायना रें तूं?भारी भरेलं ठिकरं!"आनी टपरीनं मव्हरेचं पचकन थुकी दिन्ह!मुसडाम्हा कोंबेलं घुटकानी लालभुदुगं पिचकारीम्हा जिमीन रंगायी गयी!🌷

बाप्यामुये भुऱ्यालें आखो चेव चढनां!पुडीभावू सेतसनां दोन्ही भी!सुर्यानं आंगवर रवसडी जात बोलना--
,"चेटन तून्ह मुसड!आक्काडी लाव तुन्ही चबरी जिभलें!आखरी डाव सांगस तुले,पुडी दिन्ही तें बरं से!नई तें मंग सकायलें हायी टपरी जगावर काय दिखावू नई!काय व्हयी सांगता येत नई!"🌷

सुर्या भी बठ्ठ गावंनं पानी पेयेल से!रवसडतं बोलना --,"पहिलेंग तून्हा तोंडल्हे झाकन लाव!तुंनगतं गनज फुटेलं डफडा ग्यात आठेंग!बाप मजुरीलें जास!तू आफलातूरनां पोटना से!बापना जीववर मज्या मारस!घरमा नई दाना नी माले आफलातूर म्हना!चाल निंघ आठेंग!!!!...."🌷

त्यासना झगडा दखी धल्ला-पल्ला!श्याना-सुरता गोया व्हयी ग्यात!त्यासमां भुऱ्या आनी बाप्यानां धल्ला भी पयेत उनात!त्यासनी पोरेस्ले एक एक टकोरा व्हडी दिन्हा!दुपारनां उननां भर 
झामलायी-झुंमलायी रस्ता दिखना तथा पयेत सुटनात!🌷

बाप्यानां धल्ला सूर्यागंम दखी खेकसायीस्नि बोलना--
"कारे सुर्या!घुटकान्या पुड्या ईकी ईकीस्नि बठ्ठा गावलें नासाडी ऱ्हायना तू!शाजूक से ना मंग सडेल धंदा सोडी दे ना??दुसरा चांगला धंदा टाक तू!चांगली बरकत ऱ्हायी त्याम्हा!"🌷

सुर्या भी बाप्यान धल्लालें तोंडेतोंड येत बोलना--
" देख काका मी काय कोन दारमां जात नई!कोनलें बलावत नई!ज्यालें पटस तो येस टपरीवर! पुड्या लयी जातस!खातस!मी काय करू?काका आपला पोरस्ले ताबाम्हा ठेवो नां मंग!पोरे नई ताबाम्हा उनात सोता
 टपरीम्हा!"🌷

  सुर्यानी बोलाम्हाचं बाप्यानां धल्लालें जखमी करी टाक!बाप्यानां धल्ला धाकलं तोंड करी घरना रस्ते लाग्ना! जाता जाता बोली ग्या--
"आपलाच दात आनी आपलाचं व्हट सेतस!आपलाचं पोरे बेक्कार सेतस!रस्ता चुकायेल सेतस!तुले सांगी काय उपेग!मुगा मुगा ऱ्हायेलचं बरं!पन तू घुटकान्या पुड्या ईकी गाव नासाडी ऱ्हायना हायी मातर खरं से!"🌷

रात जात ऱ्हायनी!रात जपाडत ऱ्हायनी!लोके घोरत ऱ्हायनात! तथा स्टॅण्डनां आंगे चौकम्हा सक्कायं पाह्येरें मोठा धुव्वा वर जात दिखना!जो बन तो स्टॅण्डनां गम पयेत सुटनातं!तठे सुर्यानी पान टपरी उब्याम्हा खाक व्हयी जायेलं व्हती!लोके आथाईन-तथाईन बादल्या भरी भरी टपरीवर पानी फेकी ऱ्हायंतात!निरोप लागताच सुर्या पयेत सुटना!🌷

..टपरी उब्याम्हा बयेत दिखनी!राख व्हयेल दिखनी!सुर्या तोंड झोडालें लाग्ना!डोयांस्ले धार लागी गयी!तयतय-बयबयी येडा व्हयी बोंबलालें लाग्ना--
"भुऱ्या आनी बाप्यानीचं टपरी बायेल से!त्यासनीज आग लायेल से!त्यासनीचं चेंटाडी!
कालदिंनं उज्जी खार खायी-खायी बोंबली ऱ्हायेऍंतात!!"🌷

तवलगून बाप्या आनी भुऱ्या भी पयेत यी भिडनात!त्या भी चक्करम्हा पडी ग्यात!सुर्या त्यासनाचं नावलें आराया मारी ऱ्हायंता!त्यास्ना सात ग्यात आनी पाच ऱ्हायनात!असा काय बोंबली ऱ्हायना सुर्या!दोन्ही सकत लागी ग्यात! येरायेरगंम दखी बुचकायामां पडी ग्यात!🌷
  
भुऱ्या बोलना--,"आम्हनं काय आडी गये तुनी टपरी चेटाडालें!कालदिंन तुफाईन पुड्या मांगा गुंता तुले सांगी ऱ्हायंतुतं!आम्हनां धल्लास्ले इचार पाहिजे तें!आते पाउत आम्ही घरमाचं दडपायेलं व्हतुतं!"सुर्या जोर जोरम्हा गया
  काढी रडी ऱ्हाऍंता!बाप्या आनी भुऱ्यांनां आंगवर रवसडी-रवसडी जायी ऱ्हायंता!बोंबली ऱ्हायंता
,"कालदिनं तुम्ही दोन्ही मियीस्नि
 ठरायेल व्हत!टपरी जागावर सापडावू नई म्हनीसनी!"🌷

भुऱ्या आणि बाप्या आयकीस्नि भेमकायी ग्यात!आंगे पांगेनां दोन्हीस्ले वटका करालें लाग्नात!सुर्या त्यास्न नाव ली ऱ्हायंता!गंध्यापटक गाया टिकाडी तयतयी ऱ्हायंता!
"भयनां बाट्टोड तुम्हीचं चेटाडी पान टपरी!कालदिंन तुम्हीचं दडपायेल व्हतातं आठे!येडाचाया करी ऱ्हायंतात!टपरी दिखावू नई आस सांगी ऱ्हायंतात!"बठ्ठा
लोके भुऱ्या आनी बाप्याना आंगवर सुटीपडनात!त्यास्नाचं डोकावर खापर फोडी ऱ्हायंतातं!
भुऱ्या जीवतोडी बोलना--
"मायच्यान भो!आम्हनां धल्ला धल्लीनी सपथ ली सांगतस आम्ही चेटाडी नई टपरी!काहीतरी 
दुसरंज घडेलं दिखस!दुसरंच काये-गोरं दिखस!"🌷

तवसामा रातले फटफटीवर सहेरम्हा जायेलं शंकर येता बरोब्बर बोलना--
"सुर्या तू रातले टपरी बंद कराना येलें बाहेर टांगेल इलेक्टरीक लायटर तश्याच इसरी ग्या का रें!लाईट चालू ऱ्हाई गयेती!मी जाताजाता तूंनं टपरीवर उंथु!..धुयालें जावानी जलदी व्हती!मव्हरे निंघी गवू!..तुले फोन करनार व्हतु पन इसरी गवू मन्ही गडबडमां आनी आते राख दखी ऱ्हायनू!!"🌷

लायटर गरम व्हयी व्हयी 
टपरीनां लाकूडनां भाग चेटी गयेता व्हयी!टपरीम्हान्या पुड्या-पाड्या बयी-बुयी खाक व्हयी गयत्यात!सुर्या तोंड झोडी ऱ्हायंता!भुऱ्या आनी बाप्याना गयावर येल सुरी निष्टी जायेलं व्हती!खरं कारण समजन व्हत!वखरायेलं पोरेंस्नि इज्जत वाची
 गयती!टपरी चेटी गयी!घुटका,पान,तंभाकू बठ्ठा बयी ग्या!त्याम्हा पोरेंस्न लत्ताय
 व्यसन भी बयी गये!व्यसन सुटी गये!घुटका खायी दांडगाई दखाडनारा!घुटकानां गंधापटक लाल दात्तड्या धव्व्या व्हवालें लागी ग्यात!🌷

व्हट वर उचकटी धव्व्या दात दखाडी पोरे मोके चोके हासालें लागी ग्यात!पोटभरी जेवाले लागी ग्यात!घुटकामुये शरीरथुन पोक्कय व्हयेल पोरें नेम्मंन लाईनवर यी ग्यात!भरीम व्हयी वावरम्हा घाम गायालें जावाले लागी ग्यात!उगा-मुगा,खोया-खोसी, राबी-रुबी गच्ची पैसा कमावाले लागी ग्यात!

सूर्यालें गावनी मदत करी!आखो नवीन टपरी टाकी दिन्ही!घुटकानं जागेआते... जिर,मोहरीन्या पुड्या दिखाले लागी ग्यात!सुर्या गुईनी भेली इकालें लाग्ना!किराणा दुकान पैसा देवाले लाग्न!सुर्यान्ह नाव बदली 'सुरेश' व्हयी गये!बाप्यानां 'बापूसाहेब'व्हयी गया!भुऱ्यानां 'भाऊसाहेब'व्हयी गया!गावंम्हा धल्ला पल्लास्ना सबद झेलालें लागी ग्यात!मान मर्यादा वाढी गयी!इतली करामत त्या टपरीनी करी!रद्दड हालकं-फालक ते बठ्ठ उब्याम्हा बयी गये!...मांगे आस्सल सोन ऱ्हायी गये!सच्चाइना मार्ग मोक्या व्हयी आनंद देवाले लाग्ना!घुटकानी टपरी बयी गयी गावलें आनंद दि गयी!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
----नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे,
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं.७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-०६मार्च२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)