देवा देऊ नकोस स्वार्थ मजला

देवा देऊ नकोस स्वार्थ मजला
💐👏👏💐👏💐💐
***********************
....नानाभाऊ माळी

बंधू-भगिनींनो!
महाभारतातील युद्धात पितामह भीष्म टोकदार बाणांच्या शय्येवर पडले होते!कुरुक्षेत्रावर टोकदार बाणांच्या शय्येवर पडले होते!पितामह महायोद्धा होते!महापराक्रमी होतें!राज्याचा भार वाहक होते!सर्वोत्तम कुटनीतिज्ञ होतें!सदाचारी होते!विचारी होते!ब्रम्हचारी होते!पवित्र गंगामातेचे सुपुत्र होते!ब्राम्हज्ञानी होते!त्यांच्या तोडीस तोड कोणी महायोद्धा नव्हता असे मानले जात होते!तरीही मृत्यूशय्येवर प्रचंड रक्ताळलेल्या वेदना सहन करीत प्राणार्पणासाठी वेळेची वाट पहात होते!देह ठेवण्यासाठी वाट पहात होते!
ते जगण्यासाठी धडपत नव्हते तर तर योग्य वेळ देह ठेवण्यासाठी वाट पहात होते!💐👏

काळ जवळ येत होता तरी इच्छामरणाचा वर सोबतीला घेऊन पितामह क्षरपंजरी पडले होते!देहात तेजस्वी ज्योत अखंड तेवत होती!ती ज्योत म्हणजे साक्षात इच्छामरण होत!!युद्ध चालूच होत!अरुणोदया पासून सूर्यास्तापर्यंत कौरव पांडवात विनाशकारी महायुद्ध सुरूच होत!...दोन्ही बाजूंनी महायोद्धे लढत होते!युद्धात कामी येत होते!वीर योद्धे धारातीर्थी पडत होते!कुरुक्षेत्रावर नीती अनितीचा खेळ सुरू होता!कोण कोणावर विजय मिळविणारं याचा निर्णय होणार होता!प्रचंड मनुष्य हानी होत होती!💐👏

सूर्यास्तानंतर अंधाऱ्या चिमुकल्या मशालीच्या उजेडात, कुरुक्षेत्रावरील रणभूमीवर आपापल्या छावणीतील जखमींवर उपचार सुरू होते!दिवसभर चाललेल्या युद्धाच्या कटू आणि जखमी वेदना कण्हण्याच्या रुपात छावणीतील अनंत कुटीतून येत होता!भयाण रात्र जागतं होती!उद्या कोण योद्धा धारातीर्थी पडेल याचा अंदाज नव्हता!सगळं कसं दैवाधिन होतं!जखमींची विचारपूस करीत,आपल्याकडील सैन्यास मानसिक बळ देत दोन्हीकडील सेनानायक रात्रीच्या अंधारात कुटिकुटीतून फिरत होते!सैनिकांना मानसिक आधार देत होते!💐👏

छावणीतील एका कुटीत बाणांच्या टोकदार शय्येवर वेदना सहन करीत पडलेल्या पितामहाच्यां दर्शनासाठी कुंतीपुत्र येत होते!पितामह भीष्मांनां नमन करीत होते!शरीराने दुर्योधनाकडून लढणारे भीष्म अर्जुनाच्या बाणांच्या शय्येवर पडले होते!तरीही पांडवासं 'विजयी भव'चा आशीर्वाद देत होते!यशस्वी भवचा आशीर्वाद देत होते!अश्रूंना वाट करून देत होते!विनाशकारी महायुद्धाचा शेवट कसा होईल तेही त्यांना ज्ञात नव्हते!तरीही पांडू पुत्रांना आशीर्वाद देत होते!💐👏

बंधू-भगिनींनो!
मानवी जीवन कर्मसिद्धांतातून भरकटत पुढे सरकत आलेलं आहे!कोण कसा आणि केव्हा या भूमीवर देह ठेवेल याचा अंदाज कोण बांधीत असेल बरं?सत्कर्म आणि सदविचारांची अज्ञात किमया आपल्या उद्धारास हातभार लावीत असेल!नितीमूल्यांचा सदजागर जेथे होतो तेथे मानवीमूल्य टिकून असतात!आपण दोलायमान अवस्थेतून जगत असतो!मनाने एकाकडून तर शरीराने अप्रत्यक्ष दुसऱ्या कडून उभा असतो!हा विचित्र खेळ आयुष्यभर आपल्याशी खेळत असतो!💐👏

सत्य कोण आहे?नीतीने जगणारा कोण आहे?स्वार्थी कोण आहे?आपला कोण उपयोग करून घेतोय?आपण कोणाकडे ओढले जातो!मोहाला बळी पडतो!समोरच्याच्या वागचातुर्याला बळी पडत असतो!कुटणीतीला बळी पडत असतो!आपली अवस्था महापराक्रमी पितामह भीष्माचार्य सारखी होऊन बसते!मनाने एकाकडून शरीराने दुसऱ्या कडून!कोणीतरी फासे टाकीत असतो!आपण त्यात गुरफटून जात असतो!जाळ विणणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यात घट्ट जखडले जात असतो!यात एकटा नानाभाऊ माळी अडकत नाहीये!असे अनेक असतील!सरळसोट मार्गावर अनेक अडथळे निर्माण करणारेही असतात!आपण त्यात उगाचंच अडकत जात असतो!फसवले जात असतो!साधेसरळ जगणं कठीण होऊन बसत असतं!💐👏

जन्माला प्रत्येकजण येत आहे!आपल्या कर्तृत्वाने पुढे जात आहे!कर्तृत्वाची व्याख्या कोणती ते समजून येत नाहीये!इतरांना फसवून आपल्या साम्राज्याचा विस्ताराचं कर्तृत्व सिद्ध करणारी धूर्त मंडळी आतून पोखरलेली असतातं!हृदयातील आनंद हिरावून बसलेली असतात!मुखवट्यावरं सत्ता संपत्तीचा जोश दिसत असला तरी रात्रीच्या अंधारात झोपतांना झोप येत नाही!अनितीच्या कृत्याला ती विरोध करीत राहाते!सत्तालोलुप आणि धनलोभी मनुष्य सुखी जीवनाची आशा ठेऊन असतो!झोप त्या आशेवर नजर ठेवून असते!💐💐👏
🌺🌺🌺🌺🌺🌺
सर्व काही पायाशी लोळण घेत आहे मज झोप येत नाही
आरे भिकारी भुकेला रस्त्यावर झोपेच्या अधीन जाई....💐👏

मज नकोरे स्वार्थाने मढवलेली सोनेरी लंका
वेळीअवेळी सगेसोयरे साथ देतील मज ऐका........💐👏

अश्रुथेंब मोजित जाईन रोजच्या रात्री
तुमचाच आधार नानाभाऊस आहे मज खात्री....💐👏

पायात नसले चप्पल रोज चालींन काट्यांवरी
नाते तुटत चालली रें इज्जत येते चव्हाट्यावरी....💐👏

असे जगणे नकोचं देऊस देवा मजला
जेथे स्वार्थाचे बांधिताहेत फक्त मजला..💐👏

माझ्या अश्रूंत तुमचे थेंब ही यावे साथीला
मित्र,नाते स्नेहीजनांचे आशीर्वाद आहेत आज मितीला..💐👏
   *****************
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
....नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो. नं-७५८८२२९५४६
         ९९२३०७६५००
दिनांक-२१जानेवारी२०२२
(काल मित्र गणेशजी चौधरी भेटले...आज रामप्रहरी ३ वाजता सुचलेले विचार धन🌹)

Comments

Popular posts from this blog

सोनं सोडी पित्तयमांगे पयी ऱ्हायनात🌹

मरणा आधी सावध व्हावे!आपले स्वहीत करून घ्यावे!

चला जाऊया गड-किल्ल्यांवर लोहगड किल्ला(भाग-०२)