कविता भावनानां समुंदरनां तय
आहिराणीनं धन💐💐-
******************
💐💐कविता भावनानां समुंदरनां तय💐💐
***********
.....नानाभाऊ माळी
भाऊ-बहिनीस्वन!
आशी म्हन से!....प्रेमम्हा आनी युद्धाम्हा बठ्ठ माफ ऱ्हास!जायेज ऱ्हास!भावनाथिन,मनथिनआनी कायेजथिन करेल पेरेम आनंद देत ऱ्हास!कायेजल्हे थंडक देत ऱ्हास!बयजबरी करेल पेरेम हेरनं कोल्लखटक नाडग ऱ्हास!तर भाऊस्वन!... मंग कविता कशी मव्हरे सरकत ऱ्हास दखा तुम्ही!.....
"लुगडांनां पालोम्हा चांन्या बांध्यात तू!
डोकं खजिस्नि आते गिनती करू नको!
नाकनी नथनी दखी चमकतस डोया..
आते खल्ली अंधाराम्हा चांदल्हे दखू नको!
चालनी निंदालें चत्रायवार सांगू कशी!
रस्तावरचं खुरप्यानां इशारा करू नको!
एकदाव खुल्ल बोलीस्नि उसासा टाकी दे!
कोडाम्हा ठीस्नि तोंड तुन्ह बिवतु नको!
फंदे पडेल कायेज लें मोके सोडी दे आते!
कोपराम्हा ऐकली आंगल्हे हायेद लावू नको!"💐💐
भाऊस्वन!पेरेम कविता आते नवं रूप ली ऱ्हायनी!आंगडे ली ऱ्हायनी!मन जुडत ऱ्हास!..तुटत ऱ्हास!..चढ उतार चालूचं ऱ्हास! जव्हय मन खल्ली तुटी जास तव्हय कविता काय सांगस दखा!मंग....💐💐
तुन्हा आरसाम्हा
तोंड मन्ह दिखावू नई
तोंडले मन्हा आते
पावडर लावावू नई
तून्हा इचार गनं चांगला
आगीन तारावरनां
तठे जावागुंता मी....
कोन्हा साटा लावावू नई!"💐
भाऊस्वन!उगवता सूर्य ताजा ऱ्हास!मननां राजा ऱ्हास!त्यानं नितये हासू कोनल्हे भी भुलाळत ऱ्हास!तो जगनां कान्हा ऱ्हास!तो मोक्या ऱ्हास!त्यानंसंगे राधा ऱ्हास!गवळनी ऱ्हातीस!बाल येडाचाया करी येडीस्ले पूर्त भक्ती नं येड लावत ऱ्हास!पेरेम आस्सल पानीनां झिरा ऱ्हास!भक्तीनां मोह ऱ्हास!तठे वासनालें जागा नई ऱ्हास!भक्ती नी पिरती येडी ऱ्हास!कृष्ण कान्हा खुनाडतं ऱ्हास!...पेरेमनां विरहम्हा मन येडं व्हयी जास!मन बांगे व्हयी जास!मन ठायवर ऱ्हातं नई!..त्या.. त्या.. विरह गीत सेतस!त्या हिरदन्या पेरेम कविता सेतीस!कव्हय प्रेमीकस्ले जोगे आंतस ते कव्हय आल्लग-आल्लग करत ऱ्हासं!काय बदलत ग्या!दिन बदली मव्हरे ग्यात!पेरेमन्ही व्याख्या बदलत ऱ्हायनी!कवी.. सोतांनी सोय दखी पेरेमन्हा आर्थ लावत ऱ्हायना!आर्थ लावत ग्या!कविता सापनांगत कात टाकत ऱ्हायनी!सप्पन दखतं ऱ्हायनी!...कशी ते मंग दखा तुम्ही💐💐.....
मन्ह मन बोली ऱ्हायेतं
ते परं जाई ऱ्हायेतं.....
अंधाराम्हा बठी ऐकलं
उजाये पांघरी ऱ्हायेतं
दूर चालना गऊ मव्हरे
माले रस्ता सापडे नई
भटकेलं गावंनां तिऱ्हाईतं मी
मन्ह्या जखमा कोरी ऱ्हायेतं
वयखी ऱ्हायंतू माले मी
वावधन दिखाये दूर......
पडनात आडा झाडे कितला
मन मस्तीमां जागी ऱ्हायेतं💐💐
अहिरानीं कवितांस्न रुपडं बदली ऱ्हायन!कवितांनी वयख बदली ऱ्हायनी!चरीतरं बदली ऱ्हायनं!बठ्ठी-ठ्ठी अहिरानी कविता जगनं आंगवर लिसनी!..पोट पाट!सवसार आनी बठ्ठा जोजार लिसनी आते ती आल्लग रस्ते मव्हरे पयीं ऱ्हायनी!कसं ते दखा भाऊ-बहिनीस्वन💐.....
"गोया कयात आक्षरं
सबद ठेवातं जीभवरं
सबद वयात ओवीमां
फुलें वाटातं जगभर...
वात व्हयी दिवान्ही
तेल बये सारी रात
भटकी ऱ्हायंतू आंधारामां
दिवा नई मन्हा हात....
सुख दुखनां गये पडं
डोयामां गिरना पांझरा व्हाये
आंसू लिसनी मव्हरे
बठ्ठ तापिलें लयी जाये....💐💐
भाऊस्वन!पायनां नखंफाईन ते डोकानां पलोपाउत झाकायेलं कविता!झाकेलं कविता.....मव्हरे शिरींगारनां नावथिन कवींनी तिन्हा डोकावरनां पलोफाईन ते पायनां नखपाउत बठ्ठ काढी फेकी दिन्ह!मव्हरे कविता बोल्ड व्हत गयी!कवींना कविताम्हा काम वासनान्ही जागा लिधी!आस्सल सोनंम्हा पित्तय घुसी जात ऱ्हायन!कविता भक्ती सोडी मव्हरे शिकार व्हत ऱ्हायनी!बिभत्स व्हत ऱ्हायनी! कविता घरम्हाईन रस्तावर येत ऱ्हायनी!कविता नारीनं रूप से!म्हणीसनी नारी शिकार व्हत ऱ्हायनी!भक्ती, शिरंगारं सोडी शिकारी कवीस्नि शिकार व्हत ऱ्हायनी!बागे बागे कवितालें घरदार,राज महालथिन कोठावर आनी सोडी!....दखा अहिरानीं कविता कशी मव्हरे सरकत ऱ्हायनी!.....💐💐
जांबूये काये लटकेलं वर
वर जाम्हेनं नां घड.....
नजर चगाडी चाली ऱ्हायनी
तू वंडांग नां आड........
भुरं गोरं मुखडं तुंन्ह
तुन्हा कंबरवर टोपलं
वांगा मीरच्या तोडतसं बोटे
कंबर लचकस मूकलं
कामोड्यानां बोंडे .....
दूरथिन वढतस लुगडं
नजर चगाडी दखू नको
छाती व्हवू दे धडधड..💐💐
कविता काय संगे बदलत ऱ्हायनी!काय बदली ग्या! परिस्थिती बदलत गयी!मानूसपन बदली गये...पन भाऊ-बहिनीस्वन तरी भी खान्देश मुलुखनी अहिरानीं कवितानी तिन्हा खानदानीपना,घरंदाजपना,अस्सलबाज सोडा नई!..
हातम्हा इय्या,खुरपे,पावडी,टिक्कम,कुदायी,कुस्सा धरी घर-वावरम्हाचं आडकत ऱ्हायनी!जाई खंदत ऱ्हायनी!बारा वायेतं ऱ्हायनी!कष्ट करत ऱ्हायनी!घरनां बाहेर पडी निंदा-टूपाले जात ऱ्हायनी!वावरम्हा पहेराफाईन ते पिके काढा पाउत घाम गायेतं ऱ्हायनी!तिन्हा हाऊ बठ्ठा जोजार कविताम्हा उतरत ऱ्हायना!💐
काळ बदली ऱ्हायना!कविता बदली ऱ्हायनी!ती घर बदली ऱ्हायनी!लुगडांनी खोय खोसी अहिरानीं कविता बठ्ठा खान्देश बदली ऱ्हायनी!..सोतां रस्ता दखाडी ऱ्हायनी!नजरलें नजर लाई मव्हरे जाई ऱ्हायनी!लुगडां नां पदर डोकावर ली कविता कदर करी ऱ्हायनी!....तरी भी खान्देशी अहिराणी कविता ज्यास्ती वट्टामव्हरे उनी नई!वसरीम्हाचं सोतांलें कोंडी लिध!गावंम्हा पानी नई!तरी भी गुंडाधरी घरले पानी भरत ऱ्हायनी!इचित्र भावनानां तय धुंडत ऱ्हायनी!खाटला झावरी आवरी वावरन्हा तंनम्हा खुरपे खोसी आद्दर तंन उपाडतं ऱ्हायनी!सयंपाक करी,डोकावर भाकरीस्न डालंक धरी मया-वावरनां रस्ते ल्हाये-ल्हाये पयेत ऱ्हायनी!भाऊस्वन तठे..तठे.. कवी.....कविता चाफलंत ऱ्हायना!💐💐तिन्ही सहेल,भोगेलं तिन्ह चिडकंपन कविताम्हा उतरत ऱ्हायनं!उमटत ऱ्हायनं!मानोसनी धवी कोपरी घाम गायेत ऱ्हायनी!...पन अहिराणी कविताम्हा आजून लागटपनां घुसना नई!आजून पावित्र्य जपेल से!...तिले माहेरनी याद सताडत ऱ्हायनी!माय माहेरनां झिरा व्हायेत ऱ्हायना!.....
"हाऊ सवसारनां
माय हूबा से पसारा
बिन पानीनां तंयमये
मन्हा चिडीनां पिसारा
मन्हा हिरदम्हा दाटेल
माय सुख आनी दुःख
सांड माहेरनं आमरूद
मन्ह मूकं झाये मुख💐💐💐
भाऊ-बहिनीस्वन!
अहिरानीं कविताम्हा घाम से!काम से!कष्टानां दाम से!नेम्मंन चिंतन से!कविता कायेजनां हुंकार ऱ्हास!उर्मीन्हा उत्कट आविष्कार ऱ्हास!डोयांनां वल्ला झिर से!कविता समुंदरनां मायेक खोल खोल ऱ्हास!निय्या आभरायलें गवसनी घालत ऱ्हास!आभराय भरी पानी पडत ऱ्हास!पानीन्या कवाड्या भरी-भरी मेघु राया मव्हरे सरकत ऱ्हास!.....💐कवितांगुंता जगणारा आनी मरणारा गनंज देशभक्त कवी या दुन्याम्हा व्हयी ग्यात!त्यासना श्वासम्हा कविता व्हती!कविता कवींना मनम्हा बठेल घोयमी झगडानां आरसा ऱ्हास!कविता कवी मनम्हा बठेल उज्जी बेफाम वांदी ऱ्हास!💐
कविता पडीत आनी नापिकी संस्कृतीवर हमल्ला करत ऱ्हास!सुस्तायेलं समाज रचनावर पह्येरेल शुध्द बी ऱ्हास!कवी मानूस्कीन्या इचित्र मनन्ही भावावस्था कविताम्हा पह्येरतं ऱ्हास!अहिरानीं कविताम्हा आते ते बठ्ठ रुजी ऱ्हायन!उगी ऱ्हायन!उतरी ऱ्हायन!पसरी ऱ्हायन!दखा कस ते.......
तोडेलं नाता जोडी चालनू
ऐकला मव्हरला वाटे चालनू
कुस्टाय लावं घर-दारलें मन्हा
खिडक्यास्ना आलाप सोडी चालनू!
तुम्हना कावा जिकतं ऱ्हायना
मन्हा ऱ्हायेलं दावा सोडी चालनू
दखीस्नि वरथिन चांद हाससं...
बाटतोड जगलें खरं ठी चालनू..💐💐!
कविता इचितरं आंधारानां परवास ऱ्हास!सामाजिक उलथापालथनं भावविश्व कवी चितारतं ऱ्हास!आरसांमायेक प्रतिभा हुबी करत ऱ्हास! हिरदनां उमगेलं सूर आनी मायानी सत्यता टिपत ऱ्हास!ममतान्ह कायेज दिखत ऱ्हास!तिले कविता म्हंतंस!पेटीलें गच्ची झाकनं लायेलं ऱ्हास!मधम्हा कविता ऱ्हास!💐💐
कवितानां सबद ज्वालामुखी व्हत ऱ्हातसं!दुस्मनवर तुटी पडत ऱ्हातसं!...कव्हय झाशीनी राणी व्हयी!कव्हय छत्रपती शिवाजीराजे महाराज यासनी तलवार व्हयी!....कव्हय फुले-आंबेडकर या महान सुपुत्रस्नि लेखनी व्हत ऱ्हायनी!अहिरानीं कविता सानेगुरुजी यासनी माया, ममतानां उजागरा करी ऱ्हायन्यात!
भाऊ बहिनीस्वन!
...वीर रसनी गाथा गानारी कविता देशलें स्वातंत्र्य करी देत ऱ्हास!कविता खल्ली मुईपाउत भिडत ऱ्हास!कव्हय कुयीपाउत व्हडत ऱ्हास!कव्हय आभरायथिन मोठी व्हत ऱ्हास!कव्हय धरनी मायनां गिद्दु पाउत भिडत ऱ्हास!कव्हय नदीनां धबधबा व्हयी धडाधड खाले पडत ऱ्हास!कव्हय तापी नदिनी गरायेलं शांती लिसनी व्हात ऱ्हास!समुंदरनं डोयाफाटे रूप दखाडत ऱ्हास!कविताफांन वाउंलें हिरवये बनाडानी शक्ती ऱ्हास!ताकद ऱ्हास!आखो हिरवये कचाकच कापी समाजलें खाटे करानी भी ताकद कविताम्हाचं ऱ्हास!💐💐
कविता विश्वास ऱ्हास!अनुभवनां रेघलें बोट टेकी हुबी ऱ्हास!रोज मरन नेसी उगनारा श्वासनां !आंसूनां पुकारा ऱ्हास!नियती आनी हारेलपन वर मात करनारी संजीवनी घुटी ऱ्हास!कविता मनन्हा आर्थस्ना सबद... आग्नी गोया ऱ्हास!पले पडेल इघन संगे दोन हात करनारी झगड कुदायी वीरांगना ऱ्हास!आसी अहिरानी कविता बागे बागे मव्हरे सरकी ऱ्हायनी!💐
कविता नवीन विचारलें जलंम देती माय ऱ्हास!घायाळ मनलें आउषध पाजनारी डॉक्टर ऱ्हास!ती चटका देत ऱ्हास!मलम लावत ऱ्हास!कविता सबदव्हरी विचारनां फटका मारत ऱ्हास!घडी जायेलं गोटनां उब्या भडकी ऱ्हास!...हूबा भडकेल जाळ कवितालें जलंम देत ऱ्हास!कविता मनलें पडेल सप्पननां साटा ऱ्हास!...💐
"धल्ला धल्ली संगे जावावर
मव्हरे व्हवू व्हस सासू
आंडरी जायेल सासरन्या
म्हणतीस सासरलेचं ऱ्हासु
माटिंगत माटडांमां आते
घाम कोन गायेत नई
आंगवर काम पडावर
ती नवरसंगे जास पयी
सिखेल सवरेल व्हवू
आते ढूकी दखतं नई
सालभर कमाईनी मातरं
उघडी दखस व्हयी!"💐💐
कविता भावनानां आविष्कार ऱ्हास!कविता सबद पखे लायी काव्य दुन्यामा उडत ऱ्हास!कविता वल्ला श्वासनी धडधड ऱ्हास!
भाऊ-बहिनीस्वन!
कविता लिखी लिखी ठायकीचं कागदवर उमटी ऱ्हास!कविता हिरदनां उमाया ऱ्हास!इचारनां तारा ऱ्हास!बागे बागे चंदरसंगे ख्येयनारी आभरायनी चांदनी बनी जास!कविता मनन्हा नवा इचारनी ज्योत ऱ्हास!💐
कविता ताताबयेता मननां धगधगता आलेख ऱ्हास!कविता पह्येरेल इचार जगाडत ऱ्हास!सुख दुःखनां धागा ईनत ऱ्हास!मनम्हा उठेल भावनास्ना गय्यरा आवेग ऱ्हास!कविता सबद चंद्रमुखी ऱ्हास!
कविता मनम्हानां उस्मायेल घोय ऱ्हास!भावनानां खेय ऱ्हास!भावनान्या लाटा उस्मयेल ऱ्हातीस!मननी तलवार लाटास्वर सपासप वार करत ऱ्हास!तलवार थकत ऱ्हास!भावनानां खेय चालूचं ऱ्हास!भावना थकेल मनलें धीर देत ऱ्हास!कविता मव्हरे मव्हरे सरकत ऱ्हास!💐
कविता मनम्हा बठेल इचारन्ह अक्षर बीज ऱ्हास!मनम्हा कोंब फुटत ऱ्हातसं!फुटेल कोंब सबद व्हयी वर वर येत ऱ्हातसं!मव्हरे मंग ओव्या व्हयी कविता जलंम येत ऱ्हास!कविता कवींना मनन्ही चमत्कृती ऱ्हास!कोनी तिले माय म्हनस!कोनी प्रेमिका म्हनंस!कविता बठ्ठा जगनी अनामिका ऱ्हास!जागे करानं काम ती करत ऱ्हास!कशी ते दखा!.....💐
"पोटे नदीनां पानी खोल
दिखास मुखडा तुन्हा गोल
तो चांद हासे आरसालें
वं तुन्हा गया नदिमा तोल
गोरी गोमटी टायनी तून्ही
तू झाकेलं गोरा पायनी
धुंदी ऱ्हायनी रातभर
तू खडकवर हुबी ऱ्हायनी!"💐
.......मायनं रूप भी कवी दखाडतं ऱ्हास!कविता फुलतं ऱ्हास!कसं ते दखा भाऊ बहिनीस्वन....
"कव्हय वारसारदनी छत्री व्हस मन्ही माय
बठ्ठा देवस्थिन पहिला गुरू से मन्ही माय
दूधवरनी जाड थरी अहो साय मन्ही माय
या जगन्ह चितर मी दख कॅमेरा मन्ही माय!"💐
भाऊ-बहिनीस्वन!
कमी सबदेस्मा सत्य मव्हरे मांडानं काम कविता करत ऱ्हास!कविता जीवननां झोका ऱ्हास!अथानी कैरी तथानी कैरी ती करत ऱ्हास!सुख दुःखनां चंदरसंगे फिरी कविता मनलें उजाये देत ऱ्हास!
कविता फाटेल आभराय शिवत ऱ्हास!झावरी बनायी तिलेचं पांघरी ऱ्हास!त्याम्हां इचार फुलत ऱ्हातसं!इचार पांघरी मनन्ही शक्तीलें जागे करत ऱ्हास!दुःख गियेत ऱ्हास!सुख वाटतं ऱ्हास!जखमी समाज मनल्हे मलम लावत ऱ्हास!सुईन व्हयी कविता सेवा करत ऱ्हास!नवा आशावाद जलंम घालत ऱ्हास!भ्रष्टाचार कलंक से!समाज लें लागेल किड से!कवी समाजलें जागे करत ऱ्हास!लागेल किड कमी व्हत ऱ्हास!कवितानां सबद इस्तू व्हयी कवितालें कांदामायेक भुंजत ऱ्हास!समाजलें वयन लावत ऱ्हास!कविता मन मनम्हा सबद पह्येरत ऱ्हास!नवा इचार नं वार्ग व्हातं ऱ्हास!💐
कविता पिढीजात चालीरीती तोडी नवं वड नं झाड व्हत ऱ्हास!जगलें सावली देत ऱ्हास!आखो काळ मांगे सरकी सरकी जुनाट व्हत ऱ्हास!संगे कविता भी जुनाट व्हत ऱ्हास!कविता कव्हय सुख दुःखनी झाडा झडती ऱ्हास!कविता लपेल, दपेल सबदस्ना आर्थ मांडत ऱ्हास!
सोतांलें मनथिन झोकी देयेल कवी नेम्मंनं 'सबद'हत्यार व्हरी वार करत ऱ्हास!कविता मोठी जगदुन्या देखेलं गुरू माऊली ऱ्हास!सत्यानां ठेका लेयेल ऱ्हास!कविता मन मनन्हा खेय ऱ्हास!कविता वादविवाद ऱ्हास!मोर पिसारा ऱ्हास!कविता आशानां किरण ऱ्हास!💐
कविता आनंदनां फुलोरा, पिसारा ऱ्हास!कायेजलें खल्ली खोल खड्ड पडेल जखमी वेदना ऱ्हास!ती कवीनं हत्यार ऱ्हास!सोतांलें वयखानं ठिकानं ऱ्हास!कविता सवसार शिल्प ऱ्हास!शिल्प कोरी कोरी जीवन अनुभव वाटतं ऱ्हास!पेरेम कविता ते जीवन संदेश देवानं काम करत ऱ्हास!कसं ते दखा.......💐
"लयी जासु तुले लयी जासु
मन्ह मावठीनं घरं......
जशी घोडालें मारी टाच
हूब ऱ्हायन मांगला दार
परनें उनू तुन्हा दारे उनू
हूबा मांडोमां सासरा
जवाई व्हयनू त्यासना
माले दिन्हा... आसरा!"💐💐
कवींनं मन खोल समुंदरनां मायेक ऱ्हास!खोल खोल इचार समुंदरम्हा उतरत ऱ्हास!गंजज साहित्य खजिना शोधी-शोधी तयपाउत भिडी चाफली-चुफली,उसकटी-वासकटी आमरूद धुंडी कविता म्हा टाकत ऱ्हास!कवितालें मोकी चोकी नजर येत ऱ्हास!कविता आभराय बनत ऱ्हास!कवी कवितालें सोनेरी पत्रा चितकाडत ऱ्हास!समाज जागृत व्हत ऱ्हास!सोतां भोगेलं ,दखेलं अनुभवनां आविष्कार कविता ऱ्हास!कवी जीवतोडी उज्जी आपली सोतांनी कविता बठ्ठास्ना मव्हरे मांडत ऱ्हास!मनम्हा उगेल कोंब आल्लग-आल्लग आर्थ लिसनी... नेम्मंनं ठोकी ठाकी कविता मानोसपन देत ऱ्हास!अहिराणी कविता अहिरानीं मनन्हा आंतरिक उमायानी बहिणाबाई नी पहिली पायरी से!जगेल भोगेल खोल मनन्हा भावनिक उमाया से!कविता हुंडुक से!कविता भावनानां समुंदरनां तय से!मी त्या तयलें धुंडी ऱ्हायनू!मी नानाभाऊ माळी दखी ऱ्हायनू!खंदी ऱ्हायनू !बागे बागे खोल जायी ऱ्हायनू!.....तय चाफली ऱ्हायनू!कवितानां तय माले मातरं आजून सापडनां नई!....💐
भाऊ-बहिनीस्वन!
आखो भेटसुत नवा इशय संगे!...तवलोंग राम राम मंडई!राम राम!
💐💐***********💐💐
...........नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह. मु. हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं.७५८८२२९५४६,
९९२३०७६५००
दिनांक-१८नोव्हेंबर२०२०
Comments
Post a Comment