भाग्याचा अनमोल क्षण
भाग्याचा अनमोल क्षण
🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
****************
बंधू-भगिनींनो!नमस्कार
जेथे जेथे गेलो रोज
चालला सुर्यरथाचा भाता
ओळख झाली देवत्वाची
देव विश्वासाचा हो दाता!!🌷
जगण्यास जिंदगी होती
शरीरास काम भेटले थोडे
गेलो भेटावयास माणसाशी
आनंदी केलेत साफ जोडे...🌷
आनंद झिजवतांना तेथे
मज गाभारी देव भेटला
कष्टा वाचूनी नोहे रें तो
रस्त्यावरी त्यांस गाठला....🌷
शब्द गोड पेरूनी हो
आनंद जन्म घेत राहिला
वाहीलें शब्द फुलें त्यांस मी
तेथे श्रद्धेचा देव पाहिला...🌷
ओळख आपुली खरी का
माणसात देव भेटत गेला
पळत गेलोचं पुढे पुढें मी
भक्तीभाव वाटता झाला...🌷
बंधू-भगिनींनो!
देव कधी स्वप्नात येत असतो का?आलाचं तर श्रद्धेच्या झोळीत विश्वास टाकून जात असतो का? आपला विश्वास स्विकारत असतो का?झोळीचं जर त्याची खाली नसेल तर?विश्वासाचीचं झोळी फाटली असेल तर??झोळीतून एक एक मोती सांडत असतात! मध्येच गळत जात असतात!झोळी कधी भरतचं नाही हो शिवाची!भाव असल्याशिवाय झोळीत पुण्य साचत नाही!भक्ती भावाशिवाय दर्शन होत नसत शिवाचं!माणसात देव भेटत
असतो!शिवत्व भेटत असतं!दैवतात माणूस भेटत असतो! शिव आणि शक्ती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेलें असतात!भक्तीभावासाठी, दर्शनासाठी व्याकुळ असलेला देह स्वतः समर्पित होऊन जीवन रहस्याच्या साध्यासाठी धडपडत असतो!साध्य म्हणजे काय बरं मग?🌷
उत्कट प्रेम जेथे जन्माला येत असतं!चांगल्यातील गुणसंपन्नता विश्वासाच्या चरणी अर्पण होत असते!देवत्वातील समृद्धी एकाच व्यक्तीत आकार घेत असतें! प्राप्त देखील होत असतें!आयुष्यातील भाग्याचा क्षण भेटत असतो!त्यांच्या कार्य कर्तुत्वांमुळे ती व्यक्ती असामान्य वाटू लागते!श्रद्धेने त्याची पूजा केली जात असते!विश्वास दृढ व्हायला लागत असतो!पवित्र नातं माणसाला जीवन संजीवनी देवून जात असतं!जीवन जाणीव बनत असते!माणुसकीचं तत्वज्ञान विचारगर्भात सुंदर हिरवळ फुलवायला लावत असतें!तेथे माणूस भेटत असतो!तेथे माणसातील देव भेटत असतो!तेथे श्रद्धेचा जन्म होत असतो!अढळ विश्वासाचं नातं जन्म घेत असतं!तेथे आनंदाचा अंकुर वर येत असतो!अंकुरलेला विशाल आनंद समाधानाची तृप्ती देत विठ्ठल भक्तीतं तल्लीन होऊन जातं असतो!तेथे माणसातील विठ्ठल भेटत असतो!तेथेच शिवत्व भेटत असतं!तेथेंच शब्द भेटत असतातं!🌷
बंधू-भगिनींनो!
काल गुरुवार होता!भावभक्तीला समर्पित होण्याचा दिवस होता!श्रद्धेस लिन होण्याचा दिवस होता!गुरुदत्तांचा वार होता!गुरू माणसाला घडवीत असतो!संस्काराची पेरणी माणसात करीत असतो!सदमार्गाचा मार्गदर्शक गुरू असतो!मला देखील काल संध्याकाळी गुरूंचं दर्शन झालं!माणसातील देव भेटला!देवातील सद्गुणी माणूस भेटला!अनेक वर्षांपासून साहित्यिक प्रबोधनातून सुंदर जीवन घडविणारे गुरू भेटले!बडोद्यातील आदरणीय गुरुवर्य "दादासाहेब सुधाकरजी भामरे सर" भेटले!त्यांच्या शब्दांनी माणूसपणाची पेरणी केलेली आहे!उत्तम समाज घडविण्याचा ध्यास घेतला आहे!अशा गुरुस प्रणाम केला!🌷
योगायोग असा की भामरे सर बडोद्याहून पुण्याला आले आहेत असा फोन आला!पुण्याला हडपसरला त्यांच्या कन्येकडे,जावयांकडे आले आहेत असे कळले!हडपसर मधील ससानेनगरला आले आहेत असे कळले!..त्यात धवल विंडस्केप या सोसायटीत आले आहेत असे कळले!भाग्यवान मी माझ्या भाग्यात गुरू आलेत पण इतक्या जवळ आलेतं की भेट घडवून आणणारा कोण असावा बरं?..त्याचं विंडस्केप सोसायटीतं माझे मोठे बंधू रहायला आहेत असे मी त्यांना सांगितल्यावर गुरुशिष्य एकजीव झालोत!त्यांना भेटण्यासाठी मी आतुर झालो होतो!माणूस गुरूंना भेटायला आश्रमात जात असतो!दूरदूर जात असतो!पारमार्थिक होत असतो!जर गुरूचं शिष्यांना भेटण्यासाठी जवळ आले असतील तर आनंदाला धुमारे फुटत असतातं!आनंद द्विगुणित होऊन नाचू लागतो!भावभक्तीच्या विरहाच्या क्षण निकट आलेला असतो!अतृतीच्या तृप्तीचा, विरहाच्या भेटीचा तो क्षण असतो!असा तो अदभूत क्षण काल २४ फेब्रुवारीच्या गुरुवारी संध्याकाळी ५-३० ला भाग्य ताटात घेऊन आला होता!🌷
मी परस्पर कामावरून माझे जिवलग मित्र श्री.उदयभान पाटील यांना सोबत घेऊन धवल विंडस्केप सोसायटीत पोहोचलो!आदरणीय दादासाहेब सुधाकरजी भामरे सर शिष्यांच्या स्वागतास सामोरे आलेतं!त्यांच्या पायांवर!चरणांवर श्रद्धेने डोके ठेवले!!नतमस्तक झालो!गुरुवारी गुरूंचे दर्शन घेतलं!आनंदाचा तो क्षण कधीही संपुष्टात येऊ नये असा होता!मन तृप्तीने ओतपोत भरले होतें!एका असामान्य गुरूंचे दर्शन घेत होतो!हृदयी आनंद नाचत होता!🌷
सुधाकरजी भामरे सर रेल्वेच्या नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले आहेत!अगदी लहानपणापासून लेखनाची आवड निर्माण झाली असेल त्यांना!अनेक सामाजिक कार्यात समर्पित हे व्यक्तिमत्त्व मृदुभाषी तर आहेचं, माणसं जोडण्याची कला अवगत असल्याने समाजात प्रिय आहेत!नोकरी बडोदा येथे!स्थानिक गुजराती भाषा!पण महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या पावन पुण्य भूमीमुळे गुजरातमध्ये असूनही गेल्या चाळीस वर्षांपासून मराठीचा ओढ असणारे भामरे सर सतत आपल्या लेखणीतून जीवन जाणिवांच्या जवळी नेत असतात!शब्दांनी फुलं उधळीत असतात!आपल्याला सतत प्रबोधनाच्या,सदमार्गावर नेत असतातं!खान्देशातील मायबोली अहिराणी भाषेतून देखील त्यांची लेखणी शब्द पेरीत आहे!उत्तमोत्तम कथा आणि कवितेतून माणूस घडवीत आहेत!जगण्याची रीत सांगत आहेत!गुजरातेत असूनही मराठीचा बाणा जपणारे भामरे सर स्थानिक अनेक समाजसेवी मंडळावर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत!कार्याचा गौरव वाढवीत आहेत!उत्तम ठसा उंमटवीत आहेत!🌷
पुण्य असावे भाग्यात असं म्हणतात!काल गुरुवारी रात्री ९-३० वाजता आदरणीय भामरे सरांचे पाय आमच्या घराला लागलेत!आमच्या कुटीला लागलेत!आम्ही भाग्यवान आहोत गुरूंचे आगमन आमच्या घरी झाले!गुरुवारी गुरूंच्या पदस्पर्शाने आम्ही उभयता धन्य झालो!गुरूंच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत आम्ही देखील पावित्र्याच्या जवळी गेलो!🌷
🌸***********🌸
...नानाभाऊ माळी
हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२५फेब्रुवारी२०२२
Comments
Post a Comment