साहित्यिक संत"भाग-१
🌹"साहित्यिक संत"भाग-१🌹
********
.....नानाभाऊ माळी
बंधू-भगिनींनो!
चांगले ते घेत आपण२०२० वर्षाचां निरोप घेऊन पुढे निघालो आहोत!२०२१चं मोठ्या उमेदीने स्वागत करीत आहोत!खूप अपेक्षा असतील मनामनात!खूप काही स्वप्न रंगवली असतील आपण!रंगवंलेली स्वप्न रंगीत व्हावीत!सुंदर व्हावीत!क्षणोक्षणी,कणाकणात आनंद भरून राहावा ही अपेक्षा मनात ठेवून पुढे जात असतानाचं एका सहृदय साहित्यिक संताची भेट झाली!....माणूस माणसांशी जोडणारा दुवा म्हणजे हा संत!ते कवी आहेत!लेखक आहेत!समाज सेवक आहेत!माणसाला सत्शीलतेचा मार्ग दाखवणारे गुरू आहेत!🌹
"माणसातील माणूस शोधितो रोज मी
देव मंदिरी संतांचे बांधितो रोज मी!
देव शोधितो गगनी लावूनी सीडी संतांची
गेलीत युगे संतसंगे प्रेम रोज रांधितो मी!"🌹🌹🌷
....बंधूंनो!आपण प्रत्येक माणसात सद्गुणांचा परीस शोधित असतो!लोखंडाला स्पर्श करीत लोखंड उजळीत असतं!लोखंड भाग्याचा क्षण उपभोगीत असतं!स्वतःचं सोनेरी रूप पाहून आनंदीत होत असतं!स्पर्श जीवन बदलीत असतं!स्पर्शाने नवसंजीवनी प्राप्त होत असते!गंजलेल्या लोखंडास सोन्याची झळाळी येत असतें!परीसाने लोखंड चमकत असतं!🌷
माणूस सुद्धा लोखंडासारखाचं आहे!जन्मापासून घडत असतो!कधी खाली पडतं असतो!शरीराने,मनाने कधी जखमी होत असतो!घायाळ होत असतो!जडत घडत पुढे सोन्यागत मडत असतो!संस्कारांची उत्तम शिदोरी सोबत घेऊन समाजात सोन्यासारखा चमकत असतो!...सोन्यापर्यंत पोहचविणारे खरें तर माता-पिता अन गुरुजन असतातं!🌷🌹
बंधू-भगिनींनो!
आपण गुरूमध्येचं देव पहात असतो!गुरू ईश्वराचचं रूपं असतं!ज्ञानमोती वाटणारे!..उत्तम संस्कार करणारे!सर्वचं गुरूजन माणूस घडवीत असतात!जो व्यक्ती गुरुसानिध्याने सद्विचार अंतःकरणातून ग्रहण करतो तो समाज घडवीत असतो!बदल घडवीत असतो!परीवर्तन घडवीत असतो!🌷
आम्ही ही घडतं आहोत!घडता घडता गुरूचरणी लीन होत आहोत!गुरूंनी पेहरलेलं आम्ही घेत आहोत!गुरू संदेश देत असतात सदाचाराचा!सत्संगाचा!असेंच गुरुवर्य आम्हाला सुद्धा भेटलेतं!.....आधी आयुष्य खर्ची घालत गेलो!कोरडा ठाक पाषाण होतो!पण गुरु श्रद्धेचे वाहक असतात!आपल्या मनात खोल डोकावून पहात असतात!मन शांत,एकचित्त झाले तर श्रद्धा फळाला येत असते!.... श्रद्धेचं भल मोठं झाड जवळ असूनही दिसतं नसंत!....अज्ञानी डोळ्यांना कसे दिसणार?आपलं आयुष्य एक रंगपट आहे!आपण रंगपटात काम करत असतो! तरीही एकांतात एकटाचं असतो!सुख शोधत जन्म मरणाची अभिलाषा सुटत नसते🌹
बंधू-भगिनींनो!
झालं असं की..🌷 मी काही कामासाठी पुण्याहून४००किमी लांब धुळे जिल्ह्यातील शिरपूरला गेलो होतो!तालुक्याचं ठिकाण आहे!...शहर सिंगापूरचं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडंतं आहे!..जिल्ह्यात विकसित असं प्रसिद्ध शहर आहे!...जुनी कात टाकून नव्याच्या मागे धावणारं शिरपूर शहर!....अनेक थोर साहित्यिकांची भली मोठी मांदियाळी या शहरात आहे!हिंदी, मराठी,अहिराणी भाषिक कवी, साहित्यिकांचा समृद्ध वारसा शिरपूर शहराला लाभला आहे!🌷
मी एका संतरूपी थोर साहित्यिकांस भेटण्यासाठी आतुर होतो!उत्सुक होतो!भेटण्याची अभिलाषा होती!..... त्या संतांचं!सरस्वती पुत्राचं नाव आहे आदरणीय बापूसाहेब मोहनदास भामरे सर!...काहीजण प्रेमाने फक्त 'बापू'म्हणतात!काहीजण बापूसाहेब म्हणतात!काही व्यक्ती भामरे बापू म्हणतात!काहीजण मोहनदास एम के भामरे बापू म्हणतात!तर अजून काहीजन बापूसाहेब एम के भामरे म्हणतात!🌷
व्यक्ती एकचं!पण प्रत्येकाने आपापल्या हृदयात वसलेल्या खोल श्रद्धेने नवनवीन नावं ठेवलेली!समस्त भक्ताच्या अंतकरणातीलं परिपूर्ण प्रेम त्यात ओतलेलं असतं असे ते साहित्यिकांतील संत होत!त्यांच्या जवळी गेल्यावर मनातल्या हावेची धाव संपली होती!मायेनं भक्तास अलगद उचलून घ्यावे तसे मला जाणवले होते!मी ही त्यांच्या श्रध्दारुपी भवसागरात डुंबत गेलो!हा देह देव श्रद्धेत तादात्म होवू लागला होता!देवाच्या प्राप्तीसाठी मी या संत साहित्यिकांनां शरण आलो होतो!त्यांच्या भेटीसाठी उतावीळ झालो होतो!सर्वांच्या सुखाचे उत्तम औषध गुरूंकडे असतं! बापूसाहेबांना अंतरंगातून गुरू मानलं होत!🌷🙏🌹
अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा वाटाड्या भरकटलेल्यानां वाट दाखवीत असतो!योग्य मार्ग दाखवीत असतो! ज्ञानियांचे असेंच असतं!सत्शील जीवन मार्गाचे मार्गदर्शक असतात!अस्ताला जाणाऱ्या!मावळतीला जाणाऱ्या सुर्याच्या सभोवती सुंदर अशा रंगछटांनी पश्चिम दिशा रंगवीत असतात!🌷
बापूसाहेबांनी अशा अनेक घरात जावून जेष्ठांचे जीवन फुलविले!त्यांना जीवनाविषयी ओढ निर्माण केली आहे!अनेक घरात सुंदर विचारांचे रंग भरले आहेत! त्यांच्या जीवनात आनंद फुलवला आहे!जगण्याविषयी आस जागविली आहे!...वृद्धत्व तसं सहण्यापालिकडचं असतं!त्यात थोडी आपुलकीने!आस्थेने त्यांची विचारपूस केली तर वृद्धांच्या मनातील निराशा गळून पडते!नवचैतन्य त्यांच्यात उभं राहत असतं!...चैतन्याची अमृत घुटी बापूसाहेब वाटीत आहेत!🌷
बापूसाहेबांनी नेमकी हिच दुखरी नस पकडली आहे!...शहरात, खेड्यात जाऊन घराघरात प्रबोधन करीत आहेत!कौटुंबिक तंटे-बखेटे सामोपचाराने सोडवत!घरात वृद्धांना चांगली वागणूक मिळावी अशा तळमळीने त्यांचं जीवन समर्पित केले आहे! बापू घराघरात पोहचले आहेत!!जेष्ठांची!वृद्धांची आस्थेने कोणीतरी विचारपूस करावी एवढीच माफक अपेक्षा ठेऊन एक आधार म्हणून पुढे वाटचाल सुरु ठेवली आहे!..कौटुंबिक हिंसाचार थांबावा!...वृद्धांना मानाचं स्थान मिळावं हीचं बापूसाहेबांची तळमळ!वृद्धांकडे माणूस म्हणून पाहिले पाहिजे!त्यांच्या समस्येचं मूळ शोधत बापूसाहेब कार्यास समर्पित आहेत!अनेक जेष्ठ नागरीक संघातून प्रबोधन करीत जेष्ठांच्या मावळत्या सुर्या समयी अतिशय सुंदर रंग भरीत आहेत!🌷
घरात!कुटुंबात पिढीचं अंतर असतं!पहिल्या पिढीच्या यातना कदाचित दुसऱ्या पिढीच्या नशीबात नसेलही!...विचारांची देवाणघेवाण सहज सोफी व्हावी!...पण कधीकधी ते शक्य होत नाही!..नवीन पिढी मागचा कित्ता गिरविण्यास नकार देत असतात!तेथेच कौटुंबिक कलहास सुरुवात होते!कलह विकोपाला गेल्यावर अनर्थ घडून येतो!...जेष्ठांनी देखील थोडं नमती बाजू घेत!फ्लेगजीबल जगणं स्वीकारावं!...सर्वचं सुकर होत जातं !....असं बापूसाहेबांना वाटतं असतं!वार्धक्याच्या वादळाला सामोरे गेले पाहिजे असं ठणकावून सांगत असतात!🌷
आई-वडीलांचे प्रेम मायेचा!ममतेचा सागर असतो!त्यांच्याप्रती आदर बाळगला पाहिजेचं!त्यांचा छळ करून सुख शोधू नये!तिचं छळ छावणी कालांतराने आपल्यासाठी उभी टाकलेली असते!त्यांच्या शतायुषीसाठी मुलं ईश्वराकडे प्रार्थना करतात तेव्हा त्या घरातील जडणघडण समाजाचा आरसा बनते!प्रेमाचे चार शब्द जरी एकमेकांविषयी उच्चारलेतं तरी अंगात रक्ताचे चार थेंब वाढतात असे बापूंना वाटतं असतं!🌷
...अहंकार मृत्यूचा सखा असतो!भांडण करुन अहंकार जोपासूचं नये!घर मंदिर बनाव!मंदिरातले देव आईवडील असावेत!त्यांची पूजा अंतकरणातून होत राहावी!समाज स्वास्थ्य टिकून राहावे!घराघरात नवीन वर्षात आनंद भरून रहावा याचं शुभेच्छा आदरणीय एम के भामरे बापूंना देवून पुढील कार्यास शुभेछा देतो!
बंधू-भगिनींनो!
बापूसाहेब एका लेखात बसणारे नाहीत!कार्य आकाशाएवढे!लेख चिरुटभर!त्यात तरी कसे बसतील "बापू"? त्यासाठी पुढील लेखाचा प्रपंच मांडणार आहे!तोपर्यंत नवीन२०२१वर्षाचं स्वागत करूया!२०२०वर्षा ला निरोप देऊया🌷🌷🙏😌
*************
......नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं.७५८८२२९५४६
९९२३०७६५००
दिनांक-३१डिसेंबर२०२०/१जानेवारी२०२१चा (मध्य)
Comments
Post a Comment