चंदनांनुभूतीचा प्रवास

चंदनांनुभूतीचा प्रवास
🌷🌷🌷🌷🌷
*****************
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
माणूस प्रवासी या दुनियेचा
ठिकाण नेमके शोधितो आहे
स्थळ सापडेना कुणास ही
 दुरुन अंधार खोदीतो आहे!.🌷

स्थलांतर रोज होतांना त्यांचे
चालणे अजून थांबले नाही 
पोट पाट अन नात्यांसाठी
थांबणे अजून जमले नाही..🌷

प्रवासी बनून या जगातील
रस्ते अनेक शोधितो आहे
 धावत फिरतो किलोमीटरने
  नाती-गोती सांधितो आहे..!🌷

पृथ्वीहुनही हा फेरा मोठा
धावत फिरत हिंडतो आहे
संवाद साधतोय आपुल्यांशी
हसून रडून भांडतो आहे..!🌷

या संसाराच्या वाटेवरती
प्रवासी अनेक भेटताहेत
नाते पेहरीत जातांना हो
हृदयी अमृत सांडताहेत..!🌷

बंधू-भगिनींनो!
प्रवासातील शब्दात कधी उत्साह ओसंडून वहात असतो!कधी कधी अंगावर काटा देखील येत असतो!प्रवासातं आनंद कधी कधी भेटत असतो!कधीतरी प्रवास देखील दुःखाचा वाटत असतो!कधीतरी आपण सुखावून जात असतो! तर कधी प्रवास आम्हास थकवून जात असतो!प्रवासातं प्रवासी बनून नाते अनेक जोडत असतो!वेळ-काळा सोबत आपण दररोज चालत असतो!

प्रवासी स्थलांतर करीत असतो! प्रवास चैतन्य निर्माण करीत असतो!उत्साहाला जन्म देत असतो!प्रवास स्थळ शोधून गूगलसारखेच कार्य करीत असतो!प्रक्षेपण करीत असतो!प्रवास निवास शोधीत असतो!सतत हलत्या रंग मंचाचं काम करीत असतो!किलोमीटरनें अंतर कापीत प्रवासी स्थळ शोधत असतो!कार्यभार आटोपीत असतो!🌷

बंधू-भगिनींनो!
१० फेब्रुवारी २०२२ ला आम्ही उभयता विवाह निमित्त खान्देशातील दोंडाईचा या शहरात गेलो होतो!पुणे-दोंडाईचा अंतर साधारण ४०० किलोमीटरचें असावे!रात्रीचा प्रवास स्लीपर बसने केला होता!..झोपून गेलो होतो!झोप नसली तरी अंग बिछान्यावर टाकावे अन सकाळी उठून रिलॅक्स व्हावे असा प्रवास झाला होता!सकाळी दोंडाईचा येथे पोहोचलोतं!झोप झाली नसली तरी थकवा ही जाणवत नव्हता!नातेवाईकांकडे अंघोळ उरकून ताजेतवाने होऊन बसलो होतो!🌷

दोंडाईचा महाराष्ट्रात प्रसिद्ध शहर आहे!विख्यात व्यापारी केंद्र आहे!औद्योगिक शहर आहे!तिखट झणझणीत,लालभडक मिरचीचे व्यापारी केंद्र आहे!मक्यापासून तयार होणाऱ्या स्टार्च उत्पादन आणि निर्यात होणारे औद्योगिक कारखाने आहेत!दोंडाईचा शहर तीन राज्यांना जोडणारा त्रिकोण आहे!दोंडाईचा रेल्वेस्टेशनचं शहर आहे!व्यापाराला अन उद्योगाला प्रोत्साहन देणारे उत्तम सामाजिक,राजकीय नेतृत्व दोंडाईचा शहराला लाभले आहे!...विकसित अशा दोंडाईच्या श

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)