निरोप
**निरोप***
🌷🌷🌷
********
...नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
"ठेविले अनंते तैसेचि रहावे
चित्ती असो द्यावे समाधान!
तुका म्हणे घालू तयावरी भार
वाहू हा संसार देवापाशी!"
...तुकाराम महाराजांचा अभंग
सतत हृदयात चेतना जागृतीचं कार्य करीत असतात!जीवन मूल्यांचं दर्शन घडवीत असतो!दर्शन घडविता रडवीतही असतातं!जन्म-मरणाचा सिद्धांत सांगून जात जातात!या अनंताचा, आपल्याला न समजलेल्या अनाकलनीय गोष्टींचा अर्थमेळ घालून जात असतात!अर्थबोध करीत असतात!🌷
काल दिनांक २० मार्च रोजी संत तुकाराम बीज होती!बिजोत्सव होता!सहदेह वैकुंठी गमनाचा उत्सव होता!या भूमीवरील नरदेहाच्या निरोपाचा दिवस होता!अभूतपूर्व दर्शनाचा दिवस होता!विरहाला निरोप देण्याचा सोहळा होता!डोळे भरून संत तुकोबांच्या त्या मानवी देहाला हृदयात उतरविण्याचा दिवस होता!🌷
अश्रूंच्या साक्षीने अनंताला निरोप देण्याचा हळवा क्षण येऊन ठेपला होता!विठ्ठल नामाचा जयघोष चालू होता!लाखो भाविकांच्या मुखातून,श्रद्धाळू काळजावर दगड ठेवून तुकोबांच्या स्थिर भावमुद्रेकडे एकचित्त होऊन पहात होते!डोळ्यांच्या तलावातून भाव भावनांचें ढग दाटून आले होते!पापणीच्या खालून अश्रूंचा ओहोळ डोळ्यांना रिता करीत निघाला होता!तुकोबांच्या स्थिर मुद्रेवरून ,मुखातून फक्त विठ्ठल नामाचा गजर सुरू होता!निरोपाचा त्या अवघड क्षणी विरह नकोसा झाला होता!🌷
अनंताचा प्रवास सुरु झाला होता!जड अंतःकरणानें भाविकांनी तुकोबांच्या प्रसन्न देहाकडे पहात! दोन्ही हात जोडत नतमस्तक होत होतें!डोळ्यांच्या तलावातून वैकुंठीस जाणारे तुकोबां अस्पष्ट दिसू लागले!सहदेह वैकुंठीचा, अनंतताचा,भावभक्तीचा तो महामेरू "आम्ही चाललो आमुच्या गावा!आमुचा राम राम घ्यावा!" म्हणत कधीही परत न येण्याच्या वैकुंठीच्या प्रवासात,अनंतात विलीन झाले होते!🌷
बंधू-भगिनींनो!
२०मार्चच्या सकाळी अशाच एका सद्गुरूंना निरोपाचा क्षण आम्ही अनुभवला होता!आयुष्याची काही कर्म माघारी अपुरी ठेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत!आनंदात आयुष्य जगणारी व्यक्ती काहीही न सांगता शेवटच्या निरोपाच्या सोहळ्यात आम्हाला बोलवीतें झाले!🌷
जिभाऊ!.. सर्वांच्या हृदयात बसलेलं व्यक्तिमत्त्व!सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व!त्यांच्या नावाचाचं सन्मान होणारे!त्यांच्या जिभाऊरुपी शब्दांच्या वलयाला साजेसं व्यक्तिमत्त्व!.. श्री गजानन गोविंद महाजन नेहमी आपल्या वयस्कर आईला भेटायला गावाला जात असत!आईचं वय९२वर्षाचं! त्यात आजारपणामुळे अंतरुन धरलेल्या मातोश्रींना सतत गावाला भेटायला जाव लागत असे!जीभाऊंचं वय देखील जवळपास ७०री कडे झुकणारं होतं!🌷
जीभाऊं !.. पुण्यातील अनेक सामाजिक क्षेत्राशी संबंधित होते!स्वतःस घडविणारी व्यक्ती इतरांना देखील घडवीत होती!गावाला गेलेत!अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला अन काहीही न सांगता अनंताच्या प्रवासाला निघून गेले!🌷
बाम्हणे छोटंसं खेड गाव!जळगाव जिल्ह्यातील एरंडोल
तालुक्यातील गावं!संत तुकोबांच्या बीजेच्या दिवशी, २० तारखेला शोक सागरात बुडाले होते!अनंताच्या प्रवासाला निघालेल्या कै.जिभाऊंना निरोपाचा दिवस होता!त्यांच्या ढोली नाल्याच्या तीरावर अनेक बाभळी आहेत!मोठा जनसमुदाय त्या बाबळींच्या सावलीत आश्रयाला उभी होती!उन्हाची तीव्रता जाणवत होती!चंदनी लाकडांनी रचलेल्या निरोपाच्या त्या अंथरुणावर जिभाऊ
अनंतासाठी निजलेले होते!निजधामाच्या त्या शोकाकुल वातावरणात जीभाऊंनां त्यांच्या सुपुत्राने चितेला अग्नी दिला!...ज्वाळा देहाला घेवून मानवी कुटीचा निरोप घेत होत्या!संत तुकाराम बीजेच्या दिवशी जिभाऊ अनंताच्या प्रवासाला निघून गेले!राग, लोभ, मोह मत्सराच्या या दुनियेतून कायमचेचं वैकुंठीच्या प्रवासाला निघून गेले!
निरोप घेतांना माणूस आपल्या कर्माचा ठेवा मागे ठेऊन जात असतो!आपलं संचित मागे ठेऊन जात असतो!आपण गेल्यावर सुद्धा आपलं अस्तित्व टिकवून निरोपाची सांगता होत असते!बंधूनो.. आम्ही देखील श्री पी के महाजन साहेब, श्री किशोर आण्णा वाघ, नकुल महाजन आणि सुधीरजी महाजन जीभाऊंच्या त्या निरोपाच्या क्षणी हजर होतो!डोळ्यात साचलेल्या डोहाला मोकळे सोडत होतो!डोळ्याचा बांध फुटून जीभाऊंच्या स्मृतींस निरोप देत होतो!गजानन गोविंद महाजन नावाचं..जिभाऊ नावाचं!.. मनात कोरलेलं नाव अश्रुत भिजत होतं!निरोपाच्या त्या साश्रुनयनी समयी डोळ्यातून फक्त जिभाऊ दिसत होते!..कडक उन्हात!..अग्नी भडकत राहिला!देहास निरोप देत राहिला!जगणं येथील!कर्म या भूमीवरील मागे ठेऊन जिभाऊ वैकुंठीला जात राहिले!आम्ही निरोप देत राहिलो!🌷
*******************
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
Comments
Post a Comment