साहित्यिक चार धाम यात्रा

साहित्यिक चार धाम यात्रा
*******************
💐👏💐👏💐👏
...नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!नमस्कार!
आपणास ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो!कायद्याचं!घटनेचं!संविधान अंमलबजावणीचा मंगल सुदिन म्हणजेचं २६जानेवारी १९५० चां पहिला दिवस होता!त्यासाठी अनेकांचे रक्त सांडले!देह ठेवले!बलिदानाने रिपब्लिक स्टेटस ऑफ इंडियाच्या एकसंघ भारताचे संविधान कार्यन्वित झाले!या दिवशी संपूर्ण भारतात आनंद पर्व म्हणून साजरा होत असतो!देशाची शान पवित्र तिरंग्याला हृदयातून अभिमानाने सलामी दिली जाते!🌷

देशासाठी देह आणि हृदय अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य वीरांना वंदन करतो!स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करतो!बलिदान देणाऱ्या दृश्य अदृश्य सर्वच महात्यागीनां वंदन करीत असतांनाच नतमस्तक होतो!विविधतेने नटलेल्या विशाल भारतीय संस्कृतीला नमन करतो!"संविधान" या महापवित्र ग्रंथास शत शत कोटी प्रणाम करतो!कायद्याच्या चौकटीत राहून आनंद पेरणाऱ्या,आनंद देणाऱ्या आनंद साजरा करणाऱ्या अखंड भारत भूमीला नमन करतो!🌷

सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या महातपस्वीनां नमन करतो!महायोगीनां नमन करतो!महा त्यागीनां नमन करतो!भारतीय संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या थोर साहित्यिकानां नमन करतो!महाकवीनां नमन करतो!लेखक आणि कलाकारांच्या महायोगदानाला माझं हृदय अर्पित करतो!त्यांच्या पवित्र पायांवर माझं मस्तक ठेवतो!जन्माचं सार्थक झालं असं समजतो!🌷

बंधू-भगिनींनो!
 ७३वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना!आनंद साजरा होत असतांना साहित्य क्षेत्रांत महान योगदान देणाऱ्या!प्रबोधनकारांना!समाज घडविणाऱ्या तपस्वीनां नमन करण्यासाठी.. भेटण्यासाठी आवर्जून त्यांच्या उंबरठ्यावर जाऊन त्यांच्या पवित्र पायांवर माझा माथा टेकवून आलो!🌷

खान्देशातील थोर साहित्यिक!...मराठी आणि अहिराणी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या!प्रबोधन मोती पेरणाऱ्या विख्यात कवी आणि लेखकांचें भरभरून आशीर्वाद घेतलेत!मी परिसस्पर्श होण्यासाठी उतावीळ झालो होतो!माझ्या सारख्या गंजलेल्या लोखंडास त्यांच्या पवित्र स्पर्शाने सोने नाही होता आले तरीस्वतःस पितळ तरी करून घेतले!🌷

भारतीय हिंदू संस्कृतीत चार धामांची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे!देह याचं जन्मी पवित्र करून मोक्षप्राप्तीचां मार्ग सुकर करणारी श्रध्दा आहे!जन्म जन्मांतराचां उद्धार करून घेण्याचा हा मार्ग आपल्या देहातील,मनातील, हृदयातील अपवित्र आणि नकोसा अदृश्य अंधार दूर करून मोक्षाच्या पवित्र स्थानकापर्यंत पोहोचवित असतो!🌷

बंधू-भगिनींनो!
काल प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी साहित्य क्षेत्रातील चारधाम करून आलो!शिरपूर,जि.धुळे येथे त्रिदेव दर्शन झाले!धुळ्यात एक धाम केले!याच देही याचं जन्मी... त्यांच्या पावन दर्शनाने माझं कल्याण, माझं हित साधून घेतलं!त्यांच्या आशीर्वादाने,मार्गदर्शनाने आणि प्रबोधनाने साहित्यिक भूक भागवून घेतली!मन तृप्तीनें काटोकाट भरले होते!जीवन धन्य झाल्याचं समाधान वाटत होतं!मी पवित्र आनंद सोहळ्यात तल्लीन झालो होतो!साहित्य धामाच्या दर्शनानें पावित्र्याच्या निकट पोहोचलो होतो!अमृतात डुबकी मारावी, स्वतःला जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाल्यागत वाटत होतं!साहित्य पंढरीतील महान संतांच्या दर्शनाने थोडाफार लिहिणारा मी एक कणभर जीव पावन झाल्यागत मनसोक्तपणे नाचत होतो!🌷

शिरपूर येथे आपल्या कन्येकडे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध साहित्यिक,चित्रकार संगीतकार आदरणीय आप्पासाहेब विश्राम बिरारी सरांकडे जाऊन आशीर्वाद घेतलेत! आज रोजी त्यांचं वय८१वर्षांचे आहे!त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना सुमधूर गाणी झालेली आहेत!अजूनही त्यांची गाणी कानाला गोडवा देत असतातं!त्यांची चित्र क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर झळकलेले आहेत!अशा या महान योग्याच्या दर्शनाने देह पवित्र झाला असं वाटलं!🌷

शिरपूरलाचं आपल्या कन्येकडे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध साहित्य संशोधक!समीक्षक!कथाकार!उत्तम वक्ता!नाटककार!प्रकाशक!चित्रपट अभिनेते आणि अहिराणी भाषेचं विद्यापीठ ज्यांना म्हणतो ते आदरणीय नानासाहेब सुभाष आहिरे सरांच्या पवित्र चरणांवर नतमस्तक झालो!नानासाहेबांनी भरभरून आशीर्वाद दिलेत!मार्गदर्शन केले!काही महत्वपूर्ण कानमंत्र दिलेत!साहित्याच्या अंगाने लेखक कसा घडत जातो!सखोल अभ्यासू वृत्तीतून लेखन कसे मनाचा ठाव घेत असत!उतावीळपणा सोडून लेखणीतून सुंदर प्रबोधन झाले पाहिजे असं नानासाहेबांनी कानमंत्र दिला!त्यांच्याकडूनभक्त नामदेवांसारखे हक्काने आशीर्वाद मिळवून घेतलेत आणि निघालो!...🌷

बंधू-भगिनींनो!
शिरपूरला स्थायिक असलेले प्रसिद्ध कवी,लेखक,वक्ता, मुलाखतकार,समाजप्रबोधनकार,वर्तमानपत्रा साप्ताहिक पुरवणीत नेहमीचं ज्यांचा स्तंभलेखक असतो असे आदरणीय एम के भामरे बापूसाहेबांच्या घरी जाऊन त्यांच्या पवित्र कानमंत्रांनी मी पवित्र झालो!त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून त्यातून कौटुंबिक समस्येवर अतिशय मौलिक उपाय सांगितलेले आहेत!मतिमंद आणि गतिमंद याविषयी मानसिक उपचारावर अनुभवसंपन्न लेखणीतून मोत्यांसारखे अवतरलेली उत्तम पुस्तकं मानसिक अवस्थेवर उपाय सांगतात!..अशा तपस्वीच्यां दर्शनाने माझा मार्ग सुलभ करून घेतला!🌷

 गरीबीचे चटके घेत रसायन शास्त्र विषयाचे पोस्ट ग्रॅज्युएट M Sc विद्यार्थ्यांचे आवडते प्रोफेसर होणारे!नऊ पुस्तके ज्यांच्या नावावर आहेत असे धुळ्यातील प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय आबासाहेब पाटकरी सर यांच्या निवासस्थानी त्यांच्या दर्शनासाठी पोहोचलो!वयाने थकलेले ८१वर्ष वय असलेल्या पाटकरी सरांच्या लेखणीतून समाज प्रबोधनाची कळकळ दिसून येतो!या वयात ही लेखनाचा जबरदस्त उत्साह तरुण साहित्यिकांनी घ्यावा असा जाणवला!धुळे देवपुरातील प्रसिद्ध श्री समर्थ हॉस्पिटल त्यांच्या सुपुत्राचं आहे!...त्यांच्या लेखणीस नतमस्तक होत बाहेर पडलो!🌷

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देत असतांना साहित्य क्षेत्रातील चार धाम करून मी नानाभाऊ माळी अहंकाराच्या,स्वार्थाच्या मतलबी बेड्या सोडवून घेत होत होतो!जीवनाची सुसंगतीसाठी नवी वाट शोधीत होतो!काल अनुभूतीच्या क्षणांनी माझ्या लोखंडरुपी देहातून पितळी देहात प्रवेश करतानां जाणवत होतं!🌷
   🌹🌷*******🌹🌷
*********************
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११९२८
मो नं-७५८८२२९५४६
        ९९२३०७६५००
दिनांक-२७ जानेवारी२०२२

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

भवरा हिरदनां खोल दल्लान्हा bol