एका आदर्श शिक्षकांची भेट!
एका आदर्श शिक्षकांची भेट!
🌹🌹🌹🌹🌹🌹
...नानाभाऊ माळी
नमस्कार बंधू-भगिनींनो!
जन्म जन्मांतराच्या खेळामध्ये आपली ओळख जन्माला येत असतें!ओळख जन्मत असतांना काही ठसे आपल्या सोबत वाटचाल करीत असतात!अदृश्य ठसे आपल्या चारित्र्याचं, वर्तवणुकीचं,कार्याचं मूल्यांकन करीत असतात!प्रमाणपत्र बनवून त्यांवर अदृश्य ठसा उमटवला जात असतो!तीच आपल्या जन्मसिद्धांताची ओळख असते!ही आदर्श ओळख निर्माण करतांना "चारित्र्य" शुद्ध तुपासारखे असावे!अस्सल असावे!प्रमाणपत्राची बुज राखणारे असावे!जगन्मान्य असावे!२४ कॅरेट सोन्यासारखे असावे!मूल्यांची अमृत पेरणी करणारे असावे!🌹
आपल्या जीवनाचे शिल्पकार .. आई-वडील आणि गुरुजन असतात!गुरू समाजाचा उत्तम आरसा दाखविण्याचे परोपकारी कार्य करीत असतात!विशाल कार्य करीत असतात!आदर्श समाज निर्माणाचं कार्य करीत असतात!प्रबोधनाचं कार्य करीत असतात!सुसंस्काराचं बोट धरून ठेवण्याची क्षमता निर्माण करीत असतात!नजरेतून समाज ओळखण्याची चावी प्रदान करीत असतात!म्हणूनच शिक्षक आदर्श असतातं!🌹
शिक्षक समाजाचे प्रामाणिक शिल्पकार असतात!अशा आदर्श शिक्षकास!गुरुजनास भेटण्याचा सुवर्णयोग माझ्या भाग्यात होता!मी काही कारणास्तव दिनांक२४जानेवारी२२रोजी म्हसाळे ता साक्री जि धुळे येथे!मामांच्या गावी गेलो होतो!जन्म मामांच्या गावी झालेला!शिक्षण ५वी पर्यंत तेथेच झाल्याने!ज्ञानदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत सहज भेटीला गेलो होतो!आज मी वयाच्या साठीत पोहोचलेलो!जन्ममृदेची आणि शाळेची ओढ आणि आस कधीही सुटत नसते!मातीची ओढ जीवाला!माणसाला ओढीत असते!🌹
माझे पाय शाळेतल्या त्या भव्य पटांगणाकडे वळत होते!शाळेतील माझ्या त्या बालपणाच्या खाणाखुणा वर्गांकडे ओढत होत्या!जुन्या काही आठवणींच्या खाणाखुणा नजरेसमो तरळत होत्या!सन १९६९ते१९७३ दरम्यानच्या शाळेतील ते सोनेरी क्षण डोळ्यासमोर तरळत होते!काळ पळत असतो!इतिहासातील पाने फडफड करतं मागे जात राहिली!….आणि समोर शाळेचे शिक्षक श्री देसले सर आणि मुख्याध्यापक श्री खैरनार सर त्यांच्या खोलीत घेऊन गेले!त्यांनी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध कवी श्री नरेंद्र बाविस्कर सर यांचा नामोल्लेंख केला तो ऐकून मलाही समाधान वाटले!ज्यांच्या विषयी कुतूहल होतं!उत्सुकता होती असे आदर्श व्यक्तिमत्वाला दुसऱ्यांदा भेटण्याची संधी मिळाली होती!
आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी खैरनार सर अनेक आदर्श शिक्षकांपैकीचं एक आहेत!
आदर्श विद्यार्थी घडवत असतानां!संस्काराचे धडे देत असतांनाच ते स्वतः घडत गेले!
!लढत गेले!एक एक पायरी चढत गेले!संस्कारीत विद्यार्थी वाढत होते!🌹
एक प्राथमिक शिक्षक ...स्वप्नवत
Doctor in philosophy होतो!डॉक्टर इन फिलॉसॉफी पर्यंत शिक्षणाचं सर्वोच्च शिखर गाठतो!जगण्याची रीत सांगून जातो!शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचें आदर्श होतो!शिकविता शिकविता स्वतः घडत जातो!प्रामाणिक मूल्यांचं परिमाण बनतो!परिमानातून प्रमाण निर्माण करतो!...ते आहेत प्रसिद्ध साहित्यिक आणि कवी नरेंद्र बापूजी खैरनार सर!
माणूस पोटाचा भुकेला असतो!शिक्षक ज्ञानाचा भुकेला असतो!कणकण वेचलेलं ज्ञान मुक्तहस्ते दान देणारे!वाटणारे!वाढणारे शिक्षक ज्ञानाचे पान विद्यार्थ्यांना वाढीत असतात!पानात अनेक विषय वाढून विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा उत्पन्न करीत डॉक्टर खैरनार सर विद्यार्थी घडवीत आहेत!🌹
आज प्रत्येक पालकाची आपल्या पाल्यास नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे!प्रचंड स्पर्धा सुरू आहे!मुलांचं बालपण करपून चालले आहे!स्पर्धेच्या या चढाओढीत शिक्षण पुढे सरकत आहे!विद्यार्थी पुढे सरकतो आहे!शिक्षक-पालक भरकटतं आहेत!अशा जीवघेण्या स्पर्धेला तोंड देता देता विद्यार्थी आणि पालक मेटाकुटीस आला आहे!पण यातून मार्ग काढीत जिल्ह्यापरिषदेतील शाळांमध्ये चिंतामुक्त शिक्षण घेत!निरोगी शिक्षणाचा आरोग्यदायी मंत्र ग्रहण करणारे विद्यार्थी स्पर्धेत टक्कर देत आहेत!अशा जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक आहेत डॉक्टर नरेंद्रजी खैरनार सर!विद्यार्थ्यांना सकस ज्ञानदान करणारे आदर्श शिक्षक जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवीत आहेत!कष्ट घेत आहेत!डॉक्टर खैरनार सर प्रयोगशील शिक्षक आहेत!शाळेत येणाऱ्या गावातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची घरगुती परिस्थितीचा आढावा घेत पालकांची आर्थिक कमकुवत परिस्थितीचा अभ्यास करून त्याचं गरीब विद्यार्थ्यांवर मेहनत घेत आहेत!स्थानिक लोकप्रतिनिधीं शीसमन्वय राखून…त्यांचा संपूर्ण शिक्षक वर्ग मेहनत घेत आहेत!तेच विद्यार्थी शाळेचा नावलौकिक वाढवीत आहेत!🌹
शाळा देखील भाग्यवान असेल!पी एच डी सारखी सर्वोच पदवी प्राप्त शिक्षक शाळेला लाभलेत!..स्वप्न ज्ञानदानाचं असावं!विचार दानाच असावं!स्वतःला झोकून देणार असावं!झपाटलेपण असावं!
पोटतिडकीचं असावं!विद्यार्थी घडवणार असावं!असे
झपाटलेंपन अंगी बाळगलेले डॉक्टर नरेंद्रजी खैरनार सर आम्हा सर्वांना आदर्श आहेत!🌹
दोघेही पतिपत्नी आदर्श जीवन जगणारे!ज्ञानामृत पाजणारे आहेत!उभयतांचे थोरले सुपुत्र भारतातील अग्रगण्य संस्था I I T मध्ये शिक्षण घेत आहेत!तर लहान सुपुत्र कलासक्त असल्याने आर्टस् करतो आहे..अशा ज्ञानवंतांचा सहवास लाभणे मी माझे भाग्य समजतो!धुळे जिल्ह्यातील साक्री येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक २४जानेवारी रोजी काल संध्याकाळी त्यांना भेटावयास गेलो होतो!दोघेही पतिपत्नी मला उत्तम जीवनदर्शक वाटले!..त्यांना नमन करतो!..अशा आदर्श शिक्षाकांच्या चरणांची धूळ माझ्या मस्तकी लावतो!नतमस्तक होत आशीर्वाद घेतो!🌹
🌷🌷*********🌷🌷
...नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो नं ७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-२५जानेवारी२०२२
Comments
Post a Comment