ज्ञानज्योतिस अभिवादन
ज्ञानज्योतिस अभिवादन
💐💐💐💐💐💐
*******************
...नानाभाऊ माळी
********************
नमस्कार बंधू-भगिनींनो!
आज २३मार्च २०२२!उन्हाची तीव्रता वाढते आहे!पायाला, डोक्याला चटका जाणवतो आहे!सृष्टीचा साज शृंगार चालूच आहे!पानगळ सुरूच आहे!नव पालवी फुटते आहे!सृष्टीतील प्रत्येक जीव नवनिर्मितीच्या खेळात व्यस्त आहे!जुने ते त्यागून सृष्टीचा खेळ सुरूच आहे!जीव एकरूप होत आहेतं!निर्मिती आणि विलयाच्या खेळात दंग असणारी सृष्टी मानवी जीवनात देखील विविध रंग भरत असते!नवंरंगांच्या खेळात माणूस एकजीव होतो आहे!जुना देह सोडोनि नव्या देहात मार्गक्रमण सुरूच आहे!निर्मिती विलयाचा खेळ क्षणोक्षणी सुरूच आहे!🌷
मनुष्य योनीच्या फेऱ्यातील कार्यकर्तृत्वाच्या जोरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी माणसे जन्माला आलीतं!खूप कमी काळात आपली ओळख मागे ठेऊन गेलीत!आपल्या जगण्याचं तत्वज्ञान मनामनात रुजवून गेलीत!आपल्या श्रमाचा हिरवागार बगीचा येणाऱ्या पिढीला थंडगार गारवा देत राहील म्हणून आयुष्यभर झटत राहिलीतं!आपल्या कार्यकर्तृत्वाचा अनमोल ठेवा येणाऱ्या पिढीकडे सुपूर्द करून पुढील प्रवासाला निघूनही गेलीत!जिद्द-चिकाटीच्या जोरावर, कष्टातून सुंदर बाग फुलवून निघूनही गेलीत!येणाऱ्या पिढी पुढे कष्टाचा आदर्श ठेवून गेलीत!
महान व्यक्तींच्या खडतर जगण्यातून इतिहासाची निर्मिती होत असते!इतिहासातील त्यांची नोंद येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक असते!बोधिसत्व असतं!अमृत असतं!अनुभूतीची आदर्श गाईड लाईन असते!जगण्याची उमेद निर्माण करणारी असते!🌷
बंधू-भगिनींनो!
इतिहासाला नोंद घेणे भाग पडले अशा व्यक्तिमत्वाला माझ्या बालपणापासून पाहिले होते!...मी शाळेतील सहावीच्या वर्गात जाणार होतो!आमच्या दोन नंबर वरीष्ठ भावाचं लग्न ठरलं होतं!भाऊ पुण्यात होते!..लहान कंपनीत कामाला असल्यामुळे तसा पगार कमीच होता! मुळातचं अतिशय गरीबीची परिस्थिती होती!आमच्या पूर्ण कुटुंबाने लग्नाला जाण्याइतपत सुद्धा आर्थिक परिस्थिती नव्हती!तरीही मी आईच्या पाठीमागे धोशा लावला आणि माझं सौभाग्य की मी लग्नाला जाऊ शकलो!आणि१९७४ साली भावाचा विवाह काही निवडक वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने त्यांच्याच सासुरवाडीत पार पडला होता!वहिनी त्यावेळच्या११वी पास होत्या!भाऊ देखील११वी पास होते!..पुण्यात छोट्या मोठ्या कंपनीत नोकरीला होते!🌷
सौ.वहिनी आणि बंधू पुण्यात हडपसर मधील ससाणे नगरला राहू लागले!परिस्थितीला सामोरे जात! संसारात मदत म्हणून काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळाव या उद्देशाने ससाणे नगरला जवळपासच्या घरातील बालकांसाठी बालवाडी सुरू केली!स्वतः भाड्याच्या खोलीत राहून बालवाडीतं मुलांना शिकवू लागले!पुढे बंधू देखील मोठ्या अर्थात टाटा कंपनीत कामाला लागले होते!संसार रथाची चाके फिरत होती!💐
बालवाडी नंतर पहिलीचा वर्ग सुरू झाला!जागा कमी पडू लागली!पण भाड्याच्या खोलीतचं वर्ग सुरू होते!शासन मान्यता मिळत गेली!नंतर दुसरीचा वर्ग सुरू झाला!नवीन शिक्षक नेमण्यात आला!वहिनी शिकवीत होत्या!.बंधू टाटा कंपनीत पहिली, दुसरी आणि नाईट शिफ्ट ड्युटी करून वहिणींसोबत गल्लोगल्ली शाळेसाठी मुलं गोळा करीत हिंडत असतं!एक एक वर्ग वाढत गेला!मोठया कष्टाने ससाणेमध्ये जागा विकत घेतली!उभयता पती-पत्नी आणि नातेवाईकांच्या मदतीने पाया खोदला!इतकी गरीब परिस्थिती होती!पण शिक्षण क्षेत्रातील ओढ शांत बसू देईना!💐
स्वतःची जागा बांधली!त्यात स्वतः राहू लागले!घरात लक्ष्मीच्या पावलांनी कन्यारत्नाच आगमन झाले!तिच्या आगमनाने घर गोकुळ झाले!तिच्या हसऱ्या बोलांनी घरात आनंद नाचत होता!इकडॆ इतर खोल्यांमध्ये शाळेचे वर्ग भरत होते!एक एक वर्ग वाढत होते!विद्यार्थी संख्या वाढत होती!जागा अपुरी पडत होती!शासन मान्यतेसाठी पळापळ चालूच होती!भाऊ आणि वहिणींची पळापळ-धावपळ चालूच होती!पहाता पहाता१० वी पर्यंत वर्ग वाढत गेले!शाळा वाढत होती!स्वतःच्या जागेत बांधकामे करून शाळा सुरू होती!कामाचा व्याप वाढत होता!विस्तार वाढत होता!शिक्षक,स्टाफ वाढत होता!सोबत ताणतणाव वाढत होता!🌹
पुढे पुण्यातील इतर भागात देखील शाळांचा विस्तार वाढला!वारजे माळवाडी,दत्तनगर आंबेगाव,कात्रज,लोणी, साडेसतरा नळी,कदम वाक वस्ती अशा विविध ठिकाणी बालवाडी ते दहावी पर्यंत वर्ग भरू लागले!सर्वंच ठिकाणी संस्थेने विकत जागा स्वतःच्या जागेत शाळा बांधल्या!अन पहाता पहाता ज्ञान विस्ताराचा विशाल वृक्ष झाला
१९८३ साली लावलेलं छोटस रोपटं विशाल ढेरेदार वृक्षात रुपांतरीत झालं होतं!!"महात्मा फुले विद्यानिकेतन"संस्थेच्या अनेक शाखांमध्ये,शाळांमध्ये विद्यार्थी ज्ञान घेत होते!काळ पुढे सरकत असतो!वेळ पळत असते!माणूस पळत असतो!अनेक समस्यांना तोंड देत उभयता पती-पत्नी धावपळ करीत होते!संस्थेचा व्याप वाढला होता!ताण वाढत होता!धावपळ थांबत नव्हती!सर्व शाळा मिळून ६००० विद्यार्थी संख्या वाढली होती!कष्ट करून उभ्या केलेल्या विद्यादेवतेची,ज्ञानदेवतेची अखंड सेवा सुरूच होती!कन्या कु. स्मिता(सोनू)दिदी देखील मोठी झाली होती!ग्राज्युयट झाली होती!🌹
...अन!अन!अचानक एके दिवशी सौ वहिणींची तब्येत बिघडली!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांच्या महान ज्ञानमार्गावर चालणाऱ्या सौ.शैलाताई रतन माळी!मोठ्या बाई,माळीण बाईं यांचं अतिशय तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं!तो दिवस होता २३ मार्च २०००!...दुःखाच्या अतीव वेदनेने त्यांचे पती श्री.रतन माळी सर कोलमडून पडले होतें!मुलगी सोनू दिदी हे दुःख सहन करण्याच्या पलीकडे होती!धाय मोकलून रडत होती!सर्व नातेवाईक तिला जवळ घेऊन दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करीत होती!कष्टाचा,दुःखाचा डोंगर पार करीत उभयता सर्वांना आनंद देत राहिले!शिक्षकांना माया अन प्रेम वाटीत राहिले! सुखाचा,आनंदाचा काळ उपभोगण्याचे दिवस होते!पण का कोण जाणे नियतीला हे मान्य नव्हतं!रथाचे एक चाक अचानक निखळून,कोलमडून पडले होते!माझी वहिनी या जगाचा निरोप घेऊन दूर दूर निघून गेली होती!निजधामच्या अंतिम ठिकाणी निघून गेली होती!🌹
२३मार्च २०००चा तो दिवस दुःख देवून गेला!ज्ञानदान देणाऱ्या ज्ञान ज्योतिस घेऊन गेला!माहेरील नाव "तुळसा" होतं!वृदांवणातील तुळस पावित्र्याची ओळख करून देत दूर निघून गेली होती!कै सौ शैला ताई रतन माळी कष्टासोबत दूरदूर निघून गेल्या होत्या!ज्ञानदान देत कागदाच्या पानावर इतिहास लिहून दूर निघून गेल्या होत्या!सर्वांच्या डोळ्यांत डबडबलेलें अश्रू सोडून दूर निघून गेल्या होत्या!💐
आज२३मार्च२०२२!...गेल्या २२ वर्षांपासून सौ शैला ताई रतन माळी बाईंचा,मोठ्या बाईंचा स्मृतींना उजाळा देत विविध उपक्रमांनी स्मृतिदिन साजरा होत असतो!त्यांची कन्या सौ.स्मिता दिदी वाघ आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत!तर जावाई बापू प्राचार्य रवींद्रजी वाघ सचिव म्हणून कार्यरत आहेत! दरवर्षी बाईंच्या कार्यकर्तृत्वास प्रणाम केला जात असतो!२०० शिक्षक आणि स्टाफ संख्या असलेल्या या विशाल वृक्षाच्या सावलीत ज्ञानदान सुरूच आहे!गेल्या आठ-नऊ वर्षांपासून "कै.सौ शैलाताई रतन माळी डी टी एड" कॉलेज देखील सुरू केले आहे!मुख्य शाखा ससाणेनगरला देखील११वी१२वीच्या तिघी फॅकल्टीज सुरू आहेत!💐
इतिहासाच्या पानांवर विशेष नाव कोरलेल्या या विशेष व्यक्तिमत्वाला!ज्ञान ज्योतीला! विध्यार्थ्यांच्या आईला!ममतेच्या जन्मदात्रीला!माझ्या वहिनीला! आज आपल्या२२व्या स्मृती दिनानिमित्त विनम्रपणे अभिवादन करतो!!आपल्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली वाहतो!उजाळा देतो!💐
***************
🌹🌹🌹🌹
**************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं- ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२३ मार्च २०२२
Comments
Post a Comment