चिर तरुण काठ
चिर तरुण काठ
🌷🌷🌷🌷
***********
...नानाभाऊ माळी
***************
लांब गिरणा नदीचा काठ
चौफेर फुलवुनी ठेविला ताट
अखेर वय झाले रें साठ
हिरवळ म्हनतेय दूर हाट्ट!🌷
लिंबू अंगाला टोचितो
ऊस उभ्याने उभ्याने ताठतो
म्हातारा रस्त्यावर रें गाठतो
कमळ भुंग्याला मिटतो!🌷
मका तुर्यावर नाचतो
केळ घोड्याला खेचतो
बुढढा नजरेला रें वेचतो
निरोप गिरणेला पोहचतो!🌷
चिक्कू एकमेका घासती
चिंचा हवेतचं हासती
बाभळी करतें रें दोस्ती
काटे टोचल्यागत भासती!🌷
गिरणामाई झुईझुई वहाते
खान्देश जोडीत पुढे जाते
नयनी सुख-दुःख रें पाहते
कमल नयनी हसत न्हाहते!🌷
बुढढा साठीत जवान झाला
कसा आंब्यास मोहर आला
पिवळ्या पानाचा रें देठ हिरवा
पुढे गिरणेत पोहत गेला!!🌷
*****************
.....नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२७८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-१५मार्च२०२२
Comments
Post a Comment