उन्हाळा जारे तू आता
उन्हाळा जारे तू आता
🌷🌞🌞🌷
****************
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
उन्हाळा लागला म्हणजे नाले,नद्या हमखास सुटी घेतात!नाहीतर त्यांना सुटी तरी कुठे एखाद्या सरकारी नोकरसारखी! सतत पाण्याखाली गुदमरणारें खडक उघड्यातं उन्हाने अंघोळ करीत आहेतं!खोल गेलेल्या विहीरीतून शेताला जलाभिषेक कधीतरी होत आहे!बारीक सारीक झिर-झरें विहिरीच्या तळाशी उड्या मारून पाण्याची पातळी वाढवत आहेत!विहिरीचं पोट भरतांना दिसत आहेत!..उन्हाने तापलेली!रापलेली जमीन नांगरलेल्या ढेकळात मनसोक्तपणे उन्हाची अंघोळ करीत पडली आहे! चटका देणाऱ्या उन्हात उष्ण वारे वाहतांना हळूच जमिनीला स्पर्श करीत आहेत!धूळ मस्तकी धारण करून वारा खुशाल वादळासोबत एकजीव झालेला दिसतो आहे!कुठेतरी हिरवा टवका उगाचंच आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे!ओयसीस होवून मिरवतं आहे!अन मग मोकाट गुरा ढोरांच्या तोंडाचा घास होतो आहे!बांधा बांधावर काटेरी विलायती बाभळी पदर ओढण्यास उतावीळ आहेत!
चटका देणारं ऊन!...पायाला, अंगाला,डोक्याला मनाला देखील चटका देत आहे!उन्हाळा चटका देत असतो!भाजून काढीत असतं!आतून बाहेरून भाजून काढणार ऊन ऋतू बदल घडवीत असतं!सृष्टी नव चैतन्याच दर्शन घडवीत असतें!चटक्यात देखील आनंद आहे हो!जिकडे पहावे तिकडे सृष्टीचं सुंदर रुपडं नजरेस पडतं असतं!ऋतू सजलेला असतो!शृंगारीक असतो!उन्हाने माखलेले फाल्गुन-चैत्र-वैशाख महिनें धूळ उडवीत खुशाल हिंडताहेत बेटे!धुळीच्या विविध रंगी वावटळीत निसर्ग धुळवळ खेळतो आहे!सृष्टी उन्हात देखील सौंदर्याचा साज नेसून मोहवीत आहे!🌷🌞
शेतीचा प्राण पाणी असतं!गहू-हरभरा पाणी पिऊन तृप झालेलें!दोन्ही पिकं वयात आलेंली!शेत कापून मोकळं झालेंलं!सतत शेतीत खळखळ वाहणारं पाणी उन्हाळ्यात
विहिरीतून वर येत नाहीये!खोल गेलेंल्या पाण्यामुळे मोटारींना दम लागतो आहे!दमा दमाने उपसा निघतो आहे!तहानलेली जमीन घटाघटा पाणी पिवून अधाशीपणे पुन्हा पुन्हा पाणी मागते आहे!विहिरीच्या पोटात असेल तर ओठात पाणी येईल हो!वाऱ्यावर उधळलेलं गव्हाचं कुटार आकाशात नाचत आहे!गरम भाजक्या-चटक्या झळा कानशिलात देवून पुढे पळ काढताहेत!दूरवर एखाद दुसरं हिरवळीचं बेट नजरेच्या टप्प्यात येतांना दिसतंय!ज्या विहिरीला थोडफार पाणी आहे,कडक उन्हात हिरवळ लेऊन मळा फुललेला दिसतो आहे!🌞🌷
उन्हाच्या झळा सहन करीत अनेक झाडांच्या फांद्यावर जुनी पाने गळून नवी पालवी नाचू लागलेली दिसत आहे!वाऱ्यासोबत खेळ सुरूच आहे! अनेक झाडं फुलांनी बहरलेली दिसत आहेत!शेताच्या बांधावर!गावाच्या गल्ल्यातून,शाळा, ग्रामपंचायतीच्या आसपास कडूलिंब नववधुगत हिरवागार शालू नेसलेला दिसत आहे! छोट्या-मोठया सुंदर फुलांचा सडा जमिनीवर पडलेला दिसतो आहे!लहान मोठया लिंबोळ्या वरचेवर वाऱ्यावर नाचत आहेतं!हसरी, नाचरी अन खोडकर सृष्टी खुशाल ऊन पांघरून बसली आहे!उन्हात न्हाऊन निघत आहे!🌞🌷
अंगावर ऊन घेतलेल्या फाल्गुन-चैत्राचा जोश तर चौफेर जाणवतो आहे!गुढीपाडव्याचं आगमन म्हणजे आनंदाची
पर्वणीचं आहे!गुलमोहराची झाडं भगवा रंग उधळीत इकडे तिकडे डौलाने उभी आहेत!फुलकेशर आपल्या सुगंधित फुलांच्या वर्षावानें मन मोहित करीत आहे!वरवर चढणाऱ्या सूर्य देवाच्या रथासोबत उष्ण लाटांनी चौफेर आपलं राज्य स्थापित केलेलं दिसतं आहे!झाडा झुडपातून किड्यांचा किर्रर्र सूर कानी पडतो आहे!पक्षी झाडा झुडपात विसाव्याला,आडोशाला थांबलेंली दिसत आहेत!🔥🌷
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे!बदल सृष्टीची देणगी आहे!उन्हाळा,पावसाळा,हिवाळा ही दानपात्रे आहेत!बदलातून स्वयंपूर्णतेचा संदेश देणारी ही प्राचीन परंपरा कायम 'जीव जीवश्य जीवनम:चा' खेळ खेळते आहे!प्राणी,पक्षी,माणूस या बदलाचे भागीदार आहेत!निर्मिती अन विलयाच्या विस्मयकारक खेळात माणूस देखील सहभागी झाला आहे!अपूर्णतेकडून पूर्णतेकडे चालणारी वाटचाल सुरूचं राहणार आहे!मी अर्थात नानाभाऊ माळी देखील सृष्टीच्या मनोहारी खेळात दंग होतो आहे!ऋतू बदलातून स्वतःस सिद्ध करीत आहे!उन्हाच्या ज्वाळातभाजून निघत आहे!🌷
उन्हाळ्यात स्वतःस सिद्ध करणारी,फुलं फळांनी बहरलेल्या सुंदर सृष्टीचा हा उपहार नवचैतन्याचा बहार आहे!शेताच्या बांधावर चिंच उभी दिसते आहे!आंबा अंगावर खांद्यावर कैऱ्या घेऊन उभा आहे!आपलं ते स्वयंस्फूर्तीने दान देण्यासाठी आतुर आहे!दिलेलं दान भरभरून घ्यायला माणूस देखील उतावीळ झाला आहे!अंतःकरणातून देणारी सृष्टी आणि घेणारे आपण एक जीव झाल्याशिवाय सुंदर समागम झाल्याचं समाधान मिळत नाही!उन्हाळा त्यासाठीच नेहमी प्रमाणे भेटावयास आलेला आहे!उन झेलून सावली देणारें अनेक वृक्ष,झाडे गुरुवर्य झालेले आहेत!तृष्णेला जाग आलेंली आहे!झाडावरील सावलीत पक्ष्यांची कुजबुज उन्हाळ्या विषयी बोलणी करीत आहेत!चिवचिवटाने सावली फुलली आहे!कधी कीटकांच्या किर्रर्र आवाजाने शांत पहुडलेल्या उन्हाला देखील आनंद झाला आहे!🌞🌷
उन्हाळा ऊन घेवून झंझावाती दौरे करीत आहे!माती उडवून वादळाच्या खांद्यावर बसून सैर दुरदूरची करीत आहे!भकास माळरानावर वादळाची चाहूल लागलेंली आहे!समर्पणाची गोष्ट वेगळी आहे!उन्हाच्या दारी गलितगात्र झालेले जीव मुठीत धरून पावसाळ्याची वाट पहात एकजूट झालेले आहेत!उन्हाचा चटका घेत "उन्हाळा जारे तू आता"म्हणत गीत गात आहेत!
🌷🔥🌞🌞🔥🌷
*******************
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२७ मार्च २०२२
Comments
Post a Comment