पती-पत्नीचं नातं

पती-पत्नीचं नातं
🌹🌷🌹🌷🌹
**************
...नानाभाऊ माळी

बंधू भगिनींनो!नमस्कार!
 एक रचना अशी आहे🌸🌸....

तू आहेस म्हणुनी
हा वसंत फुलला आहे
अंगणी आपुल्या तुळशी
हवेत झोका घेते आहे🌷

तुझ्यामुळे कानावरी
भक्ती गीत ऐकू येते
पाषाण हृदयी मजला
तू देवा जवळी नेते🌷

तू आहेस म्हणुनी
दारी रांगोळी हसते
घरी आपुल्या तुझ्यारुपी
गृहलक्ष्मी दिसतें...🌷

तुझ्या मुखी सूर्यफूल
सदा प्रसन्न तू दिसते
फुलविले घरची बाग
 हृदयात माझ्या असतें🌷

तुझ्या डोळ्यातला डोह
कधी ओसंडूनि वाहतो
तळ सापडेना मजला
रोज शोधूनि पाहतो!🌷

प्रेमात चिंब भिजावं!ओसंडून वहावं!पौर्णिमेचा चंद्र एकमेकांच्या डोळ्यांत पहातं रहावा असं एकजीव प्रेम पती पत्नीचं असावं!स्वर्गालाही हेवा वाटावा!देवादिकांच्या राजधान्या पृथ्वीवर धडकाव्यातं!त्यांनी देखील येथील तिखट,गोड,आंबट चव चाखावी!आदर्श निर्माण करणारे पती- पत्नीचं प्रेम डोळेभरुनी पाहावे!
सांगायचा मुद्दा असा आहे की..... आपल्या शेजारी-पाजारी असं फुलत जाणारं प्रेम कुणाच्याही ध्यानी येत नाही!ते बघायला वेळच मिळत नाही हो आपल्याला!डोळ्यांवर घट्ट पट्टी बांधून वेगळ्याच धुंदीत जगणारे आम्ही!डोळसपणे पहात नाही!का प्रेमात डुंबत नाही?🌷

मन,विश्वास,हृदय,श्रद्धा,ओढ आणि आपुलकी एका साच्यात ओतून जन्म घेणारं प्रेम खऱ्या विवाहाची ओळख असते!पती-पत्नीचं अतूट नातं घट्ट बांधलं जातं असतं सहजीवनानें! अंतःकरणातून दोन्ही एका श्वासात एकजीव होत असतात!प्रेम अनंत धाग्यांनी विणलं जातं असतं!प्रेम प्रभूराम सीता मातेचं होऊन बसतं!प्रेम कधी भक्तीरूपी कृष्ण-रुख्मिनीचं होऊन बसतं!प्रेम विश्वासाच्या अनंत धाग्यांनी अधिक घट्ट रहात!विणलं जातं असतं!अशा आदर्श प्रेमात पवित्र आणि पावित्र्याची ओळख होत जाते!'तू' आणि 'मी' असा भेद तीळमात्र देखील शिल्लक रहात नाही त्यात!एकजिनसी प्रेम निर्माण करणारें पती-पत्नी आदर्श होऊन जात असतात!श्रद्धा बनून जातं असतातं!🌷

पती-पत्नीच्या नात्यात तिखट,गोड आणि आंबट स्वादाची चव जरूर असावी!त्याच्याशिवाय संसारात मजा नाही!पण 'अति"ज्यात पडतं ते दुःखकारक असतं!सुखाची चव चाखतं विरहाच्या अग्नितीलं वेदना गोडवा निर्माण करणारं प्रेम जिवंतपणाचं लक्षण असतं!भिन्न स्वभावात आणि प्रकृतीत साहजिकच, स्वाभाविकचं मत भिन्नता असतें!भिन्न मत मांडतांना दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर करून!ताडजोडीतून सुंदर आयुष्याचा आनंद सिद्ध करीत जीवन सफलतेकडे वाटचाल करीत रहावे लागते!तेथे जीव टाकणारे प्रेम गुलाबासारखं टवटवीत दिसतं असतं!🌷

बंधू-भगिनींनो!
 मोठया गौरवाने प्राप्त झालेला मनुष्य जन्म आपल्याला भाग्यांनें मिळालेंला आहे!त्याचा गौरव वाढविण्यासाठी आपण अहोरात्र पळत असतो!झटत असतो!कष्ट करीत असतो!यातना भोगीत असतो!वेदना सहन करीत असतो!स्वाभिमान जपत जीवन वाटचाल करीत असतो!विश्वास निर्माण करीत तारेवरची कसरत करीत जगत असतो!जगणं सुंदर करीत असतो!कुटुंबाला आधार आणि आनंद देत अहोरात्र कष्ट करीत असतो!पती-पत्नी हे कार्य हृदयातून पार पाडीत असतातं!

पती-पत्नी हे जीवन प्रारंभाचे उद्गाते असतातं!एकमेकांच्या साथीने!सहयोगाने!संगनमताने! एक दिलाने!एक विचाराने निर्णय घेत असतात!विवाहाची खरी व्याख्या त्यांच्या एकजिनसीपणातं असते!सप्तपदीचा अर्थ सकरात्मक कृतीतून दिसून येत असतो!एकजीव झाल्याशिवाय!जीव ओवाळून टाकल्याशिवाय!.. प्रेम रुजत नसतं!विश्वास आणि श्रध्दा पाया असतो प्रेमाचा!पती-पत्नीच प्रेम म्हणजे फक्त शरीर सुखचं नाही!अंतरातम्याचा खोल आवाज ओळखणार नातं म्हणजे पती-पत्नी असतातं!ते नातं अंतःकरण ओतून सुंदरतेच्या जवळी नेणार असतं!भावनांच्या रसायनानें एकजीव झालेलं प्रेम सदाबहार असतं!हिरवळीनें परीपूर्ण असतं!हे नातं कोणाच्या वाद विवादाने विचलित होणारे देखील नसतं!🌷

पती सागर असतो!पत्नी नदी बनून त्यात एकजीव होत राहाते!
दोघांमध्ये विश्वासाचे भरीव नाते फुलत जात असतं!बहरत राहतं!नातं एकमेकांत गुंतत जातं!सागरातील नावेतं बसलेले पती-पत्नी धीराने, आधाराने, एकमेकांच्या सहभागाने संसारी नाव वल्हवीत असतातं!पतिपत्नी मधील कोमल अन नाजूक नात्यांची उकल आतून बाहेरून एकजीव झाल्यावरचं होत असते!दाह शांत करणे म्हणजेच प्रेम नसत!शांत,कोमल,सहजीवन, श्रध्दा प्रेमाचे सहयोगी असतात!

पती-पत्नी जीवन रथाची दोन चाकं असतातं!दोघांचं मन घोडे होऊन रथाला ओढीत असतातं!आयुष्यभर एकमेकांना साद आणि साथ संगत देण्याचं पक्के आश्वासन असतं ते नातं पती-पत्नीचं असतं!स्त्री-पुरुष एकरूप होण्याचं पवित्र आणि श्रेष्ठ नातं असतं!एकमेकांत हळुवार गुंतत जात अतूट नात्यांची गाठ पक्की बांधली जात असतें!इतर कोणीही त्यांनी बांधलेली गाठ सोडवू शकत नाही!प्रेमातलं समर्पण काळीज ओवाळून टाकणारं असावं!एकमेकांसाठी,नात्यांसाठी, समाजासाठी चंदनासारख झिजणारं अंतःकरण असावं!शरीर असावं!तेथे पती-पत्नीचा सुमधुर संवाद आत्मिक ओढीने चाललेला असतो!🌷

झिजता झिजता चंदन श्रद्धेशी एकरूप होऊन जातं असतं!चंदनाचा लेप एकचित्त झालेल्या श्रद्धेला समर्पित होऊन आपलं अस्तित्व संपवून टाकीत असतं!पावित्र्याचा सुगंध चौफेर फुलत असतो!सुमधुर सुगंध उडत असतो!संवेदनशील मनाच्या गर्भगृहात पती-पत्नीचं प्रेम पावित्र्याचा अंगीकार करीत असत!त्याग करायला शिकत असतं!प्रेम पती-पत्नीतील संवेदनशील दुवा असतो!राग लोभ हे जन्मतःच सोबत येत असल्याने टाळता येत नसतात!महामानवांना ही जमले नाही तेथे नानाभाऊ माळी देखील त्यास अपवाद नाही!अति स्वार्थाचां त्याग करायला शिकलं की अनेक मोहावंर विजय मिळविता येत असतो!पती पत्नीने तेच जपून चालायचं असतं!त्यागवृत्ती मानवी
 मनाला नवचेतना प्रदान करीत असते!पती-पत्नीमध्ये त्यातून जिव्हाळा जन्माला येत असतो!संवादी वृत्ती जन्माला येत असतें!

बंधू-भगिनींनो!
पती-पत्नीच्या अंतःकरणात हळवा कोपरा असतोचं असतो!ओलाव्याचा पदर असतो!हसता हसता रडण्याची!दुःख सहन करण्याची परमेश्वरी देणगी 
स्त्रीला दैवाने प्राप्त असते!अतीव दुःख झाल्यावर ती पटकन अश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त करीत असते!हसता हसता दुःख सहन करीत नणंद,दिर, सासू-सासऱ्यांचा सन्मान करीत जगत असते!मुलांचं संगोपन फक्त आईचं करू शकते!भिन्न भूमिका पार पडणारी पत्नी सहन शक्तीचा विशाल भंडार असते!तिच्या सहनशक्ती वृत्तीमुळेचं पती सुखात असतो!निर्धास्त असतो!झोकात असतो!कधी बेताल ही होतो!🌷

माया-ममतेच्या मोहजाळात अडकलेली "ती" अपेक्षांचं ओझं कधीच नवऱ्यावर टाकत नाही!बऱ्याच गोष्टी अशा असतातं की तिच्या पोटातून!ओठातून कधीच बाहेर येत नाहीत!स्वतःच समर्पित भावनेने जीवन सफल करीत असते!जगणं मनोहारी करीत असतें!अनंत फुलांनी सजलेलं आनंदाचं ताट बनत असतें!पत्नी सर्वस्व अर्पून पती प्रेमात चिंब भिजत असतें!सतत साद देत पतीची ऊर्जा बनत असतें!उजेड देत असते!समाजात नावलौकिक वाढवत असतें!अस्सल सोनेरीपन लेवून लोखंडाला स्वतःकडे ओढीत सोनेरी मुलामा देत असतें!पत्नी घराची लक्ष्मी असते!लक्ष्मी पद टिकून राहण्यासाठी आयुष्य खर्ची घालत असतें!पतीचा हृदयाचा तुकडा होतें!जन्मोजन्मीची प्रियसी होते!

पत्नी पतीचा श्वास असतें!सातजन्मीची प्रेमिका असते!मैत्रीण असतें!जगण्याची आस असतें!प्रेमाची रास असतें!पत्नी आराधना असते!ती काळीज असतें!स्वप्न साकारणारी, झिजणारी पत्नी पतीचं जीवन असते!तर पती गळ्यातील मंगळसूत्र असतो!सौभाग्याचा मूर्तीमंत देह असतो!समाजात मनाने जगण्याचा अधिकार असतो!भक्तीने स्वइच्छेने स्वीकारलेला परमेश्वर असतो!रक्षक असतो!समाजात सन्मान मिळवून देणारा साथी असतो!पती पत्नीचा उत्तम मित्र असतो!.....दोघांनी मिळून मिसळून अंगीकारलेला संसार सुखाचा पाया मजबूत करणारे पती-पत्नी आदर्शांची शाळा असतें!🌷
*******************
🌹🌷🌹🌷🌹🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-३० मार्च२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)