तोंडेतोंडनां धसका
तोंडेतोंडनां धसका
*************
...नानाभाऊ माळी
🌷🌷🌷🌷🌷
भाऊ-बहिणीस्वन!
घरेंघर पोरेसोरे मोठा व्हवालें लागांवर आपन समजी लेवानं...आपन त्याले सांगो काय आनी पोरें करतस काय!!चौदा पंधरा वरीसनां पोरे "ना कच्चा ना पक्का ऱ्हातसं!"...त्यास्ले वाटस," मी जे काही करी ऱ्हायनू तेच खरं से!तेचं नेम्मंन से! बाकिनास्ले समजतं नई!मन्ह आयकतस
भी नही!" तो चिडचिड करालें लागी जास!तोंडलें झुलालें लागी
जास!पोरेस्नि उंची डोकालें भिडालें लागावर हात उगारता
येत नई!पोऱ्या मातरं तोंडेतोंड येवान सोडत नई!अश्या परसंग घरेंघरम्हा येत ऱ्हातसं!🌷
जवय खटल म्हनां!आंडोर म्हनां!आंडेर म्हनां!भाऊ-बहीन म्हना!गल्लीनां शेजार पाजारसंगे
म्हनां...सांगेल काम करतस नई व्हनार!काही कारनगुंता येरायेर वर येतस व्हतीन!आयकतस नई व्हनार!घरम्हा निस्ताज दांगडो करी तोंडलें झुलतंस व्हतीनं!
गल्ली मैदान करतस व्हतीन!
निस्ताज तोंडेतोंड येतस व्हतीनं तव्हय शानला-सुरता तर्हे दि देतस!डोकान्ह खापरं व्हवाथिन डोकावर बरफ ठी लेतस!
तोंडायनां भरसे लागाथिन डोया बन करी डोकावर भरीम हात ठी लेतंस!डोकावर थंडगार पानी टाकी लेतस!बठ्ठास ठिकाने आसं
देखालें भेटस!कोठे कमी,कोठे ज्यास्ती ऱ्हास!..थोडा फार इतलाचं फरक ऱ्हास!🌷
"तोंडेतोंड"या सबदम्हा आसं काय वतेंल व्हयी बरं? माले वाटस लब्बर मिक्स करी,एकमझार करी!कालायी-कुलायी!
मयी-मुयी..जुना जानता भाषानां मुकाडदमस्नि सबदेस्नि
गायनी खंगयी-खंगयी 'तोंडेतोंड' सबद नेम्मनं निवाडा व्हयी!जोड- जाड करा व्हयी!हाऊ सबद उज्जी मिर्चिंगमायेक तिखा वाटस!तोंडले झुलुझुलु वाटस!व्हटलें हासहुस वाटस!डोकं उठाड वाटस!पन नको नको भी वाटस!तोंड-व्हटलें झुलंनारा कोनलें गोड वाटी सांगा बरं??आश्या सबदेस्न नाव
काढताचं हाऊ सबद आनी त्या तोंडांया लोके डोयांमव्हरे येतस आनी नको नको वाटतंस🌷
जो तोंडलेतोंड देत ऱ्हास तो जग जिकस थोडी!!!तो तोंडांया म्हणीसनी नवाजी जास!त्यांनगम दखानी कोनी डेअरिंग व्हत नई!पक्का वखरायेल ऱ्हास!त्यांजोडे कोनी औकात चाली का मंग??बठ्ठा त्याले टायतं ऱ्हातसं!नजर लपाडतं ऱ्हातसं!आंग चोरीचारी त्यानं फाईन दूर-पऱ्हा पयेत ऱ्हातसं!त्यान्हा आवाज भी काने नको वाटस!...तोंडेतोंड हाऊ परकार मांगे-पुढे ऱ्हातं नई आखो!डायरेक्ट आमने-सामने व्हत ऱ्हास!डायरेक्ट अटॅक ऱ्हास!ज्यानं लब्बरनं मिक्सिंग एक नंबर व्हयी!व्हट-तोंडम्हा ठासनीनी बंदुकनी गोयी ठेयेल व्हयी तोच तोंडेतोंडलें पार पाडस!तोच जिकत ऱ्हास!🌷
घरमां नवरा-बायकोनां झगडाम्हा कोन जिकत व्हयी बरं सांगा?तुम्हना अनुभव सांगी दखा?बोली देखा!डोकं दुखानी गोयी कोनलेंनी पडस व्हयी बरं?डोकाले घसडी घुसडी मलम कोनले लावनं पडस व्हयी?डोकावर बरफनां तुकडा कोनलें ठेवना पडस व्हयी?..यासन उत्तर ज्या देथिन त्यास्ले थंडगार माथनीनं एक गल्लास पानी फ्री भेटी बरं का भाऊ-बहिणीस्वन! खरं म्हणजे.. सांगी
त्यान्हा वांदा... नई सांगणारनां भी वांदा!...माले माथ्नीनं पानी गल्लासभरी पेवू वाटी ऱ्हायनं बरका भाऊ-बहिणीस्वन!🌷
"तोंडेतोंड"सबदनी मन्ह तोंड शियी टाकेल से!...सांगानी गोठ आसी से.........कालदिन २३ फेब्रुवारीलें प्रसिद्ध मराठी-अहिराणी लेखक!कवी!विचारवंत!प्रबोधनकार!आपला माणूस!मुलाखतकार ..आदरणीय एम.के.भामरे बापूसाहेब यासनी व्हाट्सएपवर दुपार दोन वाजता एक पोस्ट धाडी दिन्ही!.."नानाभाऊ तुम्हनी
सनवार २६ फेब्रुवारी २०२२ नां दिन दिमुईलें ७ वाजता मुलाखत से!तोंडेतोंड से! ध्यानमा ठेवा!"🌷
..या सबदनी माले धडकी भरायी गयी हो!माले उधडं काम द्या, पाटा पाडी टाकसु!लिखान काम द्या.. विषय मांडी अथा-तथा लिखी काड्सु!पर्दान्मांगे कोंत्त भी काम द्या!करीस्नि मोक्या व्हयी जासू!पन डायरेक्ट स्टेजवर यी बोलानं सांग ते माले धडकी भरायी जास!त त.. फ फ व्हयी जास!..आमने-सामनेनां माले घाम फुटालें लागी जास!डोकानां कॅमेराम्हायिन बठ्ठ एकाएक उडी जास!फ्लॅश व्हयी जास !इसरी जास!लीखनारा से!
बोलालें बोलती बन व्हयी जास!आनी आदरणीय बापूसाहेबस्नि गोड बोलीस्नि "मुलाखत"हाऊ सबद फेरफार करी मन्ही "तोंडेतोंड"लेनार सेतस आस सांगी टाकं!कशी तोंड देवू? छातीम्हा निश्चितवार एक एक ठोका पडनार हिरद आते धडक-धडक पयीं ऱ्हायन हो!धडाधड बिन ऑइलनं इंजिन
चालस तसं आवाज करी ऱ्हायन!आदरणीय बापूसाहेब मोठी गिरजदारीमां टाकी दिन्ह आपन माले हो!!🌷
मी शिक्षक नई से!प्रोफेसर नई से!मुरेलं राजकारणी नई से!समाजकारणी नई से!स्टेज डेअरिंग नई से!वकील नई से!डॉक्टर नई से!भाषणलें गवू नई कधी! बापुसाहेब!मन्हा छातीनां ठोका ...ठोक ठोक करी वाढी जायेलं सेतस!आपन मोठं मन करी,मन्ही उज्जी धाकली आणि कव्वी बुद्धीले संमजी लिज्यात!तोंडेतोंडनी आक्सी आदत टाकी लेतू ...ते आजन्हा दिन दखालें भेटता नई!बुद्धीलें जंग लागता नई!तो मक्ता भी खटलानी पहिलेंगचं सोतांगम ली ठेयेल से!तोंडेतोंडलें तोंड देवालें शक्ती दे व्ह खटल बाई!..खाटले नको वाट लाइस माले!मुलाखतम्हा फसावर,पंचायीत व्हवावर.. मांगेथुन तुनमव्हरे तोंडेतोंडनी मुलाखत नको मव्हरे!👏👏💐
*****************
🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२४फेब्रुवारी२०२२
Comments
Post a Comment