उगता बुडतानां खेय न्यारा

उगता बुडतानां खेय न्यारा
🌷🌷🌷🌷🌷🌷
*****************
...नानाभाऊ माळी


भाऊ-बहिणीस्वन!
कालदिंन आम्हनी गल्लीम्हा पोरें खेयी ऱ्हायंतातं!तश्या रोजचं खेतस!सकायलें,दिमुईलें दुपारलें गल्ली नाचत ऱ्हास! बरं वाटस!कव्हय मव्हय नको वाटस! चिवचिवाट कानवर पडावर धल्ला-पल्लाभी धाकल्ला पोरें व्हयी जातस!पोरेस्नि खेतं ऱ्हावो धल्लासनी दखत बठो!कव्हय मज्या वाटस ते कव्हय झगडानां कहार वाटस!एक मातर खरं से वयनं आंतर मिटी जास!धाक्कल्ला पोरेसनी यासन्या दाढ्या-मिश्या व्हडतं ऱ्हावो!चष्मा व्हडतं ऱ्हावो! हात्मा धरेल टेकानी काठी व्हडतं ऱ्हावो! कव्हय धल्लीनं लुगडं व्हडो!धाकल्ला पोरेस्ले मज्या वाटतं ऱ्हास!धल्लास्ले धाकल्पन आठस,पोरे व्हयी खेवाले भेटस!

धल्ला-पल्ला धाकल्ला पोरेंस्ले मित्र समजालें लागी जातस!
सोतालें त्यास्मा ढकली देतस !आपलं धकल्पनं त्यासमा दखालें लागी जातस!एक दुसरानां व्हडा दोन्हीस्ले लागी जात ऱ्हास!येखांदा दिन कोन गावले गये,बजार हाटलें गये,दिखनात नई ते जीवलें खुरखुरा-हुरहूरा लागी जातं ऱ्हास!एक उगता यांय ऱ्हास ते दुसरा मावयता ऱ्हास! उगतालें दखी दखी मावयता खुश ऱ्हास!तोंडम्हानां दात पडेल तरी कवचं हासत ऱ्हास!🌷

कोन कोनंलें नात गोत जीवलें व्हडा ऱ्हास!धल्ला-धाकला वय चोरी,दोन्ही रस्तावर खेयेत ऱ्हातंस!काठी टेकी ध्ययडपन हायी मव्हरे पयेत ऱ्हास!🌷

धाकल्पन भलत उलगेल नाक्खयपना करत ऱ्हास!हाट्टी-कट्टी म्हनत म्हनत सारा दिन निंघी जास!दगड फेकी काच फुटावर दानाफन व्हस!धल्लांगम बोट दखाडी धाकला गुंम व्हस!हायी वय शाया उंडायांना खेय से!भलता उन-सावलीनां मेय से! 
 धयडपनम्हा धाकल्पनं खंगयी मनमोके खेवानं ऱ्हास!सोता खंगयी-खुंगयी धाकला व्हयी मव्हरे धयेडपन पयेत ऱ्हास!दुखनं-दाखनं बठ्ठ इसरी धयेडपनचं इसरानं ऱ्हास!वयनां हाऊ तगादा भारी!पोरेंस्न धाकल्पनं डोयाम्हा म्हास🌷

धल्ला-धल्लीस्नि जगी लेवो!धाकल्लासनी भी मुकल शिकी लेवो!जुनी भीत जुना टोकरलें नवा संगे सोडी देवो!आक्सी जुनी-पानी उडतीन उतारी कचूकड्या संगे खेयेत ऱ्हावो!उडतीनम्हायीन धाकल्पनं झामली-झुमली व्हडत ऱ्हावो!धाकल्पनं पयेतं-खेयतं बच्च ऱ्हास!हिरद उज्जी सच्च ऱ्हास!वय मुकल कच्च ऱ्हास!धाकला व्हयी धल्ला-धल्लीनी एकमझार गम्मत ऱ्हास!मुकलं पोरेंसंगे खेयी लेवो!जिंदगी मुकली जी लेवो!थकेल-थुकेल तिसरा पाह्येरें धल्ला-धल्लीसनी जगी लेवो!🌷

पोरें मुकला खोडाय ऱ्हातसं!
सांडेलं पानिंगत व्हातंसं!येडाचाया करी-कुरी धल्ला-पल्लास्न डोकं खातंस!धल्ला न्यामी शानला ऱ्हातसं! सोता खोल समुंदरनं पानी व्हतंस!अनुभवनी शाया शिखी ग्यान माणुसकीनं देत ऱ्हातसं!पोरें घोमाल्या धांड्या ऱ्हातसं!ताज खरबेल दूध पेतंस!कुडीमां बठेल खुमारीगुंता हुसत्या-कुस्त्या मोके खेतस!🌷

पोरें जढनन्हा मार्गे जातस!
धल्ला उतारंगमं चालत ऱ्हातंस!पोरेंस्ना हाते काठी 
दिसनी मव्हरे मव्हरे व्हडातं
जातस!टेकडावरनी सपाटीवर पोरेस्ना बाप हुभा ऱ्हास!धल्ला-धाकला दोन्हीस्मा साठा व्हयी हुभा ऱ्हास!दुवा.. पोरें- धल्लास्ना गम्मत बाप दखल तं ऱ्हास!🌷

धल्ला जुनाट आनुभव ऱ्हास!कव्हय दूर दखानी दुर्बीण व्हस!आपुन दूरपाउत दखत जावो!ठेचकायी-ठुचकायी हुभा ऱ्हावो!धाकला-धल्ला इचार भारी पक्की दिमुयिनी दोरी व्हवो!🌷

हाद्या-कुद्या मारणारा पोरें धल्ला-पल्लास्नि गम्मत ऱ्हास! पोरेंसंगे खेयता खेयता यांय वऱ्हा चालना जास!वरीस वरीस वाढतं वय धाक्कल्ला मोठा व्हतं ऱ्हातंस!उगता यांयन्हा बोटे कव्व्या सुरकुत्या धरी चालत ऱ्हातस!थकेल-भागेल यांय दिमुयीनां कव्व्यासंगे बोलत ऱ्हातस!धल्लपन पुसक्या बाम कव्हय जुनी दारू फुटावू नई!नव्वा फटुकडा नव्वी दारू धडांगधुम फुटत ऱ्हास!🌷

जुन-नव,जुन-नव पान पलटी व्हत ऱ्हास!उगता यांयना दुपार व्हस!दुपारनां दिमुई व्हस!दिमुई मव्हरे बुडत ऱ्हास!बुडता बुडता 
मांगली पिढीफांन काठी आधारनी देत ऱ्हास!कोनलें आधार दि जगत ऱ्हावो!आधार ली चालत ऱ्हावो!मांगल पान मिटता-मिटता नवं पान हुगडत ऱ्हावो!निसर्गानी मांडेलं खेय हाऊ,चालतं बोलतं वय सऱ्हास!खो खो करी खेय चालस तान्हा मव्हरे धल्ला व्हयी!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*******************
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे.४११०२८)
मो.नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२५मार्च२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)