आनंदाची फुलं
#पुष्प_११वे-
🌷आनंदाची फुलं🌷
🌹***********🌹
...#नानाभाऊ_माळी
बंधू-भगिनींनो!
आनंद हा अनेक कारणांनी होत असतो!कारणे भिन्न असतात! अंतर्मनातला आनंद दिर्घ काळ टिकणारा असतो!घरात बाळ जन्माला आल्यावर घरातील- नात्यातील सर्वांनाच आनंद होत असतो!अतुरतेचा परमोच्च क्षण आनंदात रुपांतरीत होत असतो! एखाद्या व्यक्तीने घर,जागा किंवा गाडी विकत घेतल्यावर त्याचा आनंद तराजूत मोजता येत नाही! इतका खुश असतो!आनंदाचे काही क्षण दिर्घ काळ वाट पहायला लावणारे ही असतात!ती आतुरता क्षणोक्षणी हृदयातल्या ठोक्यातून व्यक्तीला जाणवत असते!
मुलाला त्याच्या पसंतीची गाडी घेऊन दिली तर तो त्याच्या देहबोलीतून आनंद व्यक्त करीत असतो!अनमोल आनंद शब्दात बंदिस्त होत नसतो!मिळवण्यातलं!प्राप्त करण्यातील समाधान तृप्तिकडे नेणारे असंतं!आनंद व्यक्तिपरत्वे भिन्न असतो !तरीही अवर्णनीयच असतो! प्रत्येक व्यक्ती सुखाच्या शोधात असतो!कुटुंबं-सुखी समाधानासाठी झटत असतं!एखादा समाज समाज कल्याणातून सुख शोधत असतो! मनुष्य क्षणिक सुखासाठी सर्वस्व पणाला लावत असतो!आनंद मिळविण्यासाठी झटत असतो!
मुलं जन्मल्यावर आपला आनंद गगनात मावत नसतो!तिचं मुलं मोठी झाली...त्यांचा विवाह होणं हा आनंद ही आपण पदोपदी सर्वांसोबत वाटतं असतो!पुढे नातवंडांच्या जन्माने आनंदाला सीमा रहात नाही!पारावर राहात नाही!साखळी कधी ही न संपणारी असते!आनंद होणं !..तोच वाटीत राहणं याच्या पेक्षा मोठं ते सुख कुठलं असणार आहे?
बंधू-भगिनींनो!
प्रत्येक क्षणांत आपण आनंद शोधत गेलो तर मला वाटतं दुःख कधीही जवळ येणार नाही! दुसऱ्यासाठी आपण आनंद निर्माण केला!आनंद दिला तर समोरचा तिचं कृती करणार असतो!ती व्यक्ती सुद्धा आपल्या दारात आनंदाचे फुलचं नव्हे तर आनंदी फुलांचे रोपटंच लावून जाईल!एक द्या!चार घ्या! हया सूत्राने काही पटीनं आनंद आपल्या घरी येत असतो!प्राचीन काळापासून स्वर्गाची कल्पना आपण घेऊन बसलो आहोत! स्वर्ग येथेच आहे!आपल्या अवतीभोवतीचं आहे!आपण शोधला तर सापडतं असतो,
''सुखी क्षणांच्या मोहापाशी काळ थांबला नाही!
दुःखी गोड वेदनांनी बाळ जन्माला येई!
क्षणोक्षणी आनंद करीत गेला घाई!
श्रीमंतीच्या खजिन्यापरी आनंद देतो द्वाही!"
मी रस्त्याने जात होतो! पाठीमागून एक दोन-चाकी हिरोहोंडा गाडी पुढे जातानां दिसली होती!गाडीचे साइड स्टँड खालीच होते! मी पाहिले अन तत्क्षणी जोरात आवाज देऊन चालकाला स्टँड वर घ्यायला सांगितले!जातांना ती व्यक्ती ,'Thank you very much!'असे म्हणून पुढे निघून गेली होती!आभारयुक्त शब्द कानावर पडले होते!मनाला समाधान देऊन गेले!परोपकार त्या क्षणांनी मला परोपकार शिकविला होता!कोणाला तरी मदत केल्याच समाधान चिरकाल टिकणारे होत!हृदयाला पदोपदी ते जाणवतं होतं!परोपकार आनंद देणारे नाजूक पण सुंदर फुल आहे!
"फुल पाखरे हळूच उडती होऊन टुकार!
ती भिन्नरंगी भिन्नपंखी घेऊन आकार!
फुलें हसती झोम्बी मस्ती उगा येरझार!
मधू चाखती फुलपाखरे फुलातील काढती सार!
कधी बैसती खांद्यावरती होती मज भार!
किलकिले करुनि उघडती फुल पाकळ्यांचे दार!"
मनसोक्त आनंद देणे-घेणे फुलपाखरांचा स्वभाव असावा!विविध रंगानी मन मोहीत करणाऱ्या!आनंद देणाऱ्या
फुल पाखरांसारखेचं आपण ही आनंद देत रहावे!सूख पेहरीत जावे!चौफेर मनसोक्त उधळणारे मनातले पारडु,करडू अन वासरू पहात जगावे!क्षणोक्षणी आनंद उगवतं रहावा!जगणं सहज सोपं होत जावं!आपण उल्हसित होत राहावं असं सतत वाटत असतं!आपल्यांसाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे!दुसऱ्यांसाठी वेळ दिला पाहिजे!एकोप्याचे दर्शन सतत होत राहावे!समाजाकडून!...आपल्या देशाकडून आपण खूप काही अपेक्षा ठेवत असतो!आपल्याकडून ही देशाला तशीचं अपेक्षा असते, हे नेमके आपण विसरत असतो!
"एक हातसे देना भाई दुसरे हातसे लेना!
जनम जनम से चलता आया लेना और देना!....." अन पुढे.....
दर्द से सुखून पाया खुशीयो का शिखर आया!
आना जाना चल रहा है कोई समजे ना यह माया!"
समोरचा आनंदी दिसला पाहिजे!आपण आनंदी होऊन नाचू लागू!तोच आपल्या दारी आनंद घेऊन येईल!
"आनंद पेरता पेरता जग झाले सूंदर!
माणसातील आपुलकीने कमी झाले अंतर!"
माणसं जोडणारी जिवंत वेल्डिंग मशीन बनून माणूस वेल्डर झाला तर कित्येक सुखांची यादी जोडली जाईल!सांधली जाईल!प्रेम जन्माला येईल!स्नेह जन्माला येईल!
"जोडीता जोडीता सुख दूर जाईल दुःख!
आनंद वाटीता वटीता लुटायच ते सुख!''
आनंद उपभोगण्यासाठी माध्यम म्हणून नाती-गोती!मित्र परीवार!कुटूंब,समाज,अन अनेक विचारांचा प्रवाह आपल्यासमोर आहे!त्यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवण्यातला आनंद मनाला परमानंद देऊन जातो!त्याची प्रतिक्रिया आपल्या चेहऱ्यावर दिसत असते!आनंदाची उधळण करीत सर्व जीव सृष्टी सर्वानाच आनंदित ठेवत असते!पाऊस, थंडी,पशु ,पक्षी हे जीवसृष्टीचे स्वानंदी प्रवाहक आहेत!
समाज कल्याण हेतू!जनकल्याण हेतू!आनंदाचे लहानसे रोपटे दारोदारी लावले तर व्याधींमुक्त जीवन जगण्याचा तो आनंदच विरळा असेल!समाज घडविण्याच महान कार्य आपल्याच हाती असतं! स्वप्न पूर्ण करण्यासाठी! स्वप्न साकार करण्यासाठी!त्यांना आनंद देण्यासाठी!स्वप्नांतील आनंद प्रत्यक्ष कृतीत यायला हवा! अशा आनंदाच्या महोत्सवाचे आयोजन करीत रहाणे!हातभार लावणे!....यांतूनच आनंदवृक्ष मोठा होतो!फोफावतो!आणि आनंदाचेचं मधुर फळं आपल्याला देत असतो...पुढे सर्वांना आनंदात देत काया टाकून निघून जातो!.....
आज एवढेच पुन्हा भेटूया नव्या विषयांसंगे!...पुढील पुष्पासोबत!तोपर्यंत नमस्कार!
🌹************🌹
........नानाभाऊ माळी,
साहित्यसम्राट,हडपसर,पुणे-४११९२८
मो.नं...७५८८२२९५४६/९९२३०७६५००
दिनांक-०८नोव्हेंबर२०२०
Comments
Post a Comment