बाप पापनीम्हानां डोया

बाप पापनीम्हानां डोया
*****************
🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी

बाप पोटन्या  नजरा
बाप दुन्यानां रें गजरा
दुन्या फेकी देसं दूर
जग करस साजरा...!🌹

बाप नारयना रें गोटा
खोबराम्हानं गोड पानी
फोडी फाडी नारयलें
 कसी थंबी जास वानी..!🌷

बाप खयानी वंडांग
राखनदारीनां रें मेय
घुसे हेंकयनां काटा 
मुकला सरी जास खेय!🌹

बाप लाज रें इकस
कव्हय लंल्हायी उठस
काटा बेसरमी रुतस
 बाप घरसाठे ताठस..!🌹

बाप सावलीनं झाड
कव्हय एखला रडस
उन आंगवर झेली झेली
सुख पोरेंसले धाडस...!🌷

बाप चुलावर तावा
लाल धपस तपस
काला भाकरीनां मोडी
आंसू आड तो लपस..!🌹

बाप चुल्हानं बयतंनं
भुक्या पोट संगे बयेस
 बयी बुयी राख ली
घर सवसार पयेस..!🌹


डोये आंसू तो गायेस
बाप कोपरीम्हा मयेल
पक्का धागावारी वयेल
कोनलें कसा नई कयेल..!🌷

बाप चूल्हानं बयतंन
सोता राख व्हयी बयेस
 जग पुरी म्हनी तयेस
त्यांनं घर  हुभ ऱ्हास...!🌷


बाप डोयांम्हाना आंसू
त्यानं सपन्न मी व्हसू
भाकरीना काला व्हयी
बापनां एकजीव ऱ्हासु..!🌷
**************
🌷🌷🌷🌷🌷🌷
...नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धुळे
ह मु हडपसर, पुणे-४११०२८
मो नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-१९मार्च२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)